मुंबई : स्वामी समर्थ व्यायामशाळेच्या सुशील मुरकरने मनीष आडविलकर्स ‘परळ-श्री’ किताब पटकावला. त्याने दीपक तांबीटकर, गणेश पेडामकर यांच्यावर मात करीत रॉयल एनफिल्ड पटकावली. बाल मित्र जिमचा शुभम कांडू फिजिक स्पोर्ट्स गटात विजेता ठरला तर दिव्यांगाच्या गटात डी.एन. फिटनेसचा हितेश चव्हाण अव्वल आला.
‘परळ-श्री’ स्पर्धेचा निकाल - १. सुशील मुरकर, २. दीपक तांबीटकर, ३. गणेश पेडामकर; फिजिक स्पोर्ट्स : १. शुभम कांडू, २. विजय हाप्पे, ३. अली अब्बास; दिव्यांग गट : १. हितेश चव्हाण, २. अक्षय शेजवळ, ३. प्रथमेश भोसले.
महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्या अर्थात बुधवार दिनांक ४ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता मुंबईतील विधानभवन या ठिकाणी होणार आहे.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर या मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
अर्थसंकल्प सोप्या भाषेत असं पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रस्तावना लाभली आहे. राज्याचा अर्थसंकल्प हा काहीसा किचकट विषय असतो. अनेकदा सामान्यांना त्यातील अनेक तरतुदी, घोषणा, आश्वासनं याबाबतची माहिती या पुस्तकात असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या कार्यक्रमात विशेष उपस्थिती असणार आहे.
महाविकास आघाडीचा प्रयोग राज्यात झाल्यापासून भाजपा आणि शिवसेना या दोन पक्षात विस्तव जात नाही. हे महाराष्ट्र पाहतोच आहे. अशात देवेंद्र फडणवीस यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्य उपस्थिती असणार आहे ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची.
वॉशिंग्टन : भारतीय -अमेरिकी आरोग्य धोरण सल्लागार सीमा वर्मा यांना अमेरिकेत करोना विषाणूचा सामना करण्यासाठी स्थापन केलेल्या व्हाइट हाऊस करोनाविषाणू कामगिरी दलात प्रमुख सदस्य म्हणून नेमण्यात आले आहे. अध्यक्ष ट्रम्प यांनी हे पथक ३० जानेवारीला स्थापन केले.
चीनमध्ये करोनाचा प्रसार वेगाने सुरू झाल्यानंतर ट्रम्प यांनी त्याची दखल घेऊन वेळीच त्याचा अमेरिकेत प्रवेश मर्यादित ठेवण्यासाठी, तसेच संसर्ग सुरू झाला तर उपाययोजना करण्यासाठी पथक स्थापन केले होते. आरोग्य व मानवी सेवा मंत्री अॅलेक्स अझार हे या पथकाचे प्रमुख आहेत. राष्ट्रीय सुरक्षा मंडळा समवेतही त्यांचा समन्वय आहे.
उपाध्यक्ष माइक पेन्स यांनी सोमवारी ट्विट संदेशात म्हटले आहे, की सीमा वर्मा यांची नेमणूक सेंटर्स फॉर मेडिकेअर अँड मेडिकेड सव्र्हिसेसच्या प्रशासक म्हणून करण्यात आली आहे. ‘ज्येष्ठ कामकाज’ मंत्री रॉबर्ट विल्की यांचीही नेमणूक त्यात करण्यात आली आहे.
गडचिरोली : पॉप्युलेशन फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या ५०व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांना लोकसेवेसाठी ‘जेआरडी टाटा अॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा यांनी दोघांना पुरस्कृत केले. नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे एका बहारदार कार्यक्रमात हा सन्मान सोहळा रंगला.
पुरस्कार सोहळ्याचे निमित्त सांगताना रतन टाटा म्हणाले, पॉप्युलेशन फाऊंडेशनला ५० वर्षे पूर्ण झाली आहे. आज भारतातील युवांची संख्या जवळपास ३७ कोटींच्याही वर आहे. देशाचे भविष्य युवा पिढीच्या हाती आहे. देशाच्या प्रगतीसाठी तरुणांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्यासाठी युवांची सक्षम पिढी निर्माण होणे आवश्यक आहे. आजचे सन्मानमूर्ती असलेले डॉ. बंग दाम्पत्य आरोग्यासोबतच सामाजिक भान असलेली युवा पिढी तयार करण्याचे काम अनेक वर्षांपासून करीत आहे.
लोकसेवेसाठी प्रथमच दिला जाणारा जेआरडी टाटा सन्मान या दोघांना देताना म्हणूनच आनंद होत असल्याची भावना रतन टाटा यांनी व्यक्त केली. पुरस्काराला उत्तर देताना डॉ. अभय बंग म्हणाले, देशाचे आरोग्य आज वेगळ्या वळणावर आहे. जीवनमान झपाटय़ाने बदलत आहे. यामध्ये तग धरण्यासाठी लोकांचे आरोग्य सुदृढ असणे आवश्यक आहे. त्यासाठी गांधींनी सांगितलेली ‘आरोग्य स्वराज’ ही संकल्पना नव्याने समजून घेणे आवश्यक आहे. ‘स्वत: मध्ये स्थित असलेला स्वस्थ’ अशी भारतीय आरोग्याची व्याख्या सांगताना लोकांचे आरोग्य लोकांच्या हाती देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडिया सोडणार नाहीत. कारण त्यांनी केलेलं एक नवं ट्विट समोर आलं आहे. सोमवारी रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केलं होतं.
त्यामध्ये सोशल मीडिया सोडण्याचा विचार करतो आहे असं त्यांनी म्हटलं होतं. ते असं का म्हणाले त्याचं कारण आता समोर आलं आहे.
#SheInspiresUs असा हॅशटॅग मोदींनी ट्विट केला आहे. ८ मार्च म्हणजेच रविवारी महिला दिनाच्या दिवशी आपली सगळी सोशल मीडिया अकाऊंट्स महिलांना हँडल करायला देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडिया सोडणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.