चालू घडामोडी आणि दिनविशेष - २३ नोव्हेंबर २०२०

Date : 23 November, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
देशात पुन्हा लॉकडाउन - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली बैठक :
  • करोना लस वाटपासंबंधीचं धोरण तसंच देशातील अनेक राज्यांमध्ये नव्याने करोना रुग्ण आढळू लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्री तसंच राज्याचे इतर प्रतिनिधी आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सलग दोन बैठका होतील.

  • पहिल्या बैठकीत नरेंद्र मोदी करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळू लागले आहेत अशा आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. नंतर इतर राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशासोबत चर्चा असेल. या बैठकीत करोना लस वाटपाच्या धोरणासंबंधी नरेंद्र मोदी चर्चा करतील.

  • दिल्ली तसंच महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पुन्हा नव्याने करोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. देशातील रुग्णसंख्या सध्या दिवसाला ५० हजारापेक्षाही कमी राहत असताना काही राज्यांमध्ये करोना संकट नव्याने उभं राहत असल्याने पुन्हा संचारबंदी लागू केली जात आहे. नरेंद्र मोदींच्या बैठकीत लॉकडाउनसंबंधीही चर्चा होण्याची शक्यता आहे.

ट्विटरवर भारतीय रिझर्व्ह बँकेचा बोलबाला; गाठला १ मिलियन फॉलोअर्सचा टप्पा :
  • रिझर्व्ह बँकेचा ट्विटरवर चांगलाच बोलबाला आहे. कारण बँकेच्या अॅपने ट्विटरवर १ मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठला पूर्ण केला आहे. जो जगातील कुठल्याही मध्यवर्ती बँकेपेक्षा जास्त आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रविवारी आपल्या ट्विटवरवरुन याची माहिती दिली.

  • शक्तिकांत दास म्हणाले, “आरबीआयच्या ट्विटर अकाउंटने आज १ मिलियन फोलॉअर्सचा टप्पा पार केला. आरबीआयमधील आमच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन.” रिझर्व्ह बँक ही एक अशी बँक आहे ज्या बँकेची धुरा जगातील अनेक चांगल्या तज्ज्ञ आणि आघाडीच्या लोकांनी सांभाळली आहे. ८५ वर्षे जुनी असलेल्या या बँकेने कायमच भारताला आणि जगाला आर्थिक उन्नतीचा मार्ग दाखवला आहे.

  • ३० एप्रिल २०२० पासून रिझर्व्ह बँकेच्या फॉलोअर्समध्ये अडीच लाख फॉलोअर्सची भर पडल्याने ट्विटवर ७,५०,००० फॉलोअर्सच्या संख्येने मैलाचा दगड गाठला. २० एप्रिल रोजी आरबीआयच्या फॉलोअर्समध्ये १,३१,००० फॉलोअर्सची भर पडली. मार्च २०१९ पासून ट्विटरच्या फॉलोअर्सच्या संख्येत दुप्पट वाढ झाली. ही संख्या ३,४२,००० हून ७,५०,००० वर पोहोचली.

शंभर वर्षांपूर्वी चोरलेली अन्नपूर्णेची मूर्ती लवकरच भारतात :
  • वाराणसीतील मंदिरातून १०० वर्षांपूर्वी चोरण्यात आलेली आणि कॅनडातील एका विद्यापीठाच्या कला दालनात ठेवण्यात आलेली अन्नपूर्णा या हिंदू देवतेची मूर्ती कॅनडातील संबंधित विद्यापीठ लवकरच भारताकडे सुपूर्द करणार आहे.

  • मॅकेन्झी कलादालनात रेजिना विद्यापीठाचा वस्तुसंग्रह असून तेथे सध्या ही मूर्ती ठेवली आहे. जवळपास १०० वर्षांपूर्वी ही मूर्ती चुकीने नेण्यात आल्याचे मॅकेन्झीच्या संग्रहालयाची पाहणी करीत असताना दिव्या मेहरा या कलाकाराच्या निदर्शनास आले, असे विद्यापीठाने एका निवेदनात म्हटले आहे.

