चालू घडामोडी आणि दिनविशेष - 13 मे 2023

Date : 13 May, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आता राज्यातील शिक्षकांमध्ये होणार स्पर्धा.. ई साहित्य निर्मिती स्पर्धेसाठी शिक्षण विभागाचा पुढाकार!
  • राज्यातील शाळांमध्ये तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अध्यापन करण्यासाठी शिक्षकांनी तयार केलेले ई साहित्य परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई साहित्य निर्मितीची चळवळ उभी राहण्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांसाठी ई साहित्य निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, सर्वोत्कृष्ट ई साहित्य निर्मितीसाठी तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरासाठी प्रत्येकी ८४ पुरस्कार दिले जाणार आहेत.
  • शालेय शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला. करोना काळात शाळा बंद असताना शिक्षकांनी ऑनलाइन पद्धतीने अध्यापन केले होते. त्यानंतर शिक्षक तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन अधिक रंजक आणि दर्जेदार करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील तंत्रस्नेही शिक्षकांची चळवळ अधिक सक्रीय होऊन २ लाख ८९ हजार ५६० शिक्षक तंत्रस्नेही झाल्याचे राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेमार्फत आढळून आले आहे.
  • या शिक्षकांनी केवळ आपले वर्ग ऑनलाइन पद्धतीने न घेता विद्यार्थ्यांनाही तंत्रस्नेही केले आहे. त्यामुळे विद्यार्थीही स्वत: डिजिटल साहित्य तयार करून शिक्षण मनोरंजक करत आहेत. तसेच परदेशातील शिक्षक, विद्यार्थ्यांशी ऑनलाइन संवाद साधून साहित्य वापरत आहेत. त्यामुळे आता ई साहित्याची निर्मिती करण्यासाठी शिक्षकांची स्पर्धा घेतली जाणार आहे. त्यात पहिली ते बारावी, अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी भाषा, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे या विषयावर शिक्षकांना ॲनिमेशन, ऑग्मेंटेड रिॲलिटी, व्हर्च्युअल रिॲलिटी प्रकारातील चित्रफित, खेळावर आधारित चित्रफित, ई चाचणीवर आधारित चित्रफित, दिव्यांगत्व प्रकारानुसार शिक्षणासाठी चित्रफित तयार करता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. चित्रफितींची निवड करण्यासाठी तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर समिती नियुक्त करण्यात आली आहे.
  • ई साहित्यातील चित्रफिती तयार करण्याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत. तयार केलेले ई साहित्य गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याचा दुवा स्पर्धेसाठीच्या प्रणालीवर द्यावा लागेल. चित्रफीत केवळ अध्ययन अध्यापन प्रणालीशी निगडित असणे आवश्यक आहे. कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त नऊ मिनिटांची चित्रफीत असणे आवश्यक आहे. स्पष्टता, गरज, परिणाम, नावीन्यता, समन्वय, उपयोगिता, चित्रफीत दर्जा अशा निकषांवर ई साहित्याचे मूल्यमापन करण्यात येईल. कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन झाल्यास, साहित्यिक चोरी केल्याचे आढळल्यास, हिंसा, लैंगिक प्रदर्शन, असभ्य भाषा, अंमली पदार्थाचा वापर केल्यास, वांशिक, धार्मिक, सांस्कृतिक, लिंग पूर्वग्रहाचे समर्थन केल्यास, तांत्रिक त्रुटी असल्यास चित्रफीत स्पर्धेतून नाकारली जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
