चालू घडामोडी आणि दिनविशेष - 19 जानेवारी 2024

Date : 19 January, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राज्यसेवा मुख्य परीक्षेत विनायक पाटील राज्यात प्रथम; ‘एमपीएससी’कडून २०२२ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगा(एमपीएससी)तर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. त्यात विनायक पाटील यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळवला.
  • एमपीएससीने सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि संबंधित माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ विविध २३ संवर्गातील ६१३ पदांसाठी घेण्यात आली होती. राज्यसेवेची आतापर्यंतची सर्वाधिक पदांची भरती प्रक्रिया असल्याने राज्यभरातील उमेदवारांचे या निकालाकडे लक्ष लागले होते. एमपीएससीने जाहीर केलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये धनंजय बांगर यांनी राज्यात द्वितीय, तर सौरभ गावंडे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. यादीमध्ये एकूण १८३० उमेदवारांचा समावेश आहे.
  • सर्वसाधारण गुणवत्ता यादी तात्पुरत्या स्वरूपाची आहे. अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे, कागदपत्रे पडताळणी करताना काही उमेदवारांच्या दाव्यामध्ये बदल होऊ शकतो. तसेच उमेदवाराचा गुणवत्ताक्रम बदलू शकतो. न्यायालयात, न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणांतील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्तायादी जाहीर केली आहे.
  • परीक्षेतील पदांसाठी पसंतीक्रमाचे पर्याय सादर करण्यासाठीची प्रक्रिया २२ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. अधिसूचित संवर्ग-पदांसाठी १ ते २३ यातील पसंतीक्रम निवडणाऱ्या उमेदवारांचा त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार सर्व पदांवरील निवडीसाठी विचार होईल. २३ संवर्गापैकी ज्या पदावरील निवडीसाठी इच्छुक आहे, केवळ त्याच पदासाठी पसंतीक्रम सादर करावेत. निवडीसाठी इच्छुक नसलेल्या पदासाठी ‘नो प्रेफरन्स’ हा पर्याय निवडावा. पसंतीक्रम सादर केल्यानंतर त्याची पीडीएफ उमेदवाराला डाउनलोड करून जतन करता येणार आहे.
  • राज्यात पहिल्या आल्याचा खूपच आनंद झाला. मी मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड येथील आहे. आई-वडील शेती करतात. राज्यसेवेचा माझा दुसरा प्रयत्न होता. पहिल्या प्रयत्नातून उपशिक्षणाधिकारी पदासाठी निवड झाली आहे. मी संख्याशास्त्र विषयात फग्र्युसन महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. त्यात विनायक पाटील यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळवला. एमपीएससीने सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि संबंधित माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ विविध २३ संवर्गातील ६३३ पदांसाठी घेण्यात आली होती. राज्यसेवेची आतापर्यंतची सर्वाधिक पदांची भरती प्रक्रिया असल्याने राज्यभरातील उमेदवारांचे या निकालाकडे लक्ष लागले होते. एमपीएससीने जाहीर केलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये धनंजय बांगर यांनी राज्यात द्वितीय, तर सौरभ गावंडे यांनी तृतीय क्रमांक मिळवला.  एकूण १८३० उमेदवारांचा समावेश आहे.
  • सर्वसाधारण गुणवत्ता यादी तात्पुरत्या स्वरुपाची आहे. अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे, कागदपत्रे पडताळणी करताना काही उमेदवारांच्या दाव्यामध्ये बदल होऊ शकतो. तसेच उमेदवाराचा गुणवत्ताक्रम बदलू शकतो. न्यायालयात, न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणांतील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहुन सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. परीक्षेतील पदांसाठी पसंतीक्रमाचे पर्याय सादर करण्यासाठीची प्रक्रिया २२ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. अधिसूचित संवर्ग-पदांसाठी १ ते २३ यातील पसंतीक्रम निवडणाऱ्या उमेदवारांचा त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार सर्व पदांवरील निवडीसाठी विचार होईल.
  • २३ संवर्गांपैकी ज्या पदावरील निवडीसाठी इच्छुक आहे, केवळ त्याच पदासाठी पसंतीक्रम सादर करावेत. निवडीसाठी इच्छुक नसलेल्या पदासाठी नो प्रेफरन्स हा पर्याय निवडावा. पसंतीक्रम सादर केल्यानंतर त्याची पीडीएफ उमेदवाराला डाऊनलोड करून जतन करता येणार आहे. पसंतीक्रमाचे पर्याय केवळ ऑनलाइन पद्धतीनेच सादर करणे आवश्यक असून, त्यासाठीची अंतिम मुदत २९ जानेवारी आहे. या मुदतीनंतर संवर्ग, पदांचे पसंतीक्रम सादर करण्याची किंवा बदलण्याची विनंती मान्य केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

