करोनामधून थोडंफार सावरत असणाऱ्या जगभरातील देशांना मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी येणाऱ्या दोन धोक्यासंदर्भात इशारा दिलाय. बिल गेट्स यांनी भविष्यामध्ये वातावरण बदल आणि जैविक दहशतवाद (Climate Change and Bio-terrorism) या दोन गोष्टींमुळे जगभरातील लाखो लोकांचा मृत्यू होईल अशी भीती व्यक्त केलीय.
एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये बिल गेट्स यांनी हा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे पाच ते सहा वर्षांपूर्वी बिल गेट्स यांनी करोनासारख्या साथीचा प्रादुर्भाव होण्याची भविष्यवाणी केली होती. भविष्यात पृथ्वीवर अशा विषाणूचा प्रादुर्भाव होईल की ज्यामुळे लोकं बाजारात जायलाही घाबरतील, अशा शब्दांमध्ये गेट्स यांनी साथीच्या रोगासंदर्भात इशारा दिला होता. गेट्स यांनी लोकांना विमान प्रवास करण्यातही अडथळा येईल आणि लोकं विमानप्रवासालाही घाबरतील अशी परिस्थिती निर्माण होण्याचा इशारा दिलेला. त्यामुळेच आता गेट्स यांनी पुन्हा नव्याने इशारा दिल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
डेरेक मुलर या युट्यूबरच्या व्हेरिटासीयम या चॅनेलला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये बिल गेट्स यांनी वातावरण बदल आणि जैविक दहशतवाद या दोन मोठ्या धोक्यांविरोधात मानव तयार नसल्याचं मत व्यक्त केलं आहे.
“पुढील येणाऱ्या काही वर्षांमध्ये कोणत्याही साथीच्या रोगापेक्षा वातावरण बदलामुळे घोषणा घटनांमुळे अनेकांचा मृत्यू होईल. तसेच जैविक दहशतवादाचा धोकाही जगावर आहे. जगाला संपवण्याच्या उद्देशाने कोणीही नवीन विषाणूची निर्मिती करु शकतो. सध्या जगभरामध्ये चर्चा असणाऱ्या करोना विषाणूपेक्षा या दोन गोष्टींमुळे जगभरामध्ये हाहाहाकार उडेल,” अशा शब्दांमध्ये बिल गेट्स यांनी इशारा दिलाय.
कृषी कायद्यांचे समर्थन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांना ‘आंदोलन मागे घ्या आणि चर्चेस या’ असे आवाहन सोमवारी राज्यसभेत केले.
किमान आधारभूत मूल्य (एमएसपी) होते, आहे आणि यापुढेही राहील, बाजारांचे आधुनिकीकरण करण्यात येईल आणि ८० कोटी गरिबांचा स्वस्त धान्यपुरवठाही सुरू राहील, अशी ग्वाही मोदी यांनी दिली. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कृषी सुधारणांबाबतच्या वक्तव्याचा दाखला देत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसने घूमजाव केल्याची टीका केली. कृषी सुधारणा राबवण्याची संधी द्या, असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शक प्रस्तावाला उत्तर देताना मोदी म्हणाले, की आता आंदोलनजीवी म्हणजे व्यावसायिक आंदोलक उदयास आले असून तेच सर्व आंदोलनांमध्ये दिसत आहेत. हे परोपजीवी आंदोलक प्रत्येक आंदोलनावर पोसले जात आहेत.
कृषी कायद्यांवर विरोधक राजकारण करीत असल्याचा आरोपही मोदी यांनी केला. आंदोलनामागील कारणांबाबत विरोधक मूग गिळून आहेत, अशी टीका त्यांनी केली. ‘एफडीआय’चा अर्थ थेट परकीय गुंतवणूक, असा आहे, परंतु त्याऐवजी आता थेट विध्वसंक विचारसरणी असा नवीनच अर्थ देशात लावला जात आहे. त्यामुळे या विचारधारेपासून देशाला वाचवण्याची गरज आहे, असे मोदी म्हणाले.
आरोग्य विभागाच्या राज्यातील सर्व रुग्णालयांचे तात्काळ अग्निपरीक्षण करण्याचे आदेश जारी होऊन एक महिना उलटला असला तरी अद्याप ३०८ रुग्णालयांचे अग्निपरीक्षण झालेले नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत दहा बालकांचा होरपळून व गुदमरून मृत्यू झाल्यानंतर जागे झालेल्या आरोग्य विभागाने आपल्या अख्त्यारितील सर्व रुग्णालयांचे अग्निपरीक्षण करण्याचे आदेश जारी केले. आरोग्य विभागाची राज्यात ५१२ रुग्णालये असून यात जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, स्त्री रुग्णालये, सामान्य रुग्णालये तसेच मनोरुग्णाल यादींचा समावेश आहे. गेल्या महिनाभरात अवघ्या २०४ रुग्णालयांचे अग्निपरीक्षण झाले असून अद्याप ३०८ रुग्णालयांचे अग्निपरीक्षण होणे शिल्लक आहे. आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ डॉक्टरांनी याबाबत सांगितले की, “भंडारा दुर्घटनेनंतर तात्काळ अग्निपरीक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी रुग्णालयांचे अग्निपरीक्षण करण्यासाठी पुरेशा संस्था उपलब्ध नाहीत.