‘मन की बात’ न ऐकल्याने ३६ विद्यार्थिनींवर कारवाई, चंडीगडमधील वसतीगृहाबाहेर जाण्यास आठवडाभर मनाई
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’चा १०० वा भाग ऐकण्यासाठी उपस्थित न राहणाऱ्या चंडीगड येथील ‘पीजीआयएमईआर’च्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ नर्सिग एज्युकेशनच्या (नाइन) ३६ विद्यार्थीनींना एका आठवडय़ासाठी वसतिगृहातून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली.
  • रुग्णालय प्रशासनाने प्रथम आणि तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांना ३० एप्रिल रोजी ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकणे अनिवार्य केले होते. मात्र, ‘नाइन’मधील ३६ विद्यार्थिनी यामध्ये सहभागी झाल्या नव्हत्या. यानंतर, महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी ३ मे रोजी एक आदेश प्रसृत केला. यानुसार तृतीय वर्षांतील २८ आणि पहिल्या वर्षांतील आठ विद्यार्थीनींना आठवडाभर वसतिगृहातून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली.
  •  
  • पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेने (पीजीआयएमईआर) गुरुवारी रात्री ‘मन की बात’ कार्यक्रमात सहभागी न होणाऱ्या विद्यार्थीनींवरील कारवाई बाबत सांगितले की, महाविद्यालय अधिकाऱ्यांची ही प्रतिक्रिया ‘अति’ होती. त्यामुळे ‘पीजीआयएमईआर’ प्रशासनाने नाराजी व्यक्त केली आहे. ‘आम्ही नम्रपणे विनंती करतो की, या प्रकाराबाबत कोणताही वेगळा अर्थ काढू नये. तसेच जनहिताच्या दृष्टीने हा मुद्दा अधिक चिघळू नये यासाठी काळजी घ्यावी’ असेही ‘पीजीआयएमईआर’ने निवेदनात नमूद केले आहे.
सीबीएसईच्या इयत्ता १० वीच्या निकालही मुलींनीच मारली बाजी; असा पाहा ऑनलाईन निकाल
  • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १२ वीनंतर आता इयत्ता १० वीचा निकाल जाहीर केला आहे. या वर्षी सीबीएसई बोर्डाचे इयत्ता १० वीतील ९३.१२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.२५ टक्के तर मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.२७ टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींनी १.९८ टक्क्यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे सीबीएसईच्या इयत्ता १२ वीच्या निकालाप्रमाणे इयत्ता १० वीच्या निकालात यंदा मुलींनीच बाजी मारल्याचे दिसतेय. विद्यार्थी cbseresults.nic.in, cbse.nic.in आणि cbse.gov.in वरून आपला निकाल पाहू शकतील. विद्यार्थी रोल नंबर, शाळा क्रमांक आणि प्रवेशपत्र आयडी सबमिट करू आपला निकाल पाहू शकतात.
  • सीबीएसईने इयत्ता १२ वीचा निकाल आज जाहीर करताना २०२४ या वर्षातील परीक्षा सुरू होण्याची तारीखदेखील जाहीर केली आहे. सीबीएसई १५ फेब्रुवारी २०२४ मध्ये इयत्ता १० वी, १२ वीच्या परीक्षा घेण्यास सुरुवात करेल.
  • सीबीएसईने विद्यार्थ्यांमधील अनहेल्थी स्पर्धा कमी करण्यासाठी इयत्ता १२ वीप्रमाणे इयत्ता १० वीतीलही टॉपर्स आणि मेरीट लिस्ट जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय सीबीएसई आपल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी प्रथम, द्वितीय किंवा तृतीय मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची नावेही जाहीर करणार नाही. तसे सर्व विषयांमधील ज्या विषयांमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या केवळ ०.१ टक्के विद्यार्थ्यांनाच सीबीएसई इयत्ता १० ची मेरिट लिस्ट

