चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०३ मे २०२१

Date : 3 May, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
केंद्राचे लसधोरण आरोग्यहक्कास बाधक :
  • केंद्र सरकारचे लसीकरण धोरण हे जनतेच्या आरोग्यहक्कास बाधक असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. त्यामुळे सरकारने लसधोरणात बदल करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. एल. नागेश्वर राव आणि एस. रवींद्र भट यांच्या खंडपीठाने केंद्राला दिले आहेत.

  • करोनाच्या आपत्ती व्यवस्थापनाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत असून, रविवारी न्यायालयाने आदेशपत्राद्वारे महत्वाच्या शिफारशी व निर्देश दिले. आरोग्य हा राज्यघटनेच्या अनुच्छेद २१ चा अविभाज्य आहे, याकडे लक्ष वेधत न्यायालयाने लसधोरणात बदल करण्याचे केंद्राला निर्देश दिले. रुग्णांकडे स्थानिक निवासाचा दाखला वा ओळखपत्र नसले तरी, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापासून वा अत्यावश्यक औषधांपासून वंचित ठेवता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याबाबत दोन आठवड्यांत राष्ट्रीय धोरण निश्चिात करण्याचे आदेश केंद्राला दिले असून या धोरणाचे देशातील सर्व रुग्णालयांना पालन करावे लागेल.

  • अहमदाबादमध्ये करोनाच्या रुग्णाला विशिष्ट रुग्णवाहिकेतून न आणल्याचे कारण देत रुग्णालयाने दाखल करून घेण्यास नकार दिला होता. आता हा नियम गुजरात प्रशासनाने रद्द केला आहे. काही ठिकाणी निवासाचा दाखला नसल्याचे कारण देत करोना रुग्णांवर उपचार करण्यास रुग्णालयांनी  नकार दिला होता. रुग्णालयांसंदर्भातील धोरणातील विसंगतीची दखल घेत, रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्याबाबत देशभर समान सूत्र लागू करण्याचा आदेश न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे.

MBBS अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची कोविड सेवेसाठी मदत?; उद्या निर्णयाची शक्यता :
  • देशातील करोनाचं संकट पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य तज्ज्ञांसोबत वर्चुअल बैठक घेतली. या बैठकीत महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर केंद्रातील मोदी सरकार सोमवारी मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • एमबीबीएस आणि नर्सिंगच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना कोविड ड्युटीसाठी तैनात करण्याचा निर्णय घेणार असल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर मेडिकल प्रवेशासाठी असलेली NEET परीक्षा रद्द करण्याची शक्यता आहे. तसेच एमबीबीएस अंतिम वर्षाची परीक्षाही लवकर घेतल्या जाण्याची शक्यता आहे.

  • सध्या देशात आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत चालला आहे. या मुद्द्यावर वर्चुअल बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर उद्या निर्णय घेण्याची शक्यता आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गात जागेचा अडसर :
  • प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्य़ात सुमारे २९ हजार ७८८ घरकु लांचे काम केवळ लाभार्थ्यांकडे जागा नसल्याने रखडल्याचे वास्तव समोर आले असून आता यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंचांना पुढाकार घ्यावा लागणार आहे.

  • प्रधानमंत्री आवास योजनेत प्राधान्याने बेघर लाभार्थीना घरकु लाचा लाभ देण्याबाबतचे सरकारचे धोरण आहे. या योजनेअंतर्गत सर्वाना घरकु लांचा लाभ मिळावा, यासाठी १९ नोव्हेंबर २०२० पासून राज्यात महाआवास अभियान राबवण्यात येत आहे.

  • जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात २०१६-१७ ते २०-२१ पर्यंत एकू ण ९३ हजार १९२ घरकु ले उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी ६३ हजार ४०४ घरकू ल लाभार्थीना मंजुरी देण्यात आली. जागा नसलेल्या लाभार्थीसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी योजनेअंतर्गत जागा खरेदी, अतिक्र मण नियमानुकू ल करणे, जागा नसलेल्या लाभार्थीना खुले भूखंड उपलब्ध करून देणे तसेच ई आणि एफ वर्ग शासकीय जमिनीमधून जागा उपलब्ध करून देण्यात येत असली, तरी अजूनही जिल्ह्य़ात तब्बल २९ हजार ७८८ लाभार्थ्यांच्या घरकु लांना मंजुरी मिळू शकलेली नाही. बहुतांश प्रकरणांमध्ये लाभार्थ्यांकडे घरकू ल बांधकामासाठी जागा नसल्याचे दिसून आले आहे.

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता :
  • येत्या ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात राज्यात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून झालेल्या बैठकीतही या संदर्भात सूतोवाच झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे सांगितले.

  • महाराष्ट्र दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले, तिसऱ्या संभाव्य लाटेची तीव्रता कमी करणे आणि आवश्यक ती आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यावर राज्य सरकार लक्ष केंद्रित करीत आहे. प्राणवायू, औषधी, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि रुग्णालयांतील खाटा तिसऱ्या संभाव्य लाटेच्या वेळी कमी पडणार नाहीत याकडे लक्ष देण्यात येत आहे.

  • संबंधित शासकीय यंत्रणेस मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून या संदर्भात निर्देश दिले आहे. करोनाच्या संदर्भात वेळोवेळी शासनाच्या पातळीवरून घालून दिलेल्या नियमांचे पालन जनतेमधून काटेकोरपणे झाले तर तिसऱ्या संभाव्य लाटेची तीव्रता कमी राहू शकेल.

  • लसीकरण हा राष्ट्रीय कार्यक्रम असून या संदर्भात केंद्र सरकारच्या सूचनांचे तंतोतंत पालन राज्य सरकार करीत आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकण करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. सध्या प्रत्येक जिल्ह्य़ात पाच ठिकाणी लसीकरणाचे सत्र यासाठी राबविण्याचे ठरविण्यात आले आहे, असेही टोपे यांनी सांगितले.

माजी राष्ट्रीय निवड समिती सदस्य किशन रुंगठा यांचे करोनामुळे निधन :
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीचे माजी सदस्य आणि राजस्थानचे माजी कर्णधार किशन रुंगठा यांचे करोनामुळे जयपूरमधील रुग्णालयात शनिवारी निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. ज्येष्ठ प्रशासक रुंगठा यांना करोनाची लागण झाल्यामुळे गेल्या आठवडय़ात रुग्णालयात दाखल करण्यात आले.

  • परंतु शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली. रुंगठा यांनी १९५३ ते १९७० या कालखंडात ५९ सामन्यांत राजस्थानकडून खेळताना एकूण २७१७ धावा केल्या. निवृत्तीनंतर १९९८ मध्ये राष्ट्रीय निवड समितीमध्ये मध्य विभागाकडून स्थान मिळवले.

  • सत्तरच्या दशकात रुंगठा यांचे दिवंगत बंधू पुरुषोत्तम यांनी ‘बीसीसीआय’चे कोषाध्यक्षपद भूषवले होते. पुरुषोत्तम यांचा मुलगा किशोर यांनी २०००च्या पूर्वार्धात हेच पद भूषवले.

  • रुंगठा कुटुंबीयांनी पाच दशके राजस्थान क्रिकेट प्रशासनावर राज्य गाजवले. २००५ मध्ये ललित मोदी यांनी रुंगठा यांना निवडणुकीत पराभूत करून राजस्थानच्या क्रिकेट सत्तेवर ताबा मिळवला.

०३ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.