चालू घडामोडी आणि दिनविशेष - १५ मे २०२०

Date : 15 May, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
बिल गेट्स यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार; म्हणाले : 
  • करोना व्हायरसनं जगभरात हाहाकार माजवला आहे. भारतातही करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत अर्थव्यवस्थेचं चक्रही पूर्णपणे थांबलं आहे. भारतात गुरुवारी करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होऊन ती ८० हजारांच्या जवळ गेल्याचं पाहायला मिळालं होतं. तर दुसरीकडे भारत पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेचं थांबलेलं चक्र सुरू करण्याची तयारी करत आहे.

  • गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक आणि सह-संस्थापक बिल गेट्स यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी बिल गेट्स यांनी करोनाच्या संकटामुळे जागतिक स्तरावर पडणारा  सामाजिक आणि आर्थिक ताण किमान राहिल यासंदर्भात उपाययोजना करतानाची भारताची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचं म्हटलं आहे.

  • “करोनाच्या संकटामुळे जागतिक स्तरावर निर्माण होणारा सामाजिक आणि आर्थिक ताण किमान राहिल यासंदर्भात उपाययोजना करताना भारताची भूमिका महत्वाची ठरणार आहे. तसेच भारताच्या भूमिकेमुळे लस निर्मिती, चाचणी आणि सर्वांपर्यंत उपचार पोहचण्यासाठी मार्ग सुखकर होईल,” अशी अपेक्षा बिल गेट्स यांनी व्यक्त केली. तर यापूर्वी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “करोनाची लढाई सर्वांनी एकत्र मिळून लढली पाहिजे,” असं म्हटलं होतं.

केंद्रीय अर्थमंत्र्यांची आज तिसरी पत्रकार परिषद; घोषणांकडे देशाचं लक्ष :
  • राज्यात लॉकडाउन लागू असला तरी गेल्या दोन दिवसांत सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. गुरूवारी दिवसभरात राज्यामध्ये १६०२ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या २७ हजार ५२४ वर पोहोचली आहे.

  • दिलादायक बाब म्हणजे राज्यात सध्या २०,४४१ रुग्ण उपचार घेत असून, ६०५९ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. दुसरीकडे टाळेबंदीमुळे दैनावस्था झालेल्या देशातील स्थलांतरित मजुरांना अखेर केंद्र सरकारने दिलासा दिला.

  • स्थलांतरित मजुरांना पुढील दोन महिने विनाशिधापत्रिका मोफत अन्नधान्य देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. शेतकरी, फेरीवाले, छोटय़ा व्यावसायिकांनाही विविध योजनांद्वारे केंद्राने मदतीचा हात दिला आहे.

‘मनरेगा’ अंतर्गत १० हजार कोटी खर्च :
  • केंद्र सरकारच्या ‘मनरेगा’ योजनेंतर्गत गेल्या दोन महिन्यात १० हजार कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी सांगितले. स्थलांतरितांना काम उपलब्ध होण्यासाठी ही रक्कम साहाय्यभूत ठरल्याचेही त्या म्हणाल्या.

  • अर्थमंत्र्यांनी गुरुवारी अर्थसाहाय्याचा दुसरा टप्पा जाहीर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत कोविड-१९ आव्हानावर मात करण्यासाठी सरकार उपाययोजना करणार असल्याचे जाहीर केले होते.

  • ‘मनरेगा’ अंतर्गत सरकारच्या विविध प्रकल्पांसाठी रोजंदारीवर मजूर नियुक्त केले जातात. मात्र सध्याच्या टाळेबंदीच्या कालावधीत या योजनेचा अधिक लाभ स्थलांतरित मजूरांना झाल्याचा दावा अर्थमंत्र्यांनी केला.

  • ‘मनरेगा’ अंतर्गत यंदा काम करणाऱ्या एकूण मजूरांपैकी ५० टक्के मजूर हे स्थलांतरित असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

तीन महिने पगार न मिळालेल्या ११ कोटी लोकांना कोणता लाभ होणार - शिवसेनेचा सवाल :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच वाटप जाहीर केलं. या पॅकेजमधून विविध घटकांना दिल्या जाणाऱ्या मदतीची सीतारामन यांनी माहिती दिली. दरम्यान, केंद्रानं जाहीर केलेल्या पॅकेजवरून शिवसेनेनं सरकारसमोर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ”

  • बाजारात ‘रोखता’ म्हणजे ‘कॅश फ्लो’ निर्माण करण्याची योजना ठीक आहे, पण त्यामुळे लोकांच्या खिशात पुरेसा पैसा जाईलच असे नाही. उद्योजकांना कर्जपुरवठा, अर्थपुरवठा केल्यानेच मागणी वाढणार नाही. गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या हाती पैसा द्यावाच लागेल,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग दोन दिवस २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये करण्यात आलेल्या तरतूदीची घोषणा केली. सर्वच घटकांना या पॅकेजचा लाभ होणार असल्याचंही त्या म्हणाल्या. केंद्रानं जाहीर केलेल्या या पॅकेजसंदर्भात शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून भाष्य केलं आहे.

१५ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.