पहिल्या कारकीर्दीत मोदींची शैली एकतंत्री- एकाधिकारशाहीची होती. मोदी सरकार पहिल्या मुदतीच्या काळात संसद सुरळीतपणे चालवू शकले नाही, या आणि सरकारच्या कारभाराचे विच्छेदन करणाऱ्या अनेक बाबी प्रणब मुखर्जी यांनी आत्मचरित्रात नमूद केल्या आहेत.
‘द प्रेसिडेन्शियल इयर्स’ या मुखर्जी यांच्या चौथ्या खंडाचे प्रकाशन रूपा कंपनीने केले आहे. या पुस्तकातून काही महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. मोदी यांच्याशी मुखर्जी यांचे चांगले संबंध होते, तरी त्यांनी मोदींच्या काही निर्णयांवर टीकाही केली होती. त्याचा तपशील समोर आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चलनीकरणाचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्याला पाठिंबा मिळवण्यासाठी प्रणबदांची भेट घेतली होती. मोदी यांनी निर्णय घेण्यापूर्वी म्हणजे ८ नोव्हेंबर २०१६ च्या आधी त्याबाबत आपल्याशी चर्चा केली नाही.
देशाला उद्देशून भाषण केल्यानंतर ते राष्ट्रपती भवनात मला भेटायला आले. त्यांनी या निर्णयामागची कारणे सांगितली. काळा पैसा बाहेर काढणे, भ्रष्टाचाराचा मुकाबला करणे, दहशतवाद्यांचा निधी रोखणे असे तीन उद्देश त्यांनी सांगितले, माजी अर्थमंत्री या नात्याने या निर्णयाला त्यांनी माझा पाठिंबा मागितला होता पण नंतर आपण पाठिंबा देणारे निवेदन तत्त्वत: जारी केले. पण निश्चलनीकरणाने अपेक्षित परिणाम साध्य होणार नाहीत असेही म्हटले होते नंतर चार वर्षांनीही त्यातील कुठलेच परिणाम साध्य झालेले दिसले नाहीत.
मोदींना त्यांनी एक सल्लाही दिला होता त्यानुसार पंतप्रधानांचे संसदेत उपस्थित असणे हे त्या संस्थेच्या कार्यपद्धतीवर ठसा उमटवणारे असते. पंतप्रधान मोदी यांची दुसरी कारकीर्द सुरू झाली. त्यात त्यांनी त्यांच्या पूर्वसुरींकडून संसदेत उपस्थित राहण्याचा व दृश्य नेतृत्व वठवण्याचा प्रयत्न करावा. त्यांनी मतभेदाचे सूर ऐकून घेत संसदेत बोलले पाहिजे, असा सल्ला मुखर्जी यांनी दिला होता.
न्या. ए. एम. खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी, न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने मंगळवारी निकाल दिला. या प्रकल्पाला मिळालेली पर्यावरणविषयक परवानगी आणि प्रकल्प उभारणीसाठी जमिनीच्या वापराबाबत प्रसृत करण्यात आलेली अधिसूचना वैध असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्या. खानविलकर आणि न्या. माहेश्वरी यांनी ४३२ पानी बहुमताचे निकालपत्र देताना दहा याचिकांमधील आक्षेपांच्या मुद्दय़ांवर सविस्तर भाष्य केले आहे. केंद्र सरकारने ‘डीडीए’ कायद्याचा वापर करून या प्रकल्पासाठीच्या जमिनीच्या वापरासंबंधी केलेले बदल योग्य आहेत. त्याचा २० मार्च २०२० रोजीच्या अधिसूचनेत उल्लेख होता. तसेच पर्यावरणविषयक परवानगीची तज्ज्ञ समितीने केलेली शिफारस आणि त्यानुसार पर्यावरण मंत्रालयाने घेतलेला निर्णयही योग्य आहे, असे या निकालपत्रात स्पष्ट करण्यात आले. धोरणात्मक बाबींची अंमलबजावणी न्यायालय रोखू शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
या प्रकल्पाबाबत सरकारने कोणतीही घाई केली नसून, सर्व नियमांचे, निकषांचे पालन करण्यात आले आहे, असा दावा सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला होता.
सरकारने सप्टेंबर २०१९ मध्ये ‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाची घोषणा केली होती. हा प्रकल्प ऑगस्ट २०२२ पर्यंत पूर्णत्वास नेण्याचे नियोजन आहे. संसद भवनाची आसनक्षमता १२०० पर्यंत नेण्यात येणार आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयाने प्रकल्पाच्या भूमिपूजनास मंजुरी दिली होती. मात्र, बांधकाम करण्यास मनाई केली होती.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यांचा भारत दौरा रद्द केला आहे. ब्रिटनमध्ये करोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे परिस्थिती गंभीर आहे. करोनाचा हा स्ट्रेन वेगाने फैलावत आहे. स्वदेशातील या गंभीर परिस्थितीमुळे बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी निमंत्रण सुद्धा स्वीकारले होते.