राज्यात पहिल्या आल्याचा आनंद

  • मी मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगरड येथील आहे. आई-वडील शेती करतात. राज्यसेवेचा माझा दुसरा प्रयत्न होता. पहिल्या प्रयत्नातून उपशिक्षणाधिकारी पदासाठी निवड झाली आहे. मी संख्याशास्त्र विषयात फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आहे.
खासगी क्लासेससाठी सरकारची नवी नियमावली जारी; प्रवेशप्रक्रियेसह ‘या’ मुद्द्यांचा केला समावेश!
  • गेल्या काही वर्षांपासून खासगी कोचिंग क्लासेसचं प्रस्थ वाढलं आहे. चांगल्या शाळा-कॉलेजात प्रवेश घेतल्यानंतर पालक आपल्या पाल्याला चांगल्या शिक्षणाच्या आशेने खासगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेऊन देतात. पालकांचा ओढा जास्त वाढल्याने खासगी कोचिंग क्लासेसचालकांनीही खोटी आमिषे आणि फसव्या जाहिराती करून पालकांना आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, आता शिक्षण मंत्रालयाने या सर्वांवर चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण मंत्रालयाने नवे मार्गदर्शक तत्वे जाहीर केले असून त्यानुसार, १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांची ते नोंदणी करू शकत नाहीत. तसंच, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि चांगल्या गुणांची हमी देणं बेकायदेशीर ठरवण्यात येणार आहेत. कायदेशीर चौकटीची गरज आणि खाजगी कोचिंग केंद्रांच्या अनियंत्रित वाढीचे व्यवस्थापन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत.
  • विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटना, कोचिंग क्लासेसमध्ये आगीच्या घटना वाढल्याने, कोचिंग क्लासेसमध्ये सुविधांचा अभाव तसेच त्यांनी अवलंबलेल्या अध्यापनाच्या पद्धतींबाबत सरकारकडे आलेल्या तक्रारींनंतर मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत.

चांगल्या गुणांची हमी देता येणार नाही

  • “कोणतेही कोचिंग सेंटर पदवीपेक्षा कमी पात्रता असलेल्या शिक्षकांना नियुक्त करू शकत नाही. कोचिंग सेंटर्समध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी संस्था दिशाभूल करणारी आश्वासने देऊ शकत नाहीत किंवा पालकांना दर्जा किंवा चांगल्या गुणांची हमी देऊ शकत नाहीत. संस्था १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करू शकत नाही. विद्यार्थ्यांची नोंदणी ही माध्यमिक शाळेच्या परीक्षेनंतरच व्हायला हवी”, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे.

फसव्या जाहिरातींवर चाप

  • “कोचिंग संस्था कोचिंगच्या गुणवत्तेबद्दल किंवा दिशाभूल करणारी जाहिरात प्रकाशित करू शकत नाही किंवा त्यात भाग घेऊ शकत नाही”, असंही यात म्हटलं आहे. गुन्हा दाखल असलेल्या शिक्षकांना कोचिंग सेंटर्स कार्यरत ठेवू शकत नाही. या मार्गदर्शक तत्त्वांच्या आवश्यकतेनुसार समुपदेशन प्रणाली असल्याशिवाय संस्थेची नोंदणी केली जाणार नाही, अशीही तरतूद त्यात करण्यात आली आहे.

