चालू घडामोडी आणि दिनविशेष - २० जुलै २०२०

Date : 20 July, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘वैद्यकीय नियोजनामुळे भारतातील मृत्युदर जगात सर्वात कमी’ :
  • नवी दिल्ली : भारतात कोविड १९ साथीतील मृत्युदर हा हळूहळू कमी होत असून सध्याचा २.४९ टक्के हा मृत्यूदर जगातील सर्वात कमी आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी म्हटले आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांचे योग्य व्यवस्थापन केल्यानेच हे यश मिळाल्याचा दावाही करण्यात आला आहे.

  • देशातील २९ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत कोविड १९ मृत्युदर हा देशाच्या सरासरी मृत्यू दरापेक्षाही कमी असून पाच राज्यांत तो शून्य आहे, तर १४ राज्यांत एक टक्क्य़ांहून कमी आहे.

  • केंद्र, राज्य व  केंद्रशासित प्रदेशातील रुग्णालयात दाखल रुग्णांच्या व्यवस्थापनामुळे मृत्यू दर आटोक्यात ठेवण्यात यश आले आहे. योग्य प्रतिबंधात्मक उपाय, मोठय़ा प्रमाणात चाचण्या, सर्वंकष व्यवस्थापन यामुळे मृत्युदरात घट झाल्याचे सांगण्यात आले. मृत्युदर हळूहळू कमी होत चालला असून तो सध्या २.४९ टक्के आहे. जगात भारतातील सर्वात कमी मृत्यू दर नोंदवला गेला आहे. एक महिना आधी मृत्यू दर २.८२ टक्के होता, तो १० जुलैला २.७५ टक्के झाला, तर सध्या २.४९ टक्के आहे असे आरोग्यमंत्रालयाने म्हटले आहे.

  • अनेक राज्यांनी लोकांचे सर्वेक्षण केले असून चाचण्या वाढवल्या आहेत, तसेच सार्वजनिक व खासगी रुग्णालयात पायाभूत सुविधा सज्ज केल्या आहेत. मोबाइल अ‍ॅपमुळे जोखमीच्या लोकांवर लक्ष ठेवणे शक्य झाले आहे. वेळीच रुग्णांचा शोध, वैद्यकीय उपचार यामुळे मृत्यू संख्या कमी होत आहे. आशा कर्मचारी, एनएनएम (सहायक परिचारिका) यांनी स्थलांतरित लोकांची चांगली काळजी घेतली आहे. त्यामुळे सामुदायिक पातळीवर जागरूकता निर्माण होण्यास मदतही झाली आहे. २९ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील मृत्युदर हा भारतापेक्षा कमी असून देशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेने चांगले काम केलेले दिसत आहे, असे केंद्रीय आरोग्य विभागाने म्हटले आहे.

बाएल बुद्धिबळ महोत्सव २०२० : हरिकृष्णला विजेतेपद :
  • चेन्नई : भारताचा ग्रँडमास्टर पी. हरिकृष्ण याने अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन करत सात फेऱ्यांमध्ये ५.५ गुणांची कमाई करत ५३व्या बाएल बुद्धिबळ महोत्सव २०२०चा भाग असलेल्या अ‍ॅसेंटस बुद्धिबळ ९६० स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

  • हरिकृष्ण सात फेऱ्यांमध्ये अपराजित राहिला. पोलंडच्या रॅडोस्लाव्ह वोतासेक याचा शेवटच्या फेरीतील पराभव हरिकृष्णच्या पथ्यावर पडला. स्वित्र्झलडच्या नोएल स्टडरने त्याला पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे हरिकृष्णला अव्वल स्थानी मजल मारता आली. जर्मनीच्या विन्सेन्ट के यमेर या १५ वर्षीय बुद्धिबळपटूने सर्वानाच आश्चर्याचा धक्का देत ५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. वोतासेकला ४.५ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

  • हरिकृष्णने या स्पर्धेच्या सुरुवातीला इंग्लंडच्या मायकेल अ‍ॅडम्सविरुद्ध बरोबरी पत्करली. त्यानंतर स्वित्र्झलडचा अलेक्झांडर डोनचेंको आणि स्टडर यांच्यावर दुसऱ्या आणि तिसऱ्या फे रीत मात करत आघाडी मिळवली. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या फे रीत अनुक्रमे के यमर आणि वोतासेकविरुद्ध बरोबरी पत्करल्यानंतर पुढच्या दोन फे ऱ्यांमध्ये रोमेन एडवर्ड आणि स्पेनचा डेव्हिड गुइज्जारो यांच्यावर विजय मिळवत विजेतेपदाला गवसणी घातली. आता रविवारपासून जलद प्रकाराची, तर २१ जुलैपासून पारंपरिक प्रकाराची स्पर्धा होणार आहे.

देशात लसनिर्मितीची ७ कंपन्यांत स्पर्धा :
  • नवी दिल्ली : भारतात एकूण सात औषध कंपन्या करोनावर लस तयार करण्यात गुंतल्या असून जागतिक पातळीवरही लशीसाठी प्रयत्न सुरू आहेत. जगात करोना रुग्णांची संख्या १ कोटी ४० लाख झाली असून आता त्याला आवर घालणे मुश्कील होत चालले आहे.

  • भारत बायोटेक, सिरम इन्स्टिटय़ूट, झायडस कॅडीला, पॅनाशिया बायोटेक, इंडियन इम्युनॉलॉजिकल्स. मिनव्ॉक्स,  बायोलॉजिकल-इ या देशी कंपन्या लस तयार करण्यासाठी प्रयत्नशील असून लस तयार करण्यासाठी खरेतर काही  वर्षे लागतात, पण करोनाचा वाढता प्रसार बघता ती कमी  कालावधीत उपलब्ध करण्याचे प्रयत्न आहेत.