शासकीय संस्था तसेच खाजगी मान्यताप्राप्त संस्थांच्या माध्यमातून हे परीक्षण केले जाणार आहे. काही जिल्ह्यात शासकीय तसेच खाजगी संस्था उपलब्ध नाहीत. रुग्णालयांचे अग्निपरीक्षण करण्यासाठी बहुतेक सर्व रुग्णालयांनी अर्ज केले आहेत. बहुतेक जिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालये ही जुनी असून विद्यमान अग्निसुरक्षा निकषांचा विचार करता तेथे जिन्यांची लांबी तीन मीटर एवढी नाही. तसेच बहुतेक रुग्णालयात अंतर्गत बदल केलेले असल्यामुळे मान्यताप्राप्त नकाशे उपलब्ध नाहीत. त्यामुळे सध्या आहे त्या परिस्थितीत या रुग्णालयांचे अग्निपरीक्षण झाले असले तरी कामाचा खर्च निश्चित करण्यासाठी सुधारित आराखडे असणे आवश्यक आहे. त्याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभाग अग्निसुरक्षा कामाचे अंदाजपत्रक देऊ शकणार नाही, अशी भूमिका सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली आहे”.
यातील दुसरा मुद्दा म्हणजे खाजगी संस्थांनी केलेल्या अग्निपरीक्षणाची छाननी करणे आवश्यक असून राज्याच्या अग्निशमन संचालकांची मान्यता मिळाल्याशिवाय कामाच्या निविदा काढता येणार नाहीत.
राज्यातील क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारलाही करोनाच्या साथीचा फटका बसला आहे. २०१९-२०चे शिवछत्रपती पुरस्कार यंदा दिले जाणार नाहीत, परंतु पुढील वर्षी ते दिले जातील, अशी माहिती राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी सोमवारी दिली.
१९६९पासून राज्यातील क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणारे खेळाडू, संघटक आणि प्रशिक्षकांना दरवर्षी शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. गेल्या काही वर्षांत १९ फेब्रुवारीला शिवजयंती दिनाचा मुहूर्त साधून हे पुरस्कार देण्याची प्रथा राज्य शासनाकडून सुरू करण्यात आली होती. गतवर्षी गेट वे ऑफ इंडिया येथे २२ फेब्रुवारीला झालेल्या शानदार कार्यक्रमात ६३ जणांना २०१८-१९च्या पुरस्काराने गौरवण्यात आले, परंतु गेले वर्षभर करोनाच्या साथीमुळे राज्यातील क्रीडा स्पर्धावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे यंदाचे पुरस्कार वर्षभरासाठी लांबणीवर पडल्याचे स्पष्टीकरण केदार यांनी दिले.
राज्याच्या क्रीडा विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या क्रीडा खात्याकडून शिवछत्रपती पुरस्कारांची नियमावली संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली होती. यातील नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी अभिप्रायार्थ खुले आवाहन करण्यात आले होते. या अभिप्रायांचा आढावा घेऊन नियमावलीत आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे पुढील वर्षी हे निकष लागू करूनच पुरस्कार दिले जातील.
२०२० हे वर्ष क्रिकेटसाठी फारसं चांगलं नव्हतं. सुमारे पाच ते सहा महिने करोनामुळे क्रिकेट पूर्णपणे ठप्प होतं. पूर्वनियोजित आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकादेखील स्थगित करण्यात आल्या होत्या. वर्षाच्या अखेरीस हळूहळू क्रिकेटने पुन्हा जोर धरला. आता करोनासंदर्भातील नव्या नियमांनुसार क्रिकेट मालिका खेळल्या जात आहेत.
२०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू असा नवा पुरस्कार सुरू केला आणि पहिल्याच पुरस्काराचा मानकरी ठरला भारताचा धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंत.
जानेवारी महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळत होता. या मालिकेत ऋषभ पंतने दोन डावात संस्मरणीय खेळी केल्या.
तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दिलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने ९७ धावांची धडाकेबाज खेळी होती. तर चौथ्या सामन्यात त्याने नाबाद ८९ धावा करत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या याच खेळीमुळे त्याला जानेवारी २०२१मधील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.