चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०७ ऑक्टोबर २०२१

Date : 7 October, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘सॅफ’ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा : पहिल्या विजयासाठी भारतीय संघ उत्सुक :
  • ‘सॅफ’ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात बरोबरी पत्करल्यानंतर आता गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या लढतीत पहिला विजय मिळवण्याच्या निर्धाराने भारतीय संघाचे खेळाडू मैदानात उतरतील.

  • कर्णधार सुनील छेत्रीने केलेल्या गोलमुळे भारताने सोमवारी बांगलादेशविरुद्ध झालेल्या लढतीत १-० अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर त्यांच्या एका खेळाडूला लाल कार्डही दाखवण्यात आले. तरीही बांगलादेशने भारताला १-१ असे बरोबरीत रोखले. त्यामुळे भारताच्या बचावफळीसह प्रशिक्षक इगॉर स्टिमॅक यांनाही टीकेला सामोरे जावे लागले.

  • आतापर्यंत सात वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाची श्रीलंकेविरुद्धची कामगिरी उत्तम आहे. त्यातच सलग दोन सामन्यांत पराभूत झाल्याने श्रीलंकेवर अधिक दडपण असेल. मालदीव नॅशनल फुटबॉल स्टेडियमवर होणाऱ्या उभय संघांतील या लढतीत छेत्रीव्यतिरिक्त गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधू, मनविर सिंग, चिंग्लेनसना आणि अनिरुद्ध थापा यांच्यावर प्रामुख्याने भारताची भिस्त आहे.

  • ब्राझिलचे महान फुटबॉलपटू पेले यांच्या ७७ गोलच्या विक्रमाची बरोबरी साधण्यासाठी सुनील छेत्रीला अवघ्या एका गोलची आवश्यकता आहे.

नीरज चोप्रानंतर आता त्याने फेकलेला भालाही करणार विक्रम?; लागली ‘इतक्या’ कोटींची बोली :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटवस्तूंचा ई-लिलाव आज संध्याकाळी संपणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. सुरू असलेल्या लिलावात, ऐतिहासिक वस्तू आणि धार्मिक कलाकृतींमध्ये लोकांनी अधिक रस घेतला आहे असे दिसते, तर ऑलिम्पिक खेळाडूंच्या क्रीडा साहित्याला सर्वाधिक बोली मिळाली आहे.

  • ऑनलाईन लिलाव १७ सप्टेंबर रोजी सुरू झाला होता आणि आज संध्याकाळी ५ वाजता संपेल.नीरज चोप्राने वापरलेल्या भाला, ज्याने त्याला सुवर्णपदक मिळवून दिले, त्याला सर्वाधिक बोली मिळाली, असे पीएम मेमेंटोस वेबसाइटने म्हटले आहे. त्याची मूळ किंमत एक कोटी रुपये होती आणि सध्या ती एक कोटी ५० हजारांवर पोहोचली आहे, असे वेबसाइटने म्हटले आहे. या भाल्यावर आतापर्यंत दोन बोली लावण्यात आल्या आहे.

  • नीरज चोप्रा याने आपली सही असलेला भाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून दिला होता. या भाल्याला पहिल्या दिवशी सर्वाधिक 10 कोटी रुपयांची बोली मिळाली, पण नंतर ती बनावट बोली असू शकते या संशयावरून रद्द करण्यात आली.

पाव शतकाच्या पाठपुराव्यानंतर सिंधुदुर्गात विमानतळाचे स्वप्न साकार :
  • कोकण रेल्वेनंतर या प्रदेशाच्या आर्थिक विकासामध्ये महत्त्वाचा टप्पा ठरू शकणाऱ्या सिंधुदुर्ग विमानतळाचे स्वप्न सुमारे पाव शतकाच्या सर्वपक्षीय पाठपुराव्यानंतर  शनिवारी साकार होत आहे.

  •  कै. मधू दंडवते, जॉर्ज फर्नांडिस आणि रामकृष्ण हेगडे यांच्या प्रयत्नांतून १९९६-९७ मध्ये कोकणात रेल्वे गाडी धावू लागली त्याच सुमारास या भागातील काँग्रेसचे तत्कालीन खासदार मेजर सुधीर सावंत यांनी येथे विमानतळ व्हावा, म्हणून प्रयत्न सुरू केले. तेव्हा केंद्रात सत्तेवर असलेल्या काँग्रेस आघाडीच्या सरकारमधील नागरी हवाई वाहतूकमंत्री कै. माधवराव शिंदे यांना भेटून त्यांनी या प्रकल्पासाठी गळ घातली. त्यावेळी मेजर सावंत अखिल भारतीय काँग्रेस समितीचे चिटणीस होते. त्यामुळे दिल्लीत त्यांचे वजन होते.

