सीएसआर उपक्रमाचा भाग म्हणून, मुथूट ग्रुप या भारतातील आघाडीच्या बिझनेस समूहाने सरकारी अधिकारी आणि स्थानिक एनजीओ यांच्या सहयोगाने भारतभर सध्या लॉकडाउन सुरू असल्याने फटका बसलेल्या देशभरातील १५,००० हून अधिक कुटुंबांना अन्न, अन्नधान्य व आवश्यक वस्तू पुरवल्या आहेत.
कंपनीने भारतभर उत्तर प्रदेश, दिल्ली एनसीआर, महाराष्ट्र, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश व गोवा या राज्यांमध्ये या उपक्रमाचे आयोजन केले होते. या कुटुंबांना मोफत अन्न देण्याबरोबरच, कंपनीने राज्य सरकारने आयोजित केलेल्या कम्युनिटी किचनसाठीही मदत केली. कंपनीने आरोग्य कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांना मास्क, ग्लोव्ह व सॅनटायझर अशा गरजेच्या वस्तूही दिल्या.
सीएसआर उपक्रमाविषयी बोलताना, व्यवस्थापकीय संचालक जॉर्ज अॅलेक्झांडर मुथूट यांनी सांगितले, “या प्रकारचे उदात्त उपक्रम आयोजित करण्यामध्ये मुथूट ग्रुप नेहमीच आघाडीवर असतो. अशा अत्यंत अवघड परिस्थितीमध्ये, आपण सर्वांनी एकत्र यायला हवे आणि आपल्या पाठिंबाची व आपुलकीची आवश्यकता असलेल्या सर्वांसाठी शक्य तितकी सर्व प्रकारची मदत करायला हवी.”
जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. देशातील करोनाबाधितांचा आकडा आता 5 हजार 734 वर पोहचला आहे. मागील चोवीस तासात करोनाने 17 चा बळी घेतला आहे. तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 166 झाली आहे.
करोना तपासणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या 5 हजार 734 जणांमध्ये अद्याप उपचार सुरू असलेले 5 हजार 095 जण, उपचारानंतर रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलेले 473 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची 166 ही संख्या समाविष्ट आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लागू केलेल्या तीन आठवडय़ांच्या टाळेबंदीचा कालावधी वाढवण्याचे स्पष्ट संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत दिले. शनिवारी, ११ एप्रिल रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांनी पुन्हा बैठक बोलावली असून त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
करोनाने अमेरिकेत थैमान घातलं असून भारताकडून हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाचा पुरवठा करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. भारताच्या या निर्णयामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आनंदीत झाले असून भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय आणि नरेंद्र मोदी यांचे आभार मानणारं ट्विट करत तुम्ही केलेली मदत कधी विसरणार नाही असं म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी नरेंद्र मोदींना फोन करुन करोनाविरोधातील लढाईत मदत मागितली होती. सोबतच भारताने हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाचा पुरवठा केला नाही तर प्रत्युत्तर दिलं जाईल असा धमकीवजा इशाराही दिला होता.
पण भारताकडून हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाच्या निर्यातीवरील निर्बंध हटवण्यात आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा बदलली आहे. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी महान नेता असल्याचं सांगितलं.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लागू केलेल्या तीन आठवडय़ांच्या टाळेबंदीचा कालावधी वाढवण्याचे स्पष्ट संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत दिले. शनिवारी, ११ एप्रिल रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांनी पुन्हा बैठक बोलावली असून त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
टाळेबंदीचा कालावधी १४ एप्रिल रोजी संपत आहे. मात्र विविध राज्य सरकारे, जिल्हा प्रशासन आणि तज्ज्ञांकडून टाळेबंदी कायम ठेवण्याची मागणी केली जात आहे. करोनामुळे देशात ‘सामाजिक आणीबाणी’ची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे देशाला कठीण निर्णय घ्यावे लागत आहेत. आपण सगळ्यांनी दक्ष राहिले पाहिजे, असे मोदी यांनी राजकीय नेत्यांना सांगितले.
या बैठकीत सहभागी झालेल्या बहुतांश नेत्यांनी टाळेबंदी उठवण्याची घाई न करण्याची सूचना पंतप्रधानांना केली. बैठकीनंतर बिजू जनता दलाचे नेते पिनाकी मिश्रा यांनी, मोदींनी टाळेबंदी सरसकट उठवली जाणार नसल्याचे संकेत दिल्याचे स्पष्ट केले. आर्थिक स्थिती सुधारू शकते, लोकांचा जीव गेला तर तो परत येणार नाही. त्यामुळे टाळेबंदी वाढवली जावी, अशी विनंती तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मोदींना केली आहे. महाराष्ट्र, पंजाब, तमिळनाडू, छत्तीसगड, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांनीही टाळेबंदीचा कालावधी वाढवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. करोनाचे रुग्ण वाढत असून टाळेबंदी हाच एकमेव पर्याय हातात उरलेला असल्याचे राज्य सरकारांचे म्हणणे आहे.
कोविड-१९ विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची जगभरातील संख्या बुधवारी ८२ हजार ७२६ वर पोहचली.
गेल्या डिसेंबरमध्ये चीनमध्ये या महासाथीचा उगम झाल्यानंतर १९२ देशांमध्ये करोना संसर्गाची १४ लाख ३८ हजार २९० हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. यापैकी किमान २ लाख ७५ हजार लोक बरे झाल्याचे मानले जात आहे.
एएफपी या वृत्तसंस्थेने विविध देशांतील अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून ही आकडेवारी गोळा केली आहे, मात्र ती प्रत्यक्ष आकडेवारीपैकी काही भागच दर्शवीत असावी अशी शक्यता आहे. अनेक देश अजूनही अतिशय गंभीर प्रकरणांची केवळ तपासणीच करत आहेत.
मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजेपासून जगभरात आणखी २५८४ बळींची आणि करोना संसर्गाच्या ४१४०७ नव्या प्रकरणांची नोंद करण्यात आली.
या काळात अमेरिकेत सर्वाधिक मृत्यूंची नोंद करण्यात आली. ही संख्या ८९० इतकी होती. याखालाखोर स्पेनमध्ये ७५७ जणांचा मृत्यू झाला.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.