चालू घडामोडी आणि दिनविशेष - 13 फेब्रुवारी 2024

Date : 13 February, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आता महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेकडून क्रीडा पुरस्कार
  • राष्ट्रीय पातळीवर राज्याचा लौकिक उंचावणाऱ्या खेळाडू, संघटना आणि प्रशिक्षकांना प्रोत्साहन म्हणून या वर्षीपासून महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेकडून (एमओए) राज्य क्रीडा पुरस्कार दिले जाणार आहेत. याबाबतची घोषणा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने रविवारी केली.
  • महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या बोट क्लब येथे पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेममध्ये हा निर्णय घेण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार, क्रीडामंत्री संजय बनसोडे, क्रीडा आयुक्त राजेश देशमुख यांच्यासह राज्य ऑलिम्पिक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य बैठकीस उपस्थित होते.
  • बैठकीदरम्यान अजित पवार यांनी क्रीडाक्षेत्रात गेल्या वर्षभरात यशस्वी कामगिरी करणाऱ्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन केले. महाराष्ट्रात क्रीडा संस्कृती चांगल्या प्रकारने नांदत असून, ती आणखी कशी सशक्त होईल यासाठी राज्य शासन, क्रीडा आयुक्तालय आणि क्रीडा संघटना यांच्यात समन्वय राहून काम करण्याची सूचनाही पवार यांनी केली. महाराष्ट्र ऑलिम्पिक भवनाचा उपयोग कसा केला जावा, तेथे काय असावे याबाबतही पवार यांनी मार्गदर्शन केले. त्याच वेळी लक्ष्यवेध ही योजना योग्य पद्धतीने राबवली जाईल आणि यातून संघटना दूर राहणार नाहीत याची काळजी घेण्याचेही पवार यांनी सूचित केले.
  • बैठकीनंतर महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वर्षीपासून सर्वोत्कृष्ट जिल्हा संघटना, राज्य संघटना, सर्वोत्कृष्ट खेळाडू (पुरुष व महिला), क्रीडा मार्गदर्शक (पुरुष व महिला) असे पुरस्कार दिले जातील. यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेकडून प्रायोजक शोधला जाईल किंवा कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी यासाठी कसा वर्ग करता येईल यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.
कुठे आहे राज्यातले एकमेव गणेश पंचायतन जाणून घ्या….
  • माघी गणेशोत्सवानिमित्ताने अलिबागच्या ऐतिहासिक कुलाबा किल्ल्यातील गणेश मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच मोठी गर्दी झाली आहे. राज्यातील एकमेव गणेश पंचायतन म्हणून या गणेश मंदीराची ओळख आहे. अशीं मंदीर देशात फारशी आढळत नाही. या गणेश पंचायतनाची स्थापना कशी झाली जाणून घेऊया…
  • सागरी सिमांचे परकीय आक्रमणांपासून संरक्षण करता यावे यासाठी १६८० मध्ये कुलाबा किल्ल्याची उभारणी करण्यात आली. अलिबाग समुद्र किनाऱ्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर हा सागरी किल्ला असून ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता आजही भक्कम स्थितीत उभा आहे. मराठा आरमाराच्या जाज्वल्य इतिहासामुळे किल्ल्याचे महत्व आहेच, पण त्याच बरोबर येथील गणेश पंचायतन मंदीर हे देखील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

मंदिराचे बांधकाम

  • संपुर्ण काळ्या दगडात बांधण्यात आलेल्या या मंदिराची उभारणी थोरल्या राघोजी राजे आंग्रे यांनी केली होती. १७५९ मध्ये या मंदीराचे बांधकाम करण्यात आले. मंदिराच्या प्रवेश द्वारावर डाव्या बाजूला कार्तिकस्वामी तर उजव्या बाजूला गणेशाची प्रतिमा कोरली आहे. मंदीराचे सभागृह अष्टकोनी आहे. मंदीराच्या उजव्याबाजूला महादेवाचे आणि उजव्याबाजूला हनुमानाचेही मंदीर आहे.

