भारतीय हवाई दलातील अधिकारी अभिनंदन वर्धमान यांना संरक्षण दलामध्ये दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च ‘वीरचक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. भारतीय वायुसेनेचे दिग्गज पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना नुकतीच ग्रुप कॅप्टन या पदावर बढतीही देण्यात आलीय.
२०१९ साली भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी लाडऊ विमानांना पळवून लावताना २७ फेब्रुवारीच्या सकाळी आकाशात जो संघर्ष (डॉगफाइट) झाला त्यामध्ये वर्धमान यांनी पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ १६ फायटर विमान पाडले होते. त्यांनी दाखवलेल्या या शौर्यासाठी त्यांचा ‘वीरचक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अभिनंदन यांना सन्मानित करण्यात आलं.
देशाचे रक्षण करताना उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सैन्य दलातील जवानांना परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीरचक्र ही पदके देऊन सन्मानित करण्यात येते.
अभिनंदन यांनी पाकिस्तानवरुद्धच्या हवाई संघर्षादरम्यान दाखवलेल्या अतुलनीय शौर्याची दखल घेत त्यांच्या नावाची ‘वीरचक्र’साठी शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार आज म्हणजेच सोमवारी (२२ नोव्हेंबर २०२१ रोजी) राष्ट्रपती भवनामध्ये पार पडलेल्या समारंभामध्ये झाला सन्मान पुलवामात दहशतवाद्यांनी लष्काराच्या ताफ्यावर भयंकर हल्ला केला होता.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये मोठी घोषणा केलीय.
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार स्थापन झाल्यास पंजाबमधील १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक महिलेला महिन्याला १,००० रुपये देऊ, असं अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलंय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून आश्वासनांचं पाऊस पडताना दिसत आहे.
अरविंद केजरीवाल म्हणाले, “जर २०२२ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पंजाबमध्ये आपचं सरकार स्थापन झालं तर आम्ही १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक महिलेला दर महिन्याला १,००० रुपये देऊ. हे पैसे थेट महिलांच्या खात्यावर जमा होतील.
एखाद्या कुटुंबात ३ महिला असतील तरीही प्रत्येक महिलेला १,००० रुपये मिळतील. कोणत्याही सरकारने महिला सबलीकरणासाठी राबवलेला हा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम असेल.”
आग्नेय आशिय़ात वर्चस्व प्रस्थापित करण्याचा चीनचा कोणताही हेतू नाही, असे प्रतिपादन चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी सोमवारी आसियान राष्ट्रे आणि चीन यांच्या विशेष बैठकीत केले. आसियान राष्ट्रे आणि चीन यांच्यातील संबंधांना ३० वर्षे झाल्याच्या निमित्ताने ही बैठक आयोजित केली आहे. ती आभासी पद्धतीने सुरू आहे.
दक्षिण चिनी समुद्रात सध्या सुरू असलेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर जिनपिंग म्हणाले की, आमच्या छोटय़ा शेजारी देशांना त्रास देण्याचाही आमचा हेतू नाही. असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स अर्थात आसियान राष्ट्रांच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना त्यांनी हा निर्वाळा दिला.
राजनैतिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीला म्यानमारचा प्रतिनिधी उपस्थित नाही. त्या देशातील पदच्युत नेत्या आंग सान सू ची यांना भेटण्याची परवानगी आसियानच्या दूताला नाकारण्यात आली होती. त्यामुळे तेथील लष्करशहा जनरल मिंग आंग लेंग यांना या परिषदेत सहभागी करून घेण्यास नकार देण्यात आला आहे.
आग्नेय आशियात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चीनचे प्रयत्न सुरू असल्याबद्दल जगभरात चिंतेचा सूर व्यक्त होतो. या आरोपाचे चीनने नेहमी खंडन करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषत: संपूर्ण दक्षिण चिनी समुद्रावर चीनने दावा सांगितला असून तो मलेशिया, व्हिएतनाम, ब्रूनेई आणि फिलिपाईन्स यांसारख्या आसियान देशांना मान्य नाही.
दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत यांनी मंगळवारपासून सुरू होणाऱ्या इंडोनेशिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरीचा निर्धार केला आहे.
सिंधू आणि श्रीकांत यांनी ‘सुपर ७५०’ श्रेणीच्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडिमटन स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. शनिवारी या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर या दोघांनीही ‘सुपर १०००’ श्रेणीच्या इंडोनेशिया खुल्या स्पर्धेतील जेतेपदासाठी तयारी सुरू केली.
विश्वविजेत्या सिंधूने स्विस खुल्या स्पर्धेच्या निमित्ताने अखेरची अंतिम फेरी गाठली होती. गेल्या दोन स्पर्धासह एकूण तीन स्पर्धाच्या उपांत्य फेरीपर्यंत तिने मजल मारली; परंतु तिची वाटचाल मर्यादित राहिली. मागील आठवडय़ात अकाने यामागुचीने सरळ गेममध्ये तिला पराभूत केले. इंडोनेशिया खुल्या स्पर्धेत तिसऱ्या मानांकित सिंधूपुढे सलामीला जपानच्या अया ओहोरीचे आव्हान असेल.
सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या नाथांच्या विटा नगरीने देशात स्वच्छतेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात विटा नगरपालिकेने सातत्यपूर्ण कागिरी केली आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेध्ये एक लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत विटा शहराने देशामध्ये प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल नवी दिल्लीतील विज्ञानभवनात झालेल्या सोहळय़ात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विटा नगरपालिकेचा गौरव झाला.
नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई पाटील,माजी नगराध्यक्ष तथा स्वच्छतेचे ब्रॅण्ड अॅम्बेसडर अॅड. वैभव पाटील, मुख्याधिकारी अतुल पाटील, स्वच्छतासेविका शांताबाई हत्तीकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
विटा शहराने कचराक्त शहर व हागणदारीयुक्त शहर ओडीए प्लस प्लस आदि नामांकने देखील मिळवली आहेत. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये देशातील ४३२० शहरांनी सहभाग नोंदविला आहे.
याध्ये विविध घटकांवरती शहराचे मूल्यांकन केले जाते. याध्ये शहर स्वच्छता, रहिवासी व्यापारी व सार्वजनिक भागाची स्वच्छता, सामुदायिक व सार्वजनिक शौचालय स्वच्छता व व्यवस्थापन, डिजिटल सेवा सुविधा, शहराचे सुशोभीकरण घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, मैला व्यवस्थापन, शहरातील विविध आस्थापना व नागरिकांचा सहभाग व जनजागृती, १०० टक्के कचरा वर्गीकरण, प्रोसेसिंग, नाले तलाव व्यवस्थापन व स्वच्छता अशा अनेक स्वच्छताविषयक घटकांचा समावेश केला जातो.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.