चालू घडामोडी आणि दिनविशेष - १९ जून २०२०

Date : 19 June, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जुलैपासून पक्षीशास्त्र, जैवविविधता, वन्यजीव संवर्धन प्रमाणपत्र अभ्यासक्रम :
  • शहरातील समर्पण संस्था संचलित पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन शाळेच्या वतीने एक जुलैपासून पक्षीशास्त्र, जैवविविधता, वन्यजीव आणि वने संवर्धन या तीन अभ्यासक्रमांना सुरूवात होत असून कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या वतीने त्यांना मान्यता देण्यात आली आहे.

  • उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच  निसर्ग आणि वनसंवर्धन क्षेत्रातील अभ्यासक्रम सुरू होत आहेत. या अभ्यासक्रमांना महाराष्ट्रातील अनेक तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत यामध्ये किशोर रिठे, डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, डॉ. वरद गिरी, अभय उजागरे, मयुरेश कुलकर्णी, अनिल महाजन,  अमन गुजर यांचा समावेश आहे.

  • अभ्यासक्रमांविषयी  अधिक माहितीसाठी समन्वयक राहुल सोनवणे ९२७००७६५७८ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पर्यावरण शाळेचे संचालक राजेंद्र नन्नवरे यांनी केले आहे.

मोदींची नवी घोषणा; रोजगारनिर्मितीसाठी देणार ५० हजार कोटी; सहा राज्यांना होणार फायदा :
  • करोना महामारीमुळे घेण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेक मजूर आपल्या गावी परतले. अशाच मजूरांसाठी मोदी सरकार नव्या योजनाची घोषणा करणार आहेत. स्थलांतरीत मजूरांसाठी केंद्र सरकारने ५० हजार कोटी रुपयांचे पॅकेज तयार केलं आहे. याअंतर्गत रोजगारनिर्मिती करण्यात येणार आहे. याचा फायदा सहा राज्यातील ११६ जिल्ह्यांना होणार आहे.

  • या योजनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, शनिवारी २० जून रोजी बिहारमधील खगडिया गावातून होणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. या योजनेचे नाव ‘गरीब कल्याण योजना’ असे असून शुक्रवारी पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या योजनेचा शुभारंभ करणार आहेत.

  • बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, झारखंड अशा सहा राज्यांतील ११६ जिल्ह्य़ांमधील ही योजना सुरू होणार आहे. ११६ जिल्ह्य़ांमध्ये प्रत्येकी किमान २५ हजार मजूर गावी परतल्याचे केंद्राला आढळळ्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. या योजनाचा लाभ २९ लाख मजुरांना होणार असून पुढील ४ महिने (१२५ दिवस) रोजगाराची हमी देणारी योजना राबवली जाणार आहे.

दिल्ली सरकार उभारणार २२ फुटबॉल मैदानांच्या आकाराचं जगातील सर्वात मोठं कोविड सेंटर :
  • राजधानी दिल्लीत करोनाचा वाढता प्रभाव पाहता संकटाचा सामना करण्यासाठी पूर्ण तयारी केली जात आहे. दिल्ली सरकारने राजधानीत जगातील सर्वात मोठं तात्पुरतं कोविड सेंटर उभारण्यास सुरुवात केली आहे.

  • राधा सोमी अध्यात्मिक केंद्रात हे आरोग्य केंद्र उभारलं जात आहे. या ठिकाणी १० हजार बेडची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. 

  • छत्तरपूर येथे उभारण्यात येत असलेलं कोविड सेंटर १२ लाख ५० हजार स्क्वेअर फूट परिसर व्यापणार आहे. हे सेंटर जवळपास २२ फुटबॉल मैदानांइतकं मोठं असणार आहे. या ठिकाणी पंखे तसंच सीसीटीव्हीची व्यवस्था असणार आहे. या ठिकाणी तीन लाख लोक प्रवचन ऐकण्यासाठी उपस्थित असतात. भव्य असल्यानेच ही जागा कोविड सेंटर उभारण्यासाठी निवडण्यात आलं आहे.

घरीच राहून कुटुंबीयांसोबत करा योगा! यावर्षीची थीम पंतप्रधान मोदींकडून जाहीर :
  • घरीच राहा आणि कुटुंबीयांसोबत करा योगा असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षीची योगा डे ची थीम जाहीर केली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये योगासनं करणं तरुण वर्गात लोकप्रिय होत चालली आहेत याचा विशेष आनंद होतो आहे आपण यावर्षी ६ वा योग दिवस साजरा करतो आहोत. हा जनतेने सार्वजनिक पद्धतीने साजरा करण्याचा दिवस असतो.

  • मात्र यावर्षी आपल्याला हा योग दिवस सार्वजनिक रित्या साजरा करता येणार नाही. या वर्षीची थीम आहे घरीच राहून कुटुंबीयांसोबत करा योग असल्याचं मोदींनी जाहीर केलं.

भारत चीन संघर्ष - पंतप्रधानांची आज सर्वपक्षीय बैठक :
  • पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात झालेला संघर्ष आणि एकूणच चीनला लागून असलेल्या सीमेवरील परिस्थिती संदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे.

  • आज संध्याकाळी पाच वाजता या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधानांनी टि्वटरवरुन ही माहिती दिली होती. भारतातील विविध पक्षाचे प्रमुख या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत.

  • सोमवारी रात्री पूर्व लडाखच्या गलवाण खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. चीनच्या बाजूलाही मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले आहेत. तसंच भारताच्या जखमी जवानांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहितीही समोर आली आहे.

१९ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.