चालू घडामोडी आणि दिनविशेष - 16 मे 2023

Date : 16 May, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नौदलाकडून ‘ब्राह्मोस’ची यशस्वी चाचणी
  • नौदलाकडून रविवारी ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. नौदलाची अग्रगण्य स्वयंचलित क्षेपणास्त्र प्रक्षेपण करणारी विनाशक युद्धनौका ‘आयएनएस मुरगाव’वरून या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या चाचणीचे ठिकाण कळू शकले नाही.

  • अधिकाऱ्यांनी सांगितले, की ही युद्धनौका व हे शक्तिशाली क्षेपणास्त्र दोन्ही स्वदेशी निर्मिती व आत्मनिर्भरतेचे झळाळणारी बोलकी प्रतिके आहेत. या यशस्वी चाचणीमुळे भारतीय नौदलाच्या सागरातील मारक क्षमतेचे प्रदर्शन केले. या नव्या युद्धनौकेवरून केलेली ब्राह्मोसची पहिलीच चाचणी यशस्वी झाली. अचूक लक्ष्यवेध घेण्यात हे क्षेपणास्त्र यशस्वी ठरले.

ब्राह्मोसबाबत..

  • भारत आणि रशियाच्या संयुक्त प्रकल्प असलेल्या ‘ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड’तर्फे या क्षेपणास्त्राची निर्मिती केली जाते. ही क्षेपणास्त्रे पाणबुडी, युद्धनौका, विमाने किंवा जमिनीवरूनही प्रक्षेपित करता येतात. ब्राह्मोस ध्वनीच्या वेगापेक्षा जवळपास तिप्पट वेगाने उडते. भारत ब्राह्मोस क्षेपणास्त्रांची निर्यातही करत आहे. गेल्या वर्षी जानेवारीत भारताने क्षेपणास्त्राच्या तीन बॅटरी पुरवण्यासाठी फिलीपिन्ससोबत ३७ कोटी पाच लाखांचा करार केला होता.

टाटाचे टेक्नॉलॉजीत मोठे पाऊल! भारतात तयार होणार ‘मेड इन इंडिया आयफोन’, चीनला बसणार मोठा झटका
  • Apple ही टेक कंपनी आहे. याचे मुख्य कार्यालय हे अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आहे. कंपनी आयफोन ,आयफोन स्मार्टफोन, आयपॅड टॅब्लेट कम्प्युटर, मॅक पर्सनल कॉम्प्युटर, आयपॉड पोर्टेबल मीडिया प्लेअरचे देखील उत्पादन करते. Apple कंपनीचे आयफोन हे लवकरच भारतामध्ये तयार होणार आहेत. कंपनी लवकरच आपल्या iPhones च्या उत्पादनासाठी चीनवर असणारी निर्भरता कमी करण्यासाठी भारतात आगामी iPhone 15 सिरीजमधील काही मॉडेल्सचे उत्पादन सुरु करणार आहे. आयफोन १५ सिरिज या वर्षी सप्टेंबर महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे. यापैकी iPhone 15 आणि iPhone 15 Plus भारतात तयार होणार आहेत. यासाठी टाटा ग्रुपने Apple सह करार केला आहे. म्हणजेच टाटा ग्रुपने टेक्नॉलॉजीत मोठे पाऊल टाकले आहे.

मेड इन इंडिया असणार iPhone 15 आणि iPhone 15 Plusतात

  • कंपनी आपल्या आगामी आयफोन सिरीजमधून भारतात बेस व्हेरिएंट फोन iPhone 15 आणि iPhone 15 Plus तयार करण्याची तयारी करत आहे.तैवानच्या मार्केट इंटेलिजन्स असलेल्या ट्रेंडफोर्सच्या वृत्तानुसार, Foxconn, Pegatron आणि Lux Share नंतर Apple साठी iPhones तयार करणारी टाटा समूह ही चौथी कंपनी असेल.
  • अहवालानुसार, टाटा समूहाकडून आयफोन १५ आणि १५ प्लसचे उत्पादन भारतात करण्याची योजना आखली जात आहे. आयफोनचे उत्पादन भारतात झाले तर चीनला हा मोठा धक्का असण्याची शक्यता आहे.

