चालू घडामोडी आणि दिनविशेष - 23 जानेवारी 2024

Date : 23 January, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अयोध्या लवकरच सर्वात मोठे धार्मिक पर्यटन केंद्र
  • अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर हे शहर आता देशातील सर्वात मोठे धार्मिक पर्यटन केंद्र होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या शहराला वर्षांला किमान पाच कोटी पर्यटक भेट देऊ शकतात, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अमृतसर येथील सुवर्ण मंदिर आणि तिरुपती बालाजी मंदिरापेक्षाही अयोध्येतील राम मंदिरात अधिक भाविकांचा ओघ असण्याची शक्यता आहे.
  • ‘ब्रोकरेज जेफरीज’ने एका अहवालात अशा प्रकारचा अंदाज व्यक्त केला आहे. नवे विमानतळ, सुधारित रेल्वे स्थानक, शहराचे सुशोभीकरण आणि पायाभूत सुविधा यांवर मोठया प्रमाणात खर्च केल्याने उत्तर प्रदेशातील हे शहर आगामी काळात देशातील सर्वात मोठे धार्मिक पर्यटन केंद्र असेल. अयोध्येचा कायापालट करण्यासाठी सुमारे एक हजार कोटी डॉलर खर्च करण्यात आले असून पर्यटकांसाठी नवी हॉटेल व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने पर्यटकांचा ओघ वाढणार आहे.

नवे विमानतळ, सुधारित रेल्वे स्थानक, शहराचे सुशोभीकरण यातून अयोध्या आगामी काळात देशातील सर्वात मोठे धार्मिक पर्यटन केंद्र असेल.

  • धार्मिक पर्यटन हा अजूनही भारतातील पर्यटनाचा सर्वात मोठा भाग आहे. अनेक लोकप्रिय धार्मिक केंद्रे पायाभूत सुविधांतील अडथळे असूनही वर्षांला एक ते तीन कोटी पर्यटकांना आकर्षित करतात. त्यामुळेच पायाभूत सुविधांसह नवे धार्मिक पर्यटन केंद्र तयार केल्याने त्याचा मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. पर्यटनामुळे अयोध्येत आर्थिक व धार्मिक स्थलांतर वाढेल, असा अंदाज असून हॉटेल, हवाई वाहतूक, आदरातिथ्य, पर्यटन यांसह विविध क्षेत्रांना फायदा होणार आहे, असे ‘ब्रोकरेज जेफरीज’ने म्हटले आहे.