सीबीएसईचा इयत्ता १० वीचा निकाल तपासण्यासाठी वेबसाइट्सची यादी
cbse.gov.in
results.cbse.nic.in
cbseresults.nic.in
digilocker.gov.in

उद्योजकांना ३० दिवसांत परवानगी; ‘मैत्री’ कायदा लवकरच, उदय सामंत यांची ग्वाही
  • उद्योगाशी संबंधित सर्व परवानग्या ३० दिवसांत देणे बंधनकारक करणारा ‘मैत्री’ कायदा लवकरच अमलात येईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी दिली. तसेच स्थानिक शेतकऱ्यांच्या फायद्याकरिता बारसूमधील जमीन संपादनाची नोटीस जारी झाल्यावर या परिसरातील जमीन खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
  • ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या ‘अ‍ॅडव्हाण्टेज रायगड’ या संवादसत्राचा समारोप करताना उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाशी संबंधित अनेक बाबींवर भाष्य केले. बारसूतील माती परीक्षणाचे काम पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी बोअर खोदण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनीच संमतिपत्रे दिली होती. यामुळे विरोध करणारे बहुधा बाहेरचे असावेत, अशी शंकाही सामंत यांनी व्यक्त केली.
  • बारसूमध्ये जमीन संपादनाची नोटीस (चॅप्टर ६) जारी झाल्यावर जमीन खरेदी- विक्रीवर बंदी घातली जाईल. कारण जमीन संपादनाची नोटीस जारी झाल्यावर बाहेरील गुंतवणूकदार किंवा व्यापारी कमी दरात जमिनी खरेदी करतात आणि शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला हडप करतात हे पूर्वी अनुभवास आले आहे.
  • हे टाळण्याकरिताच बारसू परिसरात जमीन संपादनाची नोटीस जारी झाल्यावर जमीन खरेदी-विक्रीचे सारे व्यवहार बंद केले जातील, असे सामंत यांनी जाहीर केले. तसेच प्रकल्प एकदा अधिसूचित झाल्यावर या परिसरातील जमिनींची ३ ते ५ वर्षे विक्री करण्यावर बंदी घालण्याची योजना असल्याचेही सामंत यांनी सांगितले.  जमिनी खरेदीवर बंदी घालण्याचा निर्णय हा स्थानिक शेतकऱ्यांच्या हिताकरिता घेण्यात येणार आहे. शिंदे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

राजीव कुमार नवे मुख्य निवडणूक आयुक्त :
  • राजीव कुमार यांची गुरुवारी देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.  सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र हे १४ मे रोजी निवृत्त झाल्यानंतर, १५ मे रोजी राजीव कुमार हे पदभार स्वीकारतील.

  •  सुशील चंद्र हे निवृत्त झाल्यानंतर निवडणूक आयोगात एक जागा रिक्त होईल. १९६० मध्ये जन्मलेले कुमार हे फेब्रुवारी २०२५च्या मध्यात निवृत्त होतील. राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांशिवाय, २०२४ ची लोकसभा निवडणूक आणि अनेक विधानसभांच्या निवडणुका कुमार यांच्या देखरेखीखाली होणार आहेत.

  • निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली, त्यावेळी राजीव कुमार हे सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाचे (पीईएसबी) अध्यक्ष होते. तत्कालीन निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्या राजीनाम्यामुळे आयोगातील एक जागा रिक्त झाल्यानंतर १ सप्टेंबर २०२० रोजी त्यांनी निवडणूक आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला. १९८४ च्या तुकडीचे बिहार- झारखंड कॅडरमधील आयएएस अधिकारी असलेले कुमार हे फेब्रुवारी २०२० मध्ये सेवेतून निवृत्त झाले होते.

‘जी-७’ची परराष्ट्रमंत्रीस्तरीय परिषद जर्मनी येथे सुरू :
  • उत्तर जर्मनीत आज, गुरुवारपासून (दि. १२) जी-७ राष्ट्रांची परराष्ट्रमंत्री स्तरीय परिषद सुरू झाली आहे. ती १४ मेपर्यंत चालणार आहे. युक्रेनमधील युद्ध, ऊर्जा, अन्नसुरक्षा, चीनशी संबंध आणि पर्यावरण बदल या मुद्दय़ांवर या तीन दिवसीय परिषदेत विचारविनिमय होणार आहे. 

  • युक्रेनचे परराष्ट्रमंत्री आणि रशियाचे आगामी लक्ष्य असल्याची भीती असलेल्या मोल्दोव्हा या देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांना या परिषदेस अभ्यागत म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. २० राष्ट्रांच्या समूहाचे (जी-२०) यंदा अध्यक्षपद भूषवत असलेल्या इंडोनेशियाचे परराष्ट्रमंत्रीही या परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. युक्रेन युद्धाचे जागतिक परिणाम या विषयावरील चर्चेत ते सहभागी होणार आहेत.

  • ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, इटली, जपान व अमेरिकेच्या परराष्ट्र उपमंत्री व्हिक्टरी नुलांद यात सहभागी होतील. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी िब्लकेन सध्या कोविड संसर्गातून बरे होत आहेत. पुढील आठवडय़ात ते नाटो राष्ट्रांच्या परराष्ट्रमंत्री बैठकीत सहभागी होणार आहेत. ही परिषद इशान्य हॅम्बुर्ग येथील वियानहॉस सागरी रिसॉर्टमध्ये होणार असून, यजमान जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री अ‍ॅनालेना बेरबॉक यात सहभागी होणार आहेत. युक्रेनची राजधानी कीव्हचा नुकताच दौरा करून त्या परतल्या आहेत.