  • भारत बायोटेकला टप्पा १ व २ चाचण्यांसाठी परवाना देण्यात आला आहे. त्यांची कोव्हॅक्सीन ही लस तयार आहे. ती हैदराबाद येथे तयार करण्यात आली आहे. त्यांनी मानवी चाचण्या सुरू केल्या आहेत. सिरम इन्स्टिटय़ूट या पुण्यातील संस्थेने वर्षअखेरीस लस येईल असे म्हटले आहे.

  • अ‍ॅस्ट्रॉझेन्का ऑक्सफर्ड लशीचे उत्पादन ही कंपनी करणार आहे. त्या लशीच्या चाचण्या तिसऱ्या टप्प्यात असून ती सप्टेंबरमध्येच बाजारात आणली जाईल, असे ब्रिटनमधून आलेल्या बातम्यांत म्हटले होते.  ऑगस्ट २०२० मध्ये या लशीच्या चाचण्या भारतात सुरू होणार आहेत. वर्षअखेरीस ही लस येईल असे सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी म्हटले आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता… रात्रपाळी केल्यास मिळणार अधिक पगार :

केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मान्यता देत केंद्रीय कर्मचाऱ्यासाठी रात्रपाळी भत्ता म्हणजेच नाईट ड्युटी अलाउंस लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात कार्मिक व प्रशिक्षण विभागाने (DoPT- Department of Personnel and Training) निर्देश जारी करत माहिती दिली आहे. हे निर्देश १३ जुलै रोजी जारी करण्यात आले असून त्यांची अंलबजावणी १ जुलै २०२० पासून लागू करण्यात आली आहे.

या नव्या नियमांनुसार केंद्र सरकारने सर्व कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या व्यवस्थेनुसार विशेष ग्रेड पेवर आधारित नाइट ड्यूटी अलाउंस बंद केला आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याआधी ग्रेड पेच्या आधारावर केंद्रीय कर्मचाऱ्यांना नाइट ड्यूटी अलाउंस दिला जायचा.

  •  ज्या प्रकरणांमध्ये नाइट वेटेजच्या आधारावर कामाचे तास मोजले जातील त्या प्रकरणांमध्ये कोणताच अतिरिक्त निधी देण्यात येणार नाही. रात्रीच्या वेळी केलेलं काम हे तासाला १० मिनिट वेटेजच्या हिशेबाने मोजलं जाईल.
  • रात्री १० ते सकाळी ६ दरम्यानच्या कामालाच नाईट ड्युटी समजलं जाईल असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.
  • नाइट ड्युटी अलाउंससाठी बेसिक पेच्या आधारावर एक मर्यादा ठरवली जाईल. कार्मिक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘नाइट ड्युटी अलाउंससाठी बेसिक पेची मर्यादा ही ४३ हजार ६०० रुपये प्रती महिना या आधारावर निर्धारित करण्यात आली आहे.’
  • सरकार हा अलाउंस तासाच्या हिशेबाने कर्मचाऱ्यांना देणार आहे. हा हिशेब बीपी + डीए/२०० या आधारने करण्यात येणार आहे. येथे बीपी म्हणजे बेसिक पे तर डिए म्हणजे महागाई भत्ता असा आहे. सातव्या वेतन आयोगातील निर्देशांप्रमाणे बीपी आणि डीएची रक्कम ठरवली जाईल. हेच समिकरण सर्व मंत्रालये आणि विभागांच्या कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणार आहे.
  • केंद्र सरकारने नाइट ड्युटी अलाउंसची रक्कम प्रत्येक कर्मचाऱ्याच्या बेसिक पे आणि नाइट ड्युटीच्या आधारावर देणार आहे.
विधान परिषदेच्या १८ जागा रिक्त :
  • मुंबई : पदवीधर मतदारसंघातील तीन, तर शिक्षक मतदारसंघातील दोन आमदारांची मुदत रविवारी संपली. त्यामुळे विधान परिषदेच्या रिक्त जागांची संख्या १८ झाली आहे. राज्यपाल निर्वाचित १२ सदस्यांच्या नियुक्तीवरून राज भवन विरुद्ध महाविकास आघाडी सरकारमधील विसंवाद अद्याप कायम असल्याने या जागा कधी भरणार याबाबत अनिश्चितता कायम आहे.

  • सतीश चव्हाण (औरंगाबाद पदवीधर), अनिल सोले (नागपूर पदवीधर), श्रीकांत देशपांडे (अमरावती शिक्षक) आणि दत्तात्रय सावंत (पुणे शिक्षक) या चार आमदारांची मुदत रविवारी संपुष्टात आली. पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची विधानसभेवर निवड झाल्याने पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा रिक्त होती.

  • विधान परिषदेच्या एकू ण ७८ पैकी १८ जागा रिक्त झाल्या आहेत. राज्यपाल नियुक्त १२, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच तर धुळे-नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्था अशा १८ जागा सध्या रिक्त आहेत.

  • करोनाच्या संकटामुळे निवडणूक आयोगाने मार्चपासून होणाऱ्या नियोजित सर्वच निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. यामुळेच नागपूर, औरंगाबाद, पुणे पदवीधर तर अमरावती व पुणे या शिक्षक मतदारसंघांतील निवडणुका लगेचच होण्याची शक्यता नाही. या पाचही मतदारसंघांतील निवडणुका या वर्षांच्या अखेरीस किं वा पुढील वर्षांच्या सुरुवातीला होण्याची शक्यता व्यक्त के ली जात आहे.

२० जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.