धार्मिक पर्यटन केंद्रे

  • अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात वर्षांला अंदाजे ३ ते ३.५ कोटी तर तिरुपती बालाजी मंदिराला २.५ ते ३ कोटी पर्यटक भेट देतात. जागतिक स्तरावर व्हॅटिकन सिटीला दरवर्षी ९० लाख पर्यटक येतात. सौदी अरेबियातील मक्का येथे दरवर्षी दोन कोटी पर्यटक भेट देतात.
दोन आठवडयांमध्ये उत्तर द्या! महिलांसाठी राखीव जागा याचिकेवर केंद्र सरकारला निर्देश
  • लोकसभा आणि सर्व विधानसभांमध्ये महिलांसाठी एक तृतियांश राखीव जागांची तरतूद करणाऱ्या ‘नारी शक्ती वंदन कायदा, २०२३’ तातडीने लागू करण्यात यावा अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दोन आठवडयांमध्ये उत्तर देण्याचे निर्देश दिले.काँग्रेसच्या नेत्या जया ठाकूर यांनी ही याचिका दाखल केली आहे. न्या. संजीव खन्ना व न्या. दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सोमवारी त्यावर सुनावणी झाली. हा कायदा तातडीने लागू झाला तर लोकसभा निवडणुकीआधीच महिलांना राखीव जागा मिळू शकतील असा युक्तिवाद या याचिकेत करण्यात आला आहे.
  • अ‍ॅड. कनू अग्रवाल यांनी केंद्र सरकारची बाजू मांडली. या मुद्दयावर सर्वसमावेश उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारला अधिक वेळ हवा आहे असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. जया ठाकूर यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील विकास सिंह यांनी सांगितले की, हा कायदा सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी लागू केला जाईल याची खबरदारी घेण्यासाठी न्यायालयाने तसे निर्देश द्यावेत. मात्र, सध्या न्यायालय असे निर्देश देऊ शकत नाही असे न्या. खन्ना यांनी स्पष्ट केले. तसेच केंद्राच्या उत्तरासाठी प्रतीक्षा करावी असेही सिंह यांना सांगितले.
  • अ‍ॅड. प्रशांत भूषण यांनी आपल्याला या प्रकरणी याचिका दाखल करायची आहे असे सांगितले. त्यावर ही याचिका नवीन प्रकरण असल्याने सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोरच दाखल करता येईल असे उत्तर खंडपीठाने दिले. या प्रकरणी पुढील सुनावणी तीन आठवडयांनंतर होणार आहे. १६ जानेवारीला केंद्र सरकारची बाजू मांडणारे वकील उपलब्ध नसल्याने सुनावणी २२ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.
या वेबसाईटवर दहा भाषांमध्ये उपलब्ध आहे रामचरितमानस, भारतानंतर ‘या’ देशाचा ‘ऑनलाइन’ वाचण्यात दुसरा क्रमांक
  • श्रीरामचरित मानस हे गीता प्रेसच्या वेबसाईटवर दहा भाषांमध्ये अपलोड करण्यात आलं आहे. हिंदी, उडिया, नेपाळी, इंग्रजी, तेलुगु, कानडी, आसामी, गुजराती, मराठी आणि बांगला भाषांमध्ये हे रामायण या वेबसाईटवर वाचता येतं. अयोध्या दर्शन आणि अयोध्या महात्म्य ही दोन पुस्तकंही अपलोड करण्यात आली आहे. मागच्या आठ दिवसांत दहा लाखांहू अधिक लोकांनी ही पुस्तकं वाचली आहेत. तसंच १ लाख ३० हजार लोकांनी ही पुस्तकं ऑनलाईन वाचली आहेत. त्याचप्रमाणे ४ लाख १८ हजारांहून अधिक लोकांनी ही पुस्तकं डाऊनलोड केली आहेत.

गीता प्रेसच्या वेबसाईटवर दहा भाषांमध्ये उपलब्ध आहे रामचरित मानस

  • रामचरितमानस हे भारतानंतर सर्वाधिक अमेरिकेत वाचलं जातं आहे. श्रीरामचरितमानस हे संयुक्त अरब आमिरात आणि कुवेतमध्येही वाचलं गेलं आहे. ती संख्या कमी असली तरीही तिथल्या लोकांनी हे वाचलं आहे ही बाब विशेष म्हणावी लागेल. भारतात हिंदी रामचरित मानस मागच्या आठ दिवसांत ४४ हजार लोकांनी वाचलं आहे. अमेरिकेत २७०० लोकांनी तर कॅनडात ६०० हून अधिक लोकांनी वाचलं आहे. इंग्रजी भाषेतलं रामचरित मानस भारतात २० हजार, अमेरिकेत ३ हजार, कॅनडात ७००, संयुक्त अरब आमिरात मध्ये ३५० जर्मनीत १०० तर मलेशियात १०० लोकांनी वाचलं आहे.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सजली अयोध्या नगरी

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अमिताभ बच्चन, रजनीकांत, उद्योजक मुकेश अंबानी आणि गौतम अंबानी, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह देशभरातील शेकडो मान्यवर आणि साधुसंतांच्या साक्षीने नव्याने बांधलेल्या मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल. दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी हा मुख्य सोहळा सुरू होईल आणि सुमारे ४० मिनिटे चालेल. प्राणप्रतिष्ठेनंतर पंतप्रधान मोदी यांचे भाषण होईल. कार्यक्रमासाठी निवडक लोकांनाच प्रवेश मिळणार असला तरी सोमवारी कोट्यवधी लोक दूरचित्रवाणी आणि ऑनलाइन माध्यमांतून हा सोहळा पाहण्याची अपेक्षा आहे. देशभरातील विविध मंदिरांमध्येही सोहळे आयोजित करण्यात आले आहेत.
आयपीएलचा यंदाचा हंगाम कधी सुरू होणार? बीसीसीआयच्या योजनेचा झाला खुलासा
  • आयपीएलचा आगामी १७वा हंगाम २२ मार्चपासून सुरू होऊ शकतो. त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. महिला प्रीमियर लीग २२ फेब्रुवारीपासून सुरू होऊ शकते. डब्ल्यूपीएलचा अंतिम सामना १७ मार्च रोजी खेळवला जाऊ शकतो. यानंतर पाच दिवसांनी आयपीएल सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना २६ मे रोजी होण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या शेवटच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव करून पाचव्यांदा विजेतेपद पटकावले.
  • मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने या कार्यक्रमाला मंजुरी दिली आहे. मात्र, त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. देशातील सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखांच्या घोषणेनंतर आयपीएलचे वेळापत्रक जाहीर होईल, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी आधीच सांगितले आहे. २६ मे रोजी आयपीएलची फायनल झाली, तर टी-२० वर्ल्डकप सुरू होण्यासाठी फक्त काही दिवस शिल्लक राहतील. कारण टी-२० विश्वचषकाला १ जूनपासून वेस्ट इंडिज आणि यूएईमध्ये सुरुवात होणार आहे. तसेच ५ जून रोजी होणारा भारताचा पहिला सामना आणि आयपीएल फायनलमध्ये नऊ दिवसांचे अंतर असेल.