गणेश पंचायतन

  • कुलाबा किल्ल्यात पोखरणीच्या पश्चिमेस गणेशाचे सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात चौथऱ्यावर मध्यभागी उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाची सुंदर मूर्ती आहे. पुढील बाजूस डावीकडे शंकर, उजवीकडे विष्णू, मागील बाजूस उजवीकडे सुर्य आणि डावीकडे देवीची मुर्ती आहे. पाच मुर्तींचा समूह या मंदीरात असल्याने या मंदिराला गणेश पंचायतन असे संबोधले जाते. अशा प्रकारे गणेश पंचायतन असलेले हे राज्यातील एकमेव गणेश मंदीर आहे. नेपाळ मध्ये अशी गणेश पंचायतन मंदिर आढळतात.
“रामायण, महाभारत काल्पनिक..”, हे शिकवलं गेल्याने आंदोलन! शाळेने केलं शिक्षिकेचं निलंबन, कुठे घडली घटना?
  • रामायण आणि महाभारत काल्पनिक आहे. हे शिकवणाऱ्या आणि मोदींबाबत अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या एका शिक्षिकेला निलंबित करण्यात आलं आहे. भाजपा आमदारांनी या शिक्षिकेवर आरोप केला की त्यांनी रामायण आणि महाभारत हे काल्पनिक असल्याचं विद्यार्थ्यांना शिकवलं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केली. तसंच शिक्षिकेने हे शिकवल्यानंतर त्याविरोधात दक्षिणपंथीय समूहाने आंदोलन केलं होतं. या सगळ्या प्रकारानंतर शाळेने शिक्षिकेला निलंबित केलं आहे.

कुठे घडली ही घटना?

  • बंगळुरु येथील सेंट गेरोसा इंग्लिश एचआर प्रायमरी शाळेत ही घटना घडली आहे. या शाळेतल्या शिक्षिकेविरोधात असाही आरोप आहे की २००२ च्या गोध्रा दंगलींचा उल्लेख करत आणि बिल्किस बानो प्रकरणाचा उल्लेख करत या शिक्षिकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अपमानजनक वक्तव्यं केली. या शिक्षिकेने लहान मुलांच्या मनात तिरस्काराची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही या शिक्षिकेविरोधात आंदोलन करत आहोत असं दक्षिण पंथीय समूहाने सांगितलं. तसंच आम्हाला आता भाजपाची साथ लाभली आहे असंही त्यांनी सांगितलं. त्यावेळी शिक्षिकेला निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. ज्यानंतर या शिक्षिकेचं निलंबन करण्यात आलं आहे.
  • या प्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाते आहे. शाळेने या शिक्षिकेने जे वक्तव्य केल्याचा आरोप केलाय त्यावरुन शिक्षिकेला निलंबित केलं आहे. शाळेने असंही म्हटलं आहे की सेंट गेरोसा शाळेच्या ६० वर्षांच्या इतिहासात अशी कोणतीही घटना घडलेली नाही. या घटनेमुळे मात्र एक प्रकारचा अविश्वास समाजात निर्माण झाला आहे. आम्ही पुन्हा एकदा नव्याने समाजात आमच्याबाबतचा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करु. तसंच सगळ्यांच्या भल्यासाठी आणखी चांगल्या पद्धतीने काम करु असं शाळेने म्हटलं आहे. टाइम्स नाऊने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
कतारने फाशीची शिक्षा सुनावलेल्या आठ माजी नौसैनिकांची सुटका, भारताच्या परराष्ट्र नीतीचं मोठं यश
  • भारताची कूटनीती यशस्वी ठरली असून कतारने ज्या आठ माजी नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावली होती त्यांची सुटका केली आहे. भारताच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे. या सगळ्यांवर हेरगिरीचा आरोप होता. कतारने शिक्षा सुनावल्यानंतर भारताने त्यांना आवाहन केलं, तसंच त्यांच्याविषयीची जी कागदपत्रं होती त्यांची पूर्तताही केली. त्यानंतर या सगळ्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरित करण्यात आली. मात्र आता ही बातमी येते आहे की या आठही माजी नौसैनिकांची सुटका करण्यात आली आहे. यापैकी सात जण मायदेशी परतले आहेत.
  • कतारमध्ये ज्या आठ भारतीय माजी नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती त्यांची कतारने सुटका केली. आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो. आठपैकी सातजण भारतात परतले आहेत. या नागरिकांची घरवापसी झाली याचा आम्हाला आनंद आहे अशी प्रतिक्रिया आता परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