क्लासची हवी स्वतंत्र वेबसाईट

  • “कोचिंग सेंटर्सकडे ट्यूटरची (शिक्षकाची) पात्रता, अभ्यासक्रम, अभ्यासक्रम पूर्ण होण्याचा कालावधी, वसतिगृहाची सुविधा आणि आकारले जाणारे शुल्क यांचा अद्ययावत तपशील असलेली वेबसाइट असावी. कठीण स्पर्धा आणि विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक दबावामुळे, कोचिंग सेंटर्सने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी पावले उचलली पाहिजेत आणि त्यांच्यावर अवाजवी दबाव न आणता वर्ग आयोजित केले पाहिजेत”, अशीही अट यामध्ये ठेवण्यात आली आहे.
राम मंदिराच्या गाभाऱ्यात प्रभू रामचंद्रांची मूर्ती, पहिला फोटो समोर
  • २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. अत्यंत भव्य दिव्य असा सोहळा होणार आहे यात शंकाच नाही. देश-विदेशातल्या दिग्गजांना रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. १८ जानेवारीला गाभाऱ्यात मूर्ती ठेवण्यात आली. या मंदिरातला मूर्तीचा पहिला फोटो आता समोर आला आहे. ANI ने या विषयीचं वृत्त दिलं आहे. रामाची मूर्ती कशी असणार? याबाबत देशभरात चर्चा आहे. रामलल्ला म्हणजेच बाळ रुपातील राम या मंदिरात असणार आहेच. याशिवाय अरुण योगीराज यांनी शाळीग्राम दगडापासून घडवलेली रामाची मूर्तीही असणार आहे. अरुण योगीराज यांनी घडवलेली मूर्ती गाभाऱ्यात ठेवण्यात आली आहे. याच मूर्तीचा फोटो समोर आला आहे. सोशल मीडियावर या फोटोची चर्चा होते आहे.
  • राम मंदिराच्या गाभाऱ्यात प्रभू श्रीरामाची मूर्ती ठेवण्यात आल्यानंतर या मूर्तीचा फोटो समोर आला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीच्या कामात गुंतलेले सर्व कामगार मूर्ती ठेवण्यात आल्यानंतर हात जोडून प्रार्थना करत असल्याचं पाहायला मिळत आहेत.
  • कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी कृष्णशिला येथे ही मूर्ती तयार केली आहे. मैसूरच्या प्रसिद्ध शिल्पकारांच्या पाच पिढ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले अरुण योगीराज सध्या देशातील सर्वात प्रसिद्ध शिल्पकार आहेत. अरुण योगीराज यांनी यापूर्वी अनेक रेखीव मूर्ती आणि शिल्पं साकारली आहेत. अरुण यांच्या कामाचं कौतुक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलेलं आहे. अरुण यांचे वडील योगीराज हे देखील कुशल शिल्पकार. तर, त्यांचे आजोबा बसवण्णा शिल्पी यांना मैसूरच्या राजानं संरक्षण दिलं होतं.

काय आहेत रामाच्या मूर्तीची वैशिष्ट्ये?

  • गाभाऱ्यात ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे ती सावळ्या रंगाची आहे आणि ही मूर्ती म्हणजे रामाचं बालरुप आहे.
  • ५ वर्षांच्या रामाची ही मूर्ती आहे जी गाभाऱ्यात बसवली जाईल आणि त्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ तारखेला पार पडणार आहे.
  • शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेली ही रामाची मूर्ती ५१ इंची आहे. या मूर्तीचं वजन २०० किलो आहे.
  • गाभाऱ्यात ही मूर्ती ठेवण्यात येणार आहे आणि २२ जानेवारी या दिवशी दुपारी १२.२० या वेळी प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरु होईल जो दुपारी १ वाजपेर्यंत चालण्याची शक्यता आहे.

