चालू घडामोडी आणि दिनविशेष - १२ नोव्हेंबर २०२०

Date : 12 November, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारत-चीन यांच्यातील सीमा तिढा सुटण्याची चिन्हे :
  • भारत व चीन यांच्यात पूर्व लडाखच्या सीमेवर गेल्या सहा महिन्यांपासूनच्या तणावाचा तिढा सुटण्याच्या बेतात असल्याची चिन्हे आहेत. सर्व संघर्षस्थळांवरून ठरावीक मुदतीत सैन्यमाघारी आणि शस्त्रे परत घेण्यासाठी तीन टप्प्यांमधील प्रक्रियेबाबत दोन्ही बाजूंची सर्वसाधारण सहमती झाली आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी बुधवारी दिली.

  • या प्रस्तावातील ठळक बाबींमध्ये, करार झाल्यापासून एक दिवसाच्या आत सैनिकांची वाहतूक करणारी वाहने हटवणे, पँगाँग तळ्याच्या उत्तर व दक्षिण किनाऱ्यांवरील ठरावीक भागांतून फौजा माघारी घेणे, तसेच दोन्ही बाजूंच्या सैन्यमाघारीची पडताळणी करणे यांचा समावेश आहे.

  • सैन्याची माघार आणि एप्रिलमध्ये होती तशी ‘जैसे थे’ परिस्थिती पुन्हा बहाल करणे याबाबतच्या प्रस्तावाला ६ नोव्हेंबरला भारतीय व चिनी सैन्यात चुशुल येथे झालेल्या उच्चस्तरीय लष्करी चर्चेच्या आठव्या फेरीत अंतिम रूप देण्यात आले.

  • दोन्ही बाजूंनी जे प्रस्ताव मान्य केले आहेत, त्याबाबत कॉर्प्स कमांडर्सच्या पुढील चर्चेत करारावर स्वाक्षरी करण्याची भारतीय लष्कर आणि चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी यांची तयारी असल्याचेही सूत्रांनी सांगितले. लष्करी चर्चेची नववी फेरी येत्या काही दिवसांतच होण्याची शक्यता आहे.

वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण झाले पाहिजे :
  • न्यायदान करणारी घटनात्मक संस्था म्हणून आपण (न्यायालय) कायद्याची अंमलबजावणी केली नाही, नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण केले नाही तर कोण करणार, अशी परखड टिप्पणी सर्वोच्च न्यायालयातील न्या. धनंजय चंद्रचूड यांनी बुधवारी सुनावणीदरम्यान केली. राज्य सरकारांनी व्यक्तींना लक्ष्य केले तर त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालये अस्तित्वात आहेत, हे राज्य सरकारांनी लक्षात घ्यावे, अशीही टिप्पणी न्यायालयाने केली.

  • रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना हंगामी जामीन मंजूर करताना, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयावर गोस्वामी यांना जामीन न दिल्याबद्दल ताशेरे ओढले. न्या. चंद्रचूड व न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठाने सकाळी ११ ते दुपारी साडेचार अशी साडेपाच तास सलग सुनावणी घेतली.

  • आपली लोकशाही अत्यंत सक्षम आहे. वृत्तवाहिन्यांवरून झालेल्या टिप्पणीकडे सरकारांनी दुर्लक्ष केले पाहिजे. या मुद्दय़ांवर निवडणूक लढवल्या जात नाहीत. अशा टीका-टिपणीचा निवडणुकीवर खरेच काही फरक पडतो असे तुम्हाला (राज्य सरकार) वाटते का, असा प्रश्नही न्यायालयाने केला.

जाणून घ्या कोण आहेत न्यायमूर्ती चंद्रचूड :
  • वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अंतरिम जामिनाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे.

  • अर्णब गोस्वामी यांची जामीन याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर काही तासातच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली असून त्यावर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड व न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या सुटीतील न्यायपीठापुढे सुनावणी सुरु आहे. या युक्तीवादामध्ये महाराष्ट्र सरकारची बाजू ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल मांडत असून अर्णब यांची बाजू ज्येष्ठ वकील हरिश साळवे मांडत आहेत. दोन्ही बाजूकडून युक्तीवाद सुरु असतानाच सोशल नेटवर्किंगवर न्या. चंद्रचूड यांच्या नावाची चांगलीच चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात न्या. चंद्रचूड यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी…

  • सदा हसतमुख, कायद्यासह अनेक विषयांचा सखोल अभ्यास व साधेपणा जपलेले व्यक्तिमत्व अशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी २०१६ साली नियुक्ती झालेल्या डॉ. धनंजय चंद्रचूड यांची ओळख सांगता येईल. वडील यशवंतराव उर्फ वाय. व्ही. चंद्रचूड हे भारताचे सरन्यायाधीश होते. दुसऱ्या पिढीचीही सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती होण्याचे उदाहरण न्यायव्यवस्थेच्या इतिहासात  दुर्मिळ आहे.