भारतमाता की जय चे नारे

  • भारतात जेव्हा माजी नौसैनिक परतले तेव्हा दिल्ली विमानतळावर त्यांनी भारतमाता की जय या घोषणा दिल्या. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतार यांचेही या सगळ्यांनी आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमच्या प्रकरणात हस्तक्षेप केला नसता तर आम्ही सुटका कठीण होती असंही या सगळ्यांनी म्हटलं आहे.

 

क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धा: रेयाल माद्रिदला आठव्यांदा जेतेपद

  • विनिशियस ज्युनियर आणि फेडेरिको व्हॅल्व्हर्डे यांनी झळावलेल्या दोन गोलच्या जोरावर रेयाल माद्रिदने क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सौदी अरेबियाच्या अल हिलाल क्लबवर ५-३ असा विजय मिळवला आणि विक्रमी आठव्यांदा स्पर्धेचे जेतेपद मिळवले.
  • निर्णायक सामन्यात अपेक्षेनुसार माद्रिदने आक्रमक सुरुवात केली. विनिशियसने सामन्याच्या १३व्या मिनिटाला संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर काही मिनिटांतच फेडेरिकोने (१८व्या मि.) गोल करत संघाची आघाडी दुप्पट केली. अल हिलालकडून मोसा मारेगाने (२६व्या मि.) गोल झळकावत आघाडी २-१ अशी कमी केली. माद्रिदने मध्यांतरापर्यंत आपली आघाडी कायम राखली.
  • दुसऱ्या सत्रात माद्रिदने आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. तारांकित खेळाडू करिम बेन्झिमाने (५४ व्या मि.) प्रतिस्पर्धी संघाच्या बचावफळीला चकवत माद्रिदच्या खात्यात आणखी एका गोलची भर घातली. यानंतर फेडेरिकोने (५८व्या मि.) गोल करत संघाला ४-१ असे सुस्थितीत पोहोचवले.
  • अल हिलालकडून लूसियानो वीटोने (६३व्या मि.) गोल करत संघाच्या खात्यात दुसऱ्या गोलचा भरणा केला. यानंतर विनिशियसने (६९व्या मि.) संघाच्या खात्यात पाचव्या गोलची भर घातली. ७९व्या मिनिटाला वीटोने अल हिलालसाठी तिसरा गोल केला. यानंतर माद्रिदच्या बचावफळीने प्रतिस्पर्धी संघाला कोणतीच संधी दिली नाही.त्यापूर्वी, तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात ब्राझीलचा क्लब फ्लेमिंगोने इजिप्तचा क्लब अल आहलीवर ४-२ असा विजय मिळवला.

बिग बॉस हिंदीची ट्रॉफी कोण जिंकणार? टॉप २ सदस्यांची नावे समोर

  • छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ‘बिग बॉस’ हिंदीच्या १६ व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा आज रंगताना दिसत आहे. बिग बॉसच्या महाअंतिम फेरीत शिव ठाकरे, MC स्टेन, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोत हे स्पर्धक टॉप ५ मध्ये दाखल झाले होते. अखेर बिग बॉसच्या टॉप २ स्पर्धकांची घोषणा झाली. शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन हे दोघेही टॉप २ सदस्य ठरले आहेत.
  • आज (१२ फेब्रुवारी) संध्याकाळी ७ वाजल्यापासून बिग बॉस हिंदीच्या १६ व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने बिग बॉसचे सूत्रसंचालन केले. यंदा बिग बॉसच्या पर्वात सहभागी झालेले सर्व स्पर्धक या कार्यक्रमावेळी उपस्थित होते. यावेळी या स्पर्धकांनी टॉप ५ स्पर्धकांबरोबर विविध खेळ खेळले.
  • बिग बॉसच्या महाअंतिम फेरीत शिव ठाकरे, MC स्टेन, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोत हे स्पर्धक टॉप ५ मध्ये दाखल झाले होते. यातील एका टास्कदरम्यान शालीन भानोत हा घराबाहेर पडला. यानंतर अर्चना गौतम हिचा बिग बॉसचा प्रवास संपला.
  • यानंतर सलमान खानने बिग बॉसच्या टॉप २ सदस्यांची घोषणा केली. यावेळी सलमान खानने शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन हे दोघं टॉप २ सदस्य ठरल्याची घोषणा केली. तर प्रियांका चौधरी हिचा बिग बॉसचा प्रवास संपल्याचे सांगितले. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.