 

भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिका: गिलचे धडाकेबाज द्विशतक 
  • सलामीवीर शुभमन गिलने (१४९ चेंडूंत २०८ धावा) आपली गुणवत्ता व प्रतिभा सिद्ध करताना केलेल्या द्विशतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडवर १२ धावांनी सरशी साधली. मायकल ब्रेसवेलच्या (७८ चेंडूंत १४०) झंझावाती खेळीमुळे न्यूझीलंडला विजयाची संधी निर्माण झाली होती. मात्र, अखेरीस मुंबईकर शार्दूल ठाकूरने ब्रेसवेलला पायचीत पकडत भारताला निसटता विजय मिळवून दिला.
  • हैदराबाद येथे झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ८ बाद ३४९ अशी विशाल धावसंख्या उभारली. त्यानंतर अडखळत्या सुरुवातीनंतर न्यूझीलंडने विजयासाठी झुंज दिली. मात्र, अखेरीस न्यूझीलंडचा डाव ४९.२ षटकांत ३३७ धावांत संपुष्टात आल्याने भारताने सामना जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
  • गेल्या काही काळापासून गिलबाबत बरीच चर्चा केली जात आहे. अनुभवी सलामीवीर शिखर धवनला गेल्या काही काळापासून धावांसाठी झगडावे लागत होते. त्यामुळे त्याने एकदिवसीय संघातील स्थान गमावले आणि त्याच्या जागी गिलला सलामीला संधी देण्याचा भारतीय संघ व्यवस्थापनाने निर्णय घेतला. गिलने सातत्यपूर्ण कामगिरी करत हा विश्वास सार्थ ठरवला होता. मात्र, न्यूझीलंडविरुद्ध त्याने द्विशतकी खेळी साकारत आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थानाकरिता आपली दावेदारी अधिकच भक्कम केली आहे.
  • या सामन्यात गिल आणि कर्णधार रोहित शर्मा (३८ चेंडूंत ३४) यांनी भारताच्या डावाची आक्रमक सुरुवात केली. रोहित लयीत दिसत होता. मात्र, वेगवान गोलंदाज ब्लेअर टिकनरच्या गोलंदाजीवर तो माघारी परतला. तसेच गेल्या चारपैकी तीन सामन्यांत शतक करणारा विराट कोहली (८) आणि इशान किशन (५) यांना फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. यानंतर गिलने सूर्यकुमार यादव (२६ चेंडूंत ३१) आणि हार्दिक पंडय़ा (३८ चेंडूंत २८) यांच्या साथीने अर्धशतकी भागीदाऱ्या रचत भारताचा डावाला आकार दिला. तसेच अखेरच्या षटकांत गिलने डावाची सूत्रे आपल्या हाती घेत न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने एकदिवसीय कारकीर्दीतील तिसरे शतक ८७ चेंडूंत, तर पहिले द्विशतक १४५ चेंडूंत पूर्ण केले. त्याने आपल्या खेळीत १९ चौकार व ९ षटकारांची आतषबाजी केली.
तीन राज्यांमध्ये निवडणुका जाहीर ;त्रिपुरा, मेघालय, नागालँडचा समावेश; २ मार्च रोजी मतमोजणी
  • ईशान्येकडील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी घोषणा केली. त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारी तर, मेघालय व नागालँडमध्ये २७ फेब्रुवारीला मतदान होणार असून २ मार्च रोजी मतमोजणी होईल.तीनही विधानसभांचा कार्यकाळ मार्चमध्ये वेगवेगळय़ा तारखांना संपणार आहे.
  • त्रिपुरामध्ये भाजपचे सरकार आहे, तर नागालँडमध्ये राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी सत्तेत आहे. ईशान्येकडील एकमेव पक्ष ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून मान्यता असलेल्या नॅशनल पीपल्स पार्टीची मेघालयमध्ये सत्ता आहे.
  • याशिवाय, केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीच्या तारखाही जाहीर केल्या. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशातील राष्ट्रवादी काँग्रेसचे महम्मद फैजल यांना निवडणूक आयोगाने अपात्र ठरवल्याने या लोकसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होत आहे. याशिवाय, अरुणाचल प्रदेश, झारखंड, तामीळनाडू, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या पाच राज्यांतील सहा विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणूक होत असून सर्व मतदारसंघात २७ फेब्रुवारीला मतदान होईल. इतर निकालासह २ मार्च रोजी मतमोजणी होईल.
कंगाल पाकिस्तानला बसणार मोठा झटका? अमेरिकेतील बायडेन सरकार ‘हा’ महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत
  • अफगाणिस्तानंतर पाकिस्तानाचीही गैर-नाटो सदस्यता रद्द करण्यासंदर्भात अमेरिकेकडून विचार सुरू आहे. यासंदर्भात खासदार एंडी बिग्स यांनी अमेरिकी संसदेत विधेयक (HR 80 ) मांडले आहे. या विधेयकावर जो बायडेन यांनी स्वाक्षरी केल्यास पाकिस्तानची गैर-नाटो सदस्यता रद्द होणार आहे. दरम्यान, त्यापूर्वी हे विधेयक प्रतिनिधी सभा आणि सीनेटमध्ये पारीत होणे आवश्यक असून त्यासाठी हे विधेयक परराष्ट्र व्यवहार समितीकडे पाठवण्यात आले आहे.
