चालू घडामोडी आणि दिनविशेष - २३ जून २०२१

Date : 23 June, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जनतेला संशयाची लस देऊ नका; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सुनावलं :
  • लस पुरवठ्यावरून दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार पुन्हा एकदा आमनेसामने आलं आहे. केंद्र सरकारकडून दिल्लीला व्यवस्थित लस पुरवठा होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.

  • असं असेल तर लसीकरणाला १५-१६ महिने लागतील, असंही सिसोदिया म्हणाले. दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या ट्विटला केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी उत्तर देत दिल्ली सरकारला सुनावलं. दिल्लीच्या लोकांना संशयाची लस देऊ नका, असा टोलाही हर्ष वर्धन यांनी लगावला.

  • काही लोक खोटी माहिती स्वीकारतात आणि खोटी माहिती पसरवतात, असं म्हणत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचा एक व्हिडीओ ट्विट केला होता. या ट्विटवरून सिसोदिया यांनी भूमिका मांडत काही सवाल केले होते. मनिष सिसोदिया यांनी केलेल्या ट्विटनंतर हर्ष वर्धन यांनी पुन्हा ट्विटमधून त्याला उत्तर दिलं.

देशात संपूर्ण लसीकरणासाठी २०७ दिवस :
  • भारतात सोमवारी ८५ लाख जणांचे लसीकरण करण्यात आले, ही संख्या ५ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या लसीकरणाच्या जवळपास दुप्पट आहे. या नव्या विक्रमामुळे भारतात ऑगस्ट महिन्यापर्यंत दररोज एक कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे ठरविलेले उद्दिष्ट पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

  • जर दररोज ७५ लाख लोकांचे लसीकरण करण्याचे ठरविण्यात आले तर १८ वर्षांवरील सर्व प्रौढांचे म्हणजे ९४.०२ कोटी लोकांचे लसीकरण होण्यास किती कालावधी लागेल?

  • देशातील बहुसंख्य जणांचे अद्याप लसीकरण झालेले नाही, २० जूनपर्यंत २२.८७ कोटी लोकांचे अंशत: लसीकरण झाले आहे तर ५.१२ कोटी लोकांचे पूर्णत: (दोन्ही मात्रा) लसीकरण झाले याचा अर्थ २८ कोटी लोकांचे अंशत: अथवा पूर्णपणे लसीकरण झाले.

  • याचा अर्थ देशात अद्याप जवळपास ६६.०२ कोटी लोकांचे लसीकरण करावे लागणार आहे, म्हणजे ६६.०२ कोटी मात्रांची अंशत: लसीकरणासाठी तर १३२.०४ मात्रांची पूर्ण लसीकरणासाठी गरज आहे. जर आता देशात दररोज ७५ लाख जणांचे लसीकरण करण्यात आले तर संपूर्ण प्रौढ व्यक्तींच्या अंशत: लसीकरणासाठी ८८ दिवसांचा कालावधी लागणार आहे.

आता ‘डेल्टा प्लस’चा धोका :
  • देशाला आता करोनाच्या उत्परिवर्तीत ‘डेल्टा प्लस’ विषाणूचा धोका आहे. ‘डेल्टा प्लस’ हा चिंताजनक विषाणू असून, त्याचे रुग्ण आढळलेल्या महाराष्ट्रासह केरळ, मध्य प्रदेश या राज्यांना केंद्राने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

  • ‘डेल्टा प्लस’ हे करोनाचे ‘निरीक्षणाधीन उत्पर्विन’ असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत म्हटले होते. मात्र, ‘इन्साकॉग’ने ‘डेल्टा प्लस’ हे ‘चिंताजनक उत्परिवर्तन’ असल्याची माहिती दिल्याचे आरोग्य मंत्रालयाने नंतर जाहीर केले.

  • केंद्राच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळसह देशभरात ‘डेल्टा प्लस’चे २२ रुग्ण आहेत. त्यात महाराष्ट्रातील १६ रुग्णांचा समावेश असल्याचे केंद्राचे म्हणणे असले तरी महाराष्ट्र सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यात या नव्या विषाणूचे २१ रुग्ण आहेत. त्यामुळे देशभरातील रुग्णसंख्या अधिक असण्याची शक्यता आहे. ‘डेल्टा प्लस’च्या फैलावाचा वेग अधिक असल्याचे मानले जाते.

