अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी IDBI Bank सह आणखी दोन सरकारी बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली आहे. याला बँक कर्मचाऱी संघटनांनी जोरदार विरोध केला आहे. यामुळे या संघटनांनी पुढील आठवड्यात सलग दोन दिवसांच्या संपाची घोषणा केली आहे.
यामुळे उद्यापासून केवळ एकच दिवस बँक सुरु राहणार आहे. जर तुमचे काही महत्वाचे काम असेल तर आज आणि शुक्रवारीच बँका सुरु राहणार आहेत. जाणून घ्या कोणत्या दिवशी बँका बंद राहणार आहेत.
खासगीकरणाविरोधात सरकारी बँकांचे कर्मचारी 15 आणि 16 मार्चला संपावर जाणार आहेत. नऊ बँक युनियनची केंद्रीय संघटना यूनाइटेड फोरम ऑफ बँक यूनियन्सने या संपाची घोषणा केली आहे. याचा परिणाम सरकारी बँकांच्या कामकाजावर होणार आहे.
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियावरही या संपाचा मोठा परिणाम होणार आहे. बँकेनेही स्टॉक एक्स्चेंजला याची माहिती दिली आहे.
बँक कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी दोन दिवसीय संपाचा परिणाम बँकेच्या कामावर पडण्याची शक्यता असल्याचे एसबीआयने सांगितले आहे.
या संपाचा परिणाम बँक ग्राहकांवरही होणार आहे. १५ मार्चला सोमवार आणि १६ मार्चला मंगळवार आहे. आठवड्याचा पहिले दोन दिवस संपात गेल्याने कामे खोळंबणार आहेत.
आठ मार्च रोजी देशात वीस लाख लोकांना एकाच दिवशी करोना प्रतिबंधक लस देण्यात आली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आतापर्यंत २.३ कोटी लोकांना करोना प्रतिबंधक लस देण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोविड १० लसीकरण मोहिमेच्या ५२ व्या दिवशी २० लाख १९ हजार ७२३ जणांना लस देण्यात आली. त्यातील १७ लाख १५ हजार १८० लाभार्थ्यांना २८,८८४ सत्रांमध्ये पहिली मात्रा देण्यात आली. ३ लाख ४ हजार ३४३ आरोग्यसेवकांना व आघाडीवर काम करणाऱ्या लोकांना दुसरी मात्रा देण्यात आली. १७ लाख १५ हजार ३८० लाभार्थ्यांमध्ये १२ लाख २२ हजार ३५१ लाभार्थी हे वयाच्या साठीवरील असून २ लाख २१ हजार १४८ जण हे ४५ ते ६० वयोगटातील सहआजाराचे लोक आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोविड १८ लसीकरण मोहीम १६ जानेवारीला सुरू झाली होती. गेल्या चोवीस तासांत २० लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले. मंगळवारी सकाळी सात वाजेपर्यंत २,३०,०८,७३३ लोकांना ४,०५,५१७ सत्रांत लस देण्यात आली असून आरोग्य कर्मचाऱ्यात ७०,७५,०१९ जणांना पहिली मात्रा तर ३७,३९,४७८ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली. आघाडीच्या कर्मचाऱ्यात ६२,९२,३१९ जणांना पहिली मात्रा तर ३ लाख ३५ हजार ९७२ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. ४५ वर्षांवरील सात लाख १८० लाभार्थी असून त्यांना पहिली मात्रा दिली आहे. साठ वर्षांवरील सहआजाराच्या ४३ लाख ७४ हजार १४५ जणांना लस देण्यात आली आहे.
महाराष्ट्र, केरळ, पंजाब, तमिळनाडू, गुजरात, कर्नाटक या राज्यांत कोविड रुग्ण संख्या वाढत आहे. २४ तासांत सापडलेले ८४.०४ टक्के रुग्ण त्या राज्यातील आहेत. २४ तासांत १५ हजार ३८८ नवीन रुग्ण सापडले असून महाराष्ट्रात ८७४४, केरळात १४१, तर पंजाबमध्ये १२२९ नवीन रुग्ण आहेत. दिल्ली, गुजरात, कर्नाटक, हरयाणा, महाराष्ट्र, तमिळनाडू, मध्य प्रदेश या राज्यांत रुग्णसंख्या वाढली आहे. दिल्ली, गुजरात, कर्नाटक, हरयाणा, महाराष्ट्र, तमिळनाडू, पंजाब व मध्य प्रदेश या राज्यांत रुग्ण संख्या वाढत आहे. १ लाख ८७ हजार ४६२ रुग्ण उपचाराधीन असून हे प्रमाण एकूण रुग्णांच्या १.६७ टक्के आहे.
भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोने अमेरिकेच्या नासा या संस्थेसमवेत उपग्रहामार्फत संयुक्त पृथ्वी निरीक्षण करण्यासाठी एका उच्च विवर्तनक्षम रडारची निर्मिती केली आहे. त्याच्या मदतीने पृथ्वीच्या अधिक स्पष्ट प्रतिमा घेता येणार आहेत.
नासा आणि इस्रो यांच्या (निसार) या संयुक्त प्रकल्पात दुहेरी कंप्रता एल व एस बँड असलेले रडार पृथ्वी निरीक्षणासाठी वापरले जाणार आहे. ‘निसार’ ही दोन वेगेवगेळ्या कंप्रता ए बँड व एस बँडसाठी असणारी पहिलीच मोहीम आहे. त्यात पृथ्वीचे निरीक्षण काही सेंटीमीटर विवर्तनापर्यंत शक्य होणार आहे, अशी माहिती नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन म्हणजे नासाने दिली आहे.
