भारतीय वंशाच्या भाव्या लाल यांना अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाच्या कार्यकारी प्रमुख पदावर नियुक्त करण्यात आलं आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भाव्या यांचं नाव नासाच्या परिक्षम मसितीच्या सदस्य म्हणून निवडलं आहे. यासंदर्भात नासानेही एक पत्रक जारी करत भाव्या यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली आहे. भाव्या यांची नियुक्ती ही भारतीयांसाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. व्हाइट हाऊसकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये भाव्या यांच्याबरोबरच नासामधील इतर प्रमुख पदांवरील नियुक्त्यांचीही घोषणा करण्यात आली आहे.
भाव्या यांना अभियांत्रिकी आणि अवकाश संशोधन या दोन्ही क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा दांडगा अनुभव आहे. मात्र भाव्या यांच्यावर अशी महत्वाची जबाबदारी टाकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी भाव्या नाच्या इनोव्हेटिव्ह अॅडव्हान्स कॉन्सेप्ट्स प्रोग्रॅम म्हणजेच नवीन संकल्पनांवर काम करण्यासंर्भातील उपक्रम आणि अॅडव्हायझरी काऊन्सीलसाठी तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण संकल्पा आणि अभियांत्रिकी सल्लागार समितीच्या सदस्य देखील होत्या.
भाव्या यांनी स्पेस टेक्नोलॉजी क्षेत्रामध्ये मागील दीड दशकांहून अधिक काळ काम केलं आङे. तसेच त्या इन्स्टीट्यूट ऑफ डिफेन्स अॅनालिसिस सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी पॉलिसी इंन्स्टीट्यूटमध्ये (एसटीपीआय) रिसर्च स्टाफ म्हणून २००५ ते २०२० दरम्यान कार्यरत होत्या.
एसटीपीआय मध्ये सहभागी होण्याअगोदर त्या सी-सटीपीएस एलएलसीच्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत. त्यापूर्वी भाव्या यांनी केंब्रिजमधल्या मैसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरण अभ्यास केंद्राचे संचालक पद भूषवलं आहे. अमेरिकेच्या न्यूक्लिअर सोसायटीच्या अण्वस्त्रविषयक वार्षिक परिषदेच्या अध्यक्षस्थानीही भाव्या यांची नियुक्ती करण्यात आली होती.
सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाशी संबंधित ‘चुकीचा व प्रक्षोभक मजकूर’ असलेली २५० हँडल्स व पोस्ट्स यांच्याविरुद्ध कारवाई करावी, असे सरकारने सांगितल्यानंतर, ट्विटरने ब्लॉक केलेली अनेकखाती व ट्वीट्स सोमवारी सायंकाळी पुन्हा सुरू केली.
ट्विटने या आदेशाचे पालन केल्यानंतर, कंपनी व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सोमवारी सायंकाळी बैठक घेतली. यात ट्विटरने मुक्त भाषणाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर, ब्लॉक केलेली खाती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हजारो अनुयायी असलेल्या आणि सध्याच्या आंदोलनात सक्रिय असलेल्या किसान एकता मोर्चा व भारतीय किसान युनियन एकता उग्रहण यांचा ब्लॉक करण्यात आलेल्या खात्यांमध्ये समावेश होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या ‘नरसंहाराची’ योजना आखली असल्याचा कुठल्याही पुराव्याशिवाय आरोप करणारे हॅशटॅग असलेल्या अनेक ‘खोटी, धमकावणारी व प्रक्षोभक ट्वीट्स’ करणारी सुमारे २५० ट्वीट्स/ ट्विटर खाती ब्लॉक करावी, असे निर्देश इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिले होते.
पूर्व लडाखमध्ये चीन बरोबर सीमावाद सुरु झाल्यानंतर लष्करी क्षमता वाढवण्यासाठी भारताने शस्त्रास्त्रांच्या आपत्कालीन खरेदीवर २०,७७६ कोटी रुपये खर्च केले. लडाखमध्ये दोन्ही देशांचे मिळून एक लाख सैनिक तैनात आहेत. रणनितीक दृष्टीने महत्त्वाच्या फॉरवर्ड भागांमध्ये भारताने अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची तैनाती केली आहे. अर्थसंकल्पातील कागदपत्रांमधून ही बाब स्पष्ट झाली.
मागच्यावर्षी सैन्याच्या अत्याधुनिकीकरणासाठी ज्या निधीची तरतूद करण्यात आली होती, त्यापेक्षा जास्त खर्च सैन्य क्षमता वाढवण्यावर करण्यात आला. २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात भांडवली खर्चासाठी १.१३ लाख रुपये राखून ठेवण्यात आले होते.
चीन बरोबर सीमावादामुळे भारताला हवेतून जमिनीवर मारा करणारी शस्त्रास्त्रे, क्षेपणास्त्र, रॉकेटस, हवाई सुरक्षा सिस्टिम, जीपीएस गाइडेड दारुगोळा, रणागाडयाची युद्धसामग्री आणि असॉल्ट रायफल्स खरेदी कराव्या लागल्या. अमेरिका, रशिया. फ्रान्स आणि इस्रायल या देशांकडून भारताने शस्त्रास्त्रांची खरेदी केली.
यंदा २०२१-२२ साठी १.३५ लाख कोटी रुपये भांडवली खर्च म्हणजे अत्याधुनिकी करणासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. भारताची वायूदलासाठी नवीन फायटर विमाने, मध्यम वाहतूक विमाने, बेसिक ट्रेनर विमाने, हलकी लढाऊ हेलिकॉप्टर्स, जमिनीवरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे खरेदीसाठी ऑर्डर देण्याची योजना आहे.
रणजी करंडकाऐवजी प्राधान्य देण्यात आलेल्या विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेला १८ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) विश्वसनीय सूत्रांनी याविषयी सोमवारी माहिती दिली.
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतीलच ठिकाणांवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे समजते. परंतु अहमदाबाद येथे भारत-इंग्लंड यांच्यातील दोन कसोटी तसेच पाच ट्वेन्टी-२० सामने होणार असल्याने यंदा मोटेराऐवजी कोलकातामधील ईडन गार्डन्स किंवा मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे बाद तसेच अंतिम फेरीच्या सामन्यांचे आयोजन करण्यात येण्याची शक्यता आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या ३८ संघांना सहा गटांत विभागण्यात येणार असून लवकरच सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. विजय हजारे स्पर्धेला प्रारंभ होण्याच्या दिवशीच दुसरीकडे ‘आयपीएल’ची लिलाव प्रक्रियाही होणार आहे.
पुणे (लष्कर) : पुणे ,खडकी, देहूरोड सहित राज्यातील ७ व देशभरातील ५६ कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय संरक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या ११ तारखेपासून होईल. या आदेशाला पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांनी दुजोरा दिला आहे.
संरक्षण विभागाच्या प्रधान निर्देशकांनी याबाबतचे पत्र देशभरातील सर्व कॅन्टोन्मेंटच्या मुख्यकार्यकरी अधिकाऱ्यांना पाठवले आहे. हे सर्व कॅन्टोन्मेंट बोर्ड १० फेब्रुवारी २०१५ ला अस्तित्वात आले होते. १० फेब्रुवारी २०२९ला त्यांचा कार्यकाळ संपला. परंतु, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कायद्यात ६ महिन्यांचा कार्यकाळ वाढवून देण्याची तरतूद आहे, त्यामुळे सहा -सहा महिन्यांचा दोन मुदतवाढ मिळाल्या होत्या. ही मुदत येत्या १० तारखेला संपत असून बोर्ड बरखास्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता अधिकृत पत्र रक्षा संपदा विभागाकडून प्राप्त झाल्याने येत्या ११ फेब्रुवारीपासून बोर्ड बरखास्त होणार आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कायद्यातील तरतुदीनुसार जेव्हा बोर्ड बरखास्त होतो तेव्हा पुढील निवडणूक जाहीर होईपर्यंत बोर्डाचा कारभार बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर व मुख्यकार्यकारी अधिकारी या द्विसदस्यीय समितीमार्फत चालतो किंवा बोर्डावर प्रशासक म्हणून लोकांचा प्रतिनिधी म्हणून सुद्धा संरक्षण मंत्रालय नेमु शकते. अश्यावेळी अध्यक्ष , उपाध्यक्ष लोकप्रतिनिधी व मुख्यकार्यकारी अधिकारी अशा त्रिसदस्यीय समिती मार्फत बोर्डाचा कारभार चालतो.
नवी दिल्ली - योग गुरू बाबा रामदेव यांनी केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प सर्व समावेशक असल्याचे म्हटले आहे. एढेच नाही, तर आरोग्याच्या दृष्टीने 137 टक्क्यांच्या वाढीसर 2 लाख 32 हजार कोटी रुपयांचे बजेट स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घोषित झाले आहे. याच बरोबर, देशात पॉम ऑईलचे उत्पादन वाढल्यानंतर पतंजली पाच लाख लोकांना रोजगार देईल, असेही बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.
इंफ्रास्ट्रक्चरच्या माध्यमाने देशाच्या विकासाला गती मिळते. गावाकडे राहणाऱ्या लोकांसाठी हा अर्थसंकल्प अत्यंत महत्वपूर्ण आहे. जल जीवन अभियान, शेतकऱ्यांना एमएसपी, मंड्यांचे आधुनिकीकरण किंवा अॅग्रीकल्चर इंफ्रास्ट्रक्चर विकिसित करणे, सरकारने सर्वच गोष्टींचा विचार केला आहे. रामदेव म्हणाले, सरकार भविष्यात सर्वसामान्यांसाठी निश्चितपणे काहीना काही पावले उचलेल. एकूणच बोलायचे, तर हा अर्थसंकल्प अत्यंत संतुलित तसेच प्रोग्रेसिव्ह आहे.
सरकार आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने पावले टाकत आहे. मग, इम्पोर्ट ड्यूटी वाढविणे असो किंवा देशात खाद्य तेलांपासून ते विविध प्रकारचे मॅन्यूफॅक्चरिंग वाढविणे असो. भारताला जगातील सर्वात मोठे मॅन्यूफॅक्चरिंग बनविण्याचे पंतप्रधान मोदींचे स्वप्न पूर्ण झाले, तर लक्ष्यावधी, कोट्यवधी लोकांना रोजगार मिळेल.
रामदेव म्हणाले, मी स्वतः आजवर पाच लाख लोकांना रोजगार दिला आहे. ज्या पद्धतीने इंडोनेशिया आणि मलेशियावरून आपल्याला पॉम मागवावे लागते, त्याचे उत्पादन भारतातच वाढले, तर देशाचे दोन लाख कोटी रुपये वाचतील आणि पाच लाखहून अधिक लोकांना तर स्वतः स्वामी रामदेवच पतंजलीच्या माध्यमाने रोजगार देतील, असेही बाबा रामदेव म्हणाले.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.