बांगलादेशच्या अध्यक्षपदासाठी चुप्पू यांचे नाव निश्चित

  • बांगलादेशच्या संसदेत संपूर्ण बहुमत असलेल्या सत्ताधारी अवामी लीगने माजी न्यायाधीश मोहम्मद शहाबुद्दीन चुप्पू यांना अध्यक्षपदासाठी नामनिर्देशित केल्यामुळे, ते देशाचे पुढील अध्यक्ष बनणार असल्याचे निश्चित झाले आहे.
  • अध्यक्ष मोहम्मद अब्दुल हमीद यांचा कार्यकाळ २४ एप्रिलला संपत असून, ७४ वर्षांचे चुप्पू हे त्यांची जागा घेतील. ३५० सदस्यांच्या सभागृहात अवामी लीगचे ३०५ सदस्य आहेत.
  • संसदेतील अधिकृत विरोधी पक्ष असलेल्या जातीय पार्टीने अध्यक्षपदासाठी कुणाच्याही नावाची शिफारस केलेली नाही.

न्या. सोनिया गोकाणी यांच्यासह चौघे मुख्य न्यायाधीशपदी

  • या महिनाअखेरीस निवृत्त होणार असलेल्या दोघांसह चार न्यायाधीशांची रविवारी उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.गुजरात उच्च न्यायालयाच्या सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश न्या. सोनिया गिरिधर गोकाणी यांना त्या न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्त करण्यात आले. शपथ घेतल्यानंतर त्या उच्च न्यायालयाच्या एकमेव महिला मुख्य न्यायाधीश असतील. देशात २५ उच्च न्यायालये आहेत. आणखी एक महिला न्यायाधीश, न्या. सबिना या सध्या हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहात आहेत.
  • तथापि, वयाची ६२ वर्षे पूर्ण झाल्यानंतर न्या. गोकाणी या २५ फेब्रुवारीला निवृत्त होणार आहेत. त्यांची नियुक्ती गुजरातच्या न्यायिक सेवेमधून झाली आहे.
  • ओडिशा उच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायाधीश न्या. जसवंत सिंग यांची त्रिपुरा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते २२ फेब्रुवारीला निवृत्त होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने २५ जानेवारीला त्यांच्या मुख्य न्यायाधीशपदी पदोन्नतीची शिफारस केली होती.
  • राजस्थान उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. संदीप मेहता यांची गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, गुवाहाटी उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. कोटिस्वर सिंह यांना जम्मू- काश्मीर व लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश करण्यात आले आहे. विधिमंत्री किरेन रिजिजू यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या.

सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांना आज शपथ : राजेश बिंदल व अरिवद कुमार या दोन न्यायाधीशांना सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड हे आज, सोमवारी पदाची शपथ देणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नत होण्यापूर्वी न्या. बिंदल हे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे, तर न्या. कुमार हे गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.

