कडाक्याच्या थंडीनं गारठलेल्या दिल्लीत शेतकरी आंदोलनामुळे वातावरण दिवसेंदिवस तापताना दिसत आहे. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरुद्ध शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून, संयुक्त किसान मोर्चाने तयार केलेल्या किसान एकता मंच फेसबुक पेजवरून रविवारी रात्री बराच गोंधळ झाला. फेसबुकनं हे पेज ब्लॉक केलं. त्यानंतर फेसबुकविरोधात संताप वाढल्यानंतर हे पेज पुन्हा सुरू करण्यात आलं.
दिल्ली आणि दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आंदोलनाची माहिती देण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने फेसबुकवर किसान एकता मंच नावाचं पेज तयार करण्यात आलं आहे. हे पेज रविवारी अचानक फेसबुककडून बंद करण्यात आलं होतं.
योगेंद्र यादव यांनी याविषयी माहिती दिली आहे. फेसबुक लाईव्ह करत असताना मध्येच पेज अनपब्लिश्ड झाल्याचा संदेश मिळाला. शेतकऱ्यांविषयी असं काही तरी आहे, ज्यामुळे हे सरकार घाबरले आहे आणि सरकार असं काहीतरी आहे ज्यामुळे फेसबुकला भीती वाटली आहे, असा आरोप योगेंद्र यादव यांनी केला.
केंद्र सरकारने करोनाच्या कालावधीमध्ये कंपन्यांना दिलासा देण्यासाठी कामगार कायद्यांमध्ये बदल केले होते. या बदलांच्या पार्श्वभूमीवर काही कंपन्यांनी मनमानी कारभार सुरु केला. या कायद्याचा संदर्भ देत कायमस्वरुपी म्हणजेच पर्मनन्ट नोकरदारांना करारावर म्हणजेच कान्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये बदलण्यास कंपन्यांनी सुरुवा केली. मात्र आता अशा कंपन्यांना थेट सरकारनेच इशारा दिला आहे.
कोणत्याही कंपनीला नवीन कर्मचारी कायद्यानुसार कोणतीही कंपनी कोणत्याही पर्मनन्ट कर्मचाऱ्याला करारानुसार म्हणजेच कॉन्ट्रॅक्टवर ट्रान्सफर करु शकत नाही असं केंद्रानं स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबरच नोकरकपात करताना नोकरी गेलेल्या कर्मचाऱ्यांची मदत करण्यासाठी कंपन्या विशेष आर्थिक निधी म्हणून सीएसआर फंडचा वापर करु शकतात, असंही केंद्राने सांगितलं आहे. नवीन कर्मचारी कायद्यासंदर्भात लवकरच कामगार आणि रोजगार मंत्रालयची बैठकही होणार असून यामध्ये नवीन कायद्यासंदर्भातील नियम अधिक स्पष्ट केले जाण्याचे शक्यता व्यक्त केली जात आहे.
सीएनबीसी आवाजने दिलेल्या वृत्तानुसार केंद्र सरकारने सेवा नियमांमध्ये लवकरच मोठे बदल करण्याची शक्यता आहे. तसेच कंपन्यांना कायमस्वरुपी नोकरदारवर्गाला करारावर आणता येणार नाही. कामगार आणि रोजगार मंत्रालय नवे नियमांनुसार कर्मचारी कपात झाल्यानंतर विशेष निधीसंदर्भातही नियम बनवणार आहे. या निधीचा वापर कर्मचाऱ्यांना कुशल बनवण्यासाठी आणि त्यांच्या प्रशिक्षणासाठी करण्यात येणार आहे.
कामगार आणि रोजगार मंत्रालयाला यासंदर्भात कंपन्यांनाही सल्ले दिले आहेत. त्याचबरोबरच कामगार संघटना आणि कंपन्यांचे एकूण मुल्य किती आहे यासंदर्भातील नियमांमध्ये अधिक स्पष्टता आणावी अशी मागणीही करण्यात आलीय.
