चालू घडामोडी आणि दिनविशेष - ११ फेब्रुवारी २०२१

Date : 11 February, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘एमपीएससी’च्या परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण :
  • महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (महाज्योती) लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी तीन हजार विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

  • महाज्योती म्हणून ओळखल्या जाणारी ही संस्था राज्य शासनाने ओबीसी, भटक्या जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी स्थापन केली आहे. या वर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळावे म्हणून प्रशिक्षणाचा उपक्रम संस्थेने हाती घेतला आहे. या आर्थिक वर्षांत केंद्रीय लोकसेवा आयोगासाठी एक हजार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी दोन हजार विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण व सुविधा देण्यात येणार आहे. यावर्षी जे पदवी परीक्षा देत आहेत ते विद्यार्थीसुद्धा २०२२या वर्षांत होणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी पात्र ठरणार आहे.

  • प्रशिक्षणासाठी विनामूल्य नोंदणी आवश्यक  कागदपत्रांसह ५ मार्चपर्यंत महाज्योतीच्या संकेतस्थळावर करता येईल. यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येईल. त्यासाठी आवश्यक पुस्तके, टॅब व इंटरनेट सुविधा मोफत मिळेल. करोनाचा कालखंड संपल्यानंतर राज्यातील नामांकित एमपीएससी व यूपीएससी शिकवणी वर्गाच्या माध्यमातून ‘बार्टी’ प्रमाणे प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाणार आहे. त्याचे शुल्क व पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना महाज्योतीतर्फे विद्यावेतनसुद्धा देण्याचा निर्णय झाला आहे.

जव्हारमध्ये पर्यटनदृष्ट्या अनेक विकासकामे प्रस्तावित :
  • जव्हार येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या, ऐतिहासिक व भौगोलिक महत्त्व इत्यादी बाबींचा विचार करून राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने जव्हार शहराला ‘ब’ वर्ग पर्यटन स्थळ म्हणून ६ नोव्हेंबर २०२० रोजी घोषित केले. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या परिसरात नैसर्गिक पर्यटन स्थळाला कला, सांस्कृतिक परंपरा व पराक्रमाचा समृद्ध वारसा लाभला आहे.

  • जव्हार नगर परिषद क्षेत्रात पर्यटनदृष्ट्या अनेक प्रस्तावितविकास कामे विचाराधीन असून शिरपामाळ येथे शिव स्मारक उभारणे, विजय स्तंभाचे नूतनीकरण करणे, शहरात उद्यान तयार करणे, जुना राजवाडा वास्तूमध्ये आदिवासी सृष्टी निर्माण करणे, सनसेट पॉइंट येथे स्काय वॉक, टॉय ट्रेन उभारणे, हनुमान पॉइंट येथे पर्यटकांसाठी सहासी खेळांचे उद्यान करणे, हनुमान पॉइंट नवीन राजवाडापर्यंत ‘रोप-वे’ तयार करणे, शहरातील मुख्य ठिकाणी व पर्यटन स्थळी विद्युत रोषणाई करणे, सूर्य तलाव येथे बोटिंग क्लब तयार करणे तसेच शिरपामाळ येथे जवाहर परिसराचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी उंच मनोरा तयार करणे इत्यादी कामांचा समावेश आहे.

  • या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी व परिसरात जय विलास पॅलेस, शिरपामाळ, हनुमान पॉइंट, सनसेट पॉइंट, जुना राजवाडा, जय सागर धरण, विजयस्तंभ, दगडी बांधकाम असलेले सूर्य तलाव, जांभूळ विहीर, फिल्टर हाऊस इत्यादी प्रेक्षणीय स्थळे आहेत. 

