चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०२ ऑगस्ट २०२१

Date : 2 August, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
उच्चस्तरीय समितीतर्फे मंजूर ‘एमपीएससी’ पदे भरण्याचा मार्ग मोकळा :
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेली आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आली आहे.

  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली २८ जुलैला बैठक झाल्यानंतर दोन दिवसांत ३० जुलै रोजी वित्त विभागाने त्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध के ला असून ३० सप्टेंबपर्यंत ‘एमपीएससी’कडे प्रस्ताव पाठवले जाणार आहेत.

  • ‘कोरोना’च्या संकटामुळे केवळ सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील पदांच्या भरतीला यापूर्वी मंजूरी देण्यात आली होती. ४ मे २०२० आणि २४ जून २०२१ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील इतर विभागांतील रिक्त पदांच्या भरतीप्रक्रीयेवर निर्बंध होते.

  • मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या  विभागांतील रिक्त असणाऱ्या पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदासह उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी देण्याचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता.

अभियांत्रिकीसाठी देशपातळीवर एकच परीक्षा :
  • राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेप्रमाणेच (नीट) अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठीही देशपातळीवर एकच प्रवेश परीक्षा घेण्याचा केंद्रीय प्राधिकरणांचा विचार आहे. निती आयोगाच्या बैठकीत तशी सूचना करण्यात आली असून, याबाबत चाचपणी सुरू आहे.

  • अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशपातळीवर परीक्षा घेण्याबाबत केंद्रीय स्तरावर पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. निती आयोगाच्या गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. अभियांत्रिकीसाठी देशपातळीवरील सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याची सूचना आयोगाच्या सदस्यांनी बैठकीत केली. ‘अभ्यासक्रमाची गुणवत्ता राखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना देशपातळीवर समान संधी मिळावी यासाठी सामायिक प्रवेश परीक्षा असावी,’ अशी गरज सदस्यांनी व्यक्त केली.

  • देशपातळीवर अभियांत्रिकीसाठी एकच प्रवेश परीक्षा घेण्याचा प्रयत्न यापूर्वीही झाला. त्यातूनच ‘जेईई’ सुरू झाली. या परीक्षेला राष्ट्रीय संस्थांनी नकार दिला. त्यानंतर मेन्स आणि अ‍ॅडव्हान्स असे दोन स्तर झाले. जेईई मेन्सच्या गुणांनुसार राज्यांनी त्यांच्या अखत्यारितील संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया राबवणे अपेक्षित होते.

  • मात्र, त्याला राज्यांनी विरोध केला. त्यानंतर राज्यांसाठी ही परीक्षा ऐच्छिक करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रासह काही राज्ये त्यांची स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतात, काही जेईई मेन्सचे गुण गृहित धरतात तर काही राज्ये बारावीच्याच गुणांआधारे प्रवेश देतात. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी २०१७ मध्ये पुन्हा देशपातळीवर परीक्षेची चर्चा सुरू झाली. आता निती आयोगानेही देशपातळीवरील परीक्षेची सूचना केली आहे. तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरणातही याबाबत उल्लेख करण्यात आला आहे.

“नेहरुंनी १९४७ रोजी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणामुळेच अर्थव्यवस्था बिघडली” :
  • महागाईची समस्या एका दिवसात उभी राहिलेली नाही. भारताचे तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन केलेल्या भाषणातील चुकांमुळेच अर्थव्यवस्था ढासळण्यास सुरुवात झाली असं वक्तव्य भाजपा नेत्याने केलं आहे. मध्ये प्रदेशातील वैद्यकीय शिक्षणमंत्री विश्वास सारंग यांनी हे विधान केलं आहे. पहिले पंतप्रधान आणि त्यांच्या पक्षाने जर अर्थव्यवस्था योग्य स्थितीत ठेवली असती तर आज महागाई नियंत्रणात असती असं विश्वास सारंग यांनी म्हटलं आहे. ते भोपाळमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

  • काँग्रेसकडून वाढते इंधनदर आणि इतर मुद्द्यांवरुन आंदोलन करण्यासंबंधी विचारण्यात आलं असता विश्वास सारंग यांनी म्हटलं की, “देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अर्थव्यवस्थेला खिळखिळी करत महागाई वाढवण्याचं श्रेय कोणाला द्यायचं असेल तर ते नेहरु कुटुंब आहे”.

  • “महागाई एक किंवा दोन दिवसांत वाढत नाही. अर्थव्यवस्थेचा पाया एक किंवा दोन दिवसात उभारला जात नाही. जवाहरलाल नेहरु यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन भाषण देताना केलेल्या चुकांमुळेच देशाची अर्थव्यवस्था खालावली आहे,” असं विश्वास सारंग यांनी म्हटलं आहे.

  • दरम्यान यावेळी मोदी सरकारने गेल्या सात वर्षात अर्थव्यवस्था बळकट केली असल्याचं सांगायला ते विसरले नाहीत. भाजपाच्या कार्यकाळात महागाई कमी झाली असून लोकांचं उत्पन्न दुप्पट झालं आहे असा दावा त्यांनी केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी खऱं तर सोनिया गांधींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं पाहिजे असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

इटलीच्या जेकॉब्जला १०० मीटर शर्यतीचे सुवर्ण :
  • इटलीच्या मार्सेल जेकॉब्जने ऑलिम्पिकमधील सर्वात प्रतिष्ठेच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीचे सुवर्णपदक पटकावले. यासाठी त्याने ९.८ सेकंद अशी वेळ नोंदवली. या स्पर्धाप्रकारातील इटलीचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले.

  • अमेरिकेच्या फ्रेड केर्लीने रौप्य आणि कॅनडाच्या आंद्रे डीग्रेसीने कांस्यपदक मिळवले. उसेन बोल्टने निवृत्त होण्याआधी १३ वष्रे या १०० मीटर शर्यतीवर निर्विवाद वर्चस्व गाजवले

मोबाइल अ‍ॅपद्वारे पिकांची नोंदणी आता शेतकरी करू शकणार :
  • शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारित शेतकऱ्यांना पीक कर्जही दिले जाते. मात्र दोन तीन गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही असा शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. आता महसूल विभागाने आपल्या पिकाची रिअल टाईम नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. महसूल विभागाने यासाठी स्वतंत्र अप्लिकेशन निर्मिती केली आहे.

  • टाटा ट्रस्ट च्या सहाय्याने या अ‍ॅप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. या मोबाईल अ‍ॅप्लिकेशन मध्ये शेतकरी पिकांची माहिती भरतील, तलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील.

  • यामुळे पीक पेरणीची रियल टाइम माहिती अप्लिकेशन मध्ये संकलित होणार आहे. तसेच ही माहिती संकलित होताना पारदर्शकता येणार आहे. पीक पाहणी नोंदणीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवल्यामुळे पीक विमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल. शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यातही यामुळे सुलभता येईल. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि मदत देणेही शक्य होईल.

“आम्हाला दोघांनाही सुवर्णपदक मिळू शकतं का?” या प्रश्नावर अधिकारी “हो म्हणाले अन् :
  • ऑलिम्पिक असो किंवा इतर कोणतीही मोठी स्पर्धा असो त्यामध्ये एका खेळासाठी एकच सुर्वणपदक दिलं जातं. मात्र टोक्यो ऑलिम्पिकमध्ये एक वेगळच चित्र रविवारी पहायाला मिळालं. एका खेळासाठी दोन खेळाडूंना सुवर्णपदक प्रदान करण्यात आलं. विशेष म्हणजे हा संघिक खेळ नव्हता आणि दोन्ही खेळाडू वेगवेगळ्या देशांचे आहेत, मात्र त्याचवेळी ते एकमेकांचे चांगले मित्रही आहेत.

  • २३ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान चालणाऱ्या ऑलिम्पिक खेळांमध्ये २०० हून अधिक देशांचे ११ हजारहून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. तिसऱ्यांना जपानमध्ये ऑलिम्पिकचं आयोजन केलं जात असून रविवारी या ठिकाणी घडलेला प्रकार हा सर्वांनाच आश्चर्यात टाकणारा ठरला.

  • रविवारी सायंकाळी ऑलिम्पिकमधील उंच उडी प्रकाराचे अंतिम सामने पार पडले. यामध्ये कतारचा मुताज बर्सहिम, इटलीचा गनमार्को तेम्बेरी आणि बेलारुसच्या माकसिम या तिघांनी २.३७ मीटर उंच उडी मारली. मात्र तिघांनाही २.३९ च्या विक्रमापर्यंत पोहचता आलं नाही. मात्र दोन प्रयत्नांमध्ये माकसिमला योग्य पद्धतीने उडी मारता आली नाही. त्यामुळे तो तिसऱ्या स्थानी सरकला आणि त्याला कांस्यपदक देण्यात आलं. मात्र मुताज बर्सहिम आणि तेम्बेरी यांच्यादरम्यान सुवर्णपदकासाठी स्पर्धा होणार होती.

  • मात्र त्यापूर्वीच बर्सहिमने येथील पंचांना “आम्हाला दोघांनाही सुवर्णपदक मिळू शकतं का?”, असं विचारलं असता अधिकाऱ्यांनी चक्क होकारार्थी उत्तर दिलं आणि या दोघांनी एकाचवेळी जल्लोष सुरु केला. विशेष म्हणजे फ्रेण्डशीप डेच्या दिवशीच दोन मित्रांनी अशाप्रकारे सुवर्णपदक शेअर करण्याचा योगायोग जुळून आल्याची चर्चाही सोशल नेटवर्किंगवर रंगली होती.

०२ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.