चालू घडामोडी आणि दिनविशेष - १३ एप्रिल २०२०

Date : 13 April, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारताचा आर्थिक विकास दर करोनामुळे घटणार : 
  • करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीमुळे भारताची आर्थिक विकास कामगिरी खूप वाईट होणार आहे, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. भारताची अर्थव्यवस्था आता २०२०-२१ मध्ये १.५ टक्के ते २.८ टक्के विकास दर राखू शकेल.

  • जागतिक बँकेच्या दक्षिण आशियाविषयक  आर्थिक अहवालात म्हटले आहे की, २०१९-२० मध्ये भारताचा आर्थिक विकास दर हा ३१ मार्चअखेर ४.८ ते ५ टक्के राहील पण नंतर करोना प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे तो कमी होणार आहे. आर्थिक क्षेत्रातील कमकुवत कामगिरीने आधीच आर्थिक विकास दर खालावलेला असताना आता भारताला करोनाचा फटका बसला आहे.

  • आर्थिक वर्ष २१ मध्ये देशांतर्गत पुरवठा व मागणी या दोन्हीवर परिणाम झाला असून त्यामुळे आर्थिक विकासाला फटका बसणार आहे. जागतिक पातळीवर करोनाचा प्रसार असल्याने देशांतर्गत गुंतवणूकही कमी होणार आहे. २०२१-२२ मध्ये विकास दर पुन्हा पाच टक्के होऊ शकतो पण त्यातही आर्थिक शिस्त व पत धोरणात बदल करावे लागणार आहेत.

करोना संकटाचा इशारा मिळूनही डोनाल्ड ट्रम्प यांचे दुर्लक्ष :
  • न्यूयॉर्क : गुप्तवार्ता आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोना महासाथीच्या संभाव्य संकटाबद्दल इशारा दिला होता, मात्र त्यांनी सतत या विषाणूचे गांभीर्य कमी लेखले. त्यांनी याबाबतच्या संदेशांवर नियंत्रण ठेवण्यावर, तसेच आर्थिक आघाडीवर झालेला फायदा संरक्षित करण्यावर लक्ष केंद्रित केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संबंधात दिलेले इशारे त्यांनी धुडकावून लावले, असे एका आघाडीच्या वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या सविस्तर शोधवृत्तांतात म्हटले आहे.

  • येऊ घातलेली महासाथ आणि तिचे परिणाम याबाबत गुप्तवार्ता विभाग, राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा आणि सरकारी आरोग्य विभाग यांच्या अधिकाऱ्यांनी इशारे दिले होते, मात्र ट्रम्प यांनी ते कमी लेखले, असे ‘दि न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तांतात नमूद केले आहे.

  • ‘पडताळणी केली असता असे आढळले की अध्यक्षांना महासाथीच्या संकटाबद्दल इशारा देण्यात आला होता, मात्र अंतर्गत मतभेद, नियोजनाचा अभाव आणि स्वत:च्या अंत:प्रेरणेवरील ट्रम्प यांचा विश्वास यामुळे त्यांनी याला प्रतिसाद दिला नाही’, असे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे.

भारताने मार्ग दाखवलाय - जागतिक बँक :
  • केंद्र आणि राज्य पातळीवर साऱ्या यंत्रणा करोनाशी झुंजत असल्या तरी देशात विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशभरात ९०९ नवे रुग्ण आढळले असून ३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

  • राज्यातील रुग्णांची संख्या १,९८२ इतकी झाली असून २४ तासांत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील १६ जण मुंबईतील आहेत.

  • देशातील एकूण रुग्णांची संख्या ८४४७ झाली असून एकूण मृत रुग्णांची संख्या २७४ झाली आहे. ७६४ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी दिली. गेल्या पाच दिवसांमध्ये सरासरी १५,४४७ नमुना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ५८४ नमुने बाधित होते.

डॉक्टर्स, नर्सेसच्या कार्याला गुगलचा सलाम, बनवले हे खास डूडल :
  • सध्या करोनाचा सामना सगळं जग करतं आहे. आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्सेस आणि इतर सगळ्या कर्मचाऱ्यांचं योगदान अनन्यसाधारण आहे. दिवस-रात्र एक करुन आपला जीव धोक्यात घालून डॉक्टर, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी करोनाच्या संकट अधिक पसरू नये यासाठी काम करताना दिसत आहे. अनेक देशांमध्ये तर रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना करोना झाल्याची उदाहरणेही आहेत.

  • असं असतानाही डॉक्टर आणि नर्सेस त्यांचे कर्तव्य पार पडताना दिसत आहेत. डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्चमाऱ्यांच्या याच निस्वार्थ वृत्तीला गुगलने डूडलच्या माध्यमातून अनोखा सलाम केला आहे. करोनाविरुद्ध दोन हात करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेससाठी गुगलने खास ‘थँक यू’ म्हणणारे डूडल बनवले आहे.

  • गुगलच्या या खास डूडलवर कर्सर नेल्यावर “To all doctors, nurses and medical workers; thank you” हा मेसेज झळकतो. या डूडलमध्ये वरच्या बाजूला एक हार्ट म्हणजेच हृदयाचा इमोन्जीही दिसत आहे. या संकटाशी दोन हात करणाऱ्यांबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी हा इमोन्जी वापरण्यात आला आहे.

१३ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.