सध्या चीनसह जगभरात करोना व्हायरसने थैमान घातला असून सर्वसामान्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. ब्रिटनमध्येही करोना व्हायरसचा फैलाव झाला असून आरोग्यमंत्री नदीन डॉरिस यांनाही करोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
नदीन यांनी मंगळवारी यासंबंधी माहिती देताना सांगितलं की, “मला करोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. वैद्यकीय चाचणी केली असता नमुना सदोष आढळला. मी स्वत:ला घरात सर्वांपासून वेगळं ठेवलं आहे”. आरोग्य विभागाचे अधिकारी सध्या नदीन यांना कुठे आणि कशी करोनाची लागण झाली याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची घेतली होती भेट - करोनाशी लढण्यासाठी कायदेशीर तरतुदी तयार करण्यात मदत करणाऱ्या नदीन डॉरिस ब्रिटनच्या पहिल्या राजकीय नेत्या आहेत ज्यांना करोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांत त्यांनी ज्यांची भेट घेतली होती त्यांनाही करोनाची लागण झाली असल्याची भिती असल्याने सध्या चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांत हजारो लोकांच्या संपर्कात त्या आल्या होत्या. यामध्ये पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचाही समावेश होता.
राष्ट्रीय पक्षांना २००४-०५ ते २०१८-१९ या काळात अज्ञात स्रोतांकडून ११ हजार २३४ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या असून त्यात भाजपला २०१८-१९ या एकाच वर्षांत १६१२.०४ कोटींच्या देणग्या प्राप्त झाल्या आहेत. अन्य राष्ट्रीय पक्षांना याच वर्षांत अज्ञात स्रोतांकडून २५१२.९८ कोटी रुपये मिळाले आहेत.
भाजपला ६४ टक्के रक्कम प्राप्त झाल्याचे असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्मस या संस्थेने म्हटले आहे. इतर पाच राष्ट्रीय पक्षांनी अज्ञात स्रोतांकडून आलेले जे उत्पन्न जाहीर केले आहे ते ९००.९४ कोटी असून त्यापेक्षा भाजपला दीडपट रक्कम मिळाली आहे. काँग्रेसने अज्ञात स्रोतांकडून ७२८.८८ कोटी रुपये मिळाल्याचे जाहीर केले आहे.
राष्ट्रीय पक्षांच्या एकूण अज्ञात स्रोत उत्पन्नाच्या ते २९ टक्के आहे. या देणग्या कुणी दिल्या त्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. राष्ट्रीय पक्षांना २००४-०५ ते २०१८-१९ या काळात ११ हजार २३४ कोटी रुपये अज्ञात स्रोतांतून मिळाले आहेत. निवडणूक आयोगाला भाजप, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, माकप, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, भाकप यांनी जी माहिती दिली त्यातून हे आकडे समजले आहेत.
बसपने देणग्यांतून पैसे मिळाले नसल्याचे म्हटले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे कूपन विक्रीतील उत्पन्न २००४-०५ ते २०१८-१९ या काळात ३९०२.६३ कोटी रुपये होते.
कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर नाखूष असल्याने सिक्कीम सरकारने पाच दिवसांचा आठवडा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने पाच आठवड्याची सुविधा पूर्णपणे रद्द केली असून दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी आदेशानुसार, १ एप्रिलपासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.
गतवर्षी मे महिन्यात सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री प्रेमसिंह तमंग यांनी सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला होता. याआधी कर्मचाऱ्यांसाठी सहा दिवसांचा आठवडा होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांना पाच दिवसांच्या आठवड्याची सुविधा देऊनही त्यांची कामगिरी न सुधारल्याने सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा सरकार नाराज होतं.
सरकारने २८ मे २०१९ मधील आदेशात बदल केला आहे. मुख्य सचिव एस सी गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२० पासून नव्या निर्णयाची अमलबजावणी होणार आहे. राज्यातील सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कार्यालयांना दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी मिळणार आहे.