टाटा ग्रुप तयार करणार आयफोन

  • टाटा समूहाने विस्ट्रॉनची भारतीय उत्पादन लाइन विकत घेतली आहे. ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे जी आयफोन 15 सिरिज असेंबल करणार आहे. हा दावा अशा वेळी केला जात आहे जेव्हा विस्ट्रॉन भारतीय बाजारपेठेतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. तसेच आयफोनचे उत्पादन भारतात झाल्यामुळे त्याची किंमत सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे
पंढरपूर आषाढी यात्रेसाठी ५ हजार विशेष बसेस सोडणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
  • आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना पंढरपुरला जाता यावे, यासाठी राज्यभरातून ५ हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. २५ जून ते ०५ जुलै या कालावधीत या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी (२७ जून रोजी) २०० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
  • पंढरपूर आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाने बससेवेसाठी केलेल्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
  • पंढरपूर आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. यामध्ये एसटीच्या प्रवाशी वाहतुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याकाळात एसटीकडून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा प्रवाशांना आणि वारकऱ्यांना दिल्या जाव्यात, भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यंत घेऊन जाणे आणि विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे घरी आणून सोडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
  • आषाढी यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा प्रदेशातून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.यात्रेसाठी सुमारे ५ हजार विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे. औरंगाबाद प्रदेशातून १२००, मुंबई ५००, नागपूर १००, पुणे १२००, नाशिक १००० तर अमरावती येथून ७०० अशाप्रकारे यात्रेसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
वर्ल्डकप सुपर लीगच्या गुणतालिकेत ‘या’ ८ संघांनी घेतली भरारी, बांगलादेशनं भारताला दिला झटका
  • बांगलादेशने आर्यलॅंडला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ४ धावांनी पराभूत केलं. या विजयानंतर बांगलादेशच्या संघानं आर्यलॅंडविरोधात झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २-० ने जिंकली. या मालिकेत मिळालेल्या यशानंतर बांगलादेशने वर्ल्डकप सुपर लीगच्या गुणतालिकेत भरारी घेतली आहे. बांगलादेशने मालिका जिंकून गुणतालिकेत भारताला मागे टाकलं आहे.
  • वर्ल्डकप सुपर लीगच्या गुणतालिकेत बांगलादेशचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. तर भारतीय क्रिकेट टीम चौथ्या स्थानावर आहे. यंदाच्या वर्ल्डकपचं यजमानपद भारत भूषवणार आहे. त्यामुळे भारताला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये थेट प्रवेश मिळाला आहे. भारताशिवाय आणखी ७ संघांना क्रिकेट वर्ल्डकपमध्ये थेट प्रवेश मिळाला आहे. न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा यात समावेश आहे.
  • जे संघ वर्ल्डकपमध्ये क्वालीफाय झाले नाहीत, ते संघ ODI वर्ल्डकप क्वालिफिकेशन राऊंड खेळतील. या राऊंडनंतर टॉपमध्ये असणाऱ्या दोन संघांना वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी मिळेल. वनडे वर्ल्डकपसाठी क्वालिफिकेशन राऊंडची सुरुवात १८ जूनपासून होणार असून १९ जुलै शेवटची तारीख असणार आहे. या राऊंडमध्ये झिम्बाब्वे, श्रीलंका, वेस्टइंडिज आणि आर्यलॅंड संघ सहभागी होणार आहे. याशिवाय नेपाल, ओमान, स्कॉटलॅंडस नेदरलॅंड्स आणि यूएईचा संघही क्वालिफिकेशन राऊंडचा भाग असणार आहे. ही टूर्नामेंट झिम्बाब्वेमध्ये खेळवण्यात येणार आहे.

 

माणिक साहा यांनी घेतली त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ :
  • बिप्लव कुमार देव यांनी त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्रिपुरा भाजपाचे प्रमुख माणिक साहा यांनी आज (रविवार) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. माणिक साहा यांनी आगरतळा येथील राजभवनात मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली. राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झालेले माणिक हे भाजपाचे राज्यसभा खासदार आहेत. याशिवाय ते त्रिपुरा भाजपाचे प्रमुख देखील आहेत. सहा वर्षांपूर्वी माणिक सहा यांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये केला होता प्रवेश.

