अहमदाबाद येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा पराभव झाला. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर भारताचे स्टार फलंदाज अपयशी ठरले. या विजयामुळे इंग्लंडने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. भारताला हार पत्करावी लागली असली तरी, विराट कोहलीचे चाहते सुखावले आहेत. मागील काही दिवसांपासून विराटची बॅट शांत होती. मात्र, मागील दोन डावात विराटने अर्धशतके ठोकत टीकाकारांची तोंडे बंद केली. या कामगिरीसोबतच विराटने एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे.
अशी कामगिरी करणारा विराट जगातील पहिलाच फलंदाज - नव्याने जाहीर झालेल्या फलंदाजांच्या आयसीसी टी-20 क्रमवारीत विराट पाचव्या स्थानावर आला आहे. त्याचे आता या यादीत 744 गुण जमा झाले आहेत. एकदिवसीय क्रमवारीत तो प्रथम आणि कसोटीत पाचव्या क्रमांकावर आहे. म्हणजेच, क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात तो अव्वल-5 फलंदाजांमध्ये आहे. त्यामुळे अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.
दुसरीकडे इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत दोनदा शून्यावर परतलेला भारतीय सलामीवीर के. एल. राहुलला या क्रमवारीत तोटा सहन करावा लागला आहे. टी-२० क्रमवारीत तो चौथ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत इंग्लंडचा डेव्हिड मलान अव्वल स्थानी विराजमान आहे. त्याच्याकडे 894 रेटिंग गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच दुसऱ्या तर, पाकिस्तानचा बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर आहे.
भारतात सध्या जेवढ्या प्रमाणात लशीचा वापर विविध घटकातील लोकांच्या लसीकरणासाठी करण्यात आला आहे त्यापेक्षा जास्त लस मात्रांची निर्यात भारताने इतर देशांना केली आहे. देशात ३.४८ कोटी मात्रा वापरण्यात आल्या तर ५.८४ कोटी लस मात्रांची निर्यात सत्तर देशांना करण्यात आली आहे.
आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी राज्यसभेत मंगळवारी एका प्रश्नावरील लेखी उत्तरात दिलेल्या माहितीनुसार ५८३.८५ लाख मात्रांची निर्यात करण्यात आली आहे. भारतात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले आहे. १५ मार्च रोजी एकाच दिवशी ३० लाख लोकांचे भारतात लसीकरण करण्यात आले होते.
अनेक आरोग्य तज्ज्ञ व डॉक्टर्स तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच महिंद्र समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्र व बायोकॉनच्या कार्यकारी अध्यक्षा किरण मुझुमदार शॉ यांनी केंद्राला लसीकरणाचा वेग वाढवण्याची सूचना केली होती कारण महाराष्ट्रासह काही राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. वेल्लोर येथील ख्रिश्चान मेडिकल कॉलेजच्या डॉ. गगनदीप कांग यांनी म्हटले होते, की भारतात वेगाने लसीकरणाची गरज असून लस वायाही जाता कामा नये.
अग्रक्रमाच्या व्यक्तींचे लसीकरण करताना लशीच्या कुपीतील काही मात्रा ही अतिरिक्त राहू शकते, ती अग्रक्रम नसलेल्या व्यक्तींसाठी वापरण्याची गरज आहे. रुग्णांची संख्या वाढत असताना अग्रक्रमात नसलेल्या व्यक्तींनाही लशी देण्याची गरज आहे. आरोग्य अर्थतज्ज्ञ रिजो एम जॉन यांनी सांगितले, की दिवसाला ३८ लाख लोकांचे लसीकरण केले तर आपण ऑगस्टपर्यंत ६० कोटी लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करू शकू. जर लशीचा पुरवठा पुरेसा असेल तरच राज्ये लसीकरणाचा वेग वाढवू शकतात.बहुतेक राज्यात आठवड्यातून चार दिवस लसीकरण होत आहे.
देशाच्या काही भागांमध्ये कोविड-१९च्या संसर्गाची प्रकरणे वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करून, करोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘जलद व निर्णायक पावले’ उचलण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले.
‘चाचणी करा, शोध घ्या व उपचार करा’ या त्रिसूत्रीचे गंभीरपणे पालन करण्याच्या आवश्यकतेवरही पंतप्रधानांनी भर दिला.