करोना विषाणूचा प्रसार मोठय़ा प्रमाणात झाल्याने पंतप्रधान गिसीपी काँटे यांनी सगळा देशच एकप्रकारे बंद केला आहे. महत्त्वाचे वगळता सर्व प्रवासांवर बंदी आणली आहे. आधी दिलेल्या इशाऱ्यांकडे लोकांनी योग्य लक्ष न दिल्याने आता सक्तीने बंदी लागू करण्याची वेळ आली आहे.
देशाच्या दोन तृतीयांश भागात काँटे यांनी असेच निर्बंध सोमवारी लागू केले होते. त्यानंतर इटलीतील ६ कोटी लोकांना घरात बसण्याचे आवाहन करण्यात आले होते. आरोग्य उपचार व अगदी आवश्यक कारणांसाठी प्रवास करण्यास परवानगी दिली होती. पण, त्यांचे पालन लोकांनी फार कसोशीने केले नाही. त्यामुळे मंगळवारी देशभरातच लोकांच्या हालचालींवर निर्बंध आणण्याचे आदेश काँटे यांनी दिले.
आपण सवयी बदलल्या पाहिजेत, आताच बदलल्या पाहिजेत, इटलीच्या हितासाठी ते गरजेचे आहे. आपले आजी आजोबा, आईवडील तसेच आप्तेष्ट यांच्यासाठी ते केले पाहिजे. कठोर निकषांचे पालन केले तरच मार्ग निघू शकेल, असे त्यांनी सांगितले. मंगळवारपासून देशात अनेक कठोर निर्बंध लागू केले असून ते ३ एप्रिलपर्यंत लागू राहणार आहेत. त्या निर्बंधानुसार सर्व शाळा, विद्यापीठे बंद ठेवण्यास मुदतवाढ देण्यात आली असून हॉटेल, पब आणि कॅफे सायंकाळी बंद ठेवण्यात येणार आहेत.
जगभरात करोना विषाणूने घेतलेल्या बळींची संख्या आता चार हजारावर गेली असून चीनमध्ये सोमवारी १७ बळी गेले. जगात १०० देशांत करोनाचा प्रसार झाला असून मृतांची संख्या ४०११ झाली आहे. एकूण १ लाख १० हजार लोकांना संसर्ग झाला आहे. दरम्यान कॅनडातील ब्रिटीश कोलंबियात एका वृद्धाश्रमात करोनाचा तेथील पहिला बळी गेला आहे. ओंटारियो व ब्रिटीश कोलंबियात एकूण ७० रूग्ण आहेत.
इराणमध्ये दिवसात ५४ बळी - तेहरान- इराणमध्ये करोनाने बळी गेलेल्यांची संख्या ५४ झाली आहे. त्यामुळे एकूण २९१ जण या संसर्गाने बळी पडले असून ८०४२ जणांना संसर्ग झाला आहे. आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते किनोश जहानपोर यांनी सांगितले की, कालच्या पेक्षा आज मृतांच्या संख्येत १८ टक्के वाढ झाली असून निश्चित रुग्णांची संख्याही १२ टक्के वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार करोना संसर्गाच्या आजारातून बरे होण्यास कमी लक्षणात दोन आठवडे व तीव्र लक्षणात सहा आठवडे लागतात.
मंगोलियात पहिला रुग्ण : उलानबटार- मंगोलियात करोनाचा पहिला रुग्ण सापडला असून त्यांनी सहा दिवस सीमा बंद केल्या तरी एक रुग्ण सापडला आहे. तो फ्रान्सच्या ऊर्जा कंपनीचा कर्मचारी असून मॉस्कोतून येथे आला आहे. मंगोलियाने चीनलगतची सीमा बंद केली असून, दक्षिण कोरियातून येणारी विमाने बंद केली आहे. उलानबटार व सर्व प्रांतिक केंद्रांवर प्रवास बंदी लागू करण्यात आली आहे.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.