महिला प्रीमियर लीग लिलावात एक महिला असणार लिलावकर्ता! जाणून घ्या कोण आहे ‘ती’ महिला

  • महिला प्रीमियर लीग (WPL 2023) साठी खेळाडूंचा लिलाव सोमवारी (१३ फेब्रुवारी) मुंबईत होणार आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये दुपारी अडीच वाजता लिलाव सुरू होईल. यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलत बीसीसीआयने एका महिला लिलावकर्त्याची निवड केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने मुंबईच्या मलिका अडवाणीची या जबाबदारीसाठी निवड केली आहे.
  • बीसीसीआयच्या आयपीएल लिलावात तीन जणांनी लिलाव करणाऱ्यांची भूमिका बजावली आहे. लिलावात प्रथम रिचर्ड मॅडलीचा आवाज घुमला. त्यांच्यानंतर ह्यू अॅडम्स यांना ही जबाबदारी मिळाली. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये लिलावादरम्यान ते स्टेजवरून अचानक खाली कोसळले होते. त्यांच्या जागी चारू शर्माने लिलावाची प्रक्रिया सुरु ठेवली. त्यानंतर एडमंड्स शेवटी परत आले आणि दोघांनी लिलाव पार पडला.
  • कोण आहे मलिका अडवाणी?
  • मलिका अडवाणी ही मुंबईची रहिवासी आहे. ती मुंबईस्थित आर्ट कलेक्टर सल्लागार आणि आर्ट इंडिया कन्सल्टंट्स या फर्ममध्ये भागीदार म्हणून काम करते. बीसीसीआयने आयोजित केलेल्या लिलावाची ही पहिलीच वेळ असेल ज्याची जबाबदारी एक महिला सांभाळणार आहे.

 

लता मंगेशकर यांचे स्मारक जयप्रभा स्टुडिओत करण्यावरून कोल्हापुरातील वातावरण तापले :
  • कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओमध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक करण्याच्या मागणीला जोर चढला असताना, या स्टुडिओची खरेदी स्थानिक शिवसेना नेत्याच्या मुलांसह काही बड्या व्यापाऱ्यांनी केल्याने आता प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.

  • तर जयप्रभा स्टुडिओ वाचवण्याच्या मागणीसाठी उद्या (रविवार) पासून स्टुडिओच्या दारात अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्यावतीने बेमुदत उपोषण सुरू केले जाणार आहे. तसेच, कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीनेही स्टुडिओ ताब्यात घेऊन कोल्हापूरचे वैभव जतन करण्याची मागणीही केली आहे.

  • कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओची उभारणी चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांनी केली. पुढे हा स्टुडिओ लता मंगेशकर यांनी विकत घेतला होता. त्यातील काही जागेची विक्री अगोदरच झालेली आहे. तर उर्वरित जागेची विक्री दोन वर्षांपूर्वी करण्यात आली आहे.

  • खरेदीदारात शिवसेनेचे माजी आमदार आणि उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या दोन मुलांचा समावेश आहे. ही माहिती समजल्यानंतर कोल्हापुरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

महागाई नियंत्रणातच; केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांचा राज्यसभेत दावा :
  • काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘यूपीए’ सरकारच्या तुलनेत आमच्या सरकारला महागाई नियंत्रणात ठेवण्यात अधिक यश आले आहे, असा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना राज्यसभेत केला.

  • जागतिक आर्थिक संकटाच्या काळात म्हणजे २००८-०९ मध्ये महागाई अर्थात चलनवाढीचा दर ९.१ टक्के होता आणि आर्थिक घट २.२१ लाख कोटी झाली होती. २०२०-२१ मध्ये करोनाच्या अभूतपूर्व संकटात चलनवाढीचा दर ६.२ टक्के राहिला आणि आर्थिक घट ९.१७ लाख कोटी झाली, असे सीतारामन म्हणाल्या.

  • लोकांच्या हातात थेट पैसे का दिले नाही, असा आक्षेप घेतला गेला. पण, अन्य विकसित देशांनी घेतलेला हाच निर्णय त्यांना महागात पडला असून त्यांना मोठय़ा चलनवाढीच्या समस्येशी झगडावे लागत आहे. अमेरिकेत १९९२ पासून महागाई झाली नव्हती, युरोझोनमधील देशांनी गेल्या २५ वर्षांमध्ये, ब्रिटनने ३० वर्षांत चलनवाढ पाहिली नव्हती. या सर्व देशांना महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. ‘यूपीए’च्या काळात २२ महिने ९ टक्क्यांपेक्षा जास्त चलनवाढ होत राहिली.