जिल्ह्य़ात तलाठय़ांची ७३ पदे रिक्त :
  • पालघर : जिल्ह्य़ातील १८४ तलाठी पदांपैकी ७३ पदे रिक्त असल्याने अनेक तलाठय़ांना तीन ते चार अतिरिक्त सज्जांचा कार्यभार सांभाळावा लागत आहे. तलाठी संवर्गाच्या भरतीविरोधात न्यायालयात याचिका दाखल असून महाराष्ट्र राज्य तलाठी संघाची पालघर जिल्हा शाखा या याचिकेत प्रतिवादी म्हणून दाखल होण्याच्या तयारी करीत आहे.

  • राज्य शासनाने १ ऑगस्ट २०१४ रोजी राज्यातील ३६ वा जिल्हा म्हणून पालघर जिल्ह्य़ाची निर्मिती केली. या जिल्ह्य़ात एकूण जुने १८३ सजे व पुनर्वसन विभागातील एक अशी १८४ पदे आहेत. जिल्हानिर्मिती झाल्यानंतर २०१५ मध्ये तलाठी भरतीसंदर्भात जाहिरात काढून रिक्त असलेल्या २९ पदांपैकी पंचवीस पदांपर्यंत करिता परीक्षा घेण्यात येऊन निकाल जाहीर करण्यात आला होता.

  • राज्यपालांनी पेसा अधिसूचनेनुसार तलाठी, ग्रामसेवक इत्यादी संवर्गातील आदिवासी उमेदवारांसाठी पदे राखीव ठेवली होती. त्यानुसार तलाठी १२ पदे स्थानिक आदिवासी उमेदवारांकडून भरणे निश्चित करण्याबाबत १५ फेब्रुवारी २०१५ रोजी शासन निर्णय झाला होता. या अधिसूचनेच्या विरोधात बिगरआदिवासी हक्क बचाव समिती यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून भरती प्रक्रियेला ३० सप्टेंबर २०१५ रोजी स्थगिती देण्यात आली. त्यामुळे सप्टेंबर २०१५ पासून आजवर जिल्ह्य़ातील तलाठी भरती झालेली नाही.

जेतेपदात गोलंदाजांचे योगदान :
  • मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) विक्रमी पाचव्यांदा विजेतेपद पटकावल्यानंतर  कर्णधार रोहित शर्माने संघातील प्रत्येक गोलंदाजाचे कौतुक केले आहे.

  • ‘‘आम्हाला पहिल्याच चेंडूवर मार्कस स्टॉइनिसला बाद करण्यात यश आले. त्यापाठोपाठही अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन या दोन महत्त्वपूर्ण फलंदाजांना आम्हाला बाद करता आले. सुरुवातीपासून दिल्लीच्या फलंदाजांवर अंकु श ठेवण्याच्या रणनीतीची गोलंदाजांनी यशस्वी अंमलबजावणी के ली. स्टॉइनिस आणि धवन या दिल्लीच्या अव्वल फलंदाजांना लवकर बाद करणे महत्त्वाचे होते. ट्रेंट बोल्टसारखा नवीन चेंडू हाताळणारा दर्जेदार गोलंदाज नेहमीच उपयोगी पडतो,’’ असे रोहितने म्हटले.

  • ‘‘बोल्टप्रमाणेच जसप्रीत बुमरा, जेम्स पॅटिन्सन, नॅथन कुल्टर-नाइल, राहुल चहर, कृणाल पंडय़ा या सर्वच गोलंदाजांनी मोलाचे योगदान दिले. कुल्टर-नाइलने मोक्याच्या क्षणी ऋषभ पंतला बाद केले. त्यामुळे दिल्लीच्या मोठी धावसंख्या करण्याच्या आशा संपुष्टात आल्या,’’ असे अंतिम फेरीत ५१ चेंडूंत ६८ धावांचे योगदान देणाऱ्या रोहितने सांगितले.

  • फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनला सामोरे जाण्याविषयी रोहित म्हणाला की, ‘‘अश्विनविरुद्ध खेळण्याचे वेगळे नियोजन केले नव्हते. मात्र अश्विन हा महत्त्वपूर्ण गोलंदाज आहे. त्यामुळे सुरुवातीपासून जर चांगले खेळलो तर त्याच्यावर दडपण ठेवण्यात यश येते. लक्ष्याचा पाठलाग करायचा असतो तेव्हा कितीही धावांचे आव्हान असले तरी चांगली सुरुवात करावी लागते. चांगली सुरुवात आम्हाला करता आली,’’ असे रोहितने सांगितले.

१२ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.