चालू घडामोडी आणि दिनविशेष - २४ जुलै २०२१

Date : 24 July, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
“आम्ही देखील माणसंच आहोत”; NIA कोर्टातील न्यायाधीशांनी ‘ते’ विधान घेतलं मागे : 
  • शहरी नक्षलवाद प्रकरणी वैद्यकीय जामिनाच्या प्रतिक्षेत असताना धर्मगुरू स्टॅन स्वामी यांचा तुरुंगातच अखेर मृत्यू झाला. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान NIA च्या विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांनी काही दिवसांपूर्वी एनआयएला परखड शब्दांमध्ये सुनावले होते.

  • तसेच, स्टॅन स्वामी यांच्या कार्याचा गौरव देकील कोर्टात केला होता. यानंतर देशभरात एनआयएविरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर शुक्रवारी झालेल्या सुनावणीमध्ये विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांनी आपलं ते विधान मागे घेतलं आहे. तसेच, आम्ही देखील माणूसच आहोत, असं देखील त्यांनी यावेळी नमूद केलं आहे.

ICSE च्या दहावी आणि ISC च्या बारावी परीक्षेचा उद्या निकाल : 
  • ICSE दहावी आणि ISC बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. दुपारी ३ वाजता https://www.cisce.org या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. पहिल्यांदाच परीक्षा न घेता दहावी बारावीचा निकाल लागणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना निकाल कधी लागणार?, याबाबत विचारणा केली जात होती. त्यानंतर आता उद्या निकाल लागणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

  • निकाल कुठे आणि कसा पाहाल

  • १) www.cisce.org आणि www.results.cisce.org या दोन संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. होम पेजवर ‘Results 2021’ यावर टॅप केल्यानंतर ICSE/ISC Year 2021 असे दोन पर्याय दिसतील. त्यानुसार त्यावर क्लिक करा. परीक्षार्थीला त्यांचा युनिक आयडी, इंडेक्स क्रमांक आणि स्क्रिनवर आलेला कॅपचा कोड टाकावा लागेल. त्यानंतर निकाल दिसेल. त्यानंतर त्याखाली डाउनलोडचा पर्याय असेल तिथून निकाल डाउनलोड करता येईल.

  • २) एसएमएसच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. परीक्षार्थीला निकालासाठी त्याचा युनिक आयडी टाकून ०९२४८०८२८८३ या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर तात्काळ रिझल्ट दिसणार आहे.

देशात ३५ हजार ३४२ नवीन रुग्णांची नोंद, ४८३ जणांचा मृत्यू : 
  • देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार होतांना दिसत आहे. सलग दोन दिवसांच्या वाढीनंतर रुग्णसंख्या घटली आहे. देशभरात गेल्या चोवीस तासांत करोनाच्या ३५ हजार ३४२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर ४८३ जणांचा मृत्यू झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशात ४ लाख ०५ हजार ५१३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

  • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार देशात ३५ हजार ३४२ रुग्णांची नोंद झाली. तर ३८ हजार ७४० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आज बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. सध्या देशात ४ लाख ०५ हजार ५५३ रुग्णांवर उपचास सुरु आहेत.

  • आतापर्यंत देशात ३ कोटी १२ लाख ९३ हजार ०६२ करोना रुग्ण आढळले आहेत. यापैकी ३ कोटी ०४ लाख ६८ हजार ०७९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर ४ लाख १९ हजार ४७० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. लसीकरणाने देखील देशात जोर पकडला आहे. देशात ४२ कोटी ३४ लाख १७ हजार ०३० लसीचे डोस देण्यात आले आहेत.

कर्मचाऱ्यांच्या मोबाईल वापरांवरही निर्बंध; राज्य सरकारने जारी केली नियमावली : 
  • देशातील पेगॅसस स्पायवेअर प्रकरणावरुन जोरदार चर्चेच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी आपल्या कर्मचार्‍यांना कार्यालयीन वेळेत मोबाईल फोनचा वापर कमी करण्यास सांगितले आहे. सरकारतर्फे लँडलाईन फोन वापरासाठी अधिक सोयीस्कर असल्याचे सांगण्यात आलं आहे. सामान्य प्रशासन विभागाने (जीएडी) जारी केलेल्या आदेशात राज्य शासकीय अधिकारी आणि सरकारी कर्मचार्‍यांनी अधिकृत कामांसाठी आवश्यक असल्यास मोबाइल फोनचा वापर करावा असे सांगण्यात आलं आहे.

  • कार्यालयीन वेळात मोबाइल फोनचा अंदाधुंद वापर केल्याने सरकारची प्रतिमा धुळीस मिळते, असे या आदेशात म्हटले आहे. जर मोबाइल फोन वापरायचे असतील तर टेक्स्ट मेसेजचा अधिक वापर करावा आणि या उपकरणांद्वारे केलेली संभाषणे कमी केली जावीत. कार्यालयीन वेळेत मोबाईलद्वारे सोशल मीडियाचा वापर मर्यादित असावा, असे सरकारने म्हटले आहे.

  • या आचारसंहितेत असे म्हटले आहे की मोबाईल फोनवरील वैयक्तिक कॉलचे उत्तर ऑफिसबाहेर दिले पाहिजे. आसपास लोकं आहेत हे लक्षात ठेवून मोबाइल फोनवर विनम्रपणे आणि कमी आवाजात बोलणे आवश्यक असल्याचेही या आदेशात म्हटले आहे. तर, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या फोन कॉलना जराही उशीर न करता उत्तर द्यायला हवे असे यात म्हटले आहे.

चक दे इंडिया..! मेरी कोम आणि मनप्रीतनं केलं भारतीय पथकाचं नेतृत्व : 
  • जपानची राजधानी टोकियो येथे आजपासून ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली आहे. करोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षासाठी तहकूब करण्यात आल्या. पण एका वर्षानंतर या स्पर्धा खेळल्या जात आहेत.

  • आज या स्पर्धेचा उद्धाटन सोहळा अतिशय दिमाखात रंगला. टोकियो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याच्या मार्चपास्टमध्ये भारतीय तुकडी २१ व्या क्रमांकावर उतरली. यात २२ खेळाडू आणि ६ अधिकारी सहभागी झाले. या मार्चपास्टमध्ये ग्रीकचा पहिला क्रमांक होता.

  • सहा वेळा विश्वविजेती बॉक्सर एम.सी. मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांनी उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकाचे नेतृत्व केले. भारतीय पथकाच्या प्रवेशावेळी पंतप्रधान मोदींनी टाळ्या वाजवून संघाला प्रोत्साहन दिले. १२७ खेळाडूंसह २२८ सदस्यीय पथक टोकियो ऑलिम्पिकमध्ये पाठवण्यात आले आहे.

२४ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.