चालू घडामोडी आणि दिनविशेष - 12 ऑगस्ट 2023

Date : 12 August, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
शाहिद आफ्रिदीचा मोठा विक्रम मोडण्यास युजवेंद्र चहल सज्ज, वेस्ट इंडिजविरुद्ध करावा लागणार ‘हा’ पराक्रम
  • भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिकेतील चौथा सामना शनिवारी होणार आहे. भारतीय संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा सामना सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंडवर खेळला जाणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजचा संघ २-१ ने आघाडीवर आहे. आता टीम इंडिया मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. या सामन्यादरम्यान भारतीय फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडू शकतो. युजवेंद्र चहल १०० टी-२० आंतरराष्ट्रीय विकेट्स पूर्ण करण्याच्या जवळ आहे.
  • युजवेंद्र चहल सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय विकेट्स घेण्याच्या बाबतीत सध्या ११व्या क्रमांकावर आहे. त्याने ७८ सामन्यात ९५ बळी घेतले आहेत. चहलला १०० बळी पूर्ण करण्यासाठी ५ बळींची गरज आहे. सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत तो आफ्रिदीला मागे सोडू शकतो. आफ्रिदीने ९९ सामन्यात ९८ विकेट घेतल्या आहेत. त्याने चार विकेट घेतल्यास आफ्रिदी मागे टाकण्यात यशस्वी होईल.
  • टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम सध्या शाकिब अल हसनच्या नावावर आहे. त्याने ११७ सामन्यात १४० विकेट्स घेतल्या आहेत. टीम साऊदी दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा गोलंदाज सौदीने १०७ सामन्यात १३४ विकेट घेतल्या आहेत. राशिद खान तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ८२ सामन्यात १३० विकेट्स घेतल्या आहेत. भारतीय फिरकीपटू चहलबद्दल बोलायचे, तर तो सध्या ११व्या क्रमांकावर आहे. तो सर्वाधिक टी-२० विकेट घेणारा भारतीय गोलंदाज आहे. भुवनेश्वर कुमारने ८७ सामन्यात ९० विकेट्स घेतल्या आहेत. भारतीय गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
तुळजाभवानी एक्सप्रेस अडीच वर्षांत धावणार; सांजा, वडगाव, तुळजापूरला नवे रेल्वेस्थानक, पंतप्रधान मोदींनी दिलेला शब्द पाळला - आमदार पाटील
  • सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्गाचे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले स्वप्न अखेर सत्यात उतरणार आहे. पहिल्या टप्प्यात धाराशिव-तुळजापूर या ३० किलोमीटर ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी ५४४ कोटी रुपयांच्या कामाची निविदा प्रकाशित करण्यात आली आहे. ३० महिन्यांच्या आत हा रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. या मार्गावर सांजा, वडगाव आणि तुळजापूर, असे तीन नवीन रेल्वेस्थानक उभारले जाणार आहेत. २०१९ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रेल्वेमार्गाला मंजुरी दिली होती. दिलेला शब्द खरा करून दाखवत तुळजाभवानी देवीच्या चरणी पंतप्रधान मोदी यांनी सेवा रूजू केली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
  • सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या एकूण ८४ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. त्यात धाराशिव जिल्ह्यातील कामाचे दोन स्वतंत्र टप्पे केले आहेत. या रेल्वेमार्गावर एकूण ११० पूल आणि तीन मोठे उड्डाणपूल असणार आहेत. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ३२ गावांतील एक हजार ३७५ एकर जमीन त्यासाठी भूसंपादीत करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
