अमान (जॉर्डन) : आशियाई रौप्यपदक विजेत्या आशीष कुमार (७५ किलो) याने चौथ्या मानांकित ओम्बूरेक बेकझाइट उलू याच्यावर दणदणीत विजय मिळवत आशियाई ऑलिम्पिक पात्रता बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.
एकतर्फी झालेल्या या लढतीत आशीषने किर्गिझिस्तानच्या बेकझाइटचे आव्हान ५-० असे सहज मोडीत काढले. आता उपांत्यपूर्व फेरीत आशीषला इंडोनेशियाच्या मायखेल रॉबेर्ड मस्किटा याच्याशी लढत द्यावी लागेल. मस्किटाने न्यूझीलंडच्या रायन स्कायफे याच्यावर मात करत आगेकूच केली. उपांत्य फेरीत मजल मारल्यास आशीषचे टोक्यो ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित होईल.
आपल्यापेक्षा तगडा प्रतिस्पर्धी असलेल्या बेकझाइटविरुद्ध आशीषने सुरुवातीला सावध पवित्रा अवलंबला. बेकझाइटपासून दूर राहत आशीषने प्रतिस्पध्र्याला पंचेस लगावण्यास परावृत्त केले. बेकझाइटचे पंचेस चुकवत आशीषने मात्र पहिल्या फेरीत अचूक फटके लगावले. दुसऱ्या फेरीत बेकझाइटने आशीषवर दडपण आणले. मात्र उजव्या हाताने ठोशांची सरबत्ती करत आशीषने त्याची परतफेड केली. अंतिम फेरीत आशीषच्या ताकदवान ठोशांपुढे बेकझाइट निष्प्रभ ठरला. त्यामुळे सर्व पंचांनी आशीषच्या बाजूने निकाल दिला.
औरंगबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं नामकरण करण्यात आलं आहे. कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता औरंगाबाद विमानतळाचं नाव हे बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं झालं आहे.
औरंगाबाद महापालिका निवडणूक जवळ आली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली.
औरंगाबादचं नामकरण संभाजी नगर केलं गेलं पाहिजे अशी मागणी शिवसेनेने गेल्या अनेक वर्षांपासून लावून धरली आहे. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगबादचा दौरा केला होता. त्यानंतर शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही कधीही तुम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाव बदलल्याची गुड न्यूज देऊ शकतात असं म्हटलं होतं. आता शहराचं नाही पण किमान विमानतळाचं नाव बदलण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे औरंगाबाद विमानतळाचा उल्लेख छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असा यापुढे केला जाईल.
YES बँकेवर कर्जाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या येस बँकेवर निर्बंध लादले आहेत. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
या बँकेवर कर्जाचा बोजा चांगलाच वाढल्याने रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले आहेत. तसेच ग्राहकांना खात्यातून ५० हजार रुपयेच काढता येतील असंही RBI नं म्हटलं आहे.
५० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढायची असल्यास खातेदारांना RBI ची मंजुरी घ्यावी लागणार आहे. खातेदारांना वैद्यकीय उपचार, विदेशी शिक्षण आणि लग्न या तीन कारणांसाठीच ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येईल. मात्र RBI ची मंजुरी त्यासाठी घेणं बंधनकारक असणार आहे.
नवी दिल्ली : इराणमधून अलीकडेच मायदेशी परतलेल्या गझियाबादमधील एका व्यक्तीला करोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने देशात करोनाची लागण झालेल्यांची संख्या आता ३० वर पोहोचली आहे. जिल्हा, गट आणि ग्रामस्तरावर शीघ्र प्रतिसाद पथके स्थापन करण्याच्या सूचना सरकारने गुरुवारी राज्यांना दिल्या आहेत.
तेलंगणमधील दोघांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्थेत पाठविण्यात आले होते, मात्र त्यांना करोनाची लागण झाली नसल्याचा अहवाल आला आहे. बुधवापर्यंत इटालीतील१६ पर्यटकांसह २९ जणांना करोनाची लागण झाल्याचे आढळले होते. केरळमध्ये गेल्या महिन्यात तीन जणांना लागण झाली होती त्यांचाही यामध्ये समावेश आहे. हे तीन जण पूर्ण बरे झाल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले.
दरम्यान, गुरगावमध्ये काम करणाऱ्या आणि दिल्लीच्या पश्चिम भागात राहणाऱ्या पेटीएम कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या पाच जणांच्या रक्ताची चाचणी घेण्यात आली असून त्याचा अहवाल येईपर्यंत त्यांना स्वतंत्र कक्षात ठेवण्यात येणार आहे, असे दिल्ली सरकारच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. पेटीएमचा हा कर्मचारी गुरगावमधील ९१ जणांच्या संपर्कात आला होता. करोनाची लागण टाळण्यासाठी दिल्लीतील सर्व प्राथमिक शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केली आहे.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.