  • त्रिपुरा विधानसभा निवडणुका २०२३ मध्ये होणार असून माणिक साहा हेच या निवडणुकीत पक्षाचा चेहरा असतील, असे भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले आहे.

  • काँग्रेसमधून आलेला भाजपचा चौथा मुख्यमंत्री - माणिक साहा यांची त्रिपूराच्या मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाल्याने ते ईशान्येकडील राज्यात भाजपाचे असे चौथे मुख्यमंत्री ठरले आहेत जे मूळचे काँग्रेसचे होते. आसामचे हेमंत बिश्व सरमा, अरुणाचल प्रदेशचे प्रेम खांडू, मणिपूरचे एन. बिरेन सिंह हे ईशान्येतील तीन राज्यांचे मुख्यमंत्री जुने काँग्रेसचे नेते आहेत. या तिघांनी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला होता. यानंतर आता त्रिपूरा भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झालेले डॉ. माणिक साहा हे मूळचे काँग्रेसचे आहेत. २०१६ मध्ये साहा यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला होता.

भारताला पहिल्या क्रमांकाचे समुद्र पर्यटन केंद्र करण्यासाठी प्रयत्न :
  • क्रूझ पर्यटन अर्थात समुद्र पर्यटन क्षेत्र सध्या झपाटय़ाने वाढत असून या क्षेत्रात मोठी संधी आहे. त्यात भारताला विस्तीर्ण आणि नितांत सुंदर अशी किनारपट्टी लाभली आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील समुद्र पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार आणि समुद्र पर्यटनाशी निगडित राज्यांकडून आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जाणार आहेत. येत्या काळात भारताला जगातील पहिल्या क्रमाकांचे समुद्र पर्यटन स्थळ किंवा केंद्र म्हणून ओळख निर्माण करून देण्याचा प्रयत्न असणार असल्याचा निर्धार केंद्रीय बंदरे, नौवाहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी शनिवारी व्यक्त केला. 

  • मुंबई बंदर प्राधिकरणाच्या (मुंबई पोर्ट अथॉरिटी) माध्यमातून देशातील पहिल्या अतुल्य भारत समुद्र पर्यटन परिषदेचे २०२२ चे अयोजन मुंबईत करण्यात आले आहे. ट्रायडंट हॉटेल येथे ही परिषद पार पडत असून सोनोवाल आणि केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.

  • देशात क्रूझ टर्मिनल, जेट्टी उभारणी यासह अनेक पायाभूत सुविधांचा विकास सागरमाला प्रकल्पाअंतर्गत प्रयत्न सुरु आहेत. असे असताना २०२० मध्ये करोना संकट आले आणि त्याचा मोठा फटका समुद्र पर्यटनाला बसला. पण त्यानंतर अर्थात वर्षभरापूर्वी पुन्हा या क्षेत्राला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. परिणामी एका वर्षांत या क्षेत्रात ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचवेळी येत्या काळात या क्षेत्रात १० टक्क्यांनी वाढ होणार आहे.

  • ही संधी लक्षात घेत भारताला आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रूझ हबह्ण म्हणून ओळख देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे यावेळी सोनोवाला यांनी सांगितले. यासाठी किनारपट्टी लाभलेल्या सर्व राज्यांना आवश्यक ती सर्व मदत केंद्राकडून करण्यात येईल असेही त्यांनी आश्वासन सांगितले. यावेळी सोनोवाल यांच्या हस्ते  पीरपाऊ येथील तिसऱ्या रासायनिक मालवाहू धक्क्याची ई पायाभरणी करण्यात आली. तसेच रत्नागिरी येथील केळशी दीपगृह तसेच धनुष्य कोडी येथील दीपगृहाचे उद्घाटनही यावेळी सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

जाणून घ्या कधी होणार चंद्रग्रहण? कुठे दिसणार सुपरमून :
  • वर्षातील पहिल्या आंशिक सूर्यग्रहणानंतर, आपण आता २०२२ च्या पहिल्या चंद्रग्रहणाच्या जवळ आलो आहोत. हे चंद्रग्रहण पृथ्वीच्या विविध भागांतून दिसणार आहे. या वर्षी १५ आणि १६ मे रोजी हे ग्रहण होणार आहे. यावेळी चंद्र ‘सुपरमून’ असेल तसेच तो लालसर रंगात दिसेल. चंद्रग्रहणाच्या आधी, तुम्हाला त्याबद्दल काही माहित असणे आवश्यक आहे.