  • गैर-नाटो सदस्यतेचे फायदे काय - गैर-नाटो सदस्य म्हणून अमेरिकेकडून पाकिस्तानला संरक्षण आणि संशोधन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली जाते. तसेच पाकिस्तानला कर्ज पुरवठादेखील केला जातो. ही सदस्यता जर अमेरिकेकडून रद्द करण्यात आली तर पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का असेल. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला आणखी एका नव्या संकटाचा सामना करावा लागेल.
  • यापूर्वी अफगाणिस्तानची नाटो सदस्यता रद्द - गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानची गैर-नाटो सदस्यता रद्द केली होती. अफगाणिस्तानमधून माघार घेतल्यानंतर अमेरिकेने हा निर्णय घेतला होता. गेली अनेक वर्ष गैर नाटो सदस्य म्हणून अमेरिकेकडून अफगाणिस्तानला संरक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मदत केली जात होती.
  • सध्या १८ गैर-नाटो सदस्य देश - अमेरिकेने १९८७ मध्ये मित्र राष्ट्रांना गैर-नाटो सदस्यता देण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार आतापर्यंत अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, बहरीन, ब्राझील, कोलंबिया, इजिप्त, इस्रायल, जपान, जॉर्डन, कुवेत, मोरोक्को, न्यूझीलंड, पाकिस्तान, फिलीपिन्स, कतार, दक्षिण कोरिया, थायलंड, ट्युनिशिया आणि अफगाणिस्तान अशा १९ देशांना गैर-नाटोची सदस्यता देण्यात आली आहे. मात्र, गेल्या वर्षी अफगाणिस्तानची सदस्यता रद्द केल्यानंतर आता केवळ १८ देश सदस्य आहेत.
विराट कोहली बनणार ‘वन डे’तील नंबर १ फलंदाज, बाबर आझमची खुर्ची धोक्यात
  • भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आजपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. आज पहिला सामना हैदराबादमध्ये आहे. याआधी टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये विराट कोहलीने अप्रतिम कामगिरी केली आहे.
  • विराट कोहलीही मधल्या काळात टॉप १०च्या यादीतून बाहेर होता, पण यादरम्यान त्याने चार सामन्यात तीन शतके झळकावून फॉर्ममध्ये परतल्याबद्दल जगाला सांगितले आहे. विराट कोहली आता तीन-चार वर्षांपूर्वी जशी फलंदाजी करत होता, तशीच फलंदाजी करत आहे. विराट कोहलीने पुन्हा एकदा टॉप ५ मध्ये एंट्री केली असून कोहलीने भविष्यातही असाच फॉर्म कायम ठेवला तर पहिल्या क्रमांकाचे स्थान त्याच्यापासून फार दूर नाही, असे मानले जात आहे.
  • आयसीसीच्या ताज्या वन डे क्रमवारीत विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आयसीसीच्या नव्या क्रमवारीत विराट कोहली ७५०च्या रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. बाबर आझमच्या रेटिंगबद्दल बोलायचे झाले तर ते ८८७ आहे. रासी व्हॅन डर डुसेन ७६६ रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर क्विंटन डिकॉक आता तिसऱ्या क्रमांकावर असून त्याचे रेटिंग ७५९ आहे. विराट कोहली ७५० रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले आहे.
  • ताज्या क्रमवारीत विराट कोहलीला चार स्थानांचा फायदा झाला आहे. डेव्हिड वॉर्नर पाचव्या क्रमांकावर असून त्याचे रेटिंग ७४७ वर पोहोचले आहे. त्यांनी एक पद गमावले आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचा इमाम-उल-हक सहाव्या स्थानावर असून त्याचे रेटिंग ७४० आहे. त्याला एक जागाही गमवावी लागली आहे. टॉप १० नंतर चार फलंदाजांबद्दल बोलायचे तर, केन विलियम्सन सातव्या क्रमांकावर आणि स्टीव्ह स्मिथ आठव्या क्रमांकावर आहे, ज्यांनी या क्रमवारीत एक स्थान गमावले आहे. यानंतर जॉनी बेअरस्टो नवव्या तर भारतीय कर्णधार रोहित शर्मा दहाव्या क्रमांकावर आहे.
पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर, मेट्रो २ सह विविध प्रकल्पाचं करणार लोकार्पण; जाणून घ्या प्रत्येक अपडेट
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या सात सांडपाणी प्रकल्पांचे, तीन रुग्णालयांचे, ४०० किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचे आणि रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. तर मेट्रो २ अ, मेट्रो ७ आणि २० आपला दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. 
  • वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) मैदानात डिजीटल पध्दतीने भूमीपूजन आणि लोकार्पण पार पडेल. त्यानंतर पंतप्रधानांची सभाही होणार आहे. यावेळी पंतप्रधान मेट्रो मार्गाने काही अंतर प्रवासही करणार आहेत. पंतप्रधानांच्या कार्यक्रमांसाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि मुंबई महापालिका यंत्रणेने पूर्ण तयारी केली आहे. मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
  • दरम्यान, या दौऱ्यावरून विरोधकांकडून टीकाही करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणारी बरीचशी कामं ही महाविकास आघाडीच्या काळात झाली असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे.
चालू घडामोडी आणि दिनविशेष - १९ जानेवारी २०२२
 