करोना महासाथीची परिस्थिती आणि सध्या सुरू असलेली लसीकरणाची मोहीम याबाबत राज्यांच्या मुख्यमंर्त्यांशी मोदी यांनी आभासी चर्चा केली. करोनाच्या विरोधात लस हे परिणामकारक शस्त्र असल्याचे सांगून, सरकारी व खासगी अशा दोन्ही प्रकारची लसीकरण केंद्रे स्थापन करण्याचे आवाहन त्यांनी राज्यांना केले.
महाराष्ट्र व पंजाब यांसारख्या राज्यांमध्ये करोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असून, महाराष्ट्र व मध्य प्रदेशमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण वाढले आहे, असे जानेवारीत देशात लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून मुख्यमंर्त्यांशी प्रथमच साधलेल्या संवादात मोदी म्हणाले.
देशातील ७ राज्यांतील ‘पॉझिटिव्हिटी रेट’मध्ये गेल्या काही आठवड्यांत दीडशे टक्क््याहून अधिक वाढ झाली असल्याबाबत पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली.
देशातील तीन कोटी शिधापत्रिका आधार क्रमांकाशी जोडल्या नसल्याने त्या रद्द करण्याचा प्रकार गंभीर असून त्यावर केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी उत्तर द्यावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
याचिकाकर्त्या कोईली देवी यांनी ही याचिका दाखल केली असून त्यांची बाजू वरिष्ठ वकील कोलीन गोन्सालविस मांडत आहेत. केंद्र सरकारने तीन कोटी शिधापत्रिका रद्द केल्या असून त्यासाठी केवळ त्या आधार क्रमांकाला जोडलेल्या नाहीत हे कारण दाखवले आहे. हा अत्यंत व्यापक मुद्दा असल्याचे गोन्सालविस यांनी सांगितले.
सरन्यायाधीश शरद बोबडे व न्या. ए.एस बोपण्णा व न्या. व्ही रामसुब्रमणियन यांनी सांगितले, की हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची गरज आहे. याची अंतिम सुनावणी आम्ही करणार आहोत.
न्यायालयाने म्हटले आहे,की आधार क्रमांकाशी याचा संबंध असल्याने यावर आता केंद्राने उत्तर द्यावे. सध्या तरी आम्ही केंद्र व राज्य सरकारला नोटिसा जारी करीत असून त्यांनी चार आठवड्यात उत्तर देण्याचा आदेश देत आहोत.
अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अमन लेखी यांनी सांगितले, की गोन्सालविस यांनी चुकीचे विधान केले आहे. याबाबत नोटीस जारी करण्यात आली असून केंद्राचे म्हणणे मागवण्यात आले आहे.
भारत आणि चीन यांच्यातील संबंध गुंतागुंतीचे असून दोन्ही देशांनी एकमेकांच्या संवेदनांचा व आशा-आकांक्षांचा आदर करण्याचे ठरवले असून त्यावरच संबंधातील पुढील दिशा अवलंबून असेल, असे भारताने बुधवारी म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्री मुरलीधरन यांनी लोकसभेत सांगितले, की चीनशी भारत चर्चा सुरू ठेवणार आहे. कारण प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अजून इतर अनेक प्रलंबित प्रश्न पूर्व लडाख भागात आहेत. दोन्ही देशांनी संघर्षाच्या क्षेत्रातून सैन्य माघारी घेण्याचे मान्य केले आहे.
भारत व चीन यांच्यातील संबंधांवर पूर्वीच्या वाटाघाटींचा भंग झाल्याने काही परिणाम झाला आहे काय, असा प्रश्न संसदेत विचारण्यात आला होता. त्यावर मुरलीधरन यांनी म्हटले आहे, की गेल्या वर्षी एप्रिल, मे महिन्यापासून चीनने जैसे थे परिस्थिती बदलण्याचे प्रयत्न प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अनेकदा केले होते.
भारताच्या सैन्य दलांनी त्याला चोख उत्तर दिले होते. चीनच्या बाजूने करण्यात आलेले जैसे थे परिस्थिती बदलण्याचे प्रयत्न भारताला अस्वीकार्य होते. या घडामोडींनी दोन्ही देशातील शांततेला बाधा आली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पश्चिम भागात काही घडामोडी झाल्या. सरकार नेहमी पूर्व लडाखला पश्चिम क्षेत्र असे संबोधत आले आहे.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.