चालू घडामोडी आणि दिनविशेष - १९ मे २०२०

Date : 19 May, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अमेरिकेत करोना लसीची पहिली मानवी चाचणी यशस्वी :
  • करोना व्हायरसला रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या लसीची अमेरिकेत मानवी चाचणी करण्यात आली आहे. अमेरिकेतील ही पहिली मानवी चाचणी आहे. या चाचणीतून समाधानकारक निष्कर्ष समोर आले आहेत. ज्यांना ही लस टोचण्यात आली, त्यांच्या शरीरावर कुठलेही दुष्परिणाम दिसलेले नाहीत तसेच करोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढली, असे ही लस विकसित करणाऱ्या मोडर्ना कंपनीने सोमवारी जाहीर केले.

  • पहिल्या आठ जणांच्या चाचणीतून ही लस सुरक्षित आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मार्चपासून या चाचण्या सुरु झाल्या होत्या. आठ स्वयंसेवकांना लसीचे दोन डोस देण्यात आले.

  • Covid-19 वर लस संशोधन करणाऱ्या मोडर्ना थेराप्युटीक्सला अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासन FDA कडून जलदगतीने आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. नोव्हाव्हॅक्स ही अमेरिकन कंपनी सुद्धा लवकरच लसीच्या मानवी चाचण्या सुरु करणार आहे. सध्याच्या घडीला Covid-19 ची लस सर्वांसाठीच महत्वाची आहे. जगात जवळपास १०० संशोधकांचे गट करोनाला रोखणारी लस शोधून काढण्यासाठी संशोधन करत आहेत. संशोधन ते क्लिनिकल चाचण्या अशा वेगवेगळया टप्प्यांवर हे लस प्रकल्प आहेत.

करोनाचे मूळ शोधण्याच्या प्रस्तावास भारताचा पाठिंबा :
  • कोविड १९ विषाणूला देण्यात आलेला जागतिक प्रतिसाद व विषाणूचे प्राणिज मूळ स्रोत शोधून काढण्याची गरज याबाबतचा प्रस्ताव जागतिक आरोग्य संघटनेचा संस्थात्मक घटक असलेल्या आरोग्य सभेच्या सोमवारपासून सुरूहोत असलेल्या परिषदेत मांडला जाण्याची शक्यता आहे. त्याला भारतासह साठ देशांनी पाठिंबा दिला आहे.

  • पाठिंबा देणाऱ्या देशात अमेरिकेचा समावेश नसल्याची प्राथमिक माहिती आहे. जागतिक आरोग्य सभेची ३२ वी वार्षिक परिषद सोमवारी सुरू होत असताना अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना विषाणूचे चीनच्या वुहानमधील मूळ शोधून काढण्यासाठी चौकशी करण्याच्या मागणीच्या अनुषंगाने काही मुद्दय़ांचा विचार करण्याचा आग्रह धरण्यात आला.

  • युरोपीय समुदायाने कोविड १९ साथीबाबत ठराव सादर केला असून त्यात असे म्हटले होते की, जागतिक आरोग्य सभेने करोना विषाणूला दिलेल्या जागतिक प्रतिसादाचे निष्पक्ष व स्वतंत्र, सर्वंकष मूल्यमापन करावे.

स्विगीमध्ये ‘कॉस्ट कटिंग’, ११०० कर्मचाऱ्यांची जाणार नोकरी :
  • ऑनलाइन फुड डिलिव्हरी क्षेत्रातील मोठी कंपनी असलेली स्विगी पुढच्या काही दिवसात १,१०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करणार आहे. कंपनीच्या मुख्यालयासह देशातील वेगवेगळया शहरातून कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार आहे. स्विगीचे सीआओ श्रीहर्ष मजेठी यांनी सोमवारी आपल्या स्टाफला यासंबंधी ई-मेल पाठवला आहे.

  • लॉकडाउन 4.0 च्या पहिल्याच दिवशी हा निर्णय समोर आला आहे. करोना व्हायरसला रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाउन सुरु आहे. मागच्या दीड महिन्यांपासून हॉटेल, फूड सेंटर बंद आहेत.

  • त्याचा व्यवसायावर मोठा परिमाण झाला आहे. स्विगीची स्पर्धक कंपनी झोमॅटोनही आपल्या ५०० कर्मचाऱ्यांनी नव्या ठिकाणी नोकरी पाहण्यास सांगितले आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

चिंता वाढली, देशातील करोनाग्रस्तांची संख्या लाखाच्या पुढे :
  • देशातील करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. देशातील करोनाबाधित रुग्णाने लाखाची संख्या ओलांडली आहे. आरोग्य मंत्र्यालयाने सकाळी दिलेल्या माहितीनुसार देशातील करोनाग्रस्तांची संख्या एक लाख एक हजार १३९ झाली आहे. गेल्या २४ तासांत ४९७० नवीन करोनाग्रस्त आढळले तर १३४ जणांचा मृत्यू झाला आहे. 

  • गेल्या आठ दिवसातील करोनाग्रस्त विदेशातून आलेले किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरातून गाव-खेड्यात पोहलले रूग्ण आहेत. स्थलांतरामुळे शहरातील करोना गाव खेड्यात पोहचल्याचे चित्र आहे.

  • देशात आतापर्यंत ३६,८२४ रुग्ण बरे झाले असून, हे प्रमाण ३८.२९ टक्के आहे. गेल्या २४ तासांत २७१५ रुग्ण बरे झाले आहेत. देशातील एकूण मृतांची संख्या ३१६३ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू आणि दिल्ली या चार राज्यांत करोनाचे जास्त रुग्ण आढळले आहेत. गेल्या आठवडय़ाभरात करोनाच्या रुग्णसंख्येत प्रतिदिन सुमारे तीन ते चार हजारांची वाढ झाली.

  • रविवारी चोवीस तासांतील रुग्णसंख्या पाच हजारांसमीप होती. ती सोमवारी एका दिवसात पाच हजारांहून अधिक नोंदली गेली. देशातील मोठ्या शहराची परिस्थिती चिंताजनक असून एकूण करोनाग्रस्तांच्या संख्येपैकी ५० टक्केंपेक्षा जास्त रूग्ण मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई आणि पुणे या पाच शहरातील आहेत. या पाच शहरातील करोनाग्रस्तांची संख्या जवळपास ५०हजार आहे.

२४ तासांत पाच हजारांहून अधिक रुग्ण :
  • टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी देशात करोनाबाधितांची २४ तासांतील उच्चांकी नोंद झाली. गेल्या २४ तासांत ५,२४२ रुग्ण आढळल्याने सोमवारी एकूण रुग्णसंख्या ९६,१६९ झाली.

  • देशात आतापर्यंत ३६,८२४ रुग्ण बरे झाले असून, हे प्रमाण ३८.२९ टक्के आहे. गेल्या २४ तासांत २७१५ रुग्ण बरे झाले आहेत. देशातील एकूण मृतांची संख्या ३,०२९ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू आणि दिल्ली या चार राज्यांत करोनाचे जास्त रुग्ण आढळले आहेत.

  • गेल्या आठवडय़ाभरात करोनाच्या रुग्णसंख्येत प्रतिदिन सुमारे तीन ते चार हजारांची वाढ झाली. रविवारी चोवीस तासांतील रुग्णसंख्या पाच हजारांसमीप होती. ती सोमवारी एका दिवसात पाच हजारांहून अधिक नोंदली गेली.

१९ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.