करोनामुळे देशाला बसलेल्या आर्थिक फटक्याच्या पार्श्वभूमीवर आणखीन एक चिंतेत टाकणारी बातमी समोर आली आहे. सामर्थ्यशाली देशांच्या यादीमधून भारत बाहेर फेकला गेला आहे. भारत हा आशियामधील चौथा सर्वात शक्तीशाली देश ठरला आहे. सिडनीमधील लोवी इन्स्टिट्यूटने केलेल्या अभ्यासामध्ये आशियामधील सर्वात प्रभावशाली देशांची यादी जाहीर केली आहे.
आशिया पॉवर इंडेक्स फॉर २०२० हा अहवाल सादर झाला असून आशिया पॅसिफिक प्रदेशामध्ये भारत हा अमेरिका, चीन आणि जपाननंतर चौथा सर्वात प्रभावशाली देश ठरला आहे. मात्र सर्वात सामर्थ्यशाली म्हणजेच मेजर पॉवर हा दर्जा भारताने गमावला आहे. ४० हून अधिक गुण असणाऱ्या देशांना प्रभावशाली देशांच्या यादीत स्थान दिलं जातं. मागील वर्षी भारताला ४१ गुण होते तर यंदा यामध्ये १.३ ची घट झाली असून भारताला २०२० मध्ये ३९.७ गुण मिळाले आहेत.
आशिया पॅसिफिकमध्ये करोनामुळे सरासार परिस्थिती खालावत चाललेल्या १८ देशांमध्ये भारताचा समावेश आहे. करोनामुळे देशाच्या आरोग्य आणि आर्थिक परिस्थितीवर मोठा ताण पडला असून यामुळेच भारताचा विकास मंदावला आहे असं लोवी इन्स्टिट्यूटने आपल्या अहवालात म्हटलं आहे. चीनच्या तुलनेत भारत म्हणावा तसा विकास करत नसल्याचेही या अहवालात म्हटलं आहे.
“लोकसंख्येच्या दृष्टीने चीनच्या बरोबरीने उभा राहणार भारत हा एकमेव देश असला तरी विकासाच्या बाबतीत तो पुढील काही वर्षांमध्ये चीनची बरोबर करु शकणार नाही. करोनाचा भारतावर मोठा परिणाम झाला असून या साथीमुळे दोन देशांमधील दरी अधिक वाढली आहे,” असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. २०३० पर्यंत भारत हा चीनच्या ४० टक्के विकास करु शकतो असं या अहवालात म्हटलं आहे. २०१० च्या आशिया पॉवर इंडेक्समध्ये हा विकासदर ५० टक्के असेल असं नमूद करण्यात आलं होतं. मात्र आता यामध्ये घट होणार असून तो ४० पर्यंत राहण्याचा अंदाज आहे.
मक्तेदारी प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमेरिकेच्या न्याय विभागाने गूगलविरुद्ध खटला दाखल केला आहे. ऑनलाइन शोध आणि जाहिरात यावरील वर्चस्वाचा स्पर्धेला मारक ठरेल असा गैरवापर केल्याचा आणि पर्यायाने ग्राहकांना हानी पोहोचविल्याचा गूगलवर आरोप आहे.
निकोप स्पर्धा असावी यासाठी सरकारने दावा दाखल करून महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असल्याचे मानले जात आहे. जवळपास २० वर्षांहूनही अधिक काळापूर्वी सरकारने मायक्रोसॉफ्टविरुद्धही दावा दाखल केला होता.
सरकारकडून आणखीही काही कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत असून गूगलविरुद्धची कारवाई ही सुरूवात असू शकते. सरकारने अॅपल, अमेझॉन आणि फेसबुक या कंपन्यांच्या तपासालाही न्याय विभाग आणि मध्यवर्ती व्यापार आयोगाला हिरवा कंदील दाखविला आहे.
अनेक प्रतिस्पर्धी कंपन्यांना दूर सारून गूगलने आपली मक्तेदारी प्रस्थापित केली ती बाजारातील स्पर्धेसाठी हानिकारक आहे, असे अमेरिकेचे डय़ेपुटी अॅटर्नी जनरल जेफ रॉसन यांनी वार्ताहरांना सांगितले.
करोना रुग्णांवर करण्यात येणारी प्लाझ्मा थेरपीबद्दल (रक्तद्रव्य उपचार पद्धती) अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं आज महत्त्वाची माहिती दिली. करोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी परिणामकारक नाही. मृत्यू दर रोखण्यात ही उपचार पद्धती यशस्वी ठरलेली नाही, त्यामुळे ती उपचाराच्या यादीतून वगळण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती आयसीएमआरचे बलराम भार्गवा यांनी आज दिली.
आयसीएमआरचे अध्यक्ष बलराम भार्गवा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्लाझ्मा थेरपीविषयी बोलताना भार्गवा म्हणाले,’अनेक अभ्यासाच्या निष्कर्षात असं दिसून आलं आहे की, करोनामुळे होणारा मृत्यू दर रोखण्यात प्लाझा थेरपी फारशी परिणामकारक ठरली नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे करोना रुग्णांसाठी ठरवण्यात आलेल्या राष्ट्रीय आरोग्य उपचार प्रोटोकॉलमधून ती वगळ्याचा विचार सुरू आहे,” असं भार्गवा यांनी सांगितलं.
करोनाचा शिरकाव झाल्यानंतर रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही उपचार पद्धती फायदेशीर असल्याचं सुरूवातीला सांगण्यात आलं होतं. मात्र, त्यावर नंतर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. यापूर्वी आयसीएमआरनं प्लाझ्मा थेरपीच्या परिणामांवर प्रश्न उपस्थित केले होते. करोना उपचारांमध्ये प्लाझ्मा थेरपी ऐवजी अँटिसेरा (प्राणी रक्तद्रव्य चाचणी) या पर्यायाचा वापर केला जाईल, असं म्हटलं होतं.
पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेचे यजमानपद सांभाळणाऱ्या भारताने पाकिस्तानी संघाला जानेवारी २०२१पर्यंत व्हिसाची खात्री द्यावी, अशी मागणी पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) मुख्य कार्यकारी अधिकारी वसिम खान यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) केली आहे.
पुढील वर्षी भारतात ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. परंतु दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध बिघडल्याममुळे या सामन्याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने ‘आयसीसी’कडे व्हिसाची खात्री मागितली आहे. २०२३पासून सुरू होणाऱ्या दौऱ्यांच्या कार्यक्रमपत्रिकेतही उभय संघांच्या मालिकेला स्थान नसेल, असे खान यांनी स्पष्ट केले आहे.
नवी दिल्ली : ‘आयसीसी’ कार्याध्यक्षपदासाठी न्यूझीलंडचे ग्रेगर बारक्ले आणि सिंगापूरचे इम्रान ख्वाजा यांनी नामनिर्देशन यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. शशांक मनोहर यांच्या रिक्त होणाऱ्या कार्याध्यक्षपदाच्या जागेसाठी अर्ज दाखल करण्याकरिता १८ ऑक्टोबपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यामुळे आता निवडणूक होणार हे निश्चित झाले आहे.
हा प्रश्न ‘आयसीसी’च्या अखत्यारित येतो. आम्ही आमची चिंता त्यांच्याकडे मांडली आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकासंदर्भात यजमान देशाशी झालेल्या करारानुसार सहभागी देशांना व्हिसा आणि निवास व्यवस्था पुरवणे बंधनकारक असते. पाकिस्तान हा सहभागी देशांपैकीच एक आहे. त्यामुळेच आम्ही ‘आयसीसी’कडे व्हिसाची खात्री मागितली आहे.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.