  • महाराष्ट्रात आढळलेल्या ‘डेल्टा प्लस’च्या २१ रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असल्याचे प्राथमिक पाहणीत आढळले आहे. या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे आणि बाधित रुग्णांचे नमुने तपासण्यांसह सर्वेक्षण आरोग्य विभागाने सुरू केले आहे.

करोनामुक्त गावांतील दहावी-बारावीचे वर्ग सुरू करा :
  • राज्यातील करोनामुक्त झालेल्या किंवा भविष्यातही करोनामुक्त राखण्याची खात्री देतील, अशा गावांतील इयत्ता १०वी आणि १२वीचे वर्ग सुरू करण्याची शक्यता पडताळून पाहा आणि शक्य असेल तेथे वर्ग सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी हिरवा कंदील दाखविला.

  • १२वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाबाबतचा प्रस्ताव लवकर सादर करण्याचे आदेशही त्यांनी शालेय शिक्षण विभागास दिले. शिक्षकांना रेल्वे प्रवासाला मुभा देण्याची शिक्षण विभागाची मागणी मात्र मान्य झाली नाही.

  • बारावीचे मूल्यांकन तसेच १०वी आणि १२वीचे वर्ग सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक झाली. शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षां गायकवाड यांच्यासह शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांपासून हिरवेबाजारसह करोनामुक्त असलेल्या गावांमध्ये १०वी आणि १२वीचे वर्ग सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

  • शिक्षण विभागाने ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणल्यानंतर जी गावे मागील काही महिन्यांपासून करोनामुक्त आहेत आणि भविष्यातही गावे करोनामुक्त ठेवण्यासाठीच्या उपाययोजनांचे कडक पालन करत गाव करोनामुक्त राखण्याची खात्री ग्रामस्थ देतील अशा गावांमधील १०वी तसेच १२वीचे वर्ग सुरू करण्याबाबत विचार करायला हरकत नाही. मुख्य विषयांपुरते वर्ग सुरू करण्याची शक्यता पडताळून पाहा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

गेल्या १० वर्षांतील महाराष्ट्राचे तापमान सरासरीपेक्षा अधिक :
  • कमी झालेला हरितपट्टा, वाढलेले काँक्रीटीकरण, औद्योगिकीकरण इत्यादी कारणांमुळे गेल्या काही वर्षांच्या कालावधीत वातावरणाचा समतोल ढासळला असून यामुळे जागतिक तापमानात १.२ अंश सेल्सिअस वाढ झाली आहे. महाराष्ट्राचे तापमानही गेल्या १० वर्षांत सरासरीपेक्षा अधिक राहिले आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक हवामान संघटनेने २१ जूनपासून ‘शो युअर स्ट्राइप्स’ मोहीम सुरू केली आहे.

  • ‘जागतिक हवामान संघटने’ने १८५० ते २०२० या कालावधीतील जागतिक तापमानाचा आलेख जाहीर केला आहे. यात सुरुवातीची अनेक वर्षे तापमान सरासरीपेक्षा कमी दिसून येत आहे; मात्र गेल्या साधारण १० ते २० वर्षांत तापमान सरासरीपेक्षा अधिक दिसू लागले आहे. या काळात जागतिक तापमानात १.२ अंश सेल्सिअस वाढ झाली आहे.

  • महाराष्ट्राचा विचार करता प्रामुख्याने १९०१ ते २०२० या कालावधीत तापमान वाढीस सुरुवात झाली आहे. गेल्या १० ते १५ वर्षांत परिस्थिती अधिक बिकट बनली असून या काळात तापमान सरासरीपेक्षा अधिक राहिले आहे.

  • १९९० नंतर जागतिकीकरणामुळे वातावरणाचे चित्र बदलले. शहरांमध्ये औद्योगिकीकरण वाढले. त्यामुळे शहरांतील हरितपट्टे कमी झालेच; पण गावांकडून शहरांक डे मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर झाल्याने गावाकडील शेती आणि झाडेही कमी झाली. परिणामी, वातावरणाचा समतोल बिघडून तापमान वाढ होत आहे, असे ‘स्कायमेट’चे महेश पलावट यांनी सांगितले.

२३ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.