चालू घडामोडी आणि दिनविशेष - २० ऑक्टोबर २०२१

Date : 20 October, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जागतिक बॉक्सिंग स्पर्धेपासून मानाचा पट्टा, पांढरे ग्लोव्हज :
  • बेलगे्रड येथे होणाऱ्या आगामी जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेपासून मानाचा पट्टा आणि परंपरागत लाल-निळ्या ग्लोव्हजऐवजी पांढरे ग्लोव्हज वापरण्यात येणार आहे, अशी घोषणा आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेकडून (एआयबीए) करण्यात आली आहे.

  • जागतिक बॉक्सिंग स्पर्धा २४ ऑक्टोबरपासून बेलग्रेड (सर्बिया) येथे सुरू होणार असून विजेत्या आणि उपविजेत्या बॉक्सिंगपटूंना अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदके दिली जातील. त्यामुळे बॉक्सिंग स्पर्धेतील विजेत्याला मानाचा पट्टा, पदक आणि रोख पारितोषिक असे तिहेरी इनाम लाभणार आहे.

  • २६ लाख डॉलर रकमेची रोख पोरितोषिके देण्यात येणार असल्याचे ‘एआयबीए’ने आधीच जाहीर केले आहे. याशिवाय सहभागी क्रीडापटूंना क्रीडा साहित्यावर त्यांच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मार्क झुकरबर्ग ‘फेसबुक’चं नाव बदलणार?; ‘या’ कारणामुळे सुरु आहे नामांतरणाचा विचार :
  • जगातील आघाडीची सोशल नेटवर्किंग कंपनी असणाऱ्या फेसबुक आयएनसी आपलं नाव बदलण्याचा विचार करत आहे. रिब्रॅण्डींगच्या उद्देशाने हा बदल करण्याचा विचार सुरु असून पुढील आठवड्यामध्ये यासंदर्भात चर्चा होणार आहे. मेटाव्हर्स पद्दतीने उत्पादने निर्माण करुन वापरकर्त्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हे नाव बदलण्याचा विचार सुरु असल्याचं वृत्त द व्हर्जने मंगळवारी दिलं आहे.

  • फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग या विषयावर कंपनीच्या वार्षिक सभेमध्ये बोलणार असल्याची माहिती समोर येत आहे. २८ ऑक्टोबर रोजी ही बैठक होणार आहे. मात्र त्याआधीच यासंदर्भातील निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्हर्जच्या वृत्तामध्ये व्यक्त करण्यात आलीय.

  • मेटाव्हर्स म्हणजेच व्हर्चूअल विश्वाला अधिक प्राधान्य देण्याची भूमिका. इंटरनेटच्या माध्यमातून लोक जेव्हा व्हर्चूअल विश्वामध्ये भ्रमंती करतात त्याला मेटाव्हर्स असं म्हणतात. यामध्ये डिजीटल स्पेसचाही समावेश होतो. डिजीटल स्पेस म्हणजेच व्हर्चूअल रिअॅलिटी आणि ऑगमेन्टेट रिअॅलिटीसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उभं केलेलं आभासी जग. याच आभासी जगाला डिजीटल स्पेस असं म्हटलं जातं.

गौतम अदानी ब्रिटीश पंतप्रधानांना भेटले; बोरिस जॉन्सन यांना अदानींने दिला ‘हा’ शब्द :
  • अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची मंगळवारी भेट घेतली. ग्लोबल इनव्हेस्टमेंट समीटच्यानिमित्ताने अदानींनी जॉनसन यांची भेट घेतली. सौरऊर्जा आणि इतर माध्यमातून ऊर्जा निर्मितीसाठी अदानी समूह ७० बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करेल असा शब्द अदानी यांनी या भेटीदरम्यान दिल्याचं म्हटलं आहे.

  • जॉन्सन यांची भेट झाल्यानंतर अदानी यांनी फेसबुकवरुन जॉन्सन यांचे आभार मानलेत. “ग्लोबल इनव्हेसमेंट समीटमध्ये युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना भेटण्याची संधी मिळाली,” असं अदानी या भेटीदरम्यानचा एक फोटो शेअर करत म्हणाले आहेत. जागतिक वातावरण बदलासंदर्भातील निर्णयासंर्भात जॉन्सन हे प्रेरणादायी नेतृत्व असल्याचा उल्लेख करत अदानी यांनी अदानी समूह ऊर्जा क्षेत्रामध्ये ७० बिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचं म्हटलंय.

  • “ग्लोबल इनव्हेसमेंट समीटमध्ये युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना भेटण्याची संधी मिळाली. हा उत्तम मंच आहे. जागतिक हवामान बदलाचा विचार करुन निर्णय घेणारं हे प्रेरणादायी नेतृत्व आहे. अदानी समूह ७० बिलियन अमेरिक डॉलर्सची गुंतवणूक सौरऊर्जा, पवन ऊर्जा आणि हायड्रोजनच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या ऊर्जा प्रकल्पांमध्ये करणार आहे. मला ही भेटीची संधी दिल्याबद्दल युके सरकार आणि युके सरकारमधील उद्योग खात्याचे आभार,” असं अदानींनी म्हटलं आहे.

दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी, वाचा कुठे आणि कसा पाहाल :
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षेचा निकाल २० ऑक्टोबर २०२१ (बुधवार) रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

  • हा निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असून या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील.

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापुर अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत दहावीची पुरवणी परीक्षा दिनांक २२ सप्टेंबर, २०२१ ते ८ ऑक्टोबर २०२१ व बारावीची पुरवणी परीक्षा दिनांक १६ सप्टेंबर २०२१ ते १२ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत आहे.

  • ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून दहावी व बारावी पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयाव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. दहावीसाठी http://verification.mh-ssc.ac.in व बारावीसाठी http://verification.mh-hsc.ac.in हे संकेतस्थळ असेल.

देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील ‘या’ ३ ठाण्यांचा समावेश, जयंत पाटलांकडून माहिती :
  • देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील ३ पोलीस स्टेशनचा समावेश झाल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिलीय. यवतमाळ, चंद्रपूर आणि शिराळा या तीन पोलीस स्टेशनचा या यादीत समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच राज्यात अनेक चांगले पोलीस स्टेशन आहेत.

  • पहिलाय आणि दुसऱ्या रांगेतील नेत्यांनी कोणतीही केस रदबदली घेऊन न जाता हे काम पाहण्यासाठी जावं, असाही सल्ला त्यांनी दिला. सांगलीमधील विश्रामबाग येथे नतून पोलीस मुख्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पाटील हे बोलत होते.

  • जयंत पाटील म्हणाले, “महाराष्ट्रातील यवतमाळ, चंद्रपूर आणि शिराळा येथील पोलीस ठाण्यांचा समावेश आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये झालाय. दीक्षित गेडाम यांनी सर्व पोलीस स्टेशन आयएसओ प्रमाणित करण्याची मोठी मोहीम हाती घेतली. राज्यात अनेक चांगले पोलीस स्टेशन आहेत. माझी पहिल्या आणि दुसऱ्या रांगेत बसलेल्या नेत्यांना विनंती आहे कोणतीही केस रदबदली घेऊन न जाता फक्त चहा घ्यायला जाऊन या.”

अमरिंदर सिंग यांचा लवकरच नवा पक्ष :
  • पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर जवळपास महिन्याभराने अमरिंदर सिंग यांनी मंगळवारी नव्या पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली.

  • शेतकरी आंदोलनाबाबत तोडगा काढला तर भाजपशी युती करणार असल्याचेही अमरिंदर यांनी जाहीर केले.

  • पंजाबमध्ये काही महिन्यांतच विधानसभा निवडणुका होणार आहेत. सत्ताधारी कॉग्रेसबरोबरच आम आदमी पक्ष, शिरोमणी अकाली दल, भाजप यांच्यासह अमरिंदर यांच्या नव्या पक्षामुळे पंजाबची निवडणूक पंचरंगी होईल.

भारतीय पाणबुडी रोखल्याचा पाकिस्तानचा दावा :
  • भारताची एक पाणबुडी पाकिस्तानच्या सागरी हद्दीत येत असताना रोखल्याचा दावा पाकिस्तानच्या लष्कराने केला आहे. गेल्या आठवड्यात हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.

  • ही भारतीय पाणबुडी पाकिस्तानी नौदलाच्या गस्ती विमानाने पाहिली होती, असे पाकिस्तानी लष्कराच्या निवेदनात म्हटले आहे. पाकिस्तानी नौदलाने म्हटले आहे की, १६ ऑक्टोबरला ही पाणबुडी पाकिस्तानी सागरी हद्दीत येताना दिसली.  भारतीय नौदलाकडून हा  प्रकार तिसऱ्या वेळी झाला असून  तीनही वेळा या पाणबुड्या शोधण्यात  पाकिस्तानी नौदलाच्या लांब पल्ल्याच्या गस्ती विमानांनी यश मिळवले आहे. आताच्या घटनेचे चित्रीकरणही पाकिस्तानने प्रसारित केले आहे. 

  • पाकिस्तानी नौदल सतत सज्ज असून व्यावसायिक सतर्कता बाळगून आहे. आम्ही पुन्हा एकदा भारताची पाणबुडी येताना शोधली आहे असे पाकिस्तानी लष्कराने ट्विटरवर म्हटले आहे.

  • यापूर्वी असा प्रकार मार्च २०१९ मध्ये घडला होता. त्यावेळी पाकिस्तानी नौदलाने भारतीय पाणबुडीचा सागरी हद्दीत प्रवेश रोखला होता. पाकिस्तानी नौदलाने त्यांचे विशेष कौशल्य वापरून भारतीय पाणबुडीला घुसण्यापासून रोखले असे निवेदनात म्हटले आहे. नोव्हेंबर २०१६ मध्येही भारतीय लष्कराच्या पाणबुडीने पाकिस्तानी सागरी हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे.

२० ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.