नासा व बेंगळुरू येथील भारतीय अवकाश संशोधन संस्था यांनी याबाबतचा भागीदारी करार ३० सप्टेंबर २०१४ रोजी केला होता. ही मोहीम २०२२ मध्ये सुरू होणार असून इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील नेल्लोर जिल्ह्यत श्रीहरीकोटा येथून हा उपग्रह रडारसह पाठवला जाणार आहे. नासाने यात एल बँड एसएआरची व्यवस्था केली असून वैज्ञानिक माहिती व जीपीएस सव्र्हर्स उपलब्ध केले आहेत.
त्यात सॉलिड स्टेट रेकॉर्डरचा समावेश असून इस्रो यात एस बँड रडार उपलब्ध करीत असून पृथ्वीवरील पृष्ठभागाचे चित्रण यात केले जाणार आहे. एस बँड एसएआर पेलोड निसार उपग्रह मोहिमेचा भाग असून त्याला अवकाश खात्याने आधीच मंजुरी दिली आहे. इस्रोच्या अहमदाबाद येथील अवकाश उपयोजन केंद्रातून पेलोड श्रीहरीकोटा येथे पाठवण्यात येत असून नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीने एल बँड एसएआर पेलोड तयार केला आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४व्या पर्वाच्या आयोजनासाठी मुंबई सज्ज झाले असतानाच करोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे आता आर्थिक राजधानीतील सामन्यांच्या आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुंबईलगत असलेल्या ठाणे शहरात करोनाचे रुग्ण झपाटय़ाने वाढत आहेत. तेथील काही भागांमध्ये करोनाचे नियम कडक करण्यात आले आहेत. अशातच ‘आयपीएल’चे वेळापत्रक रविवारी सादर केले जाणार असून त्यात मुंबईला स्थान न देण्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) दबाव वाढू लागला आहे.
मुंबईत यंदाच्या मोसमातील १० सामने आयोजित केले जाण्याची शक्यता आहे. पण करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे मुंबईला लाल कंदील दाखवण्यात येण्याची शक्यता आहे. ‘आयपीएल’चे आयोजन सहा शहरांमध्ये केले जाणार असल्याचे ‘बीसीसीआय’ने जाहीर केले होते. पण कोलकाता, बेंगळूरु, अहमदाबाद, चेन्नई आणि दिल्ली या अन्य शहरांपेक्षा मुंबईतील करोनाबाबतची परिस्थिती अधिकच बिघडली आहे. मुंबई आणि महानगरांमध्ये दिवसेंदिवस करोनारुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. ठाणे आणि नाशिक या शहरांमधील काही भागांमध्ये टाळेबंदी करण्यात आली आहे.
‘आयपीएल’च्या यंदाच्या मोसमाला प्रारंभ होण्यापूर्वी परिस्थिती सुधारलेली असेल, अशी आशा ‘आयपीएल’ प्रशासकीय समितीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी व्यक्त केली. ‘‘परिस्थिती हाताबाहेर गेल्यास, अन्य पर्यायांची चाचपणी आम्ही आधीच केली आहे,’’ असे पटेल यांनी सांगितले. त्यामुळे प्रशासकीय समितीच्या पुढील बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचे सुरुवातीचे सामने मुंबईत होणार आहेत. त्यामुळे मुंबईतील स्टेडियमजवळ सराव करण्याचे या दोन्ही संघांनी ठरवले आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या युव्हेंटसला चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या मंगळवारी मध्यरात्री होणाऱ्या पोटरेविरुद्धच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात विजय अनिवार्य आहे.
फेब्रुवारीत झालेल्या पहिल्या टप्प्यातील सामन्यात युव्हेंटसला १-२ असा पराभव पत्करावा लागला. परंतु प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर गोल केल्याचा त्यांना लाभ होऊ शकतो. त्यामुळे युव्हेंटसने १-० अशा फरकाने सामना जिंकला तरी ते उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के करू शकतात.
मंगळवारीच होणाऱ्या अन्य लढतीत सेव्हिया आणि बोरुशिआ डॉर्टमंड यांची गाठ पडणार असून पहिल्या टप्प्यातील सामन्यात डॉर्टमंडने ३-२ असा विजय मिळवला आहे.
करोना विषाणुमुळे पसरलेल्या जागतिक महामारीविरूध्द लढण्यासाठी भारताने जो पुढाकार घेतला आहे तो वाखाणण्याजोगा आहे. लसीकरणासंबंधीत तर भारताने सगळ्यांपेक्षा वेगळे आणि महत्त्वपूर्ण काम केले आहे. असे आयएमएफच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांनी सोमवारी सांगितले. त्या म्हाणाल्या की, साथीच्या आजाराशी लढा देण्यास भारत आघाडीवर आहे. कोविड -१९ लसींचे उत्पादन आणि अनेक देशांमध्ये त्या पोहचण्यामध्ये भारताने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित हंसा मेहता व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी एका सत्रात श्रीमती गोपीनाथ यांनी ही प्रतिक्रिया दिली. गोपीनाथ यांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कौतुक केले आणि म्हटले की ते नियमितपणे जगात सर्वाधिक वर्षात लस तयार करत आहेत. कोविड -१९ च्या लसींचे डोस तयार करून ते कोव्हॅक्सला देण्यात येतात आणि नंतर जगभरातील देशांमध्ये त्या वितरित केल्या जातात.
बांगलादेश, नेपाळ आणि म्यानमारसह अनेक शेजारी देशांना अनुदान देऊन तसेच व्यावसायिक व्यवस्थेतूनही लस देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद करून सांगितले की, “या साथीच्या आजाराशी लढण्यात भारत आघाडीवर आहे.”
कोविड-१९ मुळे जे जागतिक आरोग्य संकट निर्माण झालं आहे. त्याविरूध्द जगाला मदत करण्यासाठी भारत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे, असे त्या म्हणाल्या.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.