“बोरिस जॉन्सन यांनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर फोनवरुन चर्चा केली. महिनाअखेरीस भारत दौऱ्यावर उपस्थित राहता येणार नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली” असे डाऊनिंग स्ट्रीटवरील प्रवक्त्याने सांगितले.
“करोना व्हायरसचा नवा स्ट्रेन वेगाने फैलावत असल्यामुळे काल रात्री ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. व्हायरसमुळे निर्माण होणारी परिस्थिती हाताळण्यासाठी यूकेमध्येच थांबणे आवश्यक आहे” असे जॉन्सन यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले.
काही दिवसांपूर्वी बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान मोदींना पुढच्यावर्षी युकेमध्ये होणाऱ्या G-7 परिषदेचे आमंत्रण दिले होते. यापूर्वी १९९३ साली जॉन मेजर हे भारताच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे ब्रिटनचे शेवटचे पंतप्रधान होते. पुढच्या दशकात भारत-ब्रिटन संबंध कसे असावेत? याविषयी मित्र आणि पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याबरोबर उत्तम चर्चा झाली असे मोदींनी २७ नोव्हेंबरच्या टि्वटमध्ये म्हटले होते.
भारत रशियाकडून S-400 एअर डिफेन्स सिस्टिम विकत घेणार आहे. अब्जावधी डॉलर्सचा हा खरेदी करार आहे. या करारामुळे अमेरिका भारतावर निर्बंध लादू शकते. अमेरिकन काँग्रेशनल रिपोर्टमधून हा इशारा देण्यात आला आहे.
“भारत टेक्नोलॉजी शेअरींग आणि सह उत्पादनासाठी उत्सुक आहे. भारताच्या संरक्षण ऑफसेट धोरणात सुधारणा करण्याची तसेच संरक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणूकीची मर्यादा वाढवण्याची अमेरिकेने विनंती केली आहे” असे काँग्रेशनल रिसर्च सर्व्हीसच्या रिपोर्ट्मध्ये म्हटले आहे. CRS हा अमेरिकन काँग्रेसचा स्वतंत्र संशोधन विभाग आहे.
भारताने रशिया बरोबर S-400 एअर डिफेन्स सिस्टिम खरेदीचा करार केला आहे. अमेरिकेच्या कॅटसा कायद्यातंर्गत भारतावर निर्बंध लादले जाऊ शकतात असा इशारा या अहवालातून देण्यात आला आहे. अमेरिकन काँग्रेसच्या सदस्यांसाठी हा अहवाल बनवला जातो.
CRS रिपोर्ट् हा अमेरिकन काँग्रेसचा अधिकृत रिपोर्ट् नाहीय. त्यात अमेरिकन काँग्रेस सदस्यांचे विचार देखील मांडण्यात आलेले नाहीत. स्वतंत्र तज्ज्ञांकडून काँग्रेसच्या सदस्यांसाठी हा अहवाद तयार केला जातो.
कर्णधार केन विल्यम्सनने (२३८ धावा) साकारलेल्या कारकीर्दीतील चौथ्या द्विशतकाला हेन्री निकोल्स (१५७) आणि डॅरेल मिचेल (नाबाद १०२) यांच्या शतकांची अप्रतिम साथ लाभल्यामुळे न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासह मालिका विजयाच्या दिशेने कूच केली आहे.
ख्राइस्टचर्च येथील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर पाकिस्तानची १ बाद ८ धावा अशी अवस्था झाली असून ते अद्यापही ३५४ धावांनी पिछाडीवर आहेत. त्यामुळे बुधवारी चौथ्याच दिवशी कसोटीचा निकाल लागण्याची शक्यता बळावली आहे.
सोमवारच्या ३ बाद २८६ धावांवरून पुढे खेळताना विल्यम्सन आणि निकोल्स यांनी पहिल्या सत्रात पाकिस्तानला एकही बळी मिळू दिला नाही. त्यांच्या सुमार गोलंदाजी आणि ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा लाभ उचलत दोघांनी चौथ्या गडय़ासाठी ३६९ धावांची भागीदारी रचली. निकोल्स १८ चौकार आणि एका षटकारासह १५७ धावांवर बाद झाला.
विल्यम्सनने मात्र द्विशतक साकारतानाच कसोटी कारकीर्दीतील सात हजार धावांचा टप्पाही गाठला. अखेर २८ चौकारांसह ३६४ चेंडूंत २३८ धावा केल्यानंतर फहीम अशरफने त्याला बाद केले. हे दोघे माघारी परतल्यावर मिचेलने हल्लाबोल करत कारकीर्दीतील पहिले कसोटी शतक झळकावले. त्याचे शतक झाल्यावर न्यूझीलंडने ६ बाद ६५९ धावांवर डाव घोषित केला आणि पहिल्या डावात ३६२ धावांची मोठी आघाडी मिळवली.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.