नवी दिल्ली : करोनाच्या साथीतून जग सावरत असताना नँटिस (फ्रान्स) येथे झालेल्या अॅलेक्सिस व्हॅस्टिने बॉक्सिंग स्पर्धेत जागतिक रौप्यपदकविजेता अमित पंघाल (५२ किलो), आशीष कु मार (७५ किलो) आणि संजीत (९१ किलो) यांनी सुवर्णपदकांची कमाई केली.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या आणि राष्ट्रकु ल रौप्यपदक विजेत्या अमितने अमेरिकेच्या रेने अब्राहमला ३-० अशी धूळ चारली. भारतीय खुल्या बॉक्सिंग स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या संजीतने फ्रोन्सच्या सोहेब बौफियाचे आव्हान मोडीत काढले.
आशियाई रौप्यपदक विजेत्या आशीषला अमेरिके चा प्रतिस्पर्धी जोसेफ ग्रेरामी हिक्सने दुखापतीमुळे माघार घेतल्याने विजेता ठरवण्यात आले. तथापि, आशियाई रौप्यपदक विजेत्या कविंदर सिंग बिश्तला ५७ किलो वजनी गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. फ्रान्सच्या सॅम्युएल किस्टॉहरीने त्याला २-१ असे पराभूत के ले.
उपांत्य फे रीत पराभूत झालेल्या शिवा थापा (६३ किलो), सुमित सांगवान (८१ किलो) आणि सतीश कु मार (+९१ किलो) या भारताच्या तिघांना कांस्यपदके मिळाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने स्वत:च्या प्रचारासाठी रोज दोन कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मिळेल्या आकडेवारीनुसार मोदी सरकारने मागील आर्थिक वर्षामध्ये वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि होर्डींग्सच्या माध्यमातून केलेल्या जाहिरातींवर करदात्यांचे ७१३ कोटी २० लाख रुपये खर्च केल्याचे उघड झालं आहे.
सरकारने ही रक्कम जाहिरातबाजी आणि प्रचारासाठी खर्च केली आहे. मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते जतिन देसाई यांनी आरटीआयअंतर्गत या संदर्भातील माहिती मागवली होती. या अर्जाला उत्तर देताना सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ब्यूरो ऑफ अकाटरिच अॅण्ड कम्युनिकेशनने दिलेल्या माहितीनुसार केंद्राने २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये जाहिरातींवर दिवसाला सरासरी एक कोटी ९५ लाख रुपये खर्च केले आहेत.
मागील आर्थिक वर्षामध्ये लोकसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकही पार पडली. ७१३ कोटींपैकी इलेक्ट्रॉनिक मीडियावर ३१७ कोटी ५ लाख, प्रिंट मीडियावर २९५ कोटी ५ लाख आणि आऊटडोअर म्हणजेच होर्डींग आणि जाहिरातींवर १०१ कोटी १० लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केलं आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी उर्वरित दोन टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघातमध्ये झोकून दिलं आहे. एनडीएकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीश कुमार यांच्यासह भाजपा-जदयूचे दिग्गज नेते प्रचारासाठी मैदानात उतरलेले असताना महाआघाडीकडून तेजस्वी यादव यांनीही प्रचार सभांचा धडाकाच लावला आहे. तेजस्वी यादव यांनी शनिवार लालू प्रसाद यादव यांच्या सभांचाच विक्रम मोडीत काढला.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानं जोर पकडला आहे. जदयूचे नेते प्रचारात असून, भाजपाच्या नेत्यांनीही बिहारमध्येच मुक्काम ठोकल्याचं चित्र आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चार सभा घेत प्रचाराचा धुरळा उडवला. तर दुसरीकडे राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी सभांचा विक्रमच करून टाकला. विशेष म्हणजे तेजस्वींनी वडील लालू प्रसाद यादव यांचाच विक्रम मोडला.
लालू प्रसाद यादव यांनी एका दिवसात १६ प्रचारसभा केल्याचा विक्रम आहे. त्यांचा हा विक्रम तेजस्वी यादवांनी शनिवारी मोडला. तेजस्वी यादवांनी शनिवारी १७ प्रचारसभा आणि दोन रोड शो करत एका दिवसात तब्बल १९ प्रचारसभा घेतल्या.
करोनाच्या संकटामुळं गेल्या आठ महिन्यांपासून अर्थव्यवस्था वाईट स्थितीतून जात असताना आता सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच ऑक्टोबरमध्ये जीएसटीतून मिळणारा महसूल १,०५,१५५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. अर्थ मंत्रालयानं रविवारी ही माहिती दिली. गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी संकलनापेक्षा यंदा जीएसटीतून मिळालेला महसूल दहा टक्के जास्त आहे.
अर्थ मंत्रालयाने सांगितलं की, “ऑक्टोबर २०२० मध्ये एकूण जीएसटीचा महसूल १,०५,१५५ कोटी रुपये राहिला. यामध्ये केंद्रीय जीएसटी १९,१९३ कोटी रुपये तर राज्यांचा जीएसटी २५,४११ कोटी रुपये आहे. तसेच एकत्रित जीएसटी ५२,५४० कोटी रुपये आहे. (आयातीतून मिळालेल्या २३,३७५ कोटी रुपयांसह) तसेच उपकर हा ८,०११ कोटी रुपये आहे. (आयातीसह एकत्रित ९३२ कोटी रुपयांसह)”
ऑक्टोबर २०२० मध्ये जीएसटी संकलन गेल्या वर्षीच्या याच महिन्यापेक्षा १० टक्क्यांनी अधिक आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये जीएसटी संकलन ९५,३७९ कोटी रुपये राहिला. अर्थ मंत्रालयानं सांगितलं की, “३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत दाखल करण्यात आलेल्या एकूण जीएसटी आर-३ बी रिटर्नची संख्या देखील ८० लाखांवर पोहोचली आहे.”
विधानपरिषदेसाठी १२ जागांसाठी उमेदवारांच्या नावांची शिफारस महाविकासआघाडीकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली जाणार आहे. यादी आज, सोमवारी (२ नोव्हेंबर ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सुपूर्द करणार आहेत. बंद लिफाफ्यात कोणती नावं आहेत? त्याचबरोबर राज्यपाल महाविकास आघाडी सरकारच्या नावांना मंजुरी देणार की आडकाठी करणार यावर सर्वांचं लक्ष आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगावमध्ये बोलताना विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी बारा नावे ठरल्याची माहिती दिली. मात्र, ही नावे गुपित आहेत ती फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच माहिती आहेत. योग्यवेळी ती नावे आम्ही जाहीर करण्यात येणार असल्याचं अनिल देशमुख म्हणाले.
राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात झालेल्या संघर्षानंतर राज्यपाल या नावांना पसंती देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांचं नाव असणार का याबाबत देखील राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु आहे. मात्र अद्याप खडसेंचं नाव निश्चित झालं नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.