  • अन्नपूर्णा देवीची ही मूर्ती आभासी पद्धतीने भारतात पाठविण्याचा समारंभ १९ नोव्हेंबर रोजी पार पडला. मात्र आता ही मूर्ती लवकरच भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ही मूर्ती अधिकृतपणे भारतात पाठविण्यासाठी विद्यापीठाचे अंतरिम अध्यक्ष आणि कुलगरू डॉ. थॉमस चेस यांनी कॅनडातील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांच्याशी दूरचित्रसंवाद साधला.

कार्बनपदचिन्हे ३० ते ३५ टक्के कमी करण्याचे उद्दिष्ट- मोदी :
  • येत्या काही काळात भारत कार्बन पदचिन्हांचे (कार्बन फूट प्रिंट) प्रमाण ३० ते ३५ टक्के कमी करण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल करील, अशा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.

  • ते म्हणाले, की या दशकात नैसर्गिक वायूचा वापर चार पटींनी वाढवला जाणार असून तेलशुद्धीकरण क्षमता येत्या पाच वर्षांत दुप्पट करण्यात येईल.

  • पंडित दीनदयाळ उपाध्याय पेट्रोलियम विद्यापीठाच्या आठव्या पदवीदान समारंभप्रसंगी  ते दूरसंवादाच्या माध्यमातून बोलत होते.

  • पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे, की ‘आज देश कार्बन पदचिन्हे ३० ते ३५ टक्के कमी करण्याच्या दिशेने जात आहे. मी जगाला जेव्हा हे सांगतो तेव्हा त्यांना आश्चर्याचा  धक्का बसतो. पण आम्ही ते करू  शकतो. नैसर्गिक वायूचा वापर वाढवून व तेलशुद्धीकरण प्रक्रिया क्षमता वाढवून हे  शक्य आहे.

  • ठरावीक मुदतीच्या आधीच भारत अक्षय ऊर्जा निर्मिती प्रक्रिया पूर्ण करील. आज सौर ऊर्जेचा दर युनिटला २ रुपयांपेक्षा कमी आहे, जो आधी युनिटला १२ ते १३ रुपये होता. सौरऊर्जा हा देशाचा अग्रक्रम आहे. आम्ही १७५ गिगॅवॉट ऊर्जा सौरमाध्यमातून निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ते २०२२ च्या आधीच पूर्ण केले जाईल. अक्षय ऊर्जेचे ४५० गिगॅवॉटचे उद्दिष्ट २०३० पर्यंत किंवा त्याआधीच आम्ही पूर्ण करू.’

IPL आयोजनातून BCCI मालामाल, कमावले तब्बल **** कोटी; आकडा वाचून तुम्हीही व्हाल थक्क :
  • भारतात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन युएईत केलं. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात रंगलेल्या सामन्यांत मुंबई इंडियन्सने स्पर्धेवर आपलं वर्चस्व राखलं.

  • IPL 2020 च्या आयोजनातून बीसीसीआयही मालामाल झालंय. तेराव्या हंगामातून बीसीसीआयने तब्बल ४ हजार कोट कमावले आहेत. बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी इंडियन्स एक्स्प्रेसशी बोलताना माहिती दिली. कमाईच्या बाबतीतच बीसीसीआय मालामाल झालं नसून गेल्या हंगामाच्या तुलनेत आयपीएलचे सामने टिव्हीवर पाहणाऱ्या प्रेक्षकसंख्येतही २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

  • धुमाळ यांनी बीसीसीआयने कमावलेल्या ४ हजार कोटींचं वर्गीकरण करुन सांगायला नकार दिला. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात दुबई, अबु धाबी आणि शारजा या तीन मैदानांवर हे सामने रंगले.

  • “तेराव्या हंगामाला सुरुवात होण्याआधी टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचला करोनाची लागण झाली होती. त्यानंतर अनेकांनी आम्हाला आयपीएलचं आयोजन करुन नका असा सल्ला दिला. आमच्यातही थोडं संभ्रमाचं वातावरण होतं. खेळाडूंना काही झालं तर काय करायचं ही भीती मनात होती. परंतू जय शहा हे ठाम होते आणि स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली जाईल असा त्यांना विश्वास होता.”

२३ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.