चालू घडामोडी आणि दिनविशेष - १६ नोव्हेंबर २०२२

Updated On : Nov 16, 2022 | Category : Current Affairs


मेल्टवॉटर चॅम्पियन्स बुद्धिबळ स्पर्धा - प्रज्ञानंद, एरिगेसी पराभूत :
 • भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद आणि अर्जुन एरिगेसी यांना मंगळवारी मेल्टवॉटर चॅम्पियन्स टूर बुद्धिबळ फायनल्सच्या पहिल्या फेरीत पराभूत व्हावे लागले. १७ वर्षीय प्रज्ञानंदने अजरबैजानच्या शख्रियार मामेदेरोव्हकडून १.५-२.५ अशी हार पत्करली, तर पोलंडच्या यान क्रिस्तोफ डुडाने एरिगेसीला २.५-०.५ असे पराभूत केले. जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनने अमेरिकेच्या वेस्ली सो याला २.५-१.५ अशा फरकाने नमवत आपल्या मोहिमेला विजयी सुरुवात केली.

 • प्रज्ञानंद आणि मामेदेरोव्ह यांच्यातील सामन्यात सुरुवातीला अजरबैजानच्या खेळाडूने आघाडी मिळवली. यानंतर प्रज्ञानंदने दुसऱ्या डावात बरोबरीची नोंद केली. यानंतर तिसऱ्या डावात प्रज्ञानंदने विजय नोंदवत चुरस निर्माण केली.

 • मात्र, चौथ्या डावात मामेदेरोव्हने खेळ उंचावत विजय साकारला. कार्लसनचा सामना दुसऱ्या दिवशी एरिगेसीशी होईल, तर लियेम सो चा सामना करेल. मामेदेरोव्हची लढत डुडाशी तर, प्रज्ञानंदची गाठ गिरीशी पडेल. आठ खेळाडूंच्या या स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळवणारा खेळाडू विजयी होईल.

रशियाकडून पोलंडवर क्षेपणास्त्र हल्ला? जो बायडेन यांनी बोलावली तातडीची बैठक :
 • एकीकडे जागतिक पातळीवर जी-२० परिषदेत भारत, अमेरिका, फ्रान्स यांच्यासारखे देश परस्पर सहकार्य, शास्वत विकास, पर्यावरण संरक्षण यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करत आहेत. तर दुसरीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाने उग्र रुप धारण केले आहे. रशिया-युक्रेन यांच्यातील संघर्ष आता नाटो देशांपर्यंत पोहोचला आहे. आज (१६ नोव्हेंबर) रशियाने डागलेले क्षेपणास्त्र पोलंड देशात पडले आहे. या घटनेत दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नाटो सदस्य देशांच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. रशियाच्या या कृतीमुळे युद्ध आणखी पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 • मागील कित्येक दिवसांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध आतापर्यंत फक्त या दोनच देशांपर्यंत सीमित होते. आता मात्र रशियाने डागलेले क्षेपणास्त्र नाटोचा सदस्य असलेल्या पोलंड देशावर पडले आहे. यामध्ये पोलंडमधील दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रशियाच्या या कृतीचा युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी निषेध केला आहे.

 • तर रशियाच्या या कृतीची पोलंड सरकारनेदेखील दखल घेतली आहे. पोलंडचे पंतप्रधान मॅथ्यूझ मोरविकी यांनी ‘प्राथमिक अंदाजानुसार डागण्यात आलेले क्षेपणास्त्र हे रशिय बनावटीचे आहे. मात्र आम्ही या घटनेची सखोल चौकशी करत आहोत. हे क्षेपणास्त्र नेमके कोणी डागले, हे अद्याप निश्चितपणे समजलेले नाही. आमची यंत्रणा त्याचा शोध घेत आहे. आम्ही आमची लष्करी तयारी करत आहोत,’ असे सांगितले आहे. तर पोलंडच्या परराष्ट्र खात्यानेदेखील डागण्यात आलेले क्षेपणास्त्र हे रशियान बनावटीचे असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