हॅट्स ऑफ नादिया..! तालिबान्यांमुळं देश सोडला, ११ भाषा शिकल्या, २०० गोल केले आणि आता बनली डॉक्टर :

अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे राज्य आहे. तालिबानने महिलांवर विविध निर्बंध लादले आहेत. १९९६-२००२ दरम्यान तालिबानने पहिल्यांदा अफगाणिस्तानवर कब्जा केला. यादरम्यानही त्यांनी महिलांचे शोषण केले. या राजवटीत एक मुलगी अफगाणिस्तान सोडून गेली होती आणि डेन्मार्कला पोहोचली.

डेन्मार्कसाठी ती राष्ट्रीय स्तरावर फुटबॉल खेळली. मेहनतीने ती त्या संघाची प्रमुख खेळाडू बनली. आता ती डॉक्टर झाली आहे. नादिया नदीम असे या महिलेचे नाव असून तिची संघर्षगाथा थक्क करणारी आहे..

नादियाचा जन्म अफगाणिस्तानातील हेरात येथे झाला. तिचे वडील अफगाण नॅशनल आर्मीमध्ये जनरल होते, तालिबानने नादियाच्या वडिलांना मारले. वयाच्या ११ व्या वर्षी वडील गमावल्यानंतर नादियाने देश सोडला.

खोट्या ओळखीखाली प्रवास करून अनेक निर्वासितांच्या छावण्या गाठल्या. ती पाकिस्तानातील कराचीला दोन महिने राहिली. यानंतर ती इटलीला पोहोचली, जिथे ती अनेक दिवस भटकत होती.