  • धाराशिव तालुक्यातील नऊ आणि तुळजापूर तालुक्यातील १५ गावांमधील ४९४.२६ हेक्टर जमिनीचे भूसंपादन सध्या अंतिम टप्प्यात असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. रेल्वेमार्ग निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी कामाचे टप्पे पाडण्यात आले आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील कामाची निविदा जाहीर करण्यात आली आहे. तिसर्‍या टप्प्यात बोगद्याच्या कामांना हाती घेण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
राज्यात विजेची मागणी पुन्हा वाढली
  • राज्यातील काही भागात पावसाने उसंत घेतल्याने तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे पंखे, वातानुकूलित यंत्रासह कृषीपंपाचा वापर वाढल्याने राज्यातील विजेची मागणी वाढून गुरुवारी (१० ऑगस्ट) दुपारी ४ वाजता २४ हजार ६२८ मेगावॅट नोंदवली गेली.
  • राज्याच्या बऱ्याच भागात मध्यंतरी चांगला पाऊस पडला. त्यामुळे विजेची मागणी २१ हजार ते २३ हजार मेगावॅट दरम्यान होती. परंतु, आता गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या बऱ्याच भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारी ४ वाजता राज्यात विजेची मागणी २४ हजार ६२८ मेगावॅटवर गेली असून त्यापैकी १६ हजार २८१ मेगावॅट विजेची निर्मिती राज्यात होत होती. सर्वाधिक ६ हजार ६९२ मेगावॅट वीजनिर्मिती महानिर्मितीकडून केली जात होती. त्यात औष्णिक विद्युत प्रकल्पातून ६ हजार १६६ मेगावॅट, जलविद्युत प्रकल्पातून ४८९ मेगावॅट, सौरऊर्जा प्रकल्पातून ३७ आणि इतर प्रकल्पातून वीजनिर्मिती होत होती, तर अदानीकडून २ हजार ९११ मेगावॅट, जिंदलकडून ३१५ मेगावॅट, आयडियलकडून २६१ मेगावॅट, रतन इंडियाकडून १ हजार ७० मेगावॅट वीजनिर्मिती होत होती.
  • केंद्र सरकारच्या वाट्यातून राज्याला ८ हजार ३१६ मेगावॅट वीज मिळत होती. यावेळी मुंबईतही ३ हजार २१९ मेगावॅट विजेची मागणी नोंदवली गेली. विजेची मागणी वाढल्याच्या वृत्ताला महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.
डॉ. आंबेडकरांच्या ३५० फूट उंचीच्या पुतळ्यास मान्यता
  • दादर येथील इंदू मिलच्या जागेवरील आंतरराष्ट्रीय स्मारकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फूट उंचीचा पुतळा उभारण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. विख्यात शिल्पकार राम सुतार यांनी त्यांच्या गाझियाबाद येथील शिल्पशाळेत डॉ. आंबेडकर यांच्या २५ फूट उंचीच्या पुतळय़ाची प्रतिकृती तयार केली आहे.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत १६ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवारातील सदस्य, लोकप्रतिनिधी तसेच आंबेडकरी चळवळीतील मान्यवर व्यक्ती यांना सोबत घेऊन गझियाबाद येथील शिल्पशाळेतील आंबेडकरांच्या पुतळय़ाची प्रतिकृती प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्याचे ठरले होते. त्यानुसार ६ एप्रिल रोजी प्रतिकृतीची पाहणी करून, त्यास संमती देण्यात आली.
  • राज्य शासनाने आता गझियाबाद शिल्पशाळेतील २५ फुटी प्रतिकृतीच्या धर्तीवर इंदू मिलच्या जागेवरील स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फूट उंचीचा पुतळा बसविण्यास मान्यता दिली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने गुरुवारी त्यासंबंधीचा शासन आदेश काढला आहे.

