चालू घडामोडी आणि दिनविशेष - १३ जून २०२०

Date : 13 June, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
संरक्षणमंत्र्यांकडून सैन्याच्या तयारीचा आढावा :
  • पूर्व लडाखसह सिक्कीम, उत्तराखंड व अरुणाचल प्रदेशातील नियंत्रण रेषेलगतच्या इतर अनेक भागांतील सैन्यीच्या तयारीचा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी आढावा घेतला.

  • एका उच्चस्तरीय बैठकीत लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी संरक्षणमंत्र्यांना पूर्व लडाखमधील एकूण परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. सैन्यदल प्रमुख जनरल बिपिन रावत, नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया हेही या बैठकीला हजर होते.

  • पँगाँग त्सो, गलवान खोरे, डेमचोक आणि दौलत बेग ओल्डी या भागांत भारत आणि चीनचे लष्कर गेल्या पाच आठवडय़ांपासून एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. पूर्व लडाख इतर भागांमधील परिस्थितीचा ‘कणखरपणे’ सामना करावा, असे राजनाथ सिंह यांनी सैन्याच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना सांगितले असल्याचे कळते.

‘आरोग्य सेतू’ अ‍ॅप डाऊनलोड करणे अनिवार्य नाही :
  • विमानमार्गे किंवा रेल्वेने प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशाने ‘आरोग्य सेतू’ हे अ‍ॅप मोबाइलवर डाऊनलोड करणे अनिवार्य नसून त्याचा वापर ऐच्छिक आहे, असे केंद्र सरकारने कर्नाटक उच्च न्यायालयाला शुक्रवारी सांगितले.

  • आरोग्य सेतू हे काँटॅक्ट ट्रेसिंग अ‍ॅप डाऊनलोड न करताही एखादी व्यक्ती विमानाने किंवा रेल्वेने प्रवास करू शकते, असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एम. एन. नरगुंद यांनी न्यायालयाला सांगितले. मात्र, ते डाऊनलोड करणे उपयुक्त असल्याची पुस्ती त्यांनी जोडली.

  • सायबर कार्यकर्ते अनिवार आनंद यांनी केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सरकारने हे वक्तव्य केले. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी केलेल्या वक्तव्यानुसार, एखाद्या प्रवाशाला विमानाने प्रवास करायचा असेल आणि त्याने आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड केलेले नसेल, तरीही त्याला देण्यात आलेले स्व-घोषणापत्र सादर करून तो प्रवास करू शकतो. त्यामुळे विमानप्रवासाची अट म्हणून कुणाही नागरिकाला अ‍ॅप डाऊनलोड करणे किंवा ते केल्याचा पुरावा देणे बंधनकारक नाही, असे उच्च न्यायालयाने आदेशात नमूद केले.

विदेशी चलन राखीव गंगाजळी विक्रमी टप्प्यावर :
  • देशातील विदेशी चलन राखीव गंगाजळी प्रथमच ५०० अब्ज डॉलरपुढे पोहोचली आहे. ५ जून अखेर त्यात ८.२२ अब्ज डॉलरची भर पडल्याने विक्रमी टप्पा देशाला साध्य करता आला आहे.

  • रिझव्‍‌र्ह बँके च्या आकडेवारीनुसार, गेल्या सप्ताहाखेर भारताची विदेशी चलन राखीव रक्कम ५०१.७० अब्ज डॉलर झाली आहे. विदेशी चलन मालमत्तेतील वाढत्या ओघामुळे हे शक्य झाल्याचे मानले जाते.

  • यापूर्वीच्या, २९ मे रोजीअखेरच्या आठवडय़ात विदेशी चलन राखीव रक्कम ३.४४ अब्ज डॉलरने वाढून ४९३.४८ अब्ज डॉलर झाले होते. यामध्ये विदेशी चलन मालमत्तेचा वाटा ८.४२ अब्ज डॉलरने वाढत ४६३.६३ अब्ज डॉलर झाला.

  • गेल्या सप्ताहात मात्र सोन्याचे राखीव प्रमाण कमी होऊन ते ३२.३५ अब्ज डॉलर झाले. त्यात सप्ताहभरात ३२.९० कोटी डॉलरची घसरण झाली, अशी माहिती रिझव्‍‌र्ह बँके ने दिली. आंतरराट्रीय नाणेनिधीकडे देशाची राखीव गंगाजळी १२ कोटी डॉलरने वाढून ४.२८ अब्ज डॉलपर्यंत पोहोचली आहे.

आता वाईड बॉलवर मिळणार फ्री-हीट, जाणून घ्या क्रिकेटमधले नवीन नियम :
  • करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळवला गेलेला नाही. मात्र यामुळे होणारं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आयसीसीने क्रिकेटचा सराव सुरु करण्यासाठी काही दिवसांपूर्वी नियम आखून दिले होते.

  • यानंतर लॉकडाउन पश्चात क्रिकेटचे सामने सुरु करण्यासाठीही आयसीसीने काही नियमांमध्ये बदल केला आहे. ज्यात गोलंदाजांना चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर न करणं, स्थानिक पंच आणि सामनाधिकाऱ्यांना प्रथम प्राधान्य, बदली खेळाडू, DRS च्या संख्येत असे अनेक नियम आखून देण्यात आले आहेत.

  • याचसोबत ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात येत असलेल्या बिग बॅश लिग स्पर्धेच्या आयोजकांनीही नियमांमध्ये बदल केला आहे. हे नियम कोणत्याही क्रिकेटप्रेमींना आश्चर्यचकीत करणारे आहेत. यामधला सर्वात महत्वाचा बदल म्हणजे बिग बॅश लिगमध्ये आता वाईड बॉलवरही फ्री हीट दिली जाणार आहे. याआधी आयसीसीच्या नियमानुसार फक्त नो-बॉलवर फलंदाजाला फ्री-हीट मिळायची.

  • याव्यतिरीक्त पहिल्या १० षटकांत सर्वाधिक धावा करणाऱ्या संघाला बोनस गूण, परिस्थितीनुसार १० षटकानंतर पर्यायी खेळाडूला मैदानात उतरवणं असे काही नवीन नियम बिग बॅश लिगमध्ये लागू करण्यात येणार आहेत.

१३ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.