डब्ल्यूपीएल दोन शहरांमध्ये आयोजित केली जाणार -

  • बीसीसीआयने आपल्या संबंधितांशी याबाबत चर्चा केली आहे. महिला प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम २२ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान होणार आहे. या वेळी दोन शहरांमध्ये हंगाम आयोजित केला जाईल. बंगळुरू आणि दिल्लीमध्ये होईल. गेल्या वेळी सर्व सामने मुंबईतील वेगवेगळ्या मैदानांवर झाले होते. एक-दोन दिवसांत महिला प्रीमियर लीगचे वेळापत्रक जाहीर होऊ शकते, असे मानले जात आहे.

भारतीय खेळाडूंना मिळेल १० दिवसांचा ब्रेक -

  • जर आयपीएलच्या या तारखा अंतिम राहिल्या तर भारतीय खेळाडूंना इंग्लंड कसोटी मालिकेनंतर फक्त १० दिवसांचा ब्रेक मिळेल. इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना ७ ते ११ मार्च दरम्यान खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील पहिला सामना २५ जानेवारीपासून हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
आरोग्य विभाग खरेदी करणार सर्व तालुक्यांसाठी ३५२ शववाहिका!
  • राज्याच्या ग्रामीण भागात मृतदेह रुग्णालयापासून घरापर्यंत तसेच स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी पुरेशा शववाहिका नसल्यामुळे नातेवाईकांचे होणारे हाल लक्षात घेऊन आरोग्य विभागाने राज्यातील प्रत्येक तालुक्यासाठी एक शववाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागात तालुका पातळीवर होणारे नातेवाईकांचे हाल लक्षात घेऊन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाच्या माध्यमातून हा निर्णय घेतला आहे.
  • राज्यातील महापालिका क्षेत्रांमध्ये महापालिकेच्या शववाहिन्या असतात तसेच मोठ्या प्रमाणात खाजगी शववाहिन्याही उपलब्ध असतात. महापालिका क्षेत्रात तसेच शहरी भागात पालिका रुग्णालये, शासकीय वा खाजगी रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू झाल्यास रुग्णालये ते घर वा स्मशानभूमीपर्यंत मृतदेह वाहून नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोफत तसेच पैसे भरून शववाहिन्या उपलब्ध होतात. मात्र याच्या उलट परिस्थिती ग्रामीण भागात दिसते. प्रामुख्याने करोना काळात मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असताना मृतदेह वाहून नेण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. आजही ग्रामीण भागात एखाद्या व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाल्यास मृतदेह खाजगी जीप वा बैलगाडीमधून न्यावा लागत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात मृतदेह वाहून नेण्यासाठी फारशी व्यवस्था नसल्यामुळे लोकांचे होणारे हाल लक्षात घेऊन आरोग्य विभागाने याबाबत पुढाकार घेऊन व्यवस्था करावी, अशी मागणी वेळोवेळी विधिमंडळाच्या अधिवेशनातही करण्यात आली आहे.
  • राज्यातील २५ महापालिका क्षेत्रात काही प्रमाणात मृतदेह वाहून नेण्यासाठी व्यवस्था आहे. मात्र तालुकास्तरावर तसेच आदिवासी भागात लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे लक्षात घेऊन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी अलीकडेच याबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. तसेच ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. यानंतर प्रत्येक तालुक्यासाठी एक शववाहिनी घेण्याचा निर्णय आरोग्यमंत्र्यांनी घेतला. यानुसार एकूण ३५२ शववाहिनी खरेदी करण्यात येणार असून यासाठी आगामी २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात प्रती शववाहिनी ३५ लाख रुपये याप्रमाणे १२३ कोटी २० लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. ही आर्थिक तरतूद झाल्यास ग्रामीण भागात रुग्णांच्या नातेवाईकांचा मृतदेह स्थलांतरणाचा प्रश्न सुटेल असा विश्वासही या अधिकाऱ्याने व्यक्त केला.
  • “ग्रामीण भागात तसेच दुर्गम व आदिवासी भागात रुग्णालयामधून मृतदेह घरी नेणे ही अवघड बाब आहे. खाजगी रुग्णवाहिका घेतल्यास मोठ्या प्रमाणात खर्च येतो व हा खर्च करणे नातावाईकांना अनेकदा परवडणारे नसते. शहरी भागात हा प्रश्न नाही. मात्र ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न वेळोवेळी उपस्थित केला आहे. या विषयावर अधिकारी स्तरावर सर्वंकष चर्चा केल्यानंतर प्रत्येक तालुक्यासाठी एक शववाहिनी खरेदी करण्याची भूमिका घेण्यात आली आहे”, असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटले आहे.