  • गोव्यातील दाभोळी विमानतळ त्या वेळी नौदलाच्या ताब्यात असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्यास या ठिकाणी गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला फायदा होईल, असे मेजर सावंत यांनी तत्कालीन हवाईमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले  होते. त्यानंतर शिंदे यांनी १९९५ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची हवाई पाहणी केली आणि १९९६ मध्ये राज्यातील तत्कालीन युती सरकारच्या धोरणानुसार सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा करण्याबरोबरच येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत केंद्रीय पातळीवरून चाचपणी सुरू झाली.

  • त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्या विमानतळ झालेल्या चिपी-परुळे भागात जागा पाहण्यासाठी समिती नेमण्यात आली आणि या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली, अशी माहिती सावंत यांनी दिली. योगायोगाचा भाग म्हणजे, माधवराव शिंदे यांचे चिरंजीव ज्योतिरादित्य शिंदे सध्या त्याच नागरी हवाई वाहतूक खात्याचे मंत्री या नात्याने या विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत.

सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’ :
  • उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रातही उमटत आहेत. या हिंचाराबद्दल राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत खेद व्यक्त करणारा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने ११ ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.

  •  लखीमपूर खेरी येथे रविवारी आंदोलक शेतकऱ्यांच्या जथ्यात मोटार घुसवण्यात आल्यानंतर हिंसाचार उफाळला. त्यात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा बळी गेला असून, या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही लखीमपूर हिंसाचाराचे पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित करीत केंद्र आणि उत्तर प्रदेशातील भाजप सरकारच्या शेतकरीविरोधी भूूमिके चा निषेध करण्याची मागणी केली.

  • त्यांच्या भूमिके ला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अनुमोदन दिले. त्यानुसार लखीमपूर खेरी येथील हिंसाचारात झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूबद्दल खेद व्यक्त करण्याचा ठराव करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व मंत्र्यांनी दोन मिनिटे उभे राहून स्तब्धता पाळत मृत शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली.

  •   लखीमपूरमधील घटनेच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ पुकारण्याचा निर्णय महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी घेतल्याचे जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितले. बंदचा निर्णय सरकारने नव्हे तर तिन्ही पक्षांच्या आघाडीने घेतला असून, त्यात नागरिकांनी  सहभागी व्हावे, असे आवाहन या नेत्यांनी केले.

ले.ज. नदीम अहमद अंजुम आयएसआयच्या प्रमुखपदी :
  • पाकिस्तानच्या शक्तिशाली अशा इंटर सव्र्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) या गुप्तचर यंत्रणेत अनपेक्षित फेरबदल करण्यात आला असून, लेफ्टनंट जनरल नदीम अहमद अंजुम यांना तिचे नवे प्रमुख नेमण्यात आले आहे.

  • ले.ज. अंजुम हे लेफ्टनंट जनरल फैझ हमीद यांची जागा घेतील. हमीद यांची पेशावर कॉप्र्सचे कमांडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

  • ‘डॉन’ वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, लेफ्टनंट जनरल अंजुम हे यापूर्वी कराची कॉप्र्सचे कमांडर होते. सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांना लेफ्टनंट जनरलपदी बढती देण्यात आली.

  • ब्रिटनच्या रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीजचे पदवीधर असलेले अंजुम यांनी होनोलुलु येथील एशिया- पॅसिफिक सेंटर फॉर सिक्युरिटी स्टडीजमधूनही पदवी मिळवली आहे.

ह्यूस्टन येथील टपाल कार्यालयास शीख पोलीस अधिकाऱ्याचे नाव :
  • अमेरिकेतील टेक्सास राज्यात कर्तव्य बजावत असताना २०१९ मध्ये गोळीबारात ठार झालेले भारतीय अमेरिकी शीख अधिकारी संदीप सिंग धालीवाल यांचे नाव पश्चिम ह्यूस्टनमधील टपाल कार्यालयास देण्यात आले आहे.

  • धालीवाल यांना २७ सप्टेंबर रोजी वाहतूक नियंत्रण करीत असताना गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. २०१५ मध्ये धालीवाल हे टेक्सासचे पहिले शीख पोलीस अधिकारी बनले होते, ते तुर्बान परिधान करीत असत व त्यांनी दाढी सुद्धा ठेवलेली होती.

  • हॅरिस परगण्याच्या नगरपाल कार्यालयाने म्हटले आहे, की आमच्या कार्यालयातील अधिकारी संदीप सिंग धालीवाल यांना आम्ही आदरांजली वाहत असून त्यांचे नाव हॅरिस परगण्यातील टपाल कार्यालयास देण्यात आले आहे. त्यांची स्मृती त्यामुळे जागी राहील. टेक्सासमधील कमिशनर कोर्ट, टपाल कार्यालय यांचे आम्ही ऋणी आहोत.

०७ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.