भारत-चीन सीमारेषेवरुन मोठी बातमी :
  • लडाखमध्ये सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर निर्माण झालेला भारत आणि चीनमधील नियंत्रण रेषेवरील तणाव कमी होताना दिसत आहे. भारत आणि चिनी सैनिकांनी पॅगाँग लेकच्या ‘फिंगर’ परिसरातून आपलं सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही देशांमध्ये कमांडर स्तरावर चर्चेची नववी फेरी पार पडल्यानंतर सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरु कऱण्यात आली आहे. ग्लोबल टाइम्सने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

  • चिनी राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दोन्ही बाजूने पॅगाँग लेकच्या दक्षिण आणि उत्तर भागाकडे सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

  • इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत सैन्य मागे घेण्यासाठी दोन्ही देशांच्या कमांडर स्तरावर अनेक बैठका पार पडल्या. सूत्रांच्या माहितीनुसार, “प्लॅननुसार, चीन फिंगर ८ आणि भारतीय सैन्य फिंगर २ आणि फिंगर ३ पर्यंत आपलं सैन्य मागे घेणार आहे. फिंगर ४ पर्यंत दोन्ही देशांचे सैन्य गस्त घालणार नाहीत. हे टप्प्याटप्प्याने केलं जाणार आहे”.

भारत, चीनची सैन्यमाघारी :
  • पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवराच्या दक्षिण व उत्तर काठांवरून चीन आणि भारताच्या सैन्याने बुधवारपासून माघारीस सुरुवात केली, असे चीनच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. परिणामी़, पूर्व लडाखमध्ये गेल्या नऊ महिन्यांपासून सीमासंघर्षांमुळे भारत-चीन यांच्यात निर्माण झालेला तणाव निवळण्याचे संकेत आहेत.

  • पँगाँग सरोवर येथून चीन आणि भारताच्या सैन्याने एकाच वेळी आणि संघटितपणे माघार घेण्यास सुरुवात केली असल्याचे चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल वू क्वियान यांनी बुधवारी सांगितले. भारत आणि चीन यांच्यात कमांडर पातळीवरील चर्चेतील नवव्या फेरीत झालेल्या निर्णयानुसार हे पाऊल उचलण्यात आल्याने क्विआन यांनी प्रसृत केलेल्या निवेदनात नमूद केले आहे. मात्र, भारताने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

  • गेल्या वर्षी मे महिन्याच्या सुरुवातीपासून भारत (पान १० वर) (पान १ वरून) आणि चीन यांच्या सैन्यामध्ये पूर्व लडाखमध्ये संघर्ष निर्माण झाला. पँगाँग सरोवर परिसरात दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आले होते. गेल्या वर्षी १५-१६ जूनदरम्यान गलवान खोऱ्यात भारत-चीन यांच्या सैन्यात संघर्ष झाला होता. त्यात अनेक भारतीय जवान शहीद झाले. चीनचीही त्यात मनुष्यहानी झाली.

‘क्वाड’ देशांमुळे हिंद प्रशांत क्षेत्रात खुल्या व मुक्त व्यवस्थेस उत्तेजन :
  • क्वाड देशांच्या माध्यमातून अमेरिकेने हिंद प्रशांत क्षेत्रात खुली व मुक्त व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न केला असल्याचे बायडेन प्रशासनाने म्हटले आहे. क्वाड देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, अमेरिका, भारत व जपान या देशांचा समावेश आहे. हा गट हिंद प्रशांत क्षेत्रात चिनी लष्कराची एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे.

  • अमेरिकी परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी सांगितले की, क्वाड हे अमेरिकेने हिंद प्रशांत क्षेत्रात खुली व मुक्त व्यवस्था तयार करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे मोठे फलित आहे. चीनने या भागात लष्करी कारवाया वाढवल्या असून त्या परिस्थितीत ही जागतिक पातळीवरची आघाडी चीनला काबूत ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहील.

  • दक्षिण व पूर्व चीन सागरात चीनने बऱ्याच भागांत प्रादेशिक वाद निर्माण केले असून कृत्रिम बेटे तयार करून त्यांचे लष्करीकरण केले आहे. चीनने दक्षिण चीन सागरावर दावा केला असला तरी तो व्हिएतनाम, मलेशिया, फिलिपाइन्स, ब्रुनेई व तैवान यांनी अमान्य केला आहे. चीनचा जपानशीही प्रादेशिक वाद असून दक्षिण चीन  सागर व पूर्व चीन सागर हे दोन्ही खनिज संपत्ती व नैसर्गिक संपत्तीने परिपूर्ण आहेत. त्यामुळे जागतिक व्यापारात या भागांचे महत्त्वाचे स्थान आहे.

११ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.