सोलापूर : युनेस्को आणि लंडनस्थित ‘वार्की फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या ‘ग्लोबल टीचर पुरस्कारा’साठी सोलापूरमधील परितेवाडीतील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांची निवड झाली. तब्बल सात कोटी रुपयांचा (एक दशलक्ष अमेरिकी डॉलर) हा पुरस्कार असून ते मिळवणारे डिसले हे पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत.
लंडनमधील ‘नॅचरल हिस्ट्री म्युझियम’मध्ये गुरुवारी झालेल्या एका कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीव्हन फ्राय यांनी या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. जगभरातील १४० देशांतील १२ हजारांपेक्षा अधिक शिक्षकांनी या पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर केले होते.
त्यातून प्राथमिक फेरीसाठी पन्नास, तर अंतिम फेरीसाठी डिसले यांच्यासह इटली, ब्राझिल, व्हिएतनाम, मलेशिया, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि ब्रिटनमधील दहा शिक्षकांना नामांकने जाहीर झाली होती.
मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने निवड करण्यात आलेल्या देशातील दहा उत्कृष्ट पोलीस ठाण्यांच्या यादीत महाराष्ट्रातील एकाही पोलीस ठाण्याचा समावेश झालेला नाही.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने दरवर्षी देशातील दहा पोलीस ठाण्यांना उत्कृष्ट पोलीस ठाण्याचा पुरस्कार दिला जातो. २०२० मधील दहा पोलीस ठाण्यांची यादी गुरुवारी गृहमंत्रालयाने जाहीर केली. मणिपूरमधील थोंबूल जिल्ह्य़ातील पोलीस ठाण्याला पहिला पुरस्कार मिळाला. दुसरा क्रमांक तमिळनाडूतील सालेम शहर तर तिसऱ्या क्रमांकावर अरुणाचल प्रदेशमधील चँगलँग जिल्ह्य़ातील पोलीस ठाण्याला मिळाला.
महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या दादरा नगर- हवेली खानवेल पोलीस ठाण्याचा दहा जणांच्या यादीत समावेश आहे.
गोवा, छत्तीसगड, अंदमान आणि निकोबार, सिक्कीम, उत्तर प्रदेश, तेलंगणा या राज्यांमधील पोलीस ठाण्यांचा दहा जणांच्या यादीत समावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातील एकाही पोलीस ठाण्याचा समावेश झालेला नाही.
भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये अडकलेले इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्यासहीत संपूर्ण इस्रायलवरच नवीन राजकीय संकट ओढावले आहे. इस्रायलची संसद म्हणजेच नेसेट बरखास्त करण्याचा प्राथमिक प्रस्ताव बहुमताने संमत झाला आहे. हा निर्णय म्हणजे नेतान्याहू यांच्या राजकीय अस्ताची सुरुवात असल्याचे सांगितले जात आहे. हा प्रस्ताव संमत झाल्याने देशामध्ये दोन वर्षात चौथ्यांना सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नेतान्याहू यांच्यासोबत युती करुन सत्तेत असणारे सहय्योगी बेनी गेंट्ज यांनी नेतान्याहू यांनी दिलेलं वचन पाळलं नाही असा आरोप केला आहे. गेंट्ज यांनी नेतान्याहू यांच्याविरोधात मतदान केलं आहे. देशामध्ये पुन्हा सार्वत्रिक निवडणूक होणंच फायद्याचं आहे, असं गेंट्ज म्हणाले आहेत.
भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांसंदर्भात नेतान्याहू यांच्याविरोधात अनेक गंभीर आरोप करण्यात आले. मागील अनेक महिन्यांपासून तेल अवीवच्या रस्त्यांवर नेतान्याहू यांच्याविरोधात आंदोलनं केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर देशाच्या संसदेत संसद बरखास्त करण्यासंदर्भातील प्रस्तावावर घेण्यात आलेल्या मतदानामध्ये संसद बरखास्त करण्याच्या बाजूने ६१ जर विरोधात ५४ मतं पडली. पुढील आठवड्यात होणाऱ्या अंतिम मतदानानंतर संसद बरखास्त करण्यात येऊ शकते. असं झाल्यास मार्च अथवा एप्रिल महिन्यात देशात पुन्हा निवडणूक होण्याची शक्यता आहे.
अंतिम मतदानापर्यंत हे प्रकरण जाऊ नये म्हणून सध्या सत्तेत असणाऱ्या दोन्ही पक्षांचे नेते आणि पदाधिकारी पुढील काही दिवसांमध्ये अनेक बैठका घेण्याची शक्यता असल्याचे रॉयटर्सच्या वृत्तात म्हटलं आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला पराभव अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अद्यापही अमान्य आहे. या निवडणुकीत मोठय़ा प्रमाणावर गैरप्रकार झाल्याच्या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला. निवडणुकीचा निकाल काहीही असला तरी चालेल मात्र तो अचूक असल्यासच आपण स्वीकारण्यास तयार आहोत, असे ट्रम्प यांनी आता स्पष्ट केले आहे.
डमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी विद्यमान अध्यक्ष ट्रम्प यांचा ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत पराभव केला. तथापि, ट्रम्प यांनी पराभव मान्य केला नसून निकालास कायदेशीर आव्हान दिले आहे.
निवडणुकीत पराभव झाला तरी त्याचे वाईट वाटणार नाही, मात्र जो निर्णय होईल तो निष्पक्षपाती हवा आणि म्हणूनच आम्ही लढा देत आहोत कारण आमच्यासमोर अन्य पर्यायच नाही, असे ट्रम्प यांनी बुधवारी व्हाइट हाऊसमध्ये आयोजित एका कार्यक्रमात स्पष्ट केले. हा कार्यक्रम केवळ ट्रम्प समर्थकांसाठीच आयोजित करण्यात आला होता, माध्यमांसाठीही तो खुला नव्हता, त्याचा व्हिडीओ बुधवारी व्हायरल करण्यात आला.
आमच्याकडे पुरावे आहेत आणि ते सुस्पष्ट आहेत, माध्यमे आणि काही न्यायाधीशांनी ते स्वीकारण्यास नकार दिला आहे, पुरावे खरे असल्याची त्यांनाही जाणीव आहे, निवडणुकीत कोण विजयी झाले आहे तेही त्यांना माहिती आहे, परंतु तुम्ही बरोबर आहात हे सांगण्यास ते नकार देत आहेत, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.