चालू घडामोडी आणि दिनविशेष - १४ एप्रिल २०२१

Date : 14 April, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
महाराष्ट्रात उद्या रात्रीपासून लॉकडाउन; मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा :
  • महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरात सातत्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू होणार की कठोर निर्बंध? या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांत मोठी चर्चा पाहायला मिळाली.

  • महाराष्ट्रात रुग्णसंख्येसोबतच मृतांचा आकडा देखील वाढू लागला आह. त्यासोबतच राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या आरोग्य सुविधांची कमतरता देखील जाणवू लागल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन करायला हवा, असा देखील दावा केला गेला.

  • लॉकडाऊन बाबत सर्वच स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया आल्या. यामध्ये काहींनी लॉकडाऊनचं समर्थन केलं तर काहींनी विरोध केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात सर्वपक्षीय नेते, डॉक्टर, मनोरंजन क्षेत्रातील प्रतिनिधी, तज्ज्ञांशी चर्चा देखील केली. या सर्व चर्चांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज राज्यातल्या जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनाला कलाटणी देणारे थोर विचार :
  • आज जगभरात महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2021) साजरी केली जात आहे.

  • कोरोनामुळे यावर्षीही साध्या पद्धतीने, ऑनलाइन जयंती साजरी केली जात आहे. तसेच त्यांचे विचार सोशल मीडियावर शेअर केले जात आहे. असेच त्यांचे जीवन बदलणारे विचार आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा - महाराष्ट्राची विजयी सलामी :
  • अयोध्या (उत्तर प्रदेश) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात सुरू झालेल्या असलेल्या पुरुषांच्या ६८व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत ह-गटात महाराष्ट्राने मणिपूरला ४९-३० असे नमवून विजयी सलामी नोंदवली.

  • महाराष्ट्राने सुरुवात जोरदार करीत पहिल्या सत्रात दोन लोण देत ३१-१६ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात मणिपूरने जोरदार प्रतिकार करीत महाराष्ट्रावर लोण चढवण्याचा प्रयत्न केला.

  • शिलकी दोन खेळाडूत पकड केल्यावर मग आणखी दोन गुण घेत महाराष्ट्रान होणारा लोण मणिपूरवर परतवला. अजिंक्य पवार, पंकज मोहिते यांच्या चढायांना शुभम शिंदे, गिरीश इरनाक यांच्या पकडींची साथ यामुळे हे शक्य झाले.

कोरोनाचा भीतीदायक रेकॉर्ड! गेल्या २४ तासांत १,८४,३७२ नवे रुग्ण; 'या' आकडेवारीने वाढवली चिंता :
  • जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. चीनमधून वेगाने जगभरात पसरलेल्या कोरोनाचा फटका जवळपास सर्वच देशांना बसला आहे. जगातील कोरोना रुग्णांची संख्या ही आता तब्बल १३ कोटींच्या पुढे गेली असून लाखो लोकांना यामुळे जीव गमावला आहे.

  • कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. 

  • गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल १,८४,३७२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १,२८७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या १,३८,७३,८२५ वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात १,७२,०८५ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

  • बुधवारी (१४ एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे एक लाख ८४ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दीड लाखांच्यावर पोहोचला आहे. 

मोदीजी, हे थांबवा! देशातील डॉक्टरांनी पंतप्रधानांकडे केली राजकीय नेत्यांबद्दल तक्रार :
  • देशावर पुन्हा एकदा करोनारुपी आपत्ती ओढवली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेनं महाराष्ट्र, गुजरात दिल्ली पाठोपाठ इतर राज्यांतही थैमान घातलं आहे. त्यामुळे पहिल्या फळीतील करोना योद्धे असलेल्या डॉक्टर आणि आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांवर पुन्हा ताण पडला आहे. अशा संकट काळात राजकीय नेत्यांकडून डॉक्टरांना राजकीय नेत्यांकडून व्हीआयपी कल्चरचा प्रत्यय येत आहे. यासंदर्भात डॉक्टरांची राष्ट्रीय पातळीवरील संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ ऑल मेडिकल असोसिएशनने (FAIMA) थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच तक्रार केली आहे.

  • FAIMAने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात डॉक्टरांनी राजकीय नेत्यांच्या व्हीआयपी कल्चरची तक्रार केली आहे. राजकीय नेत्यांकडून व्हीआयपी कल्चरचं दर्शन घडतं असून, शासकीय रुग्णालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांना राजकारण्यांकडून चाचण्या आणि उपचारासाठी थेट घरी बोलावून घेतलं जात आहे, अशी तक्रार पत्रातून करण्यात आली आहे.

  • करोना काळात पहिल्या फळीत सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांना विषाणूचा संसर्ग झाला, तर अल्पशी सुविधा मिळते. तर दुसरीकडे रॅली आयोजित करणाऱ्या आणि विषाणूचा प्रसार करणाऱ्या राजकीय नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना वरचा प्राधान्यक्रम दिला जातो. केंद्र सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या अनेक रुग्णालयांमध्ये स्वतंत्र व्हीआयपी काऊंटर्स आहेत. तिथे फक्त राजकीय नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्याच कोविड चाचण्या केल्या जातात. पण, अशा ठिकाणी डॉक्टरांसाठी स्वतंत्र काऊंटर्स नाहीत, अशी तक्रार पत्रातून करण्यात आली आहे.

१४ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.