चालू घडामोडी आणि दिनविशेष - १४ सप्टेंबर २०२०

Date : 14 September, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ज्येष्ठ नागरिकांसाठी करोना लशीला जलदगतीने मान्यता देण्याचा सरकारचा विचार :
  • सर्वाधिक धोका असलेल्या वयोगटाला लवकरात लवकर करोना व्हायरसवरील लस उपलब्ध करुन देण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. त्यासाठी सरकार करोना लसीला इमर्जन्सी ऑथोरायझेशन म्हणजेच जलदगतीने मान्यता देण्याचा विचार करत आहे. हाय रिस्क ग्रुपमध्ये ज्येष्ठ नागरिक, आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचा समावेश होतो. केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांनी ‘संडे संवाद’ या कार्यक्रमात रविवारी ही माहिती दिली.

  • ‘एकमत झाल्यानंतर यावर निर्णय घेण्यात येईल’ असे हर्ष वर्धन यांनी सांगितले. लस चाचणीचा अंतिम टप्पा हा सहा ते नऊ महिन्यांचा असेल. एका ठराविक टप्प्यावर लशीच्या सुरक्षिततेची आणि ती प्रभावी असल्याची खात्री पटल्यानंतर आपातकालीन मान्यता म्हणजे इमर्जन्सी ऑथोरायझेशनचा विचार होऊ शकतो असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

  • भारतात तीन लशी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत. यात सिरम निर्मिती करत असलेली ऑक्सफर्डची लस, भारत बायोटेकची कोव्हॅक्सनी आणि झायडस कॅडिलाची लस आहे. “लशी बद्दल विश्वास वाटत नसेल, तर सर्वात आधी मी स्वत:ला ती लस टोचून घेईन” असे त्यांनी सांगितले. “ज्यांना सर्वाधिक गरज आहे, त्यांना ती लस सर्वात आधी उपलब्ध करुन दिली जाईल” असे हर्षवर्धन म्हणाले. करोना विषाणूवरील लस जानेवारी २०२१पर्यंत तयार होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

चीन संघर्षांवर चर्चेची मागणी :
  • नवी दिल्ली : करोनाच्या सावटाखाली संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. भारत-चीन यांच्यातील सध्याच्या घडामोडींवर विरोधकांनी चर्चेची मागणी केली असून, केंद्र सरकारकडून संसदेच्या दोन्ही सभागृहांत निवेदन दिले जाण्याची शक्यता आहे. तसेच तातडीची विधेयकेही संसदेत मांडली जातील.

  • चीनशी सुरू असलेला संघर्ष, सीमांवरील सद्यस्थिती, करोना साथरोगाची हाताळणी, देशाची आर्थिक स्थिती, छोटय़ा उद्योगांची बिकट अवस्था, विमानतळांचे खासगीकरण, पर्यावरणीय प्रभावाचा नवा मसुदा या प्रमुख विषयांवर लोकसभेत व राज्यसभेत चच्रेची मागणी विरोधी पक्ष करत आहेत. यासंदर्भात विरोधक एकजूट दाखवतील, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्यसभेतील खासदार जयराम रमेश यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

  • संसदेच्या पूर्वसंध्येला होणारी सर्वपक्षीय बैठक करोनामुळे रद्द करण्यात आली. मात्र, रविवारी झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत चीन संघर्षांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर चर्चा करण्यासाठी वेळ राखून ठेवण्याची सूचना विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केली. त्यावर, हा मुद्दा संवेदनशील असून, मंगळवारी विविध पक्षांच्या नेत्यांची बैठकही होणार आहे. त्यानंतर चच्रेसंदर्भात केंद्र सरकार अंतिम निर्णय घेईल, असे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रविवारी पत्रकारांना सांगितले.

  • कुठल्याही विषयावर चर्चा करण्याची केंद्र सरकारची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी लोकसभेचे कामकाज सकाळी ९ ते दुपारी १ आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत होईल.

परदेशी पत्रकारांवर ऑस्ट्रेलियात निर्बंध :
  • मेलबर्न : ऑस्ट्रेलियातील परदेशी पत्रकारांवर आता संघराज्य संस्थांकडून देखरेख केली जाणार असून त्यांनी जर देशाची चुकीची प्रतिमा रंगवली व देशातील लोकशाही राज्यव्यवस्थेत हस्तक्षेप करून बौद्धिक संपदा हक्क चोरण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

  • चीनशी सुरू असलेल्या वादामुळे ऑस्ट्रेलियाने हा निर्णय घेतला आहे. चीनने अनेक देशातील संस्थांमध्ये त्यांचे हस्तक पाठवून बरीच माहिती चोरल्याचे ऑस्ट्रेलियातील एका संस्थेच्या अहवालात उघड झाले आहे.