१२ ते १४ वयोगटासाठी लसीकरणाबाबत समोर आली नवीन माहिती :

भारतात करोना विषाणू विरूद्ध लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. दरम्यान, १२ ते १४ वयोगटातील बालकांच्या लसीकरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. या वयोगटातील बालकांच्या लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

या अगोदर १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास मार्चपर्यंत सुरूवात होणार असल्याची माहिती समोर आली होती. शिवाय माध्यमांमधून याबाबत बातम्या देखील झळकल्या होत्या. त्यानंतर आज वृत्ताचे खंडण करण्यात आले असून, अद्याप या बद्दल कोणताही निर्णय झालेला नसल्याचे वृत्त अधिकारीक सुत्रांच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे.

देशात करोना महामारीची तिसरी लाट आलेली आहे. दैनंदिन करोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठ वाढ दिसून येत आहे. शिवाय, करोनाचाच नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनाचे रूग्ण देखील आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्र व राज्य सरकारांकडून अधिक सतर्क होत, विविध उपाय योजनांची अंमलबाजवणी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणजे १०० टक्के लसीकरणावर भर दिला जात आहे.

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे भारताचे नवे उपसेनाप्रमुख; केंद्र सरकारने दिली मान्यता :

भारतीय सुरक्षा दल त्यांच्या नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या नियुक्तीची आतुरतेने वाट पाहत आहेत. जनरल रावत यांच्या निधनाला एक महिना उलटूनही केंद्र सरकार नवीन सीडीएसबाबत निर्णय घेऊ शकलेले नाही.

मात्र, या शोधात सरकारकडून लष्करात नियुक्त्या सुरूच आहेत. केंद्राने पूर्व लष्कराचे कमांडिंग असलेले लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांना देशाचे पुढील उपसेनाप्रमुख बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे की, जनरल पांडे यांची या पदावर नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यासह जनरल पांडे १ फेब्रुवारीपासून लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती यांच्या जागी उपलष्कर प्रमुख म्हणून नियुक्त होतील. जनरल मोहंती ३१ जानेवारीला निवृत्त होत आहेत.

तीन राज्यांचे चित्ररथ वगळण्याच्या निर्णयाचा फेरविचार नाही :

यंदाच्या प्रजासत्ताकदिन सोहळ्याच्या दिल्लीतील संचलनात केरळ, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांच चित्ररथ समाविष्ट न करण्याच्या निर्णयाचा फेरविचार केला जाणार नाही, असे संरक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

संचलनासाठी यंदा १२ राज्यांच्या चित्ररथांची निवड करण्यात आली आहे. चित्ररथ वगळण्यात आल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांनी याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली होती.  हा संबंधित राज्यांचा अवमान असल्याची टीका बिगरभाजप नेत्यांनी केली होती.

आसाम - लस न घेतलेल्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेशबंदी :

ओमायक्रॉनसह करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या कारणाने लसीकरण न झालेल्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेश न देण्याचा निर्णय आसाम राज्य सरकारने घेतला असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली. रुग्णालयांसाठी हे आदेश लागू नसल्याचे आसाम सरकारने सांगितले.

करोना प्रतिबंधक लस घेणे अनिवार्य नसल्याचा निर्वाळा नुकताच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर दिला होता. तरीही आसाम सरकारने घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. आसाममध्ये आता सार्वजनिक ठिकाणी जाताना लसीकरणाच्या दोन्ही मात्रा झाल्याचे प्रमाणपत्र घेऊन जावे लागणार आहे. प्रमाणपत्र असेल तरच सार्वजनिक ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सोमवारी लसीकरणाबाबत माहिती दिली. ज्यांना लस घेण्याची इच्छा नसेल, त्यांनी घरी बसावे. लसीकरण न झालेल्यांना कार्यालयांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही. घराबाहेर पडताना नागरिकांनी आपले लसीकरण प्रमाणपत्र जवळ बाळगावे. प्रमाणपत्र असेल तरच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येईल, असे सरमा यांनी सांगितले.

१९ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.