चालू घडामोडी आणि दिनविशेष - २४ फेब्रुवारी २०२०

Date : 24 February, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
एरोफ्लोट बुद्धिबळ स्पर्धा : विजयासह भरत सुब्रह्मण्यम अव्वल स्थानी : 
  • भारताचा युवा खेळाडू भरत सुब्रह्मण्यम याने एरोफ्लोट बुद्धिबळ स्पर्धेत चीनचा ग्रँडमास्टर जिआन्चो झू याला चौथ्या फेरीत पराभवाचा धक्का दिला. याबरोबरच स्पर्धेत ‘अ’ गटातून सुब्रह्मण्यम याने संयुक्तरीत्या अव्वल स्थान मिळवले.

  • आंतरराष्ट्रीय मास्टर सुब्रह्मण्यम याने पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना ७४ चालींपर्यंत रंगलेल्या लढतीत झू याचा पराभव केला. सुब्रह्मण्यम याचा स्पर्धेतील तिसरा विजय ठरला.

पंतप्रधानांचा ‘जय विज्ञान’चा नारा : 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी बासष्ठाव्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधताना इस्रोच्या ‘युविका’ कार्यकमाचे कौतुक केले. युवा वैज्ञानिकांसाठी हा कार्यक्रम असून त्यात ‘जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान’ हाच दृष्टिकोन अनुसरण्यात आला आहे, असे ते म्हणाले.

  • ‘युविका’मध्ये तरुणांना सुटीच्या काळात अवकाश विज्ञान व अवकाश कार्यक्रमाची माहिती दिली जाते, त्यात त्यांना बरेच शिकायला मिळते, असे पंतप्रधान म्हणाले. श्रीहरीकोटा येथे अग्निबाणाचे प्रक्षेपण हे अभ्यागत सज्जात बसून बघता येते, अनेक शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना ते दाखवले आहे. तेथे १० हजार लोक बसण्याची व्यवस्था आहे. शाळांच्या मुख्याध्यापकांनी मुलांना तेथे घेऊन जावे, असे मोदी यांनी सांगितले.

  • लेह विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या एएन ३२ विमानाने नवा इतिहास रचल्याचे सांगून मोदी म्हटले आहे की, या उड्डाणात १० टक्के जैव इंधन वापरण्यात आले होते.

अमेरिकेत वास्तव्यासाठी अडसर ठरणारा नियम आजपासून लागू : 
  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सोमवारी भारतात येत असतानाच अमेरिकेत कायम वास्तव्यासाठी ग्रीन कार्ड मिळण्यात अनेक अडचणी निर्माण करणारा नियम लागू करण्यात येत आहे.

  • यामुळे एच १ बी व्हिसाधारकांना अडचणी येणार आहेत. या प्रकारचा व्हिसा असलेल्या नागरिकांत भारत व चीनच्या नागरिकांची संख्या मोठी आहे. ज्या लोकांनी अन्न कूपनांसह सार्वजनिक आर्थिक लाभाच्या योजनांचा फायदा घेतला आहे त्यांना ग्रीनकार्ड देण्यात येणार नाही, असे सूचित होत आहे.

  • स्थायी निवास सुविधा म्हणजे ग्रीन कार्ड मागणाऱ्या व्यक्तींना त्यांनी अमेरिकेत आल्यानंतर आर्थिक लाभांच्या योजनांचा फायदा घेतलेला नाही हे सिद्ध करावे लागेल. स्थलांतर धोरण संस्था अहवाल २०१८ अनुसार बांगलादेशातील ६१ टक्के, पाकिस्तानातील ४८ टक्के, भारतातील ११ टक्के कुटुंबांनी आर्थिक लाभांच्या योजनांचा फायदा घेतला होता त्यांची तपासणी केली जाणार आहे.

चीनमध्ये करोना बळी २५०० वर : 
  • करोना विषाणूचा प्रसार ही चीनमधील सर्वात मोठी आरोग्य आणीबाणी असल्याची कबुली अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी रविवारी दिली. चीनमधील करोना बळींची संख्या रविवापर्यंत जवळपास २५०० वर पोहोचली. दुसरीकडे, दक्षिण कोरियात रुग्णसंख्या वाढल्याने अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून, या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी इटली आणि इराणने कठोर पावले उचलली आहेत.

  • चीनमध्ये सुमारे ७७ हजार जणांना करोना विषाणूची लागण झाली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी रविवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. चीनपुढे करोनाचे मोठे संकट उभे ठाकले असून, त्याचा सामना करताना कसोटी लागणार आहे, असे जिनपिंग म्हणाले.

  • चीनबाहेरही करोनाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळत आहेत. दक्षिण कोरियात करोना विषाणूने रविवारी दोघांचा मृत्यू झाला असून, १२३ नवीन रुग्ण सापडले. त्यानंतर दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांनी देशात अतिदक्षतेचा इशारा दिला. चीन वगळता इतर देशांत प्रथमच इतक्या मोठय़ा प्रमाणात करोनाचे रुग्ण सापडले आहेत.

असा असेल ट्रम्प यांचा 36 तासांचा भारत दौरा : 
  • Donald Trump India tour : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प, कन्या इव्हान्का ट्रम्प, जावई जॅरेड कुशनर यांच्यासह सोमवारी पहिल्यावहिल्या भारत भेटीवर येत आहेत. भारत दौऱ्यासाठी ट्रम्प आपल्या सहकाऱ्यासोबत वॉशिंग्टनहून रवाना झाले आहेत. स्थानिक वेळेनुसार ते रविवार रात्री सव्वा आठ वाजता वॉशिंग्टनहून रवाना झाले आहेत. त्यांचे सकाळी ११.४० वाजता अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर आगमन होणार आहे. ३६ तासांच्या दौऱ्यात ट्रम्प अतिशय व्यस्त असणार आहेत. भारताच्या दौऱ्यावर येणारे ट्रम्प सातवे अमेरिकेचे अध्यक्ष असणार आहेत.

  • परराष्ट्र मंत्रालयाने दिलेली माहितीनुसार ट्रम्प यांचं सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी अहमदाब विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर ट्रम्प दाम्पत्याची १२.१५ वा. साबरमती गांधी आश्रमाला भेट देण्याची शक्यता असल्याने तेथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच साबरमती नदीच्या किनाऱ्यावर ट्रम्प आणि मोदी यांच्या प्रतिमा असलेली मोठमोठी होर्डिग्ज लावण्यात आली आहेत.

  • ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुपारी १.०५ वा. अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवरील ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात भाषण होईल. येथे लाखो भारतीयांना ट्रम्प संबोधित करणार आहेत. दुपारी ३.३० वा. ट्रम्प आणि मेलानिया आग्य्राला प्रयाण करतील आणि सायंकाळी ५.१५ वा. जगप्रसिद्ध ताज महालला भेट देतील.

२४ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.