  • यूपीए सरकारला महागाईची समस्या हाताळता आली नाही, अशी टीका सीतारामन यांनी केली. करोनाकाळात महसुली खर्चात वाढ केली नाही, कारण त्यातून फारसा वाढीव लाभ (मल्टिप्लायर इफेक्ट) मिळाला नसता, त्या तुलनेत भांडवली खर्चातून एका रुपयामागे वाढीव लाभ २.४५ रुपये आणि नंतर ३.१४ रुपये मिळणार होता. त्यामुळे यंदाही भांडवली खर्चासाठी तरतूद ५.५४ लाख कोटींवरून ७.५ लाख कोटींपर्यंत वाढण्यात आली आहे. त्यातून पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबवले जातील आणि रोजगारनिर्मितीही होईल, असे सीतारामन म्हणाल्या.

“ये जेलवाणी है!अब आप सुनेंगे…”; रेडिओ दिनापासून कैद्यांसाठी खुली होणार आवाजाची दुनिया :
  • रेडिओ हे माध्यम बऱ्याच काळापासून लोकप्रिय माध्यम राहिलं आहे. अनेकांच्या रेडिओसोबतच्या खास आठवणी आहेत. कोणाला रेडिओ म्हटलं की लहानपण आठवतं तर कोणाला पहिलं प्रेम. अशा या रेडिओची दारं आता तुरुंगातल्या कैद्यांसाठीही खुली होणार आहेत. आज जागतिक रेडिओ दिनापासून मध्य प्रदेशातल्या तुरुंगात रेडिओ स्टेशन सुरू करण्यात आलं आहे.

  • ‘संजू’ चित्रपटातून येरवडा तुरुंगामध्ये सुरू असलेलं रेडिओ केंद्र आणि त्यावर कैद्यांमार्फत, कैद्यांसाठी चालवलेले कार्यक्रम याबद्दल आपल्याला थोडीशी कल्पना आली असेलच. तशाच पद्धतीचं रेडिओ केंद्र आता मध्य प्रदेशातल्या इंदौरमधल्या मध्यवर्ती कारागृहात सुरू होणार आहे. FM 18.77 ट्यून केल्यानंतर जेलवाणी हे रेडिओ केंद्र ऐकू येणार आहे.

  • याबद्दल कारागृह निरीक्षक अलका सोनकर म्हणाल्या, “व्यवस्थापनाची अशी भूमिका आहे की कारागृह हे सुधारगृह असायला हवं. या रेडिओ केंद्राच्या माध्यमातून कैद्यांना बाहेरच्या जगात काय चालू आहे, याबद्दल माहिती मिळेल. हा एक असा मंच ठरेल, ज्याच्या माध्यमातून आम्ही कैद्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा प्रयत्न करू”.

लेखी कराराकडे चीनने दुर्लक्ष केल्यानेच सीमेवर पेच- जयशंकर :
  • सीमेवर सैन्य गोळा न करण्याबाबत झालेल्या लेखी करारांकडे चीनने दुर्लक्ष केल्यामुळेच प्रत्यक्ष ताबा रेषेवरील परिस्थिती उद्भवली असल्याचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी सांगितले. चीनच्या या कारवाया संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायासाठी ‘सयुक्तिक चिंतेचा’ विषय बनला असल्याचेही ते म्हणाले.

  • अमेरिकेचे अँटनी ब्लिंकन, जपानचे योशिमासा हायाशी व ऑस्ट्रेलियाचे मारिसे पेन या ‘क्वाड’ देशांच्या समपदस्थ परराष्ट्र मंत्र्यांसोबत जयशंकर यांनी शुक्रवारी चर्चा केली आणि हिंदू- पॅसिफिक क्षेत्र ‘बळजबरी’ पासून मुक्त ठेवण्यासाठी सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना पूर्व लडाख सीमेवरील तिढय़ाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर बोलत होते.

  •  ‘क्वाड’ परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेत भारत- चीन संबंधांबाबत चर्चा करण्यात आली, कारण आमच्या शेजारी काय घडामोडी सुरू आहेत याबाबत आम्ही एकमेकांना माहिती देण्याचा तो भाग होता, असे जयशंकर संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले.

