पुणे महानगरपालिकेने एक ठराव संमत केला असून, त्यांनी देशातील महिला शिक्षणाचे प्रणेते म्हणून समाज सुधारक जोडपे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करावा, अशी विनंती केली आहे.
समाज सुधारक जोडप्यास भारत रत्न घोषित करण्याचा केंद्र सरकारला आग्रह करण्याचा ठराव काँग्रेसचे नेते उल्हास बागुल यांनी सर्वसाधारण सभेत मांडला आणि सर्व राजकीय पक्षांच्या पाठिंब्याने एकमताने तो मंजूर करण्यात आला आहे. हा विनंती ठराव आता राज्य व केंद्र सरकारकडे पाठविला जाईल.
१८२७ मध्ये जन्मलेल्या ज्योतिराव फुले यांनी स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी प्रयत्न करीत असताना अस्पृश्यता आणि जातीयता निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. १८९० मध्ये त्यांचे निधन झाले. १८३१ मध्ये जन्मलेल्या सावित्रीबाई फुले यांनी देशातील महिला शिक्षणाला चालना दिली. शिक्षणाच्या कार्यासाठी या दोघांनी आपले आयुष्य वाहून घेतले. १८९७ रोजी सावित्रीबाईंचे निधन झाले.
शोषित जातींमधील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी आणि उत्पीडित वर्गाच्या उन्नतीसाठी जोतिरावांच्या नेतृत्वाखाली सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली. त्यांनी भिडेवाडा येथे १८४८ मध्ये पुण्यातील पहिली मुलींची शाळादेखील सुरू केली.
राज्यात करोना रुग्णसंख्या वाढत असून ठाकरे सरकारची चिंता वाढू लागली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून गुरुवारी आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक करोनाबाधितांची नोंद झाली. २४ तासांत तब्बल २५ हजार ८३३ लोकांना करोनाची लागण झाली असून ५८ जणांचा मृत्यू झाला. यामुळे राज्याला पुन्हा एकदा लॉकडाउनचा मार्ग स्वीकारावा लागतो का काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. ते नंदुबारमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“करोनाचा धोका पुन्हा एकदा वाढला आहे. सप्टेंबरमध्ये जो सर्वोच्च बिंदू गाठला होता त्याच्या जवळपास किंवा पुढे आहोत. पुन्हा लॉकडाउन करणं एक मार्ग आहे. लॉकडाउनचा पर्याय समोर दिसत आहे. मात्र मला अजूनही लोकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. लोक आता मास्क वापरु लागले आहेत,” असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
पुढे ते म्हणाले की, “परदेशी स्ट्रेन आपल्याकडे आला आहे, त्याचे आकडेही नियंत्रणात आले होते. मात्र आता जो पसरतो तो नवा विषाणू आहे का याबाबत माहिती अद्याप तरी दिलेली नाही”.
जगभरामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. मात्र या संकटाच्या काळामध्ये जिब्राल्टर नावाच्या छोट्याश्या देशाने कमाल करुन दाखवलीय. आपल्या देशातील सर्व नागरिकांना करोनाची लस देण्याचा पराक्रम या देशाने केलाय.
ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार बुधावारी या देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालं आहे. देशातील सर्व पात्र व्यक्तींना लसीचे दोन डोस देण्यात आल्याचं हॅनकॉक यांनी स्पष्ट केलं आहे.
जिब्राल्टरची लोकसंख्या केवळ ३४ हजारांच्या आसपास आहे. या ठिकाणी चार हजार २६३ करोनाचे रुग्ण आढळून आले होते. देशातील ९४ जणांना करोना संसर्गामुळे मृत्यू झालाय.
हॅनकॉक यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये यासंदर्भात माहिती देताना, “मला ही गोष्ट सांगताना खूप आनंद होत आहे की काल (बुधवारी) जिब्राल्टर जगातील पहिला असा देश ठरला आहे ज्या आपल्या सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण केलं आहे,” असं सांगितलं. या संकटाच्या प्रसंगी जिब्राल्टरच्या नागरिकांनी दाखवलेला संयम आणि साहसाचं मी कौतुक करतो, असं म्हणत हॅनकॉक यांनी जिब्राल्टरच्या नागरिकांचं कौतुक केलं.
