चालू घडामोडी आणि दिनविशेष - १९ जून २०२१

Updated On : Jun 19, 2021 | Category : Current Affairs


पदव्युत्तर वैद्यकीय परीक्षा  रद्द किंवा लांबणीवरही नाही :
 • परीक्षार्थी डॉक्टर करोनाकाळात वैद्यकीय सेवेत गुंतल्याने अंतिम वर्षाची पदव्युत्तर वैद्यकीय परीक्षा रद्द करणे अथवा लांबणीवर टाकण्याचा आदेश आरोग्य विद्यापीठांना देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

 • सुटीकालीन पीठाचे न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि न्यायमूर्ती एम.आर. शहा यांनी परीक्षा रद्द किंवा पुढे ढकलण्यासंदर्भात कोणतेही आदेश देऊ शकत नाहीत, असे स्पष्ट केले.

 • राष्ट्रीय वैद्यकीय मंडळाने (एनएमसी) एप्रिल महिन्यातच एक पत्रक काढून वैद्यकीय महाविद्यालयांना करोनाची स्थितीचा आढावा घेऊन अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्याची सूचना केली होती, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.

 • नवी दिल्लीच्या एम्समार्फत घेतली जाणारी ‘आयएनआय सीईटी’ परीक्षा एक महिन्यासाठी पुढे ढकलण्याबाबत आम्ही हस्तक्षेप केला, कारण विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यास पुरेसा कालावधी न देता परीक्षेची तारीख जाहीर करणे समर्थनीय नव्हते, असे सांगत पीठाने अ‍ॅडव्होकेट संजय हेगडे यांनी केलेली याचिका फेटाळून लावली.

 • अ‍ॅड. हेगडे यांनी २९ डॉक्टरांच्या वतीने ही याचिका सादर केली होती. एनएमसीने सर्व विद्यापीठांना परीक्षार्थींना परीक्षेसाठी पुरेसा कालावधी द्यावा, असे आदेश देण्याबाबत ही याचिका होती.

इंग्लंडमधील प्रतिष्ठेच्या Artes Mundi पुरस्कारानं प्रभाकर पाचपुते सन्मानित :
 • महाराष्ट्रातून जागतिक पटलावर आपल्या कुंचल्यांची अमिट छाप सोडणारे प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर पाचपुते यांना इंग्लंडमधल्या प्रतिष्ठेच्या आर्ट्स मंडी ९ पुरस्करानं सन्मानित करण्यात आलं आहे. त्यामुळे भारतासोबतच विशेष करून महाराष्ट्राच्या शिरपेचाच मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे.

 • ‘आर्ट्स मंडी’ या आंतरराष्ट्रीय पातळीवर कलाविष्कारांना सन्मानित करणाऱ्या संस्थेकडून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यंदा हा पुरस्कार इतर ५ आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रकारांसोबत प्रभाकर पाचपुतेंना संयुक्तपणे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

 • पाचपुते यांनी काढलेल्या ‘पोलिटिकल अ‍ॅनिमल’ या चित्रमालिकेतील चित्रांसाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

भारतात शाळा पुन्हा कधी सुरु होणार? केंद्र सरकारने दिली माहिती :
 • देशात करोना संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे घेऊन विविध निर्बंध लादले गेले आहेत. देशातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद गेल्या वर्षभरापासून बंद आहेत. पण आता भारतात करोनाची रुग्णांची संख्या झाल्यामुळे अनलॉक करण्यास  राज्यांकडून सुरुवात करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत  राज्यांनी आता शाळादेखील सुरू कराव्यात अशी मागणी केली आहे. यावर केंद्राने आता शाळा सुरु करण्याबाबत माहिती दिली आहे.

 • गेल्या वर्षभरापासून शैक्षणिक संस्था बंद असल्याने देशभरात अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यामुळे, बहुतेक शिक्षकांना लसीकरण झाल्यावरच शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार केला जाईल अशी माहिती केंद्र सरकारने शुक्रवारी दिली. “शाळा सुरु करण्यासारखी परिस्थिती लवकर यायला पाहिजे.

 • परदेशांमध्ये शाळा सुरु केल्यानंतर करोनाचा पुन्हा उद्रेक झाला आणि त्या बंद कराव्या लागल्या. याचा विचार देखील आपल करायला हवा. आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अशा परिस्थितीसमोर उभे करायचे नाही,” असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत नीति आयोगाचे (आरोग्य) सदस्य व्ही के पॉल यांनी सांगितले.

‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंग यांचे निधन :
 • भारताचे महान माजी धावपटू आणि ‘फ्लाईंग सिख’ अशी ओळख असलेले मिल्खा सिंग यांचे निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. मोहालीतील एका रुग्णालयात मिल्खा सिंग यांना दाखल करण्यात आले होते.

 • करोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना बुधवारी जनरल आयसीयूत ठेवण्यात आले. त्यानंतर मिल्खा सिंग यांना अचानक ताप आला. शिवाय त्यांच्या ऑक्सिजन पातळीतही घसरण झाली. काही दिवसांपूर्वी मिल्खा यांच्या पत्नीचेही करोनामुळे निधन झाले होते.

 • गेल्या महिन्यात झाली करोनाची लागण - गेल्या महिन्यात मिल्खा सिंग यांना करोनाचा संसर्ग झाला होता. यानंतर त्यांना मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठवडाभर उपचारानंतर त्यांना घरीही सोडण्यात आले होते. घरी परतल्यावर त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली, त्यानंतर त्यांना पीजीआयएमईआर (PGIMER) चंदीगडमध्ये  दाखल केले गेले.

पंडित नेहरूंनी आग्रह केला अन् मिल्खा सिंग बनले ‘फ्लाईंग शिख’ :
 • भारत-पाकिस्तान फाळणीच्या झळा ज्यांनी सोसल्या त्यांना आजही या वेदनांनी असह्य होतं. भारताच्या इतिहासातील प्रचंड नरसंहार झाला. दोन देशांमध्ये धावणाऱ्या अनेक रेल्वे रक्ताने न्हाऊन निघाल्या होत्या. मृतदेहांचे ढिग बाहेर काढावे लागत होते.

 • अनेक कुटुंब कायमची मिटली, तर काहींना कुटुंबाशिवाय आयुष्यभर या वेदना घेऊन जगावं लागलं. फाळणीच्या झळा सोसलेल्यांपैकी एक होते मिल्खा सिंग… ज्यांचं नाव भारत-पाकिस्तानच्या इतिहासात फ्लाईंग शिख मिल्खा सिंग असं नोंदवलं गेलं. मिल्खा सिंग यांचा फ्लाईंग शिख असा बहुमान होण्याचा किस्साही तितकाच चित्तथरारक आणि डोळ्यात पाणी आणणारा आहे.

 • भारत-पाकिस्तान ही दोन राष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर त्यांच्यातील संबंध अधिक मैत्रीपूर्ण होण्यासाठी एक प्रयत्न केला गेला. १९६० साली भारत-पाकिस्तान मैत्रीच्या निमित्ताने अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

 • या स्पर्धेत होणारे सामने वरकरणी मैत्रीपूर्ण वाटत असले, तरी ते प्रतिष्ठेचे होते. त्यामुळे जवाहरलाल नेहरु यांनी मिल्खा सिंग यांना या स्पर्धेत खेळण्याची विनंती केली होती. त्यावेळी मिल्खा भारतातील सर्वाधिक वेगवान धावपटू होते. परंतु त्यांची या स्पर्धेत भाग घेण्याची मूळीच इच्छा नव्हती.

१९ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)