  • ऑस्ट्रेलियाचे गृह कामकाज मंत्री पीटर डय़ुटन यांनी सांगितले, की ऑस्ट्रेलियातील संघराज्य पोलिस विभाग व परराष्ट्र विभाग हे आता सरकारच्या इतर विभागांशी सहकार्य करतील. ऑस्ट्रेलियातील परदेशी हस्तक्षेपावर लक्ष ठेवण्याचे काम आता गांभीर्याने केले जाणार आहे. जर येथे काही परदेशी पत्रकार चुकीच्या पक्षपाती बातम्या देत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ऑस्ट्रेलियन कायद्याच्या हिताविरोधात काम करणारे परदेशी पत्रकार व उद्योगपती यांच्यावर कारवाई केली जाईल. हेरगिरीच्या कारवाया कुणी केल्या तर तो एक मोठा प्रश्न आहे. ऑस्ट्रेलियात येणाऱ्या परदेशी पत्रकारांची छाननी केली जाईल.

  • ऑस्ट्रेलियाच्या दोन पत्रकारांवर चीनने कारवाई करून त्यांना मायदेशी हाकलून दिले होते. या पत्रकारांचे चीनने जाबजबाब घेतले होते. बिल बिर्टल्स व माइक स्मिथ अशी त्यांची नावे असून त्यांनी चीनमधील कायदेशीर कामात अडथळा आणल्याचा आरोप  करण्यात आला होता.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या चिराग पासवान यांना रोहित पवाराचं सणसणीत पत्र :
  • अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासूनच बिहार आणि महाराष्ट्रात आरोपप्रत्यारोप होताना दिसत आहे. अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी सुशांतच्या बहिणीसह काही जणांनी केली होती. यात लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनीही ही मागणी केली होती. या मागणीवरून आमदार रोहित पवार यांनी चिराग पासवान यांना पत्र लिहिलं असून, त्यांना बिहारमधील गुन्हेगारीची आकडेवारीचं वाचून दाखवली आहे.

  • आपण महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेबद्दल चिंतेत असून, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करत असल्याचं ऐकण्यात आलं. तुम्ही जर कायदा सुव्यस्थेचे इतकेच पुरस्कर्ते आहात, तर त्यावेळस बिहारमध्ये ही मागणी का केली नाही. जेव्हा २०१८मध्ये मुजफ्फरपूर येथील निवारागृहात लैंगिक मुलींचं शोषण करण्यात आलं होतं. त्यावेळी तुम्हीच म्हणाला होतात की, अशा घटना इतर जिल्ह्यातही घटल्याचं समोर येतंय. आपण नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केली नाही.

  • इतकंच नाही, तर एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार बिहारची राजधानी पाटणा ही खूनांच्या घटनांमध्ये देशातील १९ शहरांमध्ये पहिल्या क्रमाकांवर आहे. पाटण्यातील खूनांच्या घटनांची सरासरी ४.४ टक्के इतकी आहे. जी की दुसऱ्या क्रमाकांवर असलेल्या जयपूरपेक्षा (३.१ टक्के) खूप जास्त आहे. हुंड्यासाठी होणाऱ्या मुलींच्या हत्यांमध्येही पाटणा पहिल्या क्रमांकावर आहे.

टस्कन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यत - हॅमिल्टनला जेतेपद :
  • मुगेलो : मर्सिडिझ संघाच्या लुइस हॅमिल्टन याने अपघातामुळे व्यत्यय आणलेल्या टस्कन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीत आपले कसब पणाला लावत विजेतेपद मिळवले. आपल्या कारकीर्दीतील ९०वे जेतेपद मिळवणारा हॅमिल्टन हा मायकेल शूमाकरच्या विक्रमी जेतेपदांपासून फक्त एका विजयाने दूर आहे.

  • मुगेलोच्या अवघड  ट्रॅकवर प्रथमच झालेल्या या शर्यतीत पहिल्या सात फेऱ्यांदरम्यान दोन अपघात नोंदवले गेल्यामुळे सहा ड्रायव्हर्सना शर्यतीतून माघार घ्यावी लागली. त्यानंतर ४६व्या फे रीदरम्यान लान्स स्ट्रॉलच्या कारचा अपघात झाला. मात्र हॅमिल्टनने निर्विवाद वर्चस्व गाजवले.

  • शर्यतीआधी आपल्या टी-शर्टवर ‘ब्रेओना टेलर यांना ठार मारणाऱ्या पोलिसांना अटक करा’ असा संदेश देत हॅमिल्टनने सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. हॅमिल्टनचा सहकारी वाल्टेरी बोट्टासला दुसऱ्या तर रेड बुलच्या अलेक्झांडर अल्बनला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

१४ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.