चालू घडामोडी आणि दिनविशेष - ११ जुलै २०२०

Updated On : Jul 11, 2020 | Category : Current Affairsतुकाराम मुंढेंना दणका; स्मार्ट सिटीच्या CEO पदावरून हटवले :
 • नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून नागपूर स्मार्ट सिटी सीईओपदाचा पदभार काढून घेण्यात आला आहे. महेश मोरोने यांना प्रभारी सीईओपद देण्यात आले आहे. तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली महेश मोरोने काम पाहतील. पुढील काही दिवसांत पूर्ण वेळ सीईओ नेमण्यासाठी जाहिरात काढली जाणार आहे.

 • नागपूर स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. स्मार्ट सिटीत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत सत्ताधारी भाजपातर्फे गेल्या काही दिवसांपासून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर आरोपांच्या फैरी सुरू आहेत.

 • शुक्रवारी, १० जून रोजी जवळपास तीन तासांपेक्षा जास्त काळ नागपूर स्मार्ट सिटी संचालक मंडळाची झंझावाती बैठक झाली. या बैठकीत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, महापौर संदीप जोशी, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, एनआयटी चेअरमन उपस्थित होते. चोख पोलीस बंदोबस्तात ही बैठक पार पडली.

 • तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटीचे संचालकपद आणि सीईओपद बळकवल्याचा आरोप आजच्या बैठकीत सिद्ध झाल्याचं नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितलं आहे.

ICSE, ISC बोर्डाचा दहावी-बारावीचा निकाल जाहीर :
 • आज ICSC आणि ISC बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थी त्यांचा निकाल cise.org या संकेतस्थळावर क्लिक करुन पाहू शकतात. तिथे त्यांना त्यांचा परीक्षार्थी क्रमांक आणि इतर माहिती भरावी लागेल. त्यानंतर ते एका क्लिकवर त्यांचा निकाल पाहू शकतात. ICSE बोर्डाने यासंदर्भात cise.org या वेबसाइटवर अधिकृत नोटीस जाहीर केली आहे. यामध्ये निकाल जाहीर करण्याबाबत पूर्ण माहिती देण्यात आली आहे.

 • किती मुलांनी परीक्षा दिली होती - ICSE बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेला २ लाख ७ हजार ९०२ विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये १ लाख १२ हजार ६६८ मुलं होती. तर ९५ हजार २३४ मुली होत्या. यापैकी २ लाख ६ हजार ५२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर १३७७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

 • ISC बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेला ८८ हजार ४०९ विद्यार्थी बसले होते. यामध्ये ४७ हजार ४२९ मुलांचा समावेश होता. तर ४० हजार ९८० मुलींचा समावेश होता. यापैकी ८५ हजार ६११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर २७९८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

नियंत्रणात आणून दाखवलं; WHO कडूनही करोनासंदर्भातील धारावी मॉडेलचं कौतुक :
 • देशात आणि राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारकडून करोनाशी सामना करण्याचे सर्वतोपरी प्रयत्नही सुरू आहेत. दरम्यान, मुंबईतील धारावी मॉडेलची जागतिक आरोग्य संघटनेनंही दखल घेतली असून त्यांच्याकडून धारावी मॉडेलची स्तुती करण्यात आली आहे.

 • धारावीतील झोपडपट्टी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी मानली जाते. तब्बल २.५ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या या भागात जवळपास ६.५ लाख लोकं वास्तव्य करत आहेत.

 • जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी मुंबईतील या ‘धारावी मॉडेल’ची स्तुती केली आहे. “केवळ राष्ट्रीय एकात्मता आणि जागतिक ऐक्यातून या साथीला प्रतिबंध केला जाऊ शकतो,” असं टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस म्हणाले. “जगात अशी अनेक उदाहरणे आहेत की महामारी अत्यंत गंभीर अवस्थेत असली तरीही ती पुन्हा नियंत्रित केली जाऊ शकते.

 • इटली, स्पेन, दक्षिण कोरिया आणि धारावी (मुंबई) जो जास्त लोकसंख्या असलेला भाग आहे ही याची काही उदाहरणं आहेत. सर्वांना सामील करणं, चाचणी करणे, रुग्णांचा शोध घेणं, त्यांचं अलगिकरण करणं हे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आणि करोनावर विजय मिळवण्यासाठी महत्त्वाचं आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

महाराष्ट्रात ७ हजार ८६२ नवे करोना रुग्ण, चोवीस तासात २२६ मृत्यू :
 • महाराष्ट्रात ७ हजार ८६२ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील चोवीस तासात २२६ मृत्यूंची नोंद झाली आहे. तर ५ हजार ३६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 • सध्याच्या घडीला करोना रुग्णांची आत्तापर्यंतची संख्या २ लाख ३८ हजार ४६१ झाली आहे. यापैकी १ लाख ३२ हजार ६२५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत करोनाची बाधा होऊन ९ हजार ८९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने माहिती दिली आहे.

 • राज्यातील करोना रुग्णांचा मृत्यू दर हा ४.१५ टक्के इतका झाला आहे. आत्तापर्यंत १२ लाख ५३ हजार ९७८ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ज्यापैकी २ लाख ३८ हजार ४६१ नमुने करोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात ६ लाख ७४ हजार २५ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर ४६ हजार ५६० लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

११ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)