  • ग्रहण कधी होईल, कुठे दिसेल - २०२२ चे पहिले चंद्रग्रहण या शनिवार आणि रविवार, अर्थात १५ मे आणि १६ मे रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार, १६ मे रोजी सकाळी ०७.०२ वाजता ग्रहण होईल आणि दुपारी १२.२० वाजता समाप्त होईल. मात्र, चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. नासाच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेच्या पूर्वेकडील अर्धा भाग आणि संपूर्ण दक्षिण अमेरिकेला चंद्रग्रहणाचा प्रत्येक टप्पा पाहण्याची संधी मिळेल. संपूर्ण आफ्रिका, पश्चिम युरोप, मध्य आणि दक्षिण अमेरिका आणि बहुतेक उत्तर अमेरिकेत दृश्यमान होईल असं यूएस स्पेस एजन्सीने सांगितले आहे.

  • चंद्रग्रहण कसे पाहावे - आपल्याकडे हे ग्रहण दिसणार नाही त्यामुळे तुम्ही नासाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ते थेट पाहू शकता. नासा आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि अधिकृत युट्युब चॅनेलवर याचे थेट प्रसारण देखील करणार आहे.

  • चंद्रग्रहण नक्की कधी होते - जेव्हा चंद्र आणि सूर्य पृथ्वीच्या अगदी विरुद्ध बाजूस असतात तेव्हा चंद्रग्रहण होते, परिणामी चंद्रावरील सूर्यप्रकाश पूर्णपणे अवरोधित होतो. या वर्षी, चंद्रग्रहण देखील ‘ब्लड मून’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या घटनेला कारणीभूत ठरेल. ब्लड मून दरम्यान, चंद्राच्या पृष्ठभागावर लालसर रंगाची छटा दिसते, जी त्याला एक अद्वितीय स्वरूप देते.

  • नासा याबद्दल सांगते की, “ग्रहणाच्या वेळी पृथ्वीच्या वातावरणात जितकी जास्त धूळ किंवा ढग असतील तितका चंद्र लाल दिसेल. १६ मे रोजी होणारे चंद्रग्रहण हे या वर्षी होणार्‍या दोन चंद्रग्रहणांपैकी पहिले चंद्रग्रहण असेल. दुसरे चंद्रग्रहण ८ नोव्हेंबरला होणार आहे.

एफए चषक  फुटबॉल स्पर्धा - चेल्सीला नमवत लिव्हरपूल अजिंक्य :
  • लिव्हरपूलने पेनल्टी शूटआऊटमध्ये चेल्सीला ६-५ अशा फरकाने पराभूत करत एफए चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद मिळवले.

  • वेम्बली स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी चांगला खेळ केला; पण त्यांना गोल करण्यात अपयश आले. अखेरीस पेनल्टी शूटआऊटमध्ये कोस्टास त्सिमिकासने निर्णायक गोल करत लिव्हरपूलला विजय मिळवून दिला.

  • लिव्हरपूलला २००६ नंतर पहिल्यांदाच एफए चषकाचे जेतेपद मिळाले. एफए चषकाच्या अंतिम सामन्यात विजेता ठरवण्यासाठी पेनल्टी शूटआऊट झाले. दोन्ही संघ पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-५ असे बरोबरीत होते. मात्र, संघाच्या सातव्या प्रयत्नात चेल्सीचा मध्यरक्षक मेसन माऊंटला पेनल्टीला गोलमध्ये रूपांतरित करण्यात यश आले नाही. याउलट त्सिमिकासने चेंडू गोलजाळय़ात मारत लिव्हरपूलला विजय मिळवून दिला.

१४ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.