चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०५ फेब्रुवारी २०२०

Date : 5 February, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, भारताचे ३ गडी माघारी : 
  • टी-२० मालिकेत ५-० असा धडाकेबाज विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ वन-डे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. हॅमिल्टनच्या मैदानावर पहिला वन-डे सामना खेळवला जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • हॅमिल्टनचं मैदान हे आकाराने छोटं असल्यामुळे दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करताना फलंदाजांना सोपं जाणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. दरम्यान भारताकडून मयांक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ या तरुणांना संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे या मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा राजीनामा : 
  • महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. आज संध्याकाळीच विजया रहाटकर यांनी त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सादर केला. एका जनहित याचिकेवर झालेल्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांबाबत टिपण्णी केली होती. सरकार बदललं आहे.

  • त्यामुळे विजया रहाटकर यांनी राजीनामा द्यायला हवा आणि 5 फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारने नव्या अध्यक्षांची नेमणूक करावी असाही आदेश न्यायालयाने दिला होता. हा आदेश कायद्यातील तरतुदींविरोधात असल्याने रहाटकर यांनी या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हानही दिलं होतं.

  • मात्र आज विजया रहाटकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपण स्वतःहून राजीनामा देत असल्याचं विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. तसेच मागील साडेतीन वर्षांपासून आयोगाचे अध्यक्षपद सांभाळण्याचा बहुमान मिळाल्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली आहे. बालकल्याण विभाग, आयोगाचे कर्मचारी या सगळ्यांचेच आभार विजया रहाटकर यांनी मानले आहेत.

प्रेमदिनासाठी मावळातील गुलाबांची परदेशवारी : 
  • लोणावळा : जगभरातील युवकांकडून साजरा केल्या जाणाऱ्या ‘व्हेलेंटाइन डे’ अर्थात प्रेमदिनासाठी गुलाब फुलांना मोठी मागणी असते. गेल्या काही वर्षांपासून विविध देशांत ‘व्हेलेंटाइन डे’साठी पुणे जिल्ह्य़ातील मावळ तालुक्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांनी गुलाबपुष्पांची निर्यात सुरू केली आहे.

  • व्हेलेंटाइन डे १४ फेब्रुवारी रोजी असून मावळ तालुक्यातील फूल उत्पादक शेतक ऱ्यांनी गुलाब परदेशात पाठविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. मावळ तालुक्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून मोठय़ा प्रमाणावर गुलाबांची लागवड करत असून त्यासाठी त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीचा आधार घेतला जात आहे. त्यामुळे येथील गुलाबांना गेल्या काही वर्षांपासून परदेशातून मागणी वाढली आहे. परदेशात गुलाबांची निर्यात केल्यानंतर उर्वरित गुलाब देशांतर्गत बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविला जातो.

  • ‘व्हेलेंटाइन डे’च्या कालावधीत गुलाबाचे उत्पादन क से वाढेल, याचे नियोजन डिसेंबरपासून केले जाते. गुलाब फुलांची वाढ, योग्य ती औषध फवारणी, छाटणी याकडे लक्ष दिले जाते. ६० टक्के गुलाब परदेशात पाठविला जातो.

कौतुकास्पद! ई-कचऱ्यापासून २२ वर्षीय भारतीय तरुणाने बनवले ६०० ड्रोन : 
  • कर्नाटकमधील एन. एम. प्रताप या मुलाने वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी ‘ड्रोन वैज्ञानिक’ अशी ओळख मिळवली आहे. प्रतापने ई कचऱ्यापासून एक दोन नव्हे चक्क ६०० ड्रोन आतापर्यंत तयार केली आहेत. ड्रोनच्या मदतीने सामान्यांचे प्राण वाचवण्याच्या उद्देशाने प्रताप हे काम करत असल्याचे सांगतो. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी संकटात सापडलेल्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी हे ड्रोन वापरता यावेत असं प्रतापला वाटतं.