 

 जगदीप धनखड बनले देशाचे १४ वे उपराष्ट्रपती, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ :
  • पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड यांनी देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून आज शपथ घेतली. नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धनखड यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. दिल्लीतील राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह विविध पक्षातील नेते या शपथविधी सोहळ्यात उपस्थित होते.

  • शपथविधीआधी धनखड यांनी दिल्लीतील राजघाटावरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी आदरांजली वाहिली. “राजघाटावरील निर्मळ आणि शांत वातावरणात पूज्य बापुंचा आशिर्वाद घेतल्यानंतर धन्य वाटले” अशी भावना या भेटीनंतर धनखड यांनी व्यक्त केली. या भेटीचा व्हिडीओ त्यांनी ट्वीट केला आहे.

  • ७ ऑगस्टला पार पडलेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा प्रचंड मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत धनखड यांना ५२८ मते मिळाली होती. तर अल्वा यांना केवळ १८२ मतांवर समाधान मानावे लागले होते. धनखड यांना मिळालेल्या एकुण मतांची टक्केवारी ७३ एवढी होती.

  • उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संसदेतील ७८० सदस्य मतदानासाठी पात्र होते. त्यापैकी ७२५ सदस्यांनी मतदान केले. ५५ सदस्यांनी मतदान केले नाही. त्यापैकी ७१० मते पात्र ठरली, तर १५ मतांना अपात्र ठरवण्यात आले. विजयी होण्यासाठी पहिल्या क्रमांकाची ३५६ मतांची आवश्यकता होती. बहुमतापेक्षा १७२ मते जास्त मिळवत धनखड यांनी या निवडणुकीत विजय मिळवला.

सुपर चषक फुटबॉल : रेयाल माद्रिदला जेतेपद; अलाबा, बेन्झिमाच्या गोलमुळे एनट्रॅक फ्रँकफर्टवर मात :
  • डेव्हिड अलाबा आणि कर्णधार करीम बेन्झिमा यांनी केलेल्या गोलच्या बळावर स्पॅनिश संघ रेयाल माद्रिदने जर्मन संघ एनट्रॅक फ्रँकफर्टवर २-० अशी मात करत युएफा सुपर चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

  • बुधवारी मध्यरात्री फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे झालेल्या या सामन्यात गेल्या हंगामातील चॅम्पियन्स लीग विजेत्या माद्रिदने सुरुवातीपासून युरोपा लीग विजेत्या फ्रँकफर्टवर वर्चस्व गाजवले. ३७व्या मिनिटाला माद्रिदच्या व्हिनिसियसने मारलेला फटका फ्रँकफर्टचा गोलरक्षक केव्हिन ट्रॅपने अडवला. मात्र माद्रिदला कॉर्नर किक मिळाली. यावर बेन्झिमा आणि कॅसेमिरोच्या साहाय्याने अलाबाने गोल करत माद्रिदला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर बेन्झिमा आणि व्हिनिसियस यांनी पुन्हा गोलचे प्रयत्न केले. मात्र ट्रॅपला चेंडू गोलजाळय़ात जाण्यापासून रोखण्यात यश आले.

  • परंतु ६५व्या मिनिटाला व्हिनिसियसच्या पासवर बेन्झिमाने केलेल्या गोलमुळे माद्रिदला २-० अशी आघाडी मिळाली. बेन्झिमाचा हा माद्रिदसाठी ३२४वा गोल ठरला. त्यामुळे त्याने माजी कर्णधार आणि आघाडीपटू राउलला मागे टाकत माद्रिदसाठी सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. माद्रिदचे प्रतिनिधित्व करताना केवळ ख्रिस्टियानो रोनाल्डोने (४५०) बेन्झिमापेक्षा अधिक गोल केले आहे. माद्रिदने दोन गोलची आघाडी घेतल्यानंतर फ्रँकफर्टने आक्रमणाची गती वाढवली. मात्र त्यांना माद्रिदचा बचाव भेदण्यात अपयश आले.

  • परंतु ६५व्या मिनिटाला व्हिनिसियसच्या पासवर बेन्झिमाने केलेल्या गोलमुळे माद्रिदला २-० अशी आघाडी मिळाली. बेन्झिमाचा हा माद्रिदसाठी ३२४वा गोल ठरला. त्यामुळे त्याने माजी कर्णधार आणि आघाडीपटू राउलला मागे टाकत माद्रिदसाठी सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. माद्रिदचे प्रतिनिधित्व करताना केवळ ख्रिस्टियानो रोनाल्डोने (४५०) बेन्झिमापेक्षा अधिक गोल केले आहे. माद्रिदने दोन गोलची आघाडी घेतल्यानंतर फ्रँकफर्टने आक्रमणाची गती वाढवली. मात्र त्यांना माद्रिदचा बचाव भेदण्यात अपयश आले.

डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स : श्रीशंकरला सहावा क्रमांक :
  • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता लांब उडीपटू मुरली श्रीशंकरला पदार्पणीय डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्समध्ये सहावा क्रमांक मिळवत निराशा केली. ७.९४ मीटर ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

  • सहा दिवसांपूर्वी बर्मिगहॅम येथे ऐतिहासिक रौप्यपदक पटकावणाऱ्या श्रीशंकरकडून डायमंड लीग स्पर्धेत दिमाखदार कामगिरीची अपेक्षा केली जात होती. जोरदार वाऱ्यांचा पहिल्या फेरीतील खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम जाणवला. श्रीशंकरने राष्ट्रकुलमध्ये ८.०८ मीटर अशी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती. याचप्रमाणे चालू हंगामात ८.३६ मीटर अशी वैयक्तिक कामगिरीसुद्धा त्याच्या खात्यावर आहे. युजेन येथे गेल्या महिन्यात झालेल्या जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ७.९६ मीटर अशी सर्वोत्तम कामगिरी नोंदवत श्रीशंकरने सातवा क्रमांक मिळवला होता.

  • २३ वर्षीय श्रीशंकरने पहिल्या प्रयत्नात ७.६१ मीटर अंतरावर उडी घेतली. मग दुसऱ्या प्रयत्नात ७.८४ मीटर आणि तिसऱ्या तिसऱ्या प्रयत्नात ७.८३ मीटर उडी घेतली. पहिल्या प्रयत्नानंतर सहाव्या क्रमांकावरील श्रीशंकर तिसऱ्या प्रयत्नानंतर आठव्या स्थानावर फेकला गेला, तरी आव्हान शाबूत मात्र तो राखू शकला. त्यानंतर चौथ्या प्रयत्नात ७.६९ मीटर आणि पाचव्या प्रयत्नात ७.९४ मीटर अंतरापर्यंत त्याने मजल मारल्याने सहावे स्थान मिळवता आले.

‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेला सदोष ध्वजांचा अडथळा; जिल्हा यंत्रणांची नव्या झेंडय़ांसाठी पळापळ :
  • हर घर तिरंगा’ मोहिमेसाठी राज्यात बहुतांश जिल्ह्यांत वितरणासाठी आलेले लाखो राष्ट्रध्वज संहितेनुसार तयार झाले नसल्याचे लक्षात आल्याने हे झेंडे पुन्हा पाठविण्यात येणार आहेत. आता दोन ते तीन दिवसांत लाखो ध्वजांची जुळवणी कशी करायची हा प्रश्न जिल्हा यंत्रणांना पडला आहे.

  •  पुणे शहरात वितरण करण्यासाठी मागविण्यात आलेल्या पाच लाख झेंडय़ांपैकी चार लाख झेंडे निकृष्ट असल्याने ते परत पाठविण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली आहे. दरम्यान, येत्या दोन ते तीन दिवसांत नव्याने झेंडे उपलब्ध होतील, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. पुणे महापालिका पाच लाख झेंडय़ांची खरेदी करणार आहे. खरेदी केलेल्या झेंडय़ांचे नागरिकांना विनामूल्य वाटप केले जाणार आहे. त्यासाठी ८५ लाख रुपयांच्या खर्चालाही मान्यात देण्यात आली आहे.

  • सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेने मागणी केल्याप्रमाणे एक लाख ९७ हजार झेंडे उपलब्ध झाले. त्यापैकी सत्तर हजार झेंडे योग्य नसल्याने ते विभागीय आयुक्त कार्यालयाकडे परत पाठवले आहेत. सांगली शहरासाठी आलेल्या एकूण राष्ट्रध्वजांपैकी ५० टक्के ध्वज सदोष असल्याचे आढळून आल्याने महापालिकेने पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला परत केले. महापालिका क्षेत्रात वाटपासाठी एक लाख राष्ट्रध्वजाची मागणी एका ठेकेदाराला दिली आहे. यापैकी पुरवण्यात आलेल्या ४४ हजार ७०० ध्वजांपैकी २५ हजार ध्वज सदोष आढळल्याने नाकारण्यात आले आहेत.

  • कोल्हापुरातही लाखांहून अधिक ध्वज वापरण्यास अयोग्य आढळल्याने ते परत पाठवण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ९ लाख ३७ हजार राष्ट्रध्वजांची गरज आहे. यापैकी कोल्हापूर जिल्हा परिषदेस शासकीय यंत्रणेकडून पाच लाख ध्वज उपलब्ध झाले आहेत. विदर्भात एक लाखांवर झेंडय़ाचा दर्जा निम्न स्वरूपाचा आहे.

  • एकटय़ा नागपूर महापालिकेने ४३ हजार, अकोला महापालिकेने ३५ हजार तर अमरावती महापालिककेने १० हजारांवर झेंडे त्याचा दर्जा योग्य नसल्याने परत पाठवले. चंद्रपूर महापालिकेला दोनही टप्प्यात प्राप्त झालेले ८० टक्के झेंडय़ाचा दर्जा योग्य नसल्याने परत पाठवण्यात आले.

उत्तेजक सेवनात अ‍ॅथलेटिक्स, वेटलिफ्टिंगपटूंची संख्या अधिक :
  • खेळाडूंना उत्तेजक सेवनापासून रोखण्यासाठी केंद्र सरकारने एकीकडे उत्तेजक प्रतिबंध विधेयक आणले असताना देशातील क्रीडा क्षेत्र दिवसेंदिवस उत्तेजकाच्या विळख्यात अडकत चालले आहे. राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीने (नाडा) जाहीर केलेल्या ताज्या यादीत पॉवरलिफ्टिंग, वेटलिफ्टिंग आणि अ‍ॅथलेटिक्स खेळातील खेळाडूंमध्ये उत्तेजक घेण्याचे वाढते प्रमाण दिसून आले आहे. याचप्रमाणे त्याचे लोण आता कुमार खेळाडूंपर्यंत पोहोचू लागल्याचे समोर येत आहे.

  • ‘नाडा’ने प्रसिद्ध केलेल्या यादीत २००९पासून विविध खेळाडूंवर केलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली आहे. यातील अनेक खेळाडू आता कारवाईतून मुक्त झाले असले, तरी दोषी आढळण्याची संख्या काही कमी होत नाही. ‘नाडा’च्या यादीनुसार २०२० ते २०२२ जूनपर्यंतच्या यादीवर नजर टाकली असताना दोषी आढळलेल्या खेळाडूंचा आलेख वाढतच आहे. या सर्व खेळाडूंवर दोन ते चार वर्षे बंदी घातली आहे.

  • या यादीत अ‍ॅथलेटिक्समधील खेळाडूंची संख्या अधिक आहे. पॉवरलििफ्टग, वेटलििफ्टग, शरीरसौष्ठव  खेळातील खेळाडूंचेही प्रमाण अधिक आहे. गेली दोन वर्षे व २०२२ जुलैपर्यंत पॉवरलििफ्टगमध्ये २७, वेटलििफ्टगमध्ये ३० आणि अ‍ॅथलेटिक्समध्ये ५० खेळाडूंवर यासंदर्भात कारवाई करण्यात आली आहे. यातील बरेच खेळाडू ग्रामीण भागातून आलेले आणि कुमार गटातील आहेत, ही सर्वात धक्कादायक बाब आहे.

12 ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.