चालू घडामोडी आणि दिनविशेष - १७ जुलै २०२१

Date : 17 July, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
Maharashtra SSC : नापास ०.०५ % मध्ये मोडणारे विद्यार्थी कोणते :
  • यंदा इयत्ता दहावीचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे इयत्ता १० वीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्या, तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल जाहीर करण्यात आला आहे.

  • शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत घेत निकालाबाबत सविस्तर माहिती दिली. तर, दुपारी एक वाजता विद्यार्थी निकाल ऑनलाइन पाहू शकणार आहेत. यंदाच्या परीक्षेत ९९.५ टक्के उत्तीर्ण झाले तर उरलेल ०.०५ टक्के अनुत्तीर्ण ठरवण्यात आलेले आहेत.

  • वर्षभरात काही विद्यार्थी शाळांच्या संपर्कात नव्हते असेच फक्त अनुत्तीर्ण आहेत. एकूण १४०० विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत. तर, ४९२२ विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला असून, त्यात ३६८ एटीकेटीचे विद्यार्थी, ९१६ पुनर्परीक्षार्थींचा समावेश आहे.

  • इयत्ता दहावीच्या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ७५ हजार ८०६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ७५ हजार ७५२ विद्यार्थ्यांची संपादणूक शाळांकडून प्राप्त झाली आहे. त्यापैकी १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९९.९५ आहे.

UPSC : राखीव प्रवर्गातील उमेदवारांना गुण देताना होतोय भेदभाव? दिल्लीच्या सामाजिक न्यायमंत्र्यांचा मोठा दावा :
  • महाराष्ट्रात स्वप्नील लोणकर या तरुणाच्या आत्महत्येनंतर MPSC परीक्षा, नियुक्त्या आणि एकूणच अंमलबजावणी हे मुद्दे ऐरणीवर आले आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मुलाखती, नियुक्त्या ही प्रक्रिया लांबणीवर पडल्याचं राज्य सरकारने विधानसभेत सांगितलं. मात्र, आता केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC परीक्षांसाठी असलेल्या राखील कोट्यासंदर्भात मोठा आरोप दिल्लीतील एका मंत्र्यानेच केला आहे.

  • देशाची राजधानी दिल्लीचे सामाजिक न्यायमंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी यूपीएससीच्या संचालकांना पत्र लिहून त्यामध्ये हा दावा केला आहे. “केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना गुण देताना जातीआधारीत भेदभाव केला जात आहे”, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आता यूपीएससीच्या परीक्षा आणि मुलाखतींसाठीचं मूल्यांकन हा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता आहे.

  • “मुलाखत स्तरावर केला जातो भेदभाव”  - दिल्लीचे सामाजिक न्यायमंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी शुक्रवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे संचालक प्रदीप कुमार जोशी यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी यूपीएससीच्या मुलाखतींसंदर्भात तक्रार केली आहे. “यूपीएससी मुलाखतींमध्ये राखीव कोट्यातील अनेक उमेदवारांना जातीआधारीत भेदभावाचा सामना करावा लागत आहे. या उमेदवारांना गुण देताना पद्धतशीरपणे भेदभाव केला जात आहे. मला यासंदर्भात अनेक समाजाच्या उमेदवारांनी पत्र लिहून त्यांच्या भावना सांगितल्या आहेत. यातल्या अनेक उमेदवारांना अशा प्रकारच्या भेदभावाचा सामना करावा लागत आहे”, असं राजेंद्र गौतम यांनी पत्रात म्हटलं आहे.

जगभरातच तिसऱ्या लाटेचा धोका :
  • जगाची वाटचाल करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या दिशेने सुरू असल्याचे दिसत आहे. आठवडाभरात स्पेनमध्ये रुग्णांची संख्या ६४ टक्क्यांनी तर, हॉलंडमध्ये ३३ टक्क्यांनी वाढली. म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, बांगलादेश या पूर्वेकडील देशांमध्येही झपाट्याने रुग्णवाढ झालेली आहे. त्यामुळे भारतानेही सावध राहिले पाहिजे, असे मत करोना कृतिगटाचे प्रमुख व निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केले.

  • भारतात लसीकरणाचा वेग वाढत असला तरी ही प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याने देश अजून सामूहिक प्रतिकारशक्तीपासून खूप दूर आहे. शिवाय, देशातील मोठ्या लोकसंख्येला करोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यातून सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण करण्याचा मार्ग चुकीचा ठरेल. दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होत असली तरी नियंत्रणातील स्थिती आटोक्याबाहेर जाऊ  नये यासाठी लोकांनी दक्ष राहणे व करोनासंदर्भातील नियमांचे पालन करणे हाच पर्याय असल्याचे पॉल म्हणाले.

  • भारताच्या शेजारी असणाऱ्या बांगलादेशमध्ये प्रतिदिन रुग्णवाढ ११ हजारांहून अधिक, म्यानमारमध्ये साडेचार हजारहून जास्त, इंडोनेशियात दैनंदिन रुग्णवाढ ४४ हजाराहून अधिक तर, मलेशियामध्ये १० हजारांहून जास्त होत आहे. या देशांमध्ये यापूर्वी शिखर काळात झालेल्या रुग्णवाढीपेक्षा ही वाढ तिपटीने जास्त असल्याची माहिती शुक्रवारी केंद्रीय आरोग्य संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी  दिली.

  • जागतिक आरोग्य संघटनेनेही संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली आहे. पण, नवी लाट कधी येईल यापेक्षा तिची तीव्रता काय असेल हे पाहणे अधिक महत्त्वाचे ठरेल. भारतात दुसरी लाट अजून संपलेली नाही. काही राज्यांमध्ये दैनंदिन रुग्णवाढीचे प्रमाण अधिक आहे. देशातील ४७ जिल्ह्यांमध्ये संसर्गदर १० टक्क्यांहून अधिक आहे, असेही अगरवाल म्हणाले.

भारत-पाकिस्तान दोन वर्षांनी भिडणार :
  • दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पध्र्यामधील जुगलबंदी चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारत, पाकिस्तान या दोन्ही संघांचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे.

  • अमिराती येथे १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) शुक्रवारी १२ संघांची दोन गटांत विभागणी केली. आतापर्यंत १२ संघांमधील आठ संघांचे स्थान क्रमवारीच्या आधारे निश्चित झाले असून चार संघ पात्रता फेरीद्वारे पुढील फेरीत प्रवेश करतील.

  • भारत आणि पाकिस्तान २०१९मध्ये इंग्लंडला झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात अखेरचे आमनेसामने आले आहेत. त्यामुळे आता चाहत्यांना स्पर्धेचे वेळापत्रक कधी जाहीर होते, याची उत्कंठा लागली आहे. भारताच्या गटात पाकिस्तानसह गेल्या महिन्यातच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकणारा न्यूझीलंड, अफगाणिस्तान यांचा समावेश करण्यात आला आहे. अन्य गटात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका यांसारख्या बलाढय़ संघांना स्थान लाभले आहे. २०१६नंतर प्रथमच ट्वेन्टी-२० विश्वचषक रंगणार असून त्यावेळी विंडीजने जगज्जेतेपद मिळवले होते.

१७ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.