चालू घडामोडी आणि दिनविशेष - १८ सप्टेंबर २०२०

Date : 18 September, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतातील रुग्णसंख्येने ओलांडला ५२ लाखांचा टप्पा :
  • भारतात गेल्या २४ तासात ९६ हजार ४२४ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यासोबत देशातील करोनाबाधित रुग्णसंख्येने ५२ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या २४ तासात ११७४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत देशात करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ८४ हजार ३७२ इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

  • भारतात सध्या ५२ लाख १४ हजार ६७८ करोनाबाधित रुग्ण आहेत. यामध्ये १० लाख १७ हजार ७५४ अॅक्टिव्ह केसेस असून ४१ लाख १२ हजार ५५२ रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे.

  • दरम्यान महाराष्ट्रात गुरुवारी २४ हजार ६१९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तर २४ तासांमध्ये ३९८ मृत्यू झाले. राज्यात आत्तापर्यंत ८ लाख १२ हजार ३५४ रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ७०.९० टक्के झाला आहे. तर महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची आत्तापर्यंतची संख्या ११ लाख ४५ हजार ८४० इतकी झाली आहे. सध्या राज्यात १७ लाख ७० हजार ७४८ होम क्वारंटाइन आहेत. तर ३६ हजार ८२७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज ३ लाख १ हजार ७५२ केसेस अॅक्टिव्ह आहेत.

नवं संकट? चीनमध्ये हजारो लोकांना ब्रुसेलोसिसचा संसर्ग; जाणून घ्या काय आहे हा आजार :
  • वायव्य चीनमध्ये ब्रुसेलोसिसचा (brucellosis) संसर्ग झालेले हजारो रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका औषध निर्मिती कंपनीमधून लीक झालेल्या रसायनांमुळे विषाणूमुळे होणाऱ्या या आजाराचे हजारो रुग्ण आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. गान्सू प्रांतातील लॅन्झू शहरातील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ब्रुसेलोसिसचे तीन हजार २३५ रुग्ण आढळून आले आहेत. ब्रुसेला या विषाणुमुळे हा आजार होतो असं सांगण्यात आलं आहे.

  • ग्लोबल टाइम्समध्ये छापून आलेल्या वृत्तानुसार, २४ जुलै २०१९ ते २० ऑगस्टदरम्यान झॉनगुम लॅन्झू येथील जैविक औषधनिर्मिती करणाऱ्या कारखान्यामध्ये लस निर्मिती करण्याचं काम केलं जात होतं. लॅन्झू येथील प्राणी संशोधन केंद्राजवळ असणाऱ्या या कारखान्यामध्ये प्राण्यांना होणाऱ्या आजारावर उपचार करण्यासाठी ब्रुसेला विषाणुंच्या मदतीने औषधांची निर्मीत करण्यात येत होती. याच औषध निर्मितीदरम्यान कारखान्यातील धूर आणि गॅस प्रक्रिया न करता तो बाहेर सोडण्यात आला. त्यामधूनच लोकांना आता आजाराची बाधा झाली आहे.

  • हवेमध्ये सोडण्यात आलेल्या या गॅसमधून विषाणूचा प्रसार झाला. या कालावधीमध्ये दोरदार वारा वाहत असल्याने मोठ्या क्षेत्रावर या विषाणूचा प्रसार झाला. कारखान्यामधून बाहेर फेकण्यात आलेल्या धूरामध्ये आणि गॅसमध्ये बॅक्टेरियांबरोबरच प्रक्रिया करण्यात आलेल्या रसायने आणि इतर द्रव्याचे सूक्ष्म थेंबही (एरोसोल्स, aerosols) होते. हे वाऱ्याबरोबर वाहत गेल्याने अनेकांना ब्रसेलोसिसचा संसर्ग झाला आहे.

राष्ट्रपतींनी स्वीकारला हरसिमरत कौर यांचा राजीनामा; ‘यांच्याकडे’ असेल अतिरिक्त कार्यभार :
  • कृषीविषयक तीन विधेयकांच्या निषेधार्थ शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी गुरुवारी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे. शेतकरीविरोधी वटहुकूम आणि विधेयकांच्या निषेधार्थ मंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा हरसिमरत कौर बादल यांनी ट्वीटद्वारे केली. शेतकऱ्यांची बहीण, कन्या म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याचा मला अभिमान आहे, असे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचा मंत्रिमंडळातून राजीनामा स्वीकारला आहे.

  • पंतप्रधान रामनाथ कोविंद यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हरसिमरत कौर बादल यांचा राजीनामा तात्काळ प्रभावानं स्वीकारला. तसंच त्यांच्या खात्याचा कार्यभार मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे देण्यात आला आहे. तोमर यांच्याकडे हरसिमरत कौर यांच्या अन्नप्रक्रिया उद्योगमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार असेल. कृषीविषयक विधेयके पंजाबमधील कृषी क्षेत्र नष्ट करतील, असा दावा करत सुखबीर यांनी केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री हरसिमरत या राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले.

  • हरसिमरत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार पानी राजीनामापत्र पाठवून सरकारला लक्ष्य केले. शिरोमणी अकाली दलाने वारंवार विनंती करूनही केंद्र सरकारने या विधेयकांबाबत शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही. शेतकऱ्यांच्या हितरक्षणाची आमच्या पक्षाची परंपरा असून, पक्षाचा प्रत्येक सदस्य शेतकरी आहे, असे हरसिमरत यांनी या पत्रात म्हटले आहे.

सेंट लुइस बुद्धिबळ स्पर्धा - दोन पराभवांसह हरिकृष्णची घसरण :
  • भारताचा ग्रँडमास्टर पी. हरिकृष्णला सेंट लुइस जलद आणि अतिजलद ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत इयान नेपोमनियाची आणि जगज्जेता मॅग्नस कार्लसनकडून पराभूत व्हावे लागल्याने पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

  • तीन फेऱ्यांअखेर हरिकृष्णने लेव्हॉन अरोनियनसह संयुक्तपणे अग्रस्थान पटकावले होते. त्यानंतर चौथ्या डावात त्याला नेपोमनियाचीकडून पराभूत व्हावे लागले. पाचव्या डावात हरिकृष्णने अरोनियनविरुद्ध बरोबरी पत्करली.

  • मात्र सहाव्या फेरीत त्याला कार्लसनकडून पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, कार्लसनने जोमाने पुनरागमन करताना लागोपाठ तीन विजय मिळवून नऊ गुणांसह वैयक्तिकपणे अग्रस्थान प्राप्त केले आहे.

१८ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.