  • कशी झाली सुरुवात - वयाच्या १४ व्या वर्षीच प्रतापला ड्रोनबद्दल आकर्षण निर्माण झाले. त्याने वयाच्या १६ व्या वर्षी स्वत: पहिले ड्रोन बनवले. या ड्रोनच्या मदतीने उंचावरुन फोटो काढता यायचे असं प्रताप सांगतो. एकीकडे ड्रोनची आवड जपत दुसरीकडे प्रतापने आपल्या छंदाला साजेसं शिक्षणही घेतलं. त्याने मैसुरमधील जेएसएस कॉलेज ऑफ आर्ट्स आणि कॉमर्समधून बीएसचीचे शिक्षण घेतले आहे.

  • पुरामध्ये अशी केली मदत - प्रतापने आतापर्यंत अनेकदा ड्रोनच्या सहाय्याने आपत्कालीन परिस्थीतीमध्ये नागरिकांना मदत करणे, वाहतूककोंडीवर लक्ष ठेवणे, सीमासुरक्षेसंदर्भातील काम केलं आहे. सध्या तो ड्रोन हॅक होऊ नये यासंदर्भातील क्रिप्टोग्राफीचे काम करत आहे. कर्नाटकमध्ये २०१९ साली आलेल्या पुरामध्ये हजारो लोक अडकून पडले होते. त्यावेळी दूर्गम ठिकाणी अडकलेल्या लोकांना प्रतापच्या सहकार्याने ड्रोनच्या माध्यमातून अन्न आणि औषधे पोहचवण्यात आली होती.

‘आप’चेही सौम्य हिंदुत्व : 
  • नवी दिल्ली : शाहिनबागवरून भाजपने मतांच्या धुव्रीकरणावर भर दिल्यानेच आम आदमी पार्टीने मंगळवारी सौम्य हिंदुत्वाचा पुरस्कार केला. तसेच बुधवारी दुपारी १ वाजेपर्यंत भाजपने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा, असे आव्हानही ‘आप’ने दिले.

  • ‘आप’ने मंगळवारी निवडणूक जाहीरनामाही प्रसिद्ध केला असून शाळांमध्ये ‘देशभक्ती’ कार्यक्रम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. या कार्यक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांंमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत होईल, विद्यार्थ्यांमध्ये जवानांविषयी आणि तिरंग्याबाबत प्रेम-आदर वाढेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

  • भाजपच्या कडव्या हिंदुत्ववादी प्रचाराला उत्तर देण्यासाठी ‘आप’ने सौम्य हिंदुत्वाचे प्रत्युत्तर दिले असल्याचे मानले जात आहे. केजरीवाल यांनी स्वत:ला हनुमानाचे भक्त मानले असून हनुमान चालिसाही त्यांनी म्हणून दाखवली. त्यावरून आता भाजपने केजरीवाल यांच्यावर टीका सुरू केली आहे.

‘एनआरसी’ तूर्त देशव्यापी नाही : 
  • नवी दिल्ली : वादग्रस्त ठरलेली राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) देशभर लागू करण्याचा निर्णय अद्याप तरी घेतलेला नाही, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी लोकसभेत दिली. मात्र, ‘एनआरसी’सह सुधारित नागरिकत्व कायदा आणि त्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद मंगळवारीही संसदेत उमटले.

  • गेल्या अधिवेशनात नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशभर राष्ट्रीय नागरिक नोंदणीही केली जाईल, असे म्हटले होते. गेल्या महिन्यात रामलीला मैदानावरील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय नागरिक नोंदणी आता तरी देशभर लागू केली जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र, दिल्ली तसेच अन्य राज्यांमध्ये ही नोंदणी करावी, अशी मागणी भाजपच्या नेत्यांकडून केली जात आहे.

  • या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय नागरिक नोंदणीसंदर्भात सरकारच्या भूमिकेबाबत लोकसभेत प्रश्न विचारण्यात आला होता. लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या निमित्ताने केंद्र सरकारने पहिल्यांदाच अधिकृतपणे नागरिकत्व नोंदणीबाबत भूमिका स्पष्ट केली.

०५ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.