चालू घडामोडी आणि दिनविशेष - १७ जुलै २०२०

Date : 17 July, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लडाख व जम्मू-काश्मीर दौऱ्यावर :
  • भारत व चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाच्या लष्करी सिद्धतेचा आणि एकूण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी साठी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आजपासून दोन दिवसीय दौऱ्यासाठी लडाखला पोहचले आहेत. या दरम्यान ते लडाख व जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

  • त्यांच्याबरोबर संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत बिपीन रावत आणि लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे हे देखील आहेत. आज (शुक्रवार) हे सर्वजण लडाखचा दौरा करणार असून उद्या (शनिवार) जम्मू-काश्मीरला असणार आहेत.

  • संरक्षणमंत्री लडाख सेक्टरमध्ये ‘एलएसी’ व काश्मीरमध्ये ‘एलओसी’वरील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. या दोन दिवसीय दौऱ्यासाठी आज सकाळी त्यांचे लेह विमानतळावर आगमन झाले.

  • या दौऱ्यावर निघण्या अगोदर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले होते की, मी सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व त्या ठिकणी तैनात असलेल्या जवानांशी संवाद साधण्यासाठी जात आहे.

मर्यादित आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून :
  • करोनाच्या आपत्तीनंतर बंद करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय विमानसेवा शुक्रवारपासून सुरू होत असल्याची घोषणा नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीप पुरी यांनी पत्रकार परिषदेत केली.

  • अमेरिका आणि फ्रान्स या दोन देशांसाठी मर्यादित स्वरूपात विमानसेवा पुरवली जाणार आहे. दिल्ली ते लंडन या हवाई मार्गावर दररोज दोन विमान उड्डाणांबाबत ब्रिटनशीही चर्चा केली जात आहे. जर्मन विमान कंपनी लुफ्थान्साने सेवा द्यावी अशी विनंती जर्मनीला करण्यात आली असून ही चर्चाही अंतिम टप्प्यात आहे.

  • करोनामुळे २३ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली होती. द्विपक्षीय संमतीनेच आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करावी लागेल, असे हरदीप पुरी यांनी सांगितले.

जगाला करोनाची लस पुरवण्याची भारताची क्षमता - बिल गेट्स :
  • सध्या जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक देश करोनावरील लस विकसितही करत आहेत. रशिया, अमेरिका यांसारख्या देशांना सुरूवातीच्या टप्प्यात यात यशही मिळालं आहे. भारतातदेखील शास्त्रज्ञ दिवसरात्र एक करून लस विकसित करण्याचं काम करत आहे.

  • अशातच मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी पुन्हा एकदा भारताची स्तुती केली आहे. “भारतातील औषध उद्योग केवळ आपल्या देशासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी करोनावरीस लस तयार करण्यास सक्षम आहे. भारतात करोनाची लस विकसित करण्यासाठी भारतीय औषध कंपन्या एक महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत,” असं बिल गेट्स म्हणाले.

  • “भारत हा मोठ्या आकाराचा आणि अधिक लोकसंख्या असलेला देश आहे. त्यामुळे भारताला या संकटात मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे,” असं गेट्स यावेळी म्हणाले. ‘COVID-19: India’s War Against The Virus’ या डिस्कव्हरीवरी प्लस वाहिनीवरील एका डॉक्युमेट्रीमध्ये त्यांनी भारताच्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे.

  • “भारतात औषधं आणि लस तयार करणाऱ्या कंपन्या अनेक कंपन्या आहेत ज्या संपूर्ण देशाला मागणीनुसार पुरवठा करू शकतात. जगाच्या तुलनेत भारतात सर्वाधिक लसींची निर्मिती होते हे आपल्याला माहितच आहे. सीरम इन्स्टीट्युट यात आघाडीवर आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

बारावी परीक्षा निकाल - सलग नवव्या वर्षी कोकण विभाग अव्वल :
  • महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत कोकण विभागीय मंडळाने सलग नवव्या वर्षी अव्वल स्थान मिळवले आहे. मंडळाचा  नियमित विद्यार्थ्यांंचा निकाल ९५.८९ टक्के आणि पुनर्परीक्षार्थींचा निकाल ४१.८३ टक्के लागला.

  • गतवर्षांच्या तुलनेत यंदा टक्के निकालात २.६६वाढ झाली आहे. गुरूवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर झाला.  करोना महामारीमुळे या वर्षी निकाल लावण्यास सुमारे महिनाभर उशीर झाला.

  • यंदा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीमध्ये बारावीच्या तिन्ही विद्याशाखांची परीक्षा घेण्यात आली. परंतु करोना संकटामुळे उत्तर पत्रिका तपासणीस विलंब झाला. तसेच करोनाचे संकट अजूनही कायम असल्याने निकाल जाहीर करण्यासाठी कोकण मंडळाची पत्रकार परिषद होऊ  शकली नाही. निवेदनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला.

  • रत्नागिरी जिल्ह्यात १५३ व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९१ कनिष्ठ महाविद्यालयांचे विद्यार्थी या परीक्षेला बसले. यासाठी अनुक्रमे ३७ व २३ अशा एकूण ६० केंद्रांवर परीक्षा झाली.

भारतीय संघाच्या क्रिकेट हंगामाची आज निश्चिती :
  • करोनाची साथ वाढत असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) शुक्रवारी होणाऱ्या कार्यकारिणी समितीच्या ऑनलाइन बैठकीत इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) कृती आराखडा निश्चित करण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेटची सुधारित कार्यक्रमपत्रिका आणि देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम यासह विषयपत्रिकेमधील ११ मुद्दय़ांवर बैठकीत चर्चा होईल.

  • भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगामाला आधीच कात्री लावण्यात आली आहे. मर्यादित षटकांच्या तीन मालिकांवर त्याचा परिणाम झाला आहे. श्रीलंका आणि झिम्बाब्वेचे दौरे आणि मायदेशात होणारी इंग्लंडविरुद्धची मालिका रद्द करण्यात आली आहे.

  • ‘आयपीएल’च्या आयोजनासाठी सर्व पर्यायांचा आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत. पहिला पर्याय हा भारतातच स्पर्धा आयोजनाचा आहे. परंतु करोनाची साथ नियंत्रणात न आल्यास संयुक्त अरब अमिराती आणि श्रीलंकेचाही विचार करता येईल. पण स्पर्धा देशाबाहेर गेल्यास खर्चही वाढेल, अशी माहिती ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने दिली.

१७ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.