चालू घडामोडी आणि दिनविशेष - २४ मार्च २०२०

Date : 24 March, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतात करोना व्हायरसवर प्रभावी ठरणारे ‘हे’ औषध वापरण्याची परवानगी :
  • देशभरात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर करोनाला रोखण्यासाठी राष्ट्रीय टास्क फोर्सने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध वापरण्याची शिफारस केली आहे. COVID-19 चा मुकाबला करण्यासाठी इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) राष्ट्रीय टास्क फोर्सची स्थापन केली आहे. इकोनॉमिक टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

  • हायड्रोक्सी क्लोरोक्वीनचा सरसकट वापर करता येणार नाही. इर्मजन्सीच्या प्रसंगात हे औषध वापरता येईल. राष्ट्रीय टास्क फोर्सच्या या शिफारशीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीजीसीआय) मंजुरी दिली आहे.

  • प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये हायड्रोक्सी क्लोरोक्वीन हे औषध करोना व्हायरस विरोधात प्रभावी ठरत असल्याचे अ‍ॅडव्हायजरीमध्ये म्हटले आहे. १५ वर्षाच्या आतील मुलांवर हे औषध वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. अ‍ॅडव्हायजरीनुसार नोंदणीकृत डॉक्टरने प्रिस्क्रिप्शनवर लिहिले असेल तरच हे औषध मिळू शकते.

  • करोना व्हायरसवर ‘हे’ जपानी औषध ठरतेय प्रभावी, चीनचा दावा जपानमधील ताप आणि सर्दीवरील एक औषध करोना व्हायरसच्या रुग्णांवर प्रभावी ठरत असल्याचे चीनच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. द गार्डीयनने हे वृत्त दिले होते.

करोना थांबवणं आता तुमच्या हाती! म्हणत WHO ने केलं भारताचं कौतुक :
  • करोना थांबवणं आता तुमच्या हाती आहे असं म्हणत WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने भारताचं कौतुक केलं आहे. भारतात करोनाग्रस्तांची संख्या ४९९ वर पोहचली आहे. करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून भारताने देशभरातल्या ५४८ जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन घोषित केलं आहे. भारत करोनाचा प्रादु्र्भाव रोखण्यासाठी उचलत असलेली पावलं कठोर असली तरीही योग्यच आहेत. या प्रकारची पावलं उचलणं भारताने सुरु ठेवलं पाहिजे असंही WHO ने सुचवलं आहे. WHO चे कार्यकारी संचालक मायकल जे रेयान यांनी भारताचं कौतुक केलं आहे.

  • काय म्हटलं आहे रेयान यांनी - ” चीनप्रमाणेच भारत हा देखील बहुसंख्य लोक असलेला देश आहे. या देशात करोनाचं जे संकट ओढवलं त्यानंतर आक्रमक निर्णय घेण्यात आले. करोनाशी लढा देण्यासाठी घेण्यात आलेले निर्णय योग्यच आहेत. लोकांच्या आरोग्य जपण्याच्या आणि जीव वाचवण्याच्या दृष्टीने भारताने घेतलेले निर्णय योग्य आहेत. भारताने ज्या प्रमाणे देवी आणि पोलिओ या दोन रोगांशी लढा दिला तसाच लढा देण्याची भारताची वृत्ती आत्ताही दिसून येते आहे. ”

  • भारतात करोनाग्रस्तांची संख्या ४९५ च्या वर गेली आहे. तर महाराष्ट्रात ही संख्या ९० च्या वर गेली आहे. सरकारने सर्वतोपरी काळजी घेण्याचंही आवाहन केलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि पंजाब या दोन्ही राज्यांमध्ये संचारबंदी लावण्यात आली आहे.

देशात करोनाग्रस्तांची संख्या ५०३ वर, तर महाराष्ट्रात १०१ रुग्ण :
  • करोनाग्रस्तांची देशातली संख्या ५०३ वर पोहचली आहे. तर महाराष्ट्रात ही संख्या १०१ वर पोहचली आहे. तर करोनामुळे आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. साताऱ्यात १ नवा रुग्ण आणि पुण्यात ३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातली करोनाग्रस्तांची संख्या १०१ झाली आहे.

  • महाराष्ट्रानंतर सर्वाधिक रुग्ण आढळत आहे ते केरळमध्ये केरळमध्ये ही संख्या ६० च्या वर पोहचली आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ३० राज्यं लॉकडाउन करण्यात आली आहेत. तर महाराष्ट्र आणि पंजाब या दोन्ही राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

भारतातील ३० राज्य पूर्णपणे लॉकडाउन : 
  • देशभरात दररोज करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५०० पर्यंत पोहोचली आहे.

  • महाराष्ट्रात करोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आहेत. जगभरात या विषाणूमुळे आतापर्यंत १६ हजारपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत.

  • जगभरात साडेतीन लाखापेक्षा जास्त करोना बाधित रुग्ण आहेत. करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी भारतातील अनेक राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे लॉकडाउन करण्यात आले आहे. ट्रेन, बस सेवा, मेट्रो सेवा, दुकाने ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहेत. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमान सेवाही बंद आहे.

करोनाग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी दिलं तीन महिन्यांचं वेतन :
  • ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आपलं तीन महिन्यांचं वेतन करोनाग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मुख्यमंत्री मदत निधीत आपलं त्यांनी आपलं वेतन जमा केलं आहे, राज्यातील करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.

  • “नवीन पटनायक यांनी आपलं तीन महिन्यांचं वेतन मुख्यमंत्री मदत निधीसाठी दिलं आहे. करोनासारख्या आजाराचा सामना करणाऱ्यांसाठी मदत म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त असामान्य परिस्थितीत सर्वांचा प्रतिसाद मिळावा अशी मागणीही त्यांनी केली आहे,” असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं. तसंच सर्वांनी यासाठी मदत करावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

  • दरम्यान, ओडिशामध्येही पाच जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं होतं. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी ५ ऐवजी १४ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुरी, नयागढ, जगतसिंगपूर, जाजपूर, भद्रक, बालासोर, ढेंकनाल, संबलपूर, झारसुगुडा या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी सकाळीपासून २९ मार्च रात्री ९ वाजेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त ज्यांना होम क्वारंटाईनचे आदेश देण्यात आले आहेत त्यांच्या घरांवरही शिक्के मारण्याचा निर्णय ओदिशा प्रशासनानं घेतला आहे.

२४ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.