भारताची ऊर्जासुरक्षा जगासाठी महत्त्वाची; जी-२० शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ठाम प्रतिपादन :
 • भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्यामुळे आपल्या देशाची ऊर्जासुरक्षा जागतिक विकासासाठी महत्त्वाची आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. येथे सुरू झालेल्या जी-२० राष्ट्रगटाच्या शिखर परिषदेत ‘अन्न व ऊर्जासुरक्षा’ या विषयावरील सत्रात ते बोलत होते. ऊर्जा व इंधन पुरवठय़ावर कोणतेही निर्बंध असू नयेत आणि अशा प्रकारांना प्रोत्साहनही देऊ नये, असे आवाहनही त्यांनी जागतिक समुदायाला केले. 

 • रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात ऊर्जेची टंचाई निर्माण झाली असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘इंधन व ऊर्जा पुरवठय़ासंदर्भात जागतिक स्तरावर स्थैर्य आणि सातत्य राखले गेले पाहिजे’ असे  पंतप्रधान म्हणाले. प्रदूषणमुक्त ऊर्जा व पर्यावरण रक्षणासाठी भारत वचनबद्ध असून २०३०पर्यंत देशाची ५० टक्के गरज ही अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांमधून भागवली जाईल, असे आश्वासन त्यांनी जी-२० राष्ट्रगटाला दिले.

 • युद्धामुळे जागतिक स्तरावर अन्नसुरक्षेचे आव्हान आहे. गव्हाचा सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या युक्रेनमधून पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर टंचाईची परिस्थिती आहे. यासंदर्भात मोदी म्हणाले, की सध्या भासत असलेला खतांचा तुटवडा हे एक मोठे संकट आहे. आजच्या खत टंचाईतून उद्याच्या अन्नटंचाईचे संकट निर्माण होण्याचा धोका आहे. त्या वेळी जगाकडे कोणतीही उपाययोजना असणार नाही.

 • खत व अन्नधान्य या दोन्हींची पुरवठा साखळी स्थिर आणि खात्रीशीर राखण्यासाठी आपण सामंजस्य करार केले पाहिजेत, असा आग्रहदेखील पंतप्रधानांनी धरला. शाश्वत अन्नसुरक्षेसाठी भारतात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. तृणधान्यांसारख्या (मिलेट्स) पौष्टिक व पारंपरिक धान्यास प्रोत्साहन देऊन ते पुन्हा लोकप्रिय करत असल्याचेही मोदी म्हणाले. पुढच्या वर्षी येणारे ‘जागतिक तृणधान्य वर्ष’ आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्साहात साजरे झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

२०३० पर्यंत भारतातील ५० टक्के वीजनिर्मिती अक्षय उर्जास्त्रोतांपासून- नरेंद्र मोदी :
 • ज्ञानवापी मशिदीतील कथित शिवलिंगाच्या पूजनाची परवानगी मागणाऱ्या याचिकेवरील निकाल १७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. जलदगती न्यायालयाने सोमवारी हा निकाल गुरुवापर्यंत स्थगित केला आहे. हे शिविलग ज्ञानवापी मशिदीच्या संकुलात कथितरित्या सापडले आहे.

 • वरिष्ठ स्तर सत्र न्यायाधीश महेंद्र पांडे यांनी या प्रकरणाचा निकाल स्थगित केल्याची माहिती जिल्हा सहायक सरकारी वकील सुलभ प्रकाश यानी दिली. २७ ऑक्टोबर रोजी या प्रकरणी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ८ नोव्हेंबपर्यंत हा निकाल राखून ठेवला होता. त्या दिवशी न्यायाधीश रजेवर असल्याने हे प्रकरण सोमवापर्यंत (१४ नोव्हेंबर) स्थगित झाले होते.

 • २४ मे रोजी विश्व वैदिक सनातन संघाचे सरचिटणीस किरण सिंह यांनी या प्रकरणी वाराणसी जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला असून, ‘ज्ञानवापी’ संकुलात मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात यावी, संकुल सनातन संघाकडे सोपवावे आणि येथील शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी मिळावी, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. २५ मे रोजी जिल्हा न्यायाधीश ए. के. विश्वेश यांनी हा खटला जलदगती न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश दिले होते.

१६ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)