  • सीमेवर सैन्याची जमवाजमव करू नये या भारतासोबत २०२० साली केलेल्या लेखी कराराकडे चीनने दुर्लक्ष केल्यामुळेच प्रत्यक्ष ताबा रेषेवरील परिस्थिती उद्भवली असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. एखादा मोठा देश अशा प्रकारे लेखी वचनबद्धतेकडे दुर्लक्ष करतो तेव्हा तो संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायासाठी सयुक्तिक काळजीचा मुद्दा असतो असे आपल्याला वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले.

युक्रेन सोडा, अमेरिकेचा नागरिकांना सल्ला; रशिया आक्रमणाच्या तयारीत :
  • रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करू शकतो अशी भीती जगभरामध्ये आहे. युद्ध थांबवण्यासाठी चार देशांदरम्यान सुरू असलेली चर्चाही निष्फळ ठरली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार रशिया बीजिंग ऑलिम्पिक संपण्याची वाट बघणार नाही. युक्रेनच्या सीमेवर रशियन सैन्याचा मोठा जमाव वाढत आहे आणि युद्ध टाळण्याच्या चर्चेत फारशी प्रगती झालेली नाही. या सर्व परिस्थितीमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या नागरिकांना युक्रेन सोडण्यास सांगितले आहे.

  • जो बायडेन यांनी एनबीसी न्यूजला सांगितले की, “अमेरिकेच्या नागरिकांनी तेथून ताबडतोब बाहेर पडावे. आम्ही जगातील सर्वात मोठ्या सैन्यासोबत गुंतत आहोत. ही पूर्णपणे वेगळ्या प्रकारची परिस्थिती आहे जी लवकरच नियंत्रणाबाहेर जाऊ शकते.”

  • दुसरीकडे, मेलबर्नमध्ये, परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन आशिया पॅसिफिकच्या मित्र राष्ट्रांच्या प्रतिनिधींना भेटत आहेत. संपूर्ण घडामोडीवरून असे दिसून येत आहे की रशियाचे राष्ट्राध्यक्ष युरोपमध्ये युद्ध करण्यापासून काही दिवसांऐवजी काही तास दूर आहेत.

  • “आम्ही अशा टप्प्यात आहोत जिथे हल्ला कधीही सुरू होऊ शकतो आणि बीजिंग ऑलिम्पिक दरम्यान देखील हे होऊ शकते,” असे अँटनी ब्लिंकन म्हणाले. रशिया बीजिंग आम्ही ऑलिम्पिक संपण्याची वाट पाहत आहे या गोष्टीला ब्लिंकन यांनी स्पष्ट नकार दिला.

इशान किशन ठरला सर्वात महागडा खेळाडू; मुंबई इंडियन्सने पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूसाठी मोजले :
  • आयपीएलच्या १५ व्या पर्वासाठी मुंबई इंडियन्सने यंदाच्या पर्वातील सर्वात मोठी बोली लावत इशान किशनला विकत घेतलं आहे. आजपासून सुरु झालेल्या दोन दिवसीय लिलावामध्ये इशानला मुंबईने १५.२५ कोटींची बोली लावत संघात घेतलंय.

  • मागील पर्वामध्येही इशान मुंबईच्या संघातच होता. मात्र संघाने त्याला रिटेन केलं नव्हतं. इशानची बेस प्राइज दोन कोटी रुपये इतकी होती. म्हणजेच त्याला बेस प्राइजपेक्षा सात पट अधिक रक्कम देत विकत घेण्यात आलंय. मुंबईबरोबरच इतरही अनेक संघांनी इशानसाठी मोठी बोली लावली होती. मात्र मुंबईने या शर्यतीमध्ये बाजी मारली.

  • रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच कोणत्याही लिलावात एखाद्या खेळाडूला १० कोटींहून अधिक किंमत देत विकत घेतलंय. इशान पहिल्यांदा मुंबईकडून खेळलेला तेव्हा त्याला ६.२ कोटी रुपये मिळाले होते. म्हणजेच त्याला यंदा ९ कोटी रुपये अधिक मिळालेत.

१३ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.