शुक्रवारी रात्री व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुक भारतात आणि जगभरात अचानक डाऊन झाल्याने गोंधळ उडाला. व्हॉट्सअॅपवर मेसेज करण्यात बऱ्याच युजर्सना अडचणी येत होत्या. काही यूजर्सना व्हॉट्सअॅप वेबवर लॉग इन करण्यात ही अडचण येत होती.
डाउनटाइम रिपोर्टिंग सर्व्हिस “डाउनडेटेक्टर”च्या म्हणण्यानुसार शुक्रवारी रात्री १०.४० वाजल्यापासून जगभरात व्हॉट्सअॅपद्वारे मेसेज करण्यात अडचण येत होती. १ तासापेक्षा अधिक काळ व्हॉट्सअॅप युजर्सना मेसेज पाठवण्यास किंवा मिळण्यास अडचण येत होती. मात्र व्हॉट्सअॅपच्या म्हणण्यानुसार ४९ मिनीटेच हा प्रकार सुरू होता.
दरम्यान, कंपनीने या प्रकाराबाबत नेमके कारण स्पष्ट केले नसले तरी तांत्रिक कारणांमुळे हा प्रकार झाल्याचे सांगण्यात आले.
व्हॉट्सअॅपशिवाय फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरण्यात सुद्धा अनेकांना अडचण येत होती. मात्र एका तासानंतर या सर्व सेवा पूर्वरत झाल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून ‘प्रशस्तीपत्रक’ मिळाल्यानंतर, चार दिवसांतच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी दिल्लीत येऊन पवारांशी दोन तास चर्चा केली. या भेटीमुळे राज्याच्या गृहखात्याच्या मंत्रिपदाच्या संभाव्य बदलाबाबत तर्कवितर्क केले जात आहेत.
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांच्या चौकशीप्रकरणी राज्याच्या गृहखात्याने योग्य कारवाई केल्याचे सांगत पवार यांनी अनिल देशमुख यांची पाठराखण केली होती. त्यानंतरही देशमुखांना पवार यांची दिल्लीत येऊन भेट घ्यावी लागली आहे. मिहान प्रकल्पातील उद्योगांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आपण शरद पवार यांची भेट घेतल्याचे सांगत देशमुख यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना बगल दिली. पण या भेटीमुळे पवारांनी देशमुखांच्या गृहखात्याच्या कारभाराचा ‘आढावा’ घेतल्याचे सांगितले जाते.
स्फोटकांचे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) देण्यात आले असून तपासात राज्य सरकार पूर्ण सहकार्य करत आहे. ‘एनआयए’चा अहवाल आल्यानंतरच या प्रकरणावर अधिक भाष्य करणे उचित राहील, असे देशमुख म्हणाले. परमवीर यांच्याकडून काही चुका झाल्या असल्यामुळे त्यांची बदली करण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले होते.
अमेरिकेचे नवे संरक्षणमंत्री लॉइड ऑस्टिन यांनी शुक्रवारी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि भरभराट होण्यासाठी अमेरिकेची भारतासमवेत अधिकाधिक काम करण्याची इच्छा असल्याचे ऑस्टिन यांनी मोदी यांच्याकडे स्पष्ट केले.
मोदी यांनी या वेळी दोन्ही देशांमधील भागीदारीबाबतचा आपला दृष्टिकोन मांडला आणि भारत-अमेरिका संबंधांमध्ये संरक्षणविषयक परस्पर सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडेन यांच्यापर्यंत आपल्या शुभेच्छा पोहोचवाव्या, असे या वेळी मोदी यांनी ऑस्टिन यांना सांगितले.
ऑस्टिन संरक्षणमंत्री या नात्याने प्रथमच भारत दौऱ्यावर आले आहेत. बायडेन यांनीही आपल्याला शुभेच्छा दिल्या आहेत, असे ऑस्टिन यांनी मोदी यांना सांगितले.
शेतकरी आंदोलन : सेनेटर्सचे ब्लिंकन यांना साकडे
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सेनेटचे परराष्ट्र समिती अध्यक्ष बॉम्ब मेन्डेझ आणि बहुसंख्याक नेते चक शुमर यांनी परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, शेतकरी आंदोलनाचा प्रश्न पंतप्रधान मोदी यांच्याकडे उपस्थित करावा. ते तीन कायद्यांबाबत शांततेने निदर्शने करीत आहेत.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.