श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी विक्रमसिंघे :
  • श्रीलंकेतील अभूतपूर्व आर्थिक संकटाच्या मुद्दय़ावर सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांमुळे यापूर्वीचे पंतप्रधान महिंदू राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर, विरोधी पक्षनेते रानिल विक्रमसिंघे यांना गुरुवारी देशाचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ देण्यात आली.  युनायटेड नॅशनल पार्टीचे (यूएनपी) नेते असलेले ७३ वर्षांचे विक्रमसिंघे यांच्याशी बुधवारी बंदद्वार चर्चा केल्यानंतर अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी त्यांची या पदावर नेमणूक केली.

  •  यापूर्वी चार वेळा देशाचे पंतप्रधानपद म्हणून काम पाहिलेले विक्रमसिंघे यांना तत्कालीन अध्यक्ष मैत्रिपाल सिरिसेना यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये पदावरून हटवले होते. तथापि, त्यानंतर दोनच महिन्यांनी सिरिसेना यांना त्या पदावर पुनस्र्थापित केले.  विक्रमसिंघे यांना संसदेत बहुमत सिद्ध करण्यासाठी सत्ताधारी श्रीलंका पोदुजना पेरामुना (एसएलपीपी), समागी जना बलवेगया (एसजेबी) या मुख्य विरोधी पक्षाचा एक गट आणि इतर अनेक पक्षांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

  • २०२० साली झालेल्या संसदीय निवडणुकांमध्ये, देशातील सर्वात जुना पक्ष असलेला यूएनपी हा जिल्ह्यांतून एकही जागा मिळवण्यात अपयशी ठरला होता. यात पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कोलंबोतून निवडणूक लढलेल्या विक्रमसिंघे यांचाही समावेश होता. त्यानंतर, एकत्रित राष्ट्रीय मतदानाच्या आधारावर यूएनपीला जारी करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय यादी’च्या माध्यमातून त्यांनी संसदेत प्रवेश केला होता. त्यांचे कनिष्ठ सहकारी असलेले साजिथ प्रेमदासा यांनी फुटीर एसजेबीचे नेतृत्व करून नंतर ते प्रमुख विरोधी पक्ष बनले होते.

  •  दूरदर्शी धोरणांसह अर्थव्यवस्था हाताळू शकणारा नेता म्हणून विक्रमसिंघे यांना सर्वत्र मान्यता आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळवू शकणारा श्रीलंकेतील राजकीय नेता अशीही त्यांची प्रतिमा आहे. १९४८ मध्ये ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळवल्यापासून श्रीलंकेला आजवरच्या सर्वात भीषण आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

इटालियन चषक फुटबॉल - इंटर मिलानला जेतेपद :
  • अतिरिक्त वेळेत इव्हान पेरेसिचने केलेल्या दोल गोलच्या बळावर इंटर मिलानने अंतिम सामन्यात युव्हेंटसला ४-२ अशा फरकाने नमवत इटालियन चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद मिळवले.

  • या सामन्यात नियमित (९० मिनिटे) वेळेअंती दोन्ही संघांमध्ये २-२ अशी बरोबरी होती. त्यानंतर झालेल्या ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत इंटरच्या संघाने वर्चस्वपूर्ण खेळ केला. पेरिसिचने ९९व्या मिनिटाला पेनल्टीद्वारे गोल करत इंटरला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानेच मग १०२व्या मिनिटाला आणखी एका गोलची भर घातल्याने इंटरने सामना ४-२ असा जिंकला. त्यापूर्वी, सहाव्या मिनिटाला निकोलो बारेलाने गोल करत इंटरला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

  • दुसऱ्या सत्रात युव्हेंटसने आक्रमक खेळ केला. अ‍ॅलेक्स सँड्रो (५०वे मि.) आणि डूसान व्लाहोव्हिच (५२वे मि.) यांनी गोल करत युव्हेंटसला २-१ आघाडी मिळवून दिली. मात्र, ८०व्या मिनिटाला हकान चालोनोग्लूने गोल करत इंटरला २-२ अशी बरोबरी करून दिली. मग अतिरिक्त वेळेत इंटरने आपला खेळ उंचावत दोन गोलची नोंद केली आणि सामना जिंकला.

१३ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.