नवी दिल्ली : तमिळनाडू व तेलंगणसह पाच राज्यांना उद्योगस्नेही सुधारणा पूर्ण केल्यानंतर १६,७२८ कोटी रुपये उसने घेण्यास केंद्रीय अर्थमंत्रालयाने परवानगी दिली आहे. आंध्र प्रद्रेश, कर्नाटक, मध्य प्रद्रेश ही यातील इतर तीन राज्ये आहेत.
रकारने मे महिन्यात असे ठरवले होते, की त्या राज्यांनी उद्योगस्नेही सुधारणा केल्यास अतिरिक्त उसनवारीला परवानगी देण्यात येईल. यात जिल्हा पातळीवरील उद्योग सुधारणा आराखडय़ाची पूर्तता ही प्रमुख अट होती. केंद्राच्या विशिष्ट कायद्यांनुसार या संबंधित उद्योगांना परवाने देणे हा या सुधारणांचा एक भाग होता. पाच राज्यांनी उद्योगांना अनुकूल स्थिती निर्माण करण्यात बरीच प्रगती केली असून त्यांना खुल्या बाजारातून १६,७२८ कोटी रुपयांची उसनवारी करण्यास परवानगी देण्यात येत आहे, असे अर्थमंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
कोविड १९ साथीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत केंद्र सरकारने राज्यांना उद्योगस्नेही उपाययोजना करण्याच्या अटींवर उसनवारीची परवानगी देताना राज्यांना खुल्या बाजारपेठेतून उसनवारीची मर्यादा त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या २ टक्के इतक्या प्रमाणात वाढवली होती. आर्थिक उत्तरदायित्व व अर्थसंकल्प व्यवस्थापन कायद्यानुसार ही मर्यादा तीन टक्के होती. उसनवारीची मर्यादा वाढवली असली तरी सरकारने त्यासाठी चार प्रमुख सुधारणांची अट घातली होती, त्यात ‘एक देश एक शिधापत्रिका’, ‘उद्योगस्नेही उपाय’, ‘शहरी स्थानिक स्वराज्य संस्था सुधारणा’ व ‘ऊर्जा क्षेत्रात सुधारणा’ यांचा समावेश होता. या सुधारणा राबवण्यासाठी १५ फेब्रुवारी २०२० पर्यंत मुदत दिली होती.
नवी दिल्ली:भारतीय बॉक्सिंगपटूंनी शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत जर्मनीतील कलोन येथे झालेल्या विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धेत तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदांसह एकूण नऊ पदकांची कमाई केली. अमित पंघालच्या सुवर्णपदकानंतर महिला बॉक्सिंगपटू सिम्रनजीत कौर (६० किलो) आणि मनीषा मौन (५७ किलो) यांनी शनिवारी रात्री सुवर्णयश संपादन केले.
मनीषाने भारताच्याच साक्षी चौधरी हिचा ३-२ असा पराभव केला. साक्षीने पहिल्या फेरीत जोरदार ठोसे लगावत मनीषासमोर कडवे आव्हान उभे केले होते. पण पुढील दोन फेऱ्यांमध्ये मनीषाने सरशी साधत सुवर्णपदकाची कमाई केली. सिम्रनजीतने जर्मनीच्या माया क्लिएनहान्स हिच्यावर ४-१ अशी सरशी साधत सुवर्णपदकावर नाव कोरले. भारताने नऊ पदके मिळवत या स्पर्धेत सर्वसाधारण दुसरे स्थान प्राप्त केले. शनिवारी पुरुषांमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या अमितने (५२ किलो) सुवर्णपदकाची कमाई केली होती.
भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत ६७ दिवसांच्या युरोपमधील प्रशिक्षण शिबिराची यशस्वी सांगता केली. भारताच्या सतीश कुमारला (९१ किलो) जर्मनीच्या नेल्वी टियाफॅकविरुद्धच्या अंतिम फेरीत दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.