देवी-देवतांच्या नावाने यंत्र-तंत्र विक्री करण्याची जाहिरात दाखविण्यावर बंदी घालावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. एम. जी. शेवलीकर यांनी मंगळवारी दिले. अशा प्रकारच्या यंत्राची विक्री, उत्पादन, प्रसार व प्रचार करणाऱ्यांवर १०१३ अघोरी कृत्य आणि काळी जादू कायदा २०१३ अनुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत. केंद्र व राज्याने ३० दिवसांत अशा प्रकारांवर कारवाई करण्यासाठी काय पावले उचलली, याबाबतचा अहवाल खंडपीठास सादर करावा असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
विविध प्रसार माध्यमांवर धर्माच्या नावाने भीती दाखवून हनुमान चालिसा, देवीचे यंत्र आदी वस्तू विक्रीच्या जाहिराती मोठय़ा प्रमाणावर दाखविल्या जातात. सर्वसामान्य नागरिकांची अशा भोंदूगिरीच्या माध्यमातून लूट केली जाते.
राज्य शासनाच्या २०१३ मधील अघोरी कृत्य व काळी जादू कायद्यानुसार प्रसार माध्यमांवर प्रक्षेपण करता येत नाही. याविरुद्ध २०१५ मध्ये औरंगाबाद येथील राजेंद्र गणपतराव अंभोरे (रा. टाउनसेंटर सिडको औरंगाबाद) यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. समाजात विज्ञाननिष्ठ नागरिक तयार होऊन वैज्ञानिक वातावरणास गती मिळावी, अंधश्रद्धेचे निर्मूलन व्हावे यासाठी २०१३ मध्ये कायदा निर्माण केला. प्रत्येक पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांच्या समवेत अशा बाबींवर प्रतिबंध घालण्यासाठी एक अधिकारी नियुक्त केलेला आहे.
कायद्याच्या माध्यमातून भोंदूगिरीला वेसण घालावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. हनुमान चालिसा यंत्र विक्री करणाऱ्या जाहिरातीमधून व्यवसायात तोटा होत असेल, तर अशा प्रकारे यंत्र जवळ ठेवल्यावर लाभ होतो वगैरे दावे केले जात होते.
देशात करोना लसीकरण कार्यक्रमास सुरूवात होण्या अगोदर ८ जानेवारी रोजी देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये दुसरा ‘ड्राय रन’ घेण्यात येणार आहे. या अगोदर २ जानेवारी रोजी संपूर्ण देशात ‘ड्राय रन’ चे आयोजन करण्यात आले होते. मात्र, तेव्हा सर्वच जिल्ह्यांमध्ये ‘ड्राय रन’ घेण्यात आलेला नव्हता. आता होणारा दुसरा ‘ड्राय रन’ हा देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे. लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम २८ व २९ डिसेंबर रोजी चार राज्यांमधील काही ठिकाणी पहिला ‘ड्राय रन’ घेण्यात आला.
पंजाबा, आसाम, गुजरात आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये घेण्यात आलेल्या ‘ड्राय रन’चे परिणाम समोर आल्यानंतर, सरकारने संपूर्ण देशात ‘ड्राय रन’ घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता ८ जानेवारी रोजी पुन्हा एकदा संपूर्ण देशात ‘ड्राय रन’ पार पडणार आहे.
दुसरीकडे लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन हे उद्या(गुरुवार) राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांबरोबर बैठक करणार आहेत. या वेळी ते राज्य सरकारच्या तयारीचा आढावा घेतील. उद्या साडेबारा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे.
भारत आणि इस्रायलने मागच्या आठवडयात जमिनीवरुन हवेतील लक्ष्याचा वेध घेणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजने (IAI) मंगळवारी ही माहिती दिली. भारत आणि इस्रायल दोघांनी मिळून हे क्षेपणास्त्र विकसित केलं आहे. या क्षेपणास्त्राद्वारे हवेत ५० ते ७० किलोमीटर अंतरावरील शत्रूचे फायटर विमान नष्ट करता येऊ शकते.
भारताची डीआरडीओ आणि इस्रायलच्या IAI ने मिळून ही मिसाइल डिफेन्स सिस्टिम विकसित केली आहे. MRSAM सिस्टिममध्ये कमांड आणि कंट्रोल, अत्याधुनिक रडार, मोबाइल लाँचर्स आणि इंटरसेप्टर्सचा समावेश आहे. मिसाइल डिफेन्स सिस्टिममधील सर्व घटकांनी चाचणीचे सर्व अपेक्षित निकष पूर्ण केले अशी माहिती इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजकडून देण्यात आली.
“MRSAM एअर आणि मिसाइल डिफेन्स सिस्टिम ही नवीन, कल्पक आणि अत्याधुनिक सिस्टिम आहे. या सिस्टिमने हवाई धोक्यापासून संरक्षण करण्याची आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. प्रत्येकवेळी एअर डिफेन्स सिस्टिमची चाचणी एक जटिल प्रक्रिया असते” असे इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि सीईओ बोएझ लेवी म्हणाले.
उस्मानाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राचे स्वतंत्र विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी तज्ञांची समिती गठीत करण्यात आली. पुढील तीन महिन्यात समिती अहवाल सादर करणार. शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी ऑगस्टमध्ये असे जाहीर केले होते. मात्र अशी कोणतीही समिती उच्च तंत्र व शिक्षण विभागाने गठीत केली नसल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानेही शिक्षण विभागाच्या या माहितीला दुजोरा दिला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून स्वतंत्र विद्यापीठाचे स्वप्न बाळगून असलेल्या उस्मानाबादकरांचा माहविकास आघाडीकडूनही भ्रमनिरास झाला आहे.
मागील वर्षी 20 ऑगस्ट रोजी मुंबई येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राचे स्वतंत्र विद्यापीठ व्हावे यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक झाली. या बैठकीत जळगाव विद्यापीठाचे माजी कुलगुरू आर. एस. माळी यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञांची समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी जाहीर केली होती.
या समितीमध्ये शिवाजी विद्यापीठाचे डी.टी शिर्के, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, माजी प्राचार्य डॉ.अनार साळुंखे, शिक्षणतज्ञ एम.डी. देशमुख, विद्यापीठाचे सिनेट सदस्य संजय निंबाळकर, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.धनराज माने यांच्यासह औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचा समावेश असल्याचे खासदार राजेनिंबाळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले होते.
औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा मुद्दा राज्याच्या राजकारणात दिवसेंदिवस तापत असताना, आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला. औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद महापालिका निवडणूक नामांतराच्या मुद्द्याभोवतीच घुटमळणार असल्याचे दिसत आहे.
औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करण्याबाबत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने अधिसूचना लवकरात लवकरात काढावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांना कळवले आहे. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हरदिप पुरी यांना स्मरण पत्र पाठवले आहे.
या पत्रात म्हटले आहे की, औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. याबाबतचा ठराव विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला आहे.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.