चालू घडामोडी आणि दिनविशेष - १४ मे २०२२

Date : 14 May, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी - भारतीय नेमबाजांना चार सुवर्ण :
  • भारतीय नेमबाजांनी कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेतील दमदार कामगिरी सुरू ठेवताना शुक्रवारी चार सुवर्णपदकांची कमाई केली.

  • पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकाराच्या सांघिक गटात रुद्राक्ष पाटील, पार्थ मखिजा आणि उमामहेश माद्दिनेनी यांनी, तर १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सौरभ चौधरी, शिवा नरवाल आणि सरबजोत सिंग या त्रिकुटाने सुवर्णपदक जिंकले.

  • महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात मनू भाकर, पलक आणि ईशा सिंग यांनी, तर महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात आर्या बोरसे, झीना खिट्टा आणि रमिता यांनी सुवर्णपदक आपल्या नावे केले.

NEET PG परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली :
  • नीट परीक्षा २०२२ (NEET-PG 2022) पुढे ढकलण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. “परीक्षा आयोजित करण्यात येणाऱ्या विलंबामुळे निवासी डॉक्टरांची संख्या कमी होईल.” असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी काही वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या गटाने केली होती. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहले होते. तसेच परीक्षा पुढे ढकलण्यात यावी यासाठी जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांकडून आंदोलनही करण्यात येत आहे.

  • नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी - २१ मे २०२२ ला नीट परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी काही वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांनी केली होती. कांऊनसिलिंगच्या दरम्यान ही परीक्षा येत असल्यामुळे ती पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती.

  • सरकारने जारी केलेल्या वेळापत्रकांचे पालन विद्यार्थ्यांनी करावे - न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि सूर्यकांत यांच्या खंडपीठाने सांगितले, की परीक्षा पुढे ढकलल्याने “अराजकता आणि अनिश्चितता” निर्माण होईल आणि परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या मोठ्या वर्गावर परिणाम होईल. “विद्यार्थ्यांच्या दोन श्रेणी आहेत. एक जे पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत आणि दुसरीकडे दोन लाख सहा हजारांहून अधिक उमेदवार आहेत ज्यांच्यावर परीक्षा पुढे ढकल्याचा परिणाम होईल. कोरोनामुळे परीक्षांचे विस्कटलेले वेळापत्रक पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. देश यातून सावरत असताना सरकारने दिलेल्या वेळापत्रकाचे पालन विद्यार्थ्यांनी केले पाहिजे असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.

  • परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसह आंदोलन - वकील आशुतोष दुबे आणि अभिषेक चौहान यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे, की “याचिकाकर्ते हे डॉक्टर आहेत. जे देशभरातील विविध रुग्णालयांमध्ये इंटर्नशिप करत आहेत. याचिकाकर्ते २१ मे रोजी होणार्‍या नीट परीक्षेला बसण्याची इच्छा आहे. तर ४० हजारापेक्षा अधिक विद्यार्थी २१ मे २०२२ रोजी होणारी नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत ऑनलाइन आणि ऑफलाइन आंदोलन करत आहेत.

  • नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी - २१ मे २०२२ ला नीट परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी काही वैद्यकीय विद्यार्थ्यांनी केली होती. कांऊनसिलिंगच्या दरम्यान ही परीक्षा येत असल्यामुळे ती पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती.

‘यूएई’चे अध्यक्ष खलीफा बिन जायेद यांचे निधन :
  • संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष खलीफा बिन जायेद अल नहयान यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते, अशी माहिती अध्यक्षीय व्यवहार मंत्रालयाने दिली आहे. 

  • पिता शेख झायेद बिन सुल्तान अल नाह्यान यांच्यानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र असलेल्या खलीफा बिन जायेद यांची संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. १९४८ ला जन्मलेले शेख खलिफा देशाचे दुसरे अध्यक्ष व अबुधाबीच्या अमिरातीचे १६ वे सत्ताधीश होते. शेख खलिफा ३ नोव्हेंबर २००४ पासून संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष होते. त्यांच्या कारकीर्दीत संयुक्त अरब अमिरातीने विकासाची घोडदौड केली. येथील नागरिकांसाठी हा देश समृद्ध करण्यात त्यांचे योगदान होते.

  • खलीफा बिन जायेद अल नहयान यांच्या निधनामुळे शोकग्रस्त संयुक्त अरब अमिरात सरकारला अरब आणि इस्लामी देशांसह जगभरातून शोकसंदेश प्राप्त झाले. देशात ४० दिवसांचा शोक पाळण्यात येणार आहे.

ट्विटर डीलला तात्पुरती स्थगिती; ‘हे’ आहे मुख्य कारण :
  • प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क (Elon Musk) मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटर विकत घेणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पण ट्विटर विकत घेण्याची डील तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. मस्क यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. याचे परिणाम शेअर मार्केटमध्येही दिसून आले आहेत. यामुळे शेअर्स प्रीमार्केट ट्रेडिंगमध्ये २० टक्क्यांनी घसरले आहेत.

  • ट्विटरवर सध्या ५ टक्क्यांहून कमी स्पॅम आणि बनावट अकाऊंट्स आहेत. या अकाऊंट्सची माहिती अद्याप ट्विटरकडून आपल्या टीमला मिळाली नसल्याने ट्विटर खरेदीची डील तात्पुरती स्थगित करण्यात आली असल्याचे मस्क यांनी ट्विटमध्ये म्हणले आहे.

  • ४४ अब्ज डॉलर्सना खरेदी केले ट्विटर - इलॉन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर ४४ अब्ज डॉलर्समध्ये (३ लाख ३७ हजार कोटी रुपयांहून अधिक) खरेदी केली आहे. हा करार पूर्ण होताच इलॉन मस्क यांचे ट्विटरवर पूर्ण नियंत्रण असेल आणि ट्विटर ही खासगी कंपनी बनेल. त्यामुळे आता ट्विटरवर मोफत सेवा मिळणार की नाही? हा प्रश्न युजर्संना पडला आहे. याबाबत आता इलॉन मस्क यांनी ट्वीट करून सांगितलं आहे की, या प्लॅटफॉर्मचा व्यावसायिक आणि सरकारी युजर्संना त्याच्या वापरासाठी पैसे खर्च करावे लागतील. तर सामान्य युजर्सबाबतही त्यांनी आपलं मत स्पष्ट केलं आहे.

  • ट्विटरसाठी नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची निवड - इलॉन मस्क यांनी ट्विटरसाठी नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची निवड केली आहे. मस्क यांनी निवड केलेली व्यक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवालची जागा घेणार आहे. मात्र, मस्क यांनी त्या व्यक्तीचे नाव सांगण्यास नकार दिला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जॅक डॉर्सीच्या जागी पराग अग्रवाल यांची ट्विटरचे नवे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

१४ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.