 

‘यूपीएससी उमेदवारांना आणखी संधी नाही’ :
  • केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) कोविड १९ महासाथीच्या काळात झालेल्या परीक्षेत गेल्या वर्षी संधी हुकलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेतील उमेदवारांना आणखी संधी देण्याचा कुठलाही विचार नाही, असे केंद्र सरकारने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयातच स्पष्ट केले.

  • न्या. ए. एम. खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील पीठास अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी सांगितले की, अशी संधी देता येणार नाही. राजू यांनी कार्मिक व प्रशिक्षण विभागाची बाजू मांडली.  राजू यांनी सांगितले की, यूपीएससीच्या उमेदवारांना आणखी संधी देण्याचा सरकारचा विचार नाही, असे संकेत कालच केंद्राने दिले आहेत, त्याबाबत आम्ही प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहोत.

  • दरम्यान, यासंदर्भातील रचना सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर २५ जानेवारी रोजी सुनावणी करण्यात येईल असे सांगून न्यायालयाने म्हटले आहे की,  केंद्र सरकारने याबाबत विहित काळात प्रतिज्ञापत्र दाखल करून नोटिसा जारी कराव्यात.

HAL च्या ‘हॉक-आय’ मधून ‘SAAW’ ची यशस्वी चाचणी, समजून घ्या किती घातक आहे हे शस्त्र :
  • हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) गुरुवारी हॉक-आय विमानातून स्मार्ट अँटी एअरफिल्ड शस्त्राची यशस्वी चाचणी केली. या चाचणीच्या यशामुळे स्वदेशी हॉक-आय कार्यक्रमाला गती मिळणार आहे. ओदिशाच्या किनाऱ्यावर ही चाचणी घेण्यात आली. एचएएलचे टेस्ट पायलट निवृत्त विंग कमांडर पी. अवस्थी आणि निवृत्त विंग कमांडर एम. पटेल यांनी हॉक-आय मधून SAAW हे अस्त्र डागले.

  • मोहिमेची सर्व उद्दिष्टय पूर्ण झाल्याचे एचएएलकडून सांगण्यात आले. दूर अंतरावरुन हे अस्त्र डागून शत्रूच्या ठिकाणांचा वेध घेता येऊ शकतो. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) हे शस्त्र विकसित केले आहे. पहिल्यांदाच भारतीय हॉक-Mk132 मधून हे स्मार्ट शस्त्र डागण्यात आले. १२५ किलो वर्गातील SAAW हे अत्याधुनिक, अचूकतेने वार करणारे शस्त्र आहे.

  • SAAW चा वापर करुन, १०० किमीच्या परिघातील शत्रूची धावपट्टी, रडार आणि बंकर उद्धवस्त करता येतात. याआधी जॅग्वार फायटर जेटमधून SAAW ची यशस्वी चाचणी करण्यात आली होती. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून हॉक-आय विमानांची निर्मिती केली जाते. वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी या विमानांचा वापर केला जातो. आता शस्त्र डागण्यासाठी हॉक-आयचा वापर करुन, या विमानांची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न आहे. मोदी सरकारने संरक्षणासह सर्वच क्षेत्रात आत्मनिर्भर भारतावर भर दिला आहे. एचएएलचे उद्दिष्टय सुद्धा तेच आहे.

‘आयपीएल’चा लिलाव १८ फेब्रुवारीला :
  • इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) यंदाच्या हंगामासाठीची लिलाव प्रक्रिया १८ फेब्रुवारीला होण्याची दाट शक्यता असून, ठिकाण मात्र अद्याप निश्चित झालेले नाही, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिली.

  • ‘आयपीएल’चा आगामी हंगाम भारतात होणार की परदेशात हेसुद्धा अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुली मात्र हंगाम होण्याबाबत आशावादी आहे. करोना साथीच्या पार्श्वभूमीवर २०२०चा ‘आयपीएल’ हंगाम सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीत झाला होता.

  • पुढील महिन्यात इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकांद्वारे देशात ‘आयपीएल’ होण्याबाबतची स्पष्टता येऊ शकेल. तसेच ४ फेब्रुवारीपर्यंत संघांसाठी खेळाडू स्थलांतरण व्यवहार प्रक्रिया सुरू राहील.

मंत्र्यांची दिलगिरी, ग्रंथालय समितीची पुनर्रचना :
  • राज्याच्या ग्रंथ निवड समितीवर सदस्य नेमताना चूक झाल्याबद्दल उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्य ग्रंथालय संघाकडे दिलगिरी व्यक्त करीत शुक्रवारी ग्रंथालय समितीची पुनर्रचना केली. यासंदर्भात तातडीने शुद्धिपत्रकही जारी करण्यात आले. गुरुवारी ‘लोकसत्ता’ने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यावर सामंत यांनी त्याची तातडीने दखल घेतली.

  • राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाने २० जानेवारीच्या आदेशान्वये ग्रंथ निवड समिती गठित केली. त्यात इतर सदस्यांसह ग्रंथालय संघाचे विभागवार प्रतिनिधी म्हणून सहा सदस्यांची नियुक्ती केली. मात्र हे सदस्य राज्य ग्रंथालय संघाने शिफारस केलेले नव्हते. ग्रंथालय अधिनियमानुसार राज्य ग्रंथालय संघाने सुचवलेल्या प्रतिनिधीचीच निवड करणे अनिवार्य आहे.

  • राज्य संघाच्या नावांना डावलून अन्य प्रतिनिधींची नियुक्ती तंत्रशिक्षण खात्याने केली होती. या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही राज्य ग्रंथालय संघाने दिला होता. ‘लोकसत्ता’ने ही बाब समोर आणताच साहित्य, संस्कृती व शैक्षणिक वर्तुळातून निषेधाच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.

  • उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर पवार यांच्याशी शुक्रवारी संवाद साधून झालेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला व त्वरित ग्रंथालय समितीच्या पुनर्रचनेबाबत शुद्धिपत्रक जारी केले. ग्रंथालय संघाच्या भावनांचा सन्मानच होईल, अशी हमी सामंत यांनी दिल्याची माहिती डॉ. पवार यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

गूगलचा ऑस्ट्रेलियाला ‘सेवा बंद’चा इशारा :
  • ऑस्ट्रेलिया सरकारने वृत्तसेवेसाठी शुल्क आकारण्याच्या योजनेची अंमलबजावणी करावयाचे ठरविल्यास त्या देशातील सर्च इंजिनची सेवा खंडित केली जाईल, असा इशारा शुक्रवारी गूगलने दिला.

  • ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी त्वरेने गूगलला फटकारताना स्पष्ट केले की, आम्ही इशाऱ्यांना भीक घालत नाही, तुम्ही ऑस्ट्रेलियात काय करू शकता याची नियमावली आम्हीच तयार करतो, असे मॉरिसन यांनी ब्रिस्बेन येथे वार्ताहरांना सांगितले. ऑस्ट्रेलियाच्या संसदेत निर्णय घेण्यात आला आहे, आमच्या सरकारने निर्णय घेतलेला आहे, ऑस्ट्रेलियात तशाच पद्धतीने काम होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

  • नवी नियमावली अयोग्य असल्याचे गूगल ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे व्यवस्थापकीय संचालक मेल सिल्व्हा यांनी सिनेट चौकशी समितीसमोर सांगितल्यानंतर मॉरिसन यांनी वरील बाब स्पष्ट केली.

23 जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.