चालू घडामोडी आणि दिनविशेष - १७ डिसेंबर २०१९

Date : 17 December, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
NEFTद्वारे आता कधीही पैसे ट्रान्सफर करता येणार : 
  • देशभरात आजपासून (१६ डिसेंबर) दोन महत्वाचे बदल लागू झाले आहेत. यामध्ये आरबीआयद्वारे ऑनलाइन बँकिंग ट्रान्जॅक्शन आणि ट्रायद्वारे मोबाईल नंबर पोर्ट करण्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार, आज मध्यरात्रीपासूनच ऑनलाइन पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरच्या (एनईएफटी) सुविधेचा २४ तास लाभ घेता येणार आहे. तसेच आजपासूनच मोबाईल क्रमांक कायम ठेऊन सर्व्हिस प्रोव्हायडर बदलण्याच्या म्हणजेच नंबर पोर्टेबिलिटी सुविधा अधिक सोपी करण्यात आली आहे.

  • २४ तास एनइएफटी सुविधा - आजपासून एनइएफटी सुविधा आठवड्यातील सर्व दिवस कोणत्याही वेळेत (२४/७) वापरता येणार आहे. यापूर्वी या सेवेचा लाभ २४ तास मिळत नव्हता. गेल्या काही दिवसांपूर्वी आरबीआयने डिजीटल देवाण-घेवाणीला प्रोत्साहन देण्यासाठी याची घोषणा केली होती.

  • आजवर एनइएफटीद्वारे पैशांचा व्यवहार सकाळी ८ ते संध्याकाळी ७ या वेळेतच करता येत होता. तर पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंतच ही सुविधा वापरता येत होती. एनइएफटीद्वारे एका वेळी २ लाख रुपयांची रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर करता येऊ शकते.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना नववर्षाची भेट मिळणार : 
  • नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना नाताळच्या तोंडावर वा नववर्षाच्या आधी आनंदाची बातमी मिळायची शक्यता आहे. मोदी सरकार या कर्मचाºयांच्या महागाई भत्त्यामध्ये ४ टक्के वाढ करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास या कर्मचाºयांचा पगार किमान ७५0 रुपये ते कमाल १0 हजार रुपयांनी वाढू शकेल.

  • एका अर्थविषयक वृत्तवाहिनीने महागाई भत्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचे वृत्त दिले आहे. हे खरे ठरल्यास केंद्र सरकारच्या सेवेतील कर्मचाºयांना नववर्षाची मोठीच भेट ठरू शकेल. काहींच्या मते नाताळच्या आधी ही घोषणा केली जाईल, तर काहींनी नववर्ष सुरू होण्याआधी महागाई भत्त्यातील वाढीचा निर्णय होईल, अशी शक्यता व्यक्त केली आहे.

  • जुलै २0१९ ते डिसेंबर २0१९ या काळात महागाईचा दर वाढला आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाºयांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाईल, अशी शक्यता एका वरिष्ठ अधिकाºयानेही व्यक्त केली. मात्र ४ टक्के वाढ केली तर त्याचा तिजोरीवर खूपच मोठा बोजा येऊ शकेल. त्यामुळे प्रत्यक्ष महागाईत किती वाढ झाली, हे पाहून भत्त्यात वाढ होईल, असे हा अधिकारी म्हणाला.

  • गेल्या काही महिन्यांपासून देशात आर्थिक मंदीचे वातावरण आहे. वस्तू व मालाला उठाव नाही, त्यामुळे उत्पादन कमी होत आहे, परिणामी लोकांचे रोजगार जात आहेत. अशा स्थितीत वस्तू व मालाला उठाव मिळावा, यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. लोकांच्या हाती अधिक पैसा आला, तर मागणी वाढेल आणि उत्पादन तसेच रोजगार यांत वाढ होईल, या हेतूने सरकार महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या विचारात असल्याचे सांगण्यात येत आहे.

लय भारी! विमानदेखील ओढू शकते ही व्यक्ती; ठरली सर्वात शक्तिशाली :
  • मार्टिन लिसिस यांची जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून निवड झाली आहे.

  • अमेरिकेच्या कॅलिफॉर्नियामध्ये राहणारे लिसिस ३५० किलोंपर्यंतचं वजन लिलया उचलू शकतात.

  • लिसिस बोईंग विमान अगदी सहज ओढू शकतात.

  • गेल्या कित्येक वर्षांपासून लिसिस स्ट्राँगमॅन स्पर्धेची तयारी करत होते. मात्र त्यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं.

  • अखेर यंदा लिसिस यांचं स्ट्राँगमॅन स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं. ही स्पर्धा अमेरिकेत अतिशय लोकप्रिय आहे.

देशभर विद्यार्थ्यांचा उद्रेक : 
  • सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात निदर्शने करणाऱ्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ सोमवारी देशभरातील प्रमुख विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. निदर्शने, मोर्चे काढून विद्यार्थ्यांनी पोलीस कारवाईच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली.

  • राजधानी दिल्लीसह, मुंबई, कोलकाता, लखनौ, बनारस, चंडीगड, चेन्नई, बंगळूरु आणि गुवाहाटीसह अनेक शहरांतील उच्च शिक्षण संस्थांच्या आवारांचा आसमंत सरकारविरोधी घोषणांनी निनादला. संतापाला शांततेने वाट करून देताना विद्यार्थ्यांनी ‘जामिया’तील विद्यार्थ्यांवरील कथित पोलीस हल्ल्याच्या चौकशीची मागणी केली आणि तेथील विद्यार्थ्यांना पाठिंबा व्यक्त केला.   पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असतानाही दिल्ली विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षांवर बहिष्कार टाकून जामियातील पोलीस कारवाईविरोधात निदर्शने केली.

  • इन्किलाब झिंदाबादच्या घोषणा देत विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या अत्याचाराची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. दिल्लीतील मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालय आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, उत्तर प्रदेशातील लखनौमधील दारूल उलूम महाविद्यालयाच्या, अलिगड मुस्लीम विद्यापीठ, बनारस हिंदूू विद्यापीठ, बिहारमधील पाटणा विद्यापीठ, पश्चिम बंगालमधील जादवपूर विद्यापीठ, हैदराबादमधील मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ, आयआयटी, मद्रास, पाँडेचेरी विद्यापीठ, बंगळूरुतील जैन विद्यापीठ, आयआयटी, मुंबई, मुंबईतील टाटा समाज विज्ञान संस्था आणि हरियाणातील चंडीगड विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सोमवारी आपआपल्या महाविद्यालयांच्या आवारात पोलीस कारवाईविरोधात निदर्शने केली.

सात वर्षे उलटूनही न्यायाची प्रतीक्षाच.. : 
  • आमच्या मुलीवर अत्याचार करून खून केल्याच्या घटनेला सात वर्षे होऊ नही  अजून  न्याय मिळालेला नाही, अशी खंत दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी सामूहिक बलात्कार व निर्घृण हल्ला करण्यात आलेल्या निर्भयाच्या आईवडिलांनी व्यक्त केली आहे.

  • ‘या घटनेनंतर दिल्लीला बलात्काराची राजधानी संबोधले गेले. पण प्रत्यक्षात हा प्रश्न सगळ्या भारतातच आहे, त्यामुळे आम्ही देशाच्या राजधानीबाबत द्वेष किंवा मत्सराची भावना ठेवलेली नाही,’ असे सांगून तिच्या आईने म्हटले आहे, की ‘खरेतर दिल्लीने आमचे सर्वस्व हिरावून घेतले पण तरी आम्ही दिल्लीचा द्वेष करीत नाही. कारण आमच्या उत्तर प्रदेशात अशा घटना नेहमीच घडत आहेत. जगात तुम्ही कुठेही गेलात तरी अशा घटना घडतच असतात. त्यामुळे सगळ्या जगाचा तर द्वेष करता येणार नाही. पण आम्हाला परिस्थिती बदलावी अशी आशा वाटते. निर्भयावर अत्याचार करून खून करणारम्य़ा गुन्हेगारांना फाशी देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत त्यामुळे आमच्या आशा उंचावल्या आहेत.’

  • त्यांच्या मृत्यूचे वॉरंट निघून फाशीची तारीख जाहीर करेपर्यंत तरी आम्हाला शांतता लाभणार नाही. कर्माच्या संकल्पनेवर माझा विश्वास आहे. मला देवाचा पाठिंबा या लढाईत लाभला, पण माझा देवावर विश्वास नाही. कारण आमच्या वाटेला असा प्रसंग काय यावा हा प्रश्